✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

स
सुधीरन यांनी
Sat, 04/09/2016 - 00:05  ·  लेख
लेख
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37100 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

१००

मितभाषी
Sat, 04/09/2016 - 14:49 नवीन
१००
  • Log in or register to post comments

१००

महासंग्राम
Sat, 04/09/2016 - 15:39 नवीन
धाग्याच्या शंभरी प्रित्यर्थ आता धडाडीच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई महिलांच्या इतर प्रश्नांद्दल जसे स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सार्वजनिक शौचालये याकडेही लक्ष देतील अशी अपेक्षा करूया
  • Log in or register to post comments

म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत

प्रदीप साळुंखे
Sat, 04/09/2016 - 16:07 नवीन
म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत जास्ती हस्तक्षेप करू नये असे वाटते का?
स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सार्वजनिक शौचालये याकडेही लक्ष देतील अशी अपेक्षा करूया
वरील कार्यांमध्ये स्त्रियांचाच 50% सहभाग असतो. म्हणजे पूर्ण छळ पुरूषी नसतो. म्हणजे हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी सासू ही स्त्रीच असते. भ्रूणहत्या करवून घेणारी आई ही स्त्रीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

हम्म,

प्रदीप साळुंखे
Sat, 04/09/2016 - 16:01 नवीन
हम्म, चौथर्यावर प्रवेश मिळाला हे उत्तमच झाले, आता ही भूमाता ब्रिगेड आमच्या कोल्हापूरात येवून महालक्ष्मी(कि अंबाबाई?) मंदिर गाभार्यात प्रवेश करणार आहेत अशी बातमी आहे.
  • Log in or register to post comments

हे ही पहा-

सुधीरन
Sat, 04/09/2016 - 17:22 नवीन
जगात अनेक प्रश्न असतात. एखाद्या प्रश्नाला कोणी हात घातला की लगेच त्याचे विरोधक या प्रश्नांचे काय? त्या प्रश्नांचे काय? असे मुद्दे मांडू लागतात. त्या त्या व्यक्तिवर अवलंबून असतं की त्यास कोणता मुद्दा महत्वाचा वाटावा व त्याने कोणत्या मुद्द्यास हात घालावा. स्त्री पुरुष समानता ही निदान तत्वतः तरी सर्वांस मान्य असते (वा तसे दाखवावे लागते). त्यामुळे इतर मुद्दे रेटले जातात. वेदाधिकारांविषयी बोलले तर, काय ठेवले आहे त्या वेदांत?, मंदिर प्रवेशाविषयी बोलले की, काय गरज आहे मंदिरांची? असे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु ज्यास हे अधिकार नाहीत वा नव्हते त्यास या अधिकारांचे महत्त्व वाटावे वा वाटू नये, हे आपण कसे सांगायचे? हो, २१वे शतक आहे, या अशा प्रश्नांत जास्त गुंतू नये. मात्र अनेक व्यक्तींची ही शिक्षण घेणारी केवळ पहिली वा दूसरी पीढ़ी आहे, त्यानी लगेच आपण वैश्विक वगैरे विचार करावा, हे सांगणे व त्यांची कीव करणे थोडेसे त्यांवर अन्याय करण्यासारखे ठरते. त्यात आपली शिक्षण व्यवस्था स्वतंत्र विचारांस कितपत वाव देते ते आपल्याला माहितच आहे!
  • Log in or register to post comments

सहमत

lgodbole
Sat, 04/09/2016 - 17:39 नवीन
ते लंडन पैलवान लंडनात बसुन विचरत आहेत .... बायकाना या आंदोलनाची काय गरज होती ? मतदानाच्या अधिकारासाठी इंग्लंडातही एके काली स्त्रीयानी मोर्चे काढले होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन

=))

मितभाषी
Sat, 04/09/2016 - 23:04 नवीन
आ न लंडन पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole

मतदानाचा अधिकार आणि मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार

बोका-ए-आझम
Wed, 04/13/2016 - 09:48 नवीन
यांच्यात फरक आहे. मतदान न केल्याने फरक पडतो. मंदिरात न गेल्याने काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole

तसं म्हणाल तर, मतदान केल्याने तरी काय फरक पडतो?

