आभाळानं वाजिवलाय ढोल
आभाळानं वाजिवलाय ढोल
हानम्या सुतार लुना घीऊन झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलाय
तंबाखूची पिशवी घिऊन धुरपी कॉकटेल सर्व्ह करायला निघालीय
विमान १८० मैल वेगानं आभाळात झेपावलयं
माकडांनी भक्तीसंगिताचा खिस काढत बानूबयावर ठेका धरलाय
गोलमेज परिषदेत मारुतीनं शनवारचा उपास सोडलाय
एक डोळा झाकून पारध्यानं चिमणीवर निशाना साधलाय
बेबेवाडीच्या धरणात वाळूचा उपसा चाललाय
डांबरीवर घसरुन संत्याचा पायजमा फाटलाय
आरं हाय कारं मंडळी हितं कोण? आज एंडरेल पिऊन आभाळानंच ढोल बडवलाय
च्यक्!
आब्स्ट्रेक्ट!
इलस्ट्रेशन ..
गोलमेज परिषदेत मारुतीनं
अरे काय हे!
छान
जव्हेरभौ आवडली कविता.