सुधीरन
Wed, 04/13/2016 - 10:08 नवीन
मंदिरात गेल्याने तुम्हाला नसेल फरक पडत, ज्यांना पडतो, त्यांना पडतो. पुरुष मंदिरात गेलेला चालतो, स्त्री का नाही चालत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे,

बोका-ए-आझम
Wed, 04/13/2016 - 10:12 नवीन
वस्तुस्थिती नाही. मंदिरात न जाण्याने काहीही फरक पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. ते माझं मत नाहीये. आणि मुळात असला भेदभाव करणारी मंदिरं किंवा कोणतीही धार्मिक स्थळं हवीत कशाला हा माझा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कुणीही दिलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन

मंदिरात जाणं ही कुणाची मानसिक

तर्राट जोकर
Wed, 04/13/2016 - 10:25 नवीन
मंदिरात जाणं ही कुणाची मानसिक गरज असू शकते किमान तेवढा तरी फरक पडू शकतो ते मान्य आहे का? मंदिरात जाण्याने काहीही फरक पडत नाही हेही तुमचे वैयक्तिक मत झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मंदिरात न जाण्याने काहीही फरक पडत नाही हे ही तुमचं मत आहे!

सुधीरन
Wed, 04/13/2016 - 10:25 नवीन
वस्तुस्थिती नाही! देव, धर्म, धार्मिक स्थळे इ. विषयी मला बिलकुल ममत्व नाहिए. परंतु त्यांचे अस्तित्व ही वस्तुस्थिती आहे. मग जर तिथे भेदभाव होत असेल तर तो नष्ट व्हावा अशी अपेक्षा कोणी करीत असेल व त्यासाठी आंदोलन करीत असेल तर त्यांस पाठिंबा आपण द्यायला हवा. जाता जाता- धार्मिक स्थळांस तुमचा विरोध आहे असे दिसते. त्यासाठी आंदोलन करू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सुधारणा टप्प्याटप्प्याणेच होतात-

सुधीरन
Sat, 04/09/2016 - 17:29 नवीन
सर्व मंदिरे बंद व्हावित यासाठी कुणाला आंदोलन करावयाचे असेल तर त्याने ते दुस-याना शिकविण्यापेक्षा स्वतः करावे. त्यांना ब-याच लोकांचा पाठिंबाही मिळू शकेल. लोका सांगे...
  • Log in or register to post comments

(No subject)

'पिंक' पॅंथर्न
Sat, 04/09/2016 - 22:36 नवीन
  • Log in or register to post comments

शनी देव आणि शनी ग्रह यांचा

'पिंक' पॅंथर्न
Sat, 04/09/2016 - 22:37 नवीन
शनी देव आणि शनी ग्रह यांचा काय संबंध आहे का ? ... शनी ग्रहाच्या भोवती कडी आहेत. अशीच कडी शनिमहाराजांना होती का ? ... मग ती कडी तृप्ती देसाई यांनी तोडली का ? ... वा !! वा !!.. एक यान करा "इस्रो" तर्फे आणि ती शनी ग्रहाची कडी पण तोडुन शनि ग्रह मोकळा करा.. एक अतिशय क्लेश दायक प्रतिक्रिया !!
  • Log in or register to post comments

(No subject)

'पिंक' पॅंथर्न
Sat, 04/09/2016 - 22:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हे असं कोल्हापूरात कधी होणार

सूड
Mon, 04/11/2016 - 11:05 नवीन
हे असं कोल्हापूरात कधी होणार त्याची वाट बघतोय. बायकांनी आंदोलनं केली की पुरषांना पण प्रवेश नाकारायचा हा पॅटर्न शिंगणापूरवाल्यांनी कोल्हापूरातनंच उचललेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

याची माहीती आणि ठोस संदर्भ

नाखु
Mon, 04/11/2016 - 11:53 नवीन
क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.
इथेच दिले पाहिजेत अन्यथा एका शांत आणि बाजारीकरणाचा लवलेष नसलेल्या सुंदर देवस्थानचा अवमान केल्याबद्दल गरीब चिमणा यांनी जाहीर माफी मागेतली पाहिजे ( त्याकरीता त्यांनी आत्मशुन्य्,केंजळे कुठलाही आय डीने न लिहिता गरीब चिमणा याच आय्डीने लिहावे, ता. क. मी मिपाकरांबरोबर (पंच म्हणून घेउन) गरीब चिमणा यांना (माझ्या खर्चाने ) गोंदवल्यास घेऊन जायला तयार आहे पुण्यात असतील पुण्यातून्,मुंबैत असतील तर मुंबैहून तेथील विश्वस्थांकडून कधी आंदोलन करून ही प्रथा (आधी असल्यास) बंद पाडली तेही कळेल आणि गरीब चिमणा यांना काही (बुद्धी गंज निवारक प्रसाद) मिळाला तर मिपाकरांचेही भले होईल. गोंदवल्यास किमान ७-८ वेळा गेलेला नाखु
  • Log in or register to post comments

अद्द्या, मृत्युन्जय, विजय

श्रीगुरुजी
Mon, 04/11/2016 - 15:21 नवीन
अद्द्या, मृत्युन्जय, विजय पुरोहित, कपिलमुनी, तर्राट जोकर , नाद खुळा, गरीब चिमणा नामक ब्रिगेडीच्या विद्वेषी प्रतिसादाला योग्य उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! हा माणूस अत्यंत जात्यंध आहे. याने इतर धाग्यातही आपली ब्रिगेडी पिंक टाकलेली आहे. हा म्हणे गोंदवल्याच्या जवळ फलटणला राहतो म्हणून याला इतरांपेक्षा म्हणे जास्त माहिती आहे. मुळात फलटण हे गोंदवल्यापासून सुमार्र ५० किमी अंतरावर आहे. म्हणजे ते गोंदवल्याजवळचे गाव नाही. दुसरं म्हणजे हा आपल्या उभ्या आयुष्यात कधी गोंदवल्याला गेला असेल का याविषयी शंका आहे. मी स्वतः गोंदवल्याला दरवर्षी जातो. आतापर्यत किमान १५-१६ वेळा मी तिथे गेलेलो आहे. ३-४ वेळा मी तिथल्या भक्तनिवासात एक रात्र राहिलेलो सुद्धा आहे. मी जानवे, शेंडी इ. ब्राह्मणत्वाची कोणतीही बाह्यचिन्हे कधीही वापरीत नाही. परंतु आजतगायत तिथल्या कोणीही एका शब्दाने सुद्धा यावर विचारलेले नाही किंवा जानवे, शेंडी इ. नाही म्हणून कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला गेलेला नाही. जानवे असलेल्यांना कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक दिल्याचे पाहिलेले नाही व जानवे नसलेल्यांना कमी दर्जाची वागणूक दिल्याचे पाहण्यात नाही. जानवे असलेल्यांना व नसलेल्यांना सुद्धा एकाच रांगेतून दर्शनासाठी प्रवेश असतो, एकाच रांगेतून ते जेवणासाठी जातात, जे अन्न जानवेवाल्यांना देतात तेच अन्न जानवे नसलेल्यांना सुद्धा देतात, कोणाकडूनच एक रूपया सुद्धा मागितला जात नाही, जानवेवाले व जानवे नसलेले मंदीरात, भोजनगृहात, ध्यानमंदीरात एकमेकांशेजारीच एकाच सतरंजीवर बसतात, जानवेवाले व जानवे नसलेले रात्री एकाच मोठ्या सभागृहात एकाच भल्यामोठ्या सतरंजीवर शेजारीशेजारी झोपतात, जानवेवाल्यांना गाद्यागिरद्या व जानवे नसलेल्यांना झोपायला तरट असा भेदभाव कधीही नसतो, जानवेवाल्यांना स्पेशल बैठक, दर्शनव्यवस्था नसते, रोज हजारो भक्त जेवून जातात व त्यासाठी कोणताही मोबदला नसतो. सर्वत्र बर्‍यापैकी स्वच्छता व शिस्त असते. शिर्डी किंवा तिरूपतीप्रमाणे या गावचे शहरीकरण, व्यापारीकरण झालेले नाही. अशा देवस्थानाबद्दल धडधडीत खोटे व जातीय विद्वेषाने भरलेले आरोप करताना गरीब चिमणा या ब्रिगेडीला मनोमन शरम वाटायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

गरिब चिमणा उडालेला आहे.

पिलीयन रायडर
Mon, 04/11/2016 - 15:53 नवीन
गरिब चिमणा उडालेला आहे. तक्रारीची दखल घेतल्याबद्दल सरपंचांचे जाहीर आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पुन्हा येईल

नाखु
Mon, 04/11/2016 - 16:00 नवीन
आणि किमान १५-२० दिवस तळ ठोकेल हे नक्की . इथेच एक गोडबोले नावाचा आय डी आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय

होबासराव
Mon, 04/11/2016 - 16:07 नवीन
आणि १० व्या मिनिटाला गरिब चिमणा ह्या नावाने मला व्यनि केला "हं तर काय म्हणत होतात तुम्ही?" ह्या आशयाचा. जणु काही चहा पिऊन आलो, चला गप्पा कंटिन्यु करुया. http://www.misalpav.com/comment/825393#comment-825393 पिरा इथे ह्या धाग्यावर सुद्धा सेम झालय, तुमच्या प्रतिक्रिये नंतरच्या २ प्रतिक्रिया बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला

प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 16:09 नवीन
ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

हं समजलं!!!

विजय पुरोहित
Mon, 04/11/2016 - 16:10 नवीन
हं समजलं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड.

होबासराव
Mon, 04/11/2016 - 16:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली भौ

होबासराव
Mon, 04/11/2016 - 16:14 नवीन
प्रश्न हा पडतो कि त्याचा आत्ताचा आयडी ३ आठवड्यांपुर्वि घेतलाय...म्हणजे हा सतत आय्डी तयार करतच असतो. मला माझा आयडी अ‍ॅक्टिव्हेट व्हायला बराच वेळ वाट बघावि लागलि होति ते आठवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं

प्रचेतस
Mon, 04/11/2016 - 16:20 नवीन
ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं आणि हल्ली मोबाईल डाटाचे आयपी डायन्यामिक असल्याने सतत बदलत असतात त्यामूळे तपासणे अवघड. बाकी अशा व्यक्ती आयडी सतत तयार करतात असतात. ह्यांना ब्यानरुपी असुरक्षिततेच्या भावनांनी सतत घेरलेले असते. ह्यांना सुप्तावस्था आवडत नसल्याचे दिसते. हे दिसले की जराही दयामाया न दाखवता लगेच उडवणे हाच उपाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

हे दिसले की जराही दयामाया न

अद्द्या
Mon, 04/11/2016 - 16:46 नवीन
हे दिसले की जराही दयामाया न दाखवता लगेच उडवणे हाच उपाय >> हे असं होऊ लागेल तेव्हा लागेल तेवढे मांडे पाठवण्यास मी तयार आहे =]] jokes apart असं खरच होईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आधी मांडे घेऊन या, मग बोलू =)

सूड
Mon, 04/11/2016 - 17:20 नवीन
आधी मांडे घेऊन या, मग बोलू =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मलाही हाच प्रश्न पडतो.

पिलीयन रायडर
Mon, 04/11/2016 - 16:22 नवीन
मलाही हाच प्रश्न पडतो. अजुन एक प्रश्न असाही पडतो की प्रत्येक नव्या आयडीसाठी नवा इमेल आयडी पण लागतो ना? म्हणजे इतक्या डु आयडी साठी इतके नानाविविध इमेल तयार करायचे. आणि हा सगळा खेळ सांभाळायचा.. कशासाठी माणुस असं करत असेल? आम्हाला घरातले आणि हापिसातले खेळ खेळुन खेळुन मरायला होतंय... बाकी सुद्धा कितीतरी चमत्कारिक आणि मनोरंजक गोष्टी आयुष्यात चालु असतात. लोकांना बरा वेळ मिळतो राव इथे तमाशे करत फिरायला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

एक तर बेरोजगार इंजिनियर असेल

अद्द्या
Mon, 04/11/2016 - 23:30 नवीन
एक तर बेरोजगार इंजिनियर असेल किंवा नको तेवढ्या वरच्या पदावर पोचलेला मूर्ख असेल :) या दोघानाही वेळ भरपूर असतो , पहिल्याला कमीत कमी अक्कल तरी असते , दुसऱ्याचा मेंदू वापर कमी झाल्यामुळे सडत चाललेला असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अजुन एक प्रश्न असाही पडतो की

सायकलस्वार
Mon, 04/11/2016 - 23:36 नवीन
अजुन एक प्रश्न असाही पडतो की प्रत्येक नव्या आयडीसाठी नवा इमेल आयडी पण लागतो ना?
गैरसमज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कै म्हणता ;)

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 23:53 नवीन
कै म्हणता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार

???

विजय पुरोहित
Mon, 04/11/2016 - 16:10 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

तो नवीन स्त्रीरूपात आलेला

श्रीगुरुजी
Mon, 04/11/2016 - 20:39 नवीन
तो नवीन स्त्रीरूपात आलेला आयडी पूर्वाश्रमीचा गरीब चिमणा नाही. तो एल गोडबोलेचा नवीन अवतार आहे. गरीब चिमणा नक्की येणार. आला की ते कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

वाह गुरुजि आपकि पारखि नजर और

होबासराव
Mon, 04/11/2016 - 20:45 नवीन
वाह गुरुजि आपकि पारखि नजर और ये सायकोपॅथ युजर (डुआयडी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

..

mugdhagode
Mon, 04/11/2016 - 15:36 नवीन
छन चरचा
  • Log in or register to post comments

आजचा मटा.

mugdhagode
Mon, 04/11/2016 - 15:49 नवीन
http://m.maharashtratimes.com/nation/drought-in-maharashtra-result-of-sai-worship-shankaracharya/articleshow/51774788.cms शनि 'पापग्रह' आहे. त्यामुळे शनिची पूजा केल्यास महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढतील, बलात्काऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
  • Log in or register to post comments

आलात :)

टवाळ कार्टा
Mon, 04/11/2016 - 20:49 नवीन
आलात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

पूजा करुन गुन्हे वाढणार

स्रुजा
Tue, 04/12/2016 - 07:00 नवीन
पूजा करुन गुन्हे वाढणार असतील तर तुम्ही मंदीरात जाऊन २-४ शिव्या द्या शनिदेवाला, काही गुन्हे तरी थांबतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का?

गामा पैलवान
Mon, 04/11/2016 - 18:25 नवीन
सुधीरन, तुमचं सुरुवातीचं विधान पटलं नाही : >> त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज >> गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. ही प्रथा असण्यामागे स्त्रियांवर मुद्दाम अन्याय करायचा हेतू होता का? असल्यास त्याचा विडा द्यावा. नसल्यास ती प्रथा मोडीत काढून काय लाभ होणार आहे? तसेच स्त्रियांना चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्याने त्या पुरुषांच्या बरोबरीस कशाकाय येणार आहेत? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

विडा नव्हे विदा. धन्यवाद व चुकीबद्दल क्षमस्व.

गामा पैलवान
Mon, 04/11/2016 - 18:26 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

उत्तर आधीच दिलंय, तरीही-

सुधीरन
Mon, 04/11/2016 - 22:42 नवीन
१. उघड दिसणा-या गोष्टींस विदे द्यायचे? तुम्हीच विचार करा की, का स्त्रीयांस मंदिरात / चौथ-यावर / गाभा-यात का प्रवेश दिला जात नसेल? जी कारणे दिली जातात (धार्मिक ग्रंथांत वगैरे), ती तर्काच्या कसोटिवर टिकतात का? तुमच्या माहितीत तशी एखादी गोष्ट असेल तर सांगा. २. स्त्रियांवर अन्याय करण्याचा, त्यांस कमी लेखण्याचा, त्यांस स्वतःविषयी कमिपणा वाटवण्याचा हेतू सहजच दिसतो. ३. ही प्रथा मोडीत काढल्याने- इतर मंदिरांत स्त्रीयांचा प्रवेश होण्यास साह्य होईल, अशा प्रथांविषयी स्त्रीया प्रश्न करू लागतील, जागरूकता वाढेल, सोबतच अन्य स्त्रीविषयक प्रश्नांस हात घातला जाईल. ४. चौथ-यावर प्रवेश मिळवणे यामुळे 'त्या'बाबतीत स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीस आल्याच की! असं सर्व ठिकाणी, सर्वच बाबतीत होईल, तेव्हा त्या सर्वच ठिकाणी, सर्वच बाबतीत बरोबरीस येतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

असल्यास त्याचा विडा द्यावा

होबासराव
Mon, 04/11/2016 - 18:48 नवीन
विडा पुर्वि उचलायचे, आजकाल फकस्त सुपारी देउन काम भागते :) ह.घ्या. ;)
  • Log in or register to post comments

ही बातमी बघा-

सुधीरन
Mon, 04/11/2016 - 22:55 नवीन
m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=12079861
  • Log in or register to post comments

लिंक ...

mugdhagode
Mon, 04/11/2016 - 23:03 नवीन
www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=12079861
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीरन

धन्यवाद.

सुधीरन
Mon, 04/11/2016 - 23:08 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

शनि जागृत ग्रह आहे हे या

वैभव जाधव
Mon, 04/11/2016 - 23:58 नवीन
शनि जागृत ग्रह आहे हे या धाग्यावर आल्यावर पुराव्याने शाबीत झालेलं आहे.
  • Log in or register to post comments

अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/13/2016 - 07:14 नवीन
अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या ज्या खर्‍या गरजा आहेत त्यासाठीही जनआंदोलन उभे करावे. देव मंदिर वगैरेंपेक्षा हुंडाबळी, स्त्री भृणहत्या, सामाजिक सुरक्षा, आरोग्यसेवा वगैरे आवश्यक गोष्टींसाठी आपली आंदोलनशक्ती खर्च करावी.
  • Log in or register to post comments

२४ तास न्यूज वाले जर या

अद्द्या
Wed, 04/13/2016 - 10:50 नवीन
२४ तास न्यूज वाले जर या बातम्यासाठी नाचणार असतील बाईंच्या सोबत तर ते हि करतील , त्यात काय एवढं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा