Skip to main content

आयडी = ?

लेखक नीलमोहर
Published on मंगळवार, 15/03/2016
इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्‍याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्‍याने इमॅजिन करतो. हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत: श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी, एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण. (वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;) तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ? होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)

वाचन संख्या 15952
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

जयंत काका - म्हणजे संस्कारी बाबूजी सारखे = आलोकनाथ

In reply to by महासंग्राम

आणि बोका भौ म्हणजे - इसेर ह्यारेल गॅरी ट्रुमन- एखाद्या अमेरिकन प्रेसिडेंट सारखे ( म्हणजे पर्ल हार्बर मधल्या प्रेसिडेंट सारखे )

तो पण फूल और कांटे चा... दोन मोटरसयकलीवर पाय ठेवून हात उंचावून कालेजात एण्ट्री मारणारा!!

निलमनोहर = इंदिरा गांधी मुक्त विहारी = वागळे की दुनिया वाले वागळे विवेक ठाकुर = आसाराम बापू + अर्नब गोस्वामी

पैसा = रोहिणी हट्टंगडी पिलीयन रायडर = ललिता पवार स्रुजा = अलका कुबल अजया = दुर्गा खोटे

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

तुम्हाला वर मुंडी करायची सोय नाही राहिली आता!

आर यू ऑब्सेस्ड विथ आयडी? बादवे, मी कोणाला आठवावा इतका प्रसिद्ध आहे की काय मिपावर? हम्म! मिपावावर कम करना चाहिये. इदर पडीक नई रेहना चाहिये. क्या बोल्ताय? रच्याकने वरील बरीच मंडळी आणि त्यांची हिरोहिरविणी प्रतिके यांत काहीही साम्य नाही असे ठामपणे म्हणू शकतो. :-)

In reply to by एस

थोडं चुकलं, ऑब्सेस्ड विथ मिपा असं पाहिजे ते :) तुमच्या समोरचंही नाव खोडून नंतर दुसरं लिहीलं, आधी आमिर खान लिहीलं होतं, इथे आमिर - सुरूवातीचा गोंडस, चांगले काम करणारा, बुद्धिमान वाटणारा तो आणि आत्ताचा सार्कॅस्टीकली भांडेफोड करणारा निरागस पीके.

पिलीयन रायडर = ललिता पवार मि ह्यालाहि एव्ह्ढा नाहि हसलो जेव्हढा अजया = दुर्गा खोटे ह्याला हसलो. अजयाताई आता फ्रि मध्ये ३० हि दात विदाऊट अ‍ॅनेस्थेशिया काढतिल ह्यांचे :) ह्.घ्या.

In reply to by बॅटमॅन

समांटरः प्रिया बापट किंवा उमेश कामत सुद्धा फक्त छान दिसणं आणि छान अभिनय करणं एवढं करतात. जास्त जनरल नॉले़ज वगैरे च्या भानगडीत पडत नाहित असं एक दोन कार्यक्रमात पाहिलं आहे. प्रिया बापटचं नाव आलं म्हणून लिहिलं. बाकि चालु द्या.

आणि आता दुसरे आयडी घ्या ना राव! मिपावर इतके आयडी आहेत. थोड्या अनवट प्रवासवर्णनांसारखेच कमी परिचित आयडी व त्यांची वर्णने असावीत असे भविष्यात असा धागा काढू इच्छिणार्‍यांना विनंती.

In reply to by एस

+१! कंटाळा आला तेच तेच आयडी आणि त्यांची कौतुक वाचून! आमचा आयडी कुणालाच आठवत नाही म्हणून अशा सर्व धाग्यांचा निषेध! :)

In reply to by रातराणी

निषेध ठेव तुझ्याजवळ, तू कुहू (स्पृहा जोशी) वाटतेस, एका लग्नाची कितवी गोष्ट मधली, किंवा मग कभी कभी मधील राखी सिलसिला मधील रेखा, युअर चॉइस :)

In reply to by नीलमोहर

बापरे काय रेंज आहे कराक्टेरची एक अत्यंत बालिश आहे, एक काकूबाई आहे आणि एक उनाड ;) ह्या सगळ्याचं मिश्रण असलेला कुणी होऊन गेल नाही का ;) तरी पण एक पुरस्कार ठेऊन घेते आणि बाकीचे उदार अंत:करनाणे परत करते. जाव ऐश कर लो.

In reply to by रातराणी

अरेरे उनाड ? असा शब्द वापरावा तोही एका स्त्रीसाठी, निषेध असो. ह्या सगळ्याचं मिश्रण असलेला कुणी होऊन गेल नाही का - कंगना चालेल ? पण तुला अमृता सुभाष जास्त सूट होईल, छान आहे ती:)

माझी बाईको म्हणते "should we leave mipa?,intolerance is on growth ". आमिर खान अर्र|||गेला बाजार मकरंद अनासपुरे म्हटल असत तर ...

In reply to by जेपी

तुमच्यासाठी आधी सचिन लिहिले होते, सचिन म्हाणजे 'अलबेला, आला आला जयराम आला', वाला तो गोग्गोड सचिन अर्थात, म्हागुरू नाही, पण परत कन्फ्यूजन झालं मग नेम चुकला :)

In reply to by नीलमोहर

आग्गाग्गा....जेपी म्हाग्रुंसार्खे "चला ना...चला ना...चला ना...गडे..." असे गाणे म्हणत मिपाकरांना संन्यास घ्यायला उद्युक्त करत आहे असे दृष्य डोळ्यासमोर आले =))

किचेन = केतकी माटेगावकर

श्रीरंग,जोशी--आलोकनाथ, भाते-ज्यु.आलोकनाथ, उगा काहितरीच-सेकंड ज्यु.आलोकनाथ.. गुर्जी-जॉनी लिवर, जव्हेरगंज-मकरंद अनासपुरे.. विपु--रागीट मकरंद अनासपुरे.. तजो- साऊथ ईंडीयाचा कुठलाही स्टार...

In reply to by जेपी

श्रीरंग जोशी आलोकनाथ आणि मी ज्यु.आलोकनाथ! श्रीरंग आणि मी जवळपास एकाच वयाचे असु. तरीही मला ज्यु.आलोकनाथ म्हणल्यापध्दल धन्यवाद. दोन वर्षांपुर्वी मिपा कट्टयावर एका मिपाकराने मला कुलदीप पवार म्हणले होते ते आठवले. आता त्यांना माझ्यात आणि कुलदीप पवार यांच्यात काय साम्य दिसले ते तेच जाणोत. बाकी, भावी संपादक म्हणुन आगाऊ शुभेच्छा!

श्री गावसेना प्रमुख = निळू फुले प्रचेतस = जयवंत वाडकर श्रीगुरूजी = श्रीराम लागू(पिंजरामधले)

रच्याकने वरील बरीच मंडळी आणि त्यांची हिरोहिरविणी प्रतिके यांत काहीही साम्य नाही असे ठामपणे म्हणू शकतो. :-)
सहमत आहे. नीमोकडून अशा फालतू धाग्याची अपेक्षा नव्हती :(

फर्मासच धागा खुपच मस्त आशयाशी सहमत -- स्पारंग गोडबोले

टवाळ कार्टा = दगडू परब(टाईमपासवाला) आत्मबंध = भाऊ कदम

प्रा . डॉ. दिलीप बिरुटे = दिलीप प्रभावळकर असा माझा पक्का समज कितीतरी वर्षे होता ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(पळतो!) . . . मी नाय्ये बर्का आता इथे.... गावाकडं गेलोय!

म्हटले कि नीलगाय आठवते

अरे रे वाईट झाले!! सगळा टीआरपी इकडे आला!!! पहिल्या दीड तासातच 23 प्रतिसाद!!! ओपनिंग चांगलं हाय....चालू द्या

सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल जे एन यु वगैरे वगैरे येत राहतात, लोकांना गिगाबायटी प्रतिसाद द्यायला जमतं याचं नवल वाटतं इत्यादीबाबत खफवर बोलायचे आणि पुन्हा आपणच फक्त विडंबने किंवा काथ्याकुटातलेच धागे काढायचे हे काही पटले नाही. ललित, कथा, भटकंती, इतिहास, कविता, पाकृ आणि अजूनही बरंच काही लिहिण्यासारखं आहे. पण असो. बाकी ते मृणाल कुलकर्णी वाचून हहपुवा. :)))

In reply to by मधुरा देशपांडे

@ मधुरा देशपांडे, बाकी विषयांवर लिहिलेले आहे, लिहीत असते, तुम्ही वाचलेत का? - प्रतिसाद नसले की कळत नाही म्हणून विचारते. मृणाल कुलकर्णी एक उत्तम अभिनेत्री दिग्दर्शिका आहे, सौंदर्य बुद्धिमत्ता सशक्त अभिनय इ.अनेक गुण तिच्यात एकवटलेत. तुम्हीही अनेक गोष्टींत पारंगत आहात म्हणून तुमचे कौतुक होते ते, असो. एखाद्याला कॉम्पलीमेंट देणेही चूक कसे ठरू शकते हे स-उदाहरण दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. (कोणाला सई, अमृता इ.म्हटले असते तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या?.. कल्पनाही नको ;) @ स्नेहाताई, तुमचे बोट धरूनच मिपावर पावले टाकायला सुरुवात केलीय, तुमच्यात mpk hahk वाली गोड पण खंबीर आई दिसते शिवाय नवरा माझा नवसाचा मधील धमाल नेतीण बाईही, म्हणून तुमच्यासाठी रिमा लागू :)

In reply to by नीलमोहर

मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१ होतं ते, इतर कशाला नाही. गैरसमज नसावा. इतकंच म्हणायचं होतं की चांगलं लिहिण्याचं पोटेन्शियल असताना टैमपास धागे काढू नकोस :)

In reply to by सस्नेह

वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर मारा आणि चांगले लिहिताना टैम्पास धागे काढायला विस्रू नका...दुसर्यांच्या आवडी निवडी जपायला तुम्ही आंतरजालावर येत नाहीत =))

In reply to by टवाळ कार्टा

वरच्या म्हणजे माझ्या की नीमोच्या ? हा प्रतिसाद मला आहे की नीमोला ?
दुसर्यांच्या आवडी निवडी जपायला तुम्ही आंतरजालावर येत नाहीत =))
पसंद अपनी अपनी...

In reply to by नीलमोहर

तुमचे धागे मी वाचतच नाही असं अजिबात नाही. मध्यंतरी बर्‍याच कामात व्यस्त होते, त्यामुळे कदाचित काही वाचले नसतील आणि वाचले तिथेही प्रतिसाद दिले नाहीत किंवा द्यायला जमले नाही. तुमची बॅनर्स आवडली तेव्हा कौतुकही केलंच, आता नाही पटला एखादा धागा तर तसं लिहिलं. आणि याआधीही तुमच्या धाग्यांवर जमेल तसे, वेळ असेल तेव्हा आणि प्रामाणिकपणे वाटले ते लिहिलेच आहे. मौजमजा वाल्या धाग्यांचा प्रॉब्लेम नाही मला, विडंबनांचा पण नाही. हे सगळे मिपाचेच भाग आहेत. पण सतत तेच तेच होतंय असं वाटलं. असेच धागे सतत सुरू राहिले की मग पुढे प्रतिसादातून मात्र बरेचदा लेव्हल घसरत जाते. (हे पुन्हा तुम्हाला एकटीला नाही, जनरल बोलतेय) अनेक आयडी, डु आयडी सतत तेच धागे वर येत राहतात. आधीच राजकारण वगैरे धाग्यांवर धुळवड चालू आहे, त्यात फक्त मौजमजा म्हणून असे धागे काढायचे आणि तेही खफ वर तुम्हीच याबाबत बोलला आहात बरेचदा म्हणून जास्त जाणवले. मग इतर धुळवडीला तरी कशाला बोलायचे. मृणाल कुलकर्णीशी तुलना वगैरेचा राग अजिबातच आला नाही, ते ह. घेण्याइतपत मिपावर रुळलेली आहे. आता त्या तुलनेने हसू आले यात काय चूक? असो, अजून वाद वाढवायचे नाहीयेत. त्यामुळे लेखनसीमा.

काय हे ?? बाकीच्या रणधुमाळीत बदल म्हणून असे खेळीमेळीचे निव्वळ करमणुकीसाठी धागे लिहिते मी, त्यात कसलाही खोडसाळपणा फालतूपणा नाही. वर काही लोकांनी वेडेवाकडे प्रतिसाद दिलेत, असे लोक आणि प्रतिसाद मलाही नकोत माझ्या धाग्यावर, पण त्यासाठी धाग्याला वाईट म्हणायचं प्रयोजन समजत नाही. गंभीर लिहिले तरी प्रॉब्लेम, गंमतीशीर हलकेफुलके लिहिले तरी प्रॉब्लेम, का मुळात प्रॉब्लेमच वेगळा आहे.. To write or not to write.... असो, संमं धागा उडवला तरी चालेल.

In reply to by नीलमोहर

बिनधास्त लिहा.
गंभीर लिहिले तरी प्रॉब्लेम, गंमतीशीर हलकेफुलके लिहिले तरी प्रॉब्लेम, का मुळात प्रॉब्लेमच वेगळा आहे.. To write or not to write....
याच्याशी सहमत. कधीकधी लोक्स १०० कपडे असूनही काय घालू याची टोटल न लागणाऱ्या माणसांसारखे वागतात. सोडून द्या. त्यांची नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा!

In reply to by बोका-ए-आझम

हाहाहाहा भारी आयड्या. एक अ‍ॅडीषन. आपणच असल्या माणसाच्या पतंगाच्या मांजाला फुल्ल ढील द्यायची आधी. मग आपणच हळूच मांजा काटायचा. ट्रीपल मज्जा. टाइमपास झाला, मांजा काटल्याचे सुख, गेला उडत म्हणायला मोकळे.

In reply to by बोका-ए-आझम

बिनधास्त लिहा. नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे करताना म्हणायला गाणे आहेच. .

अन बाई मी पतंग उडवित होते.

अहाहाहाहा. लाखात अशी देखणी जयश्री गडकर आन आशा भोसले. (एखांदी आयडी साधी मानसं वाली जयश्री गडकर सारखी नाही का?) होउ द्या शिट्ट्या.

In reply to by अभ्या..

'साधी माणसंमधली जयश्री गडकर' असा आयडी घेतला तर संंमं मान्य करेल का ब्रे? काय म्हणता प्राडाॅ?

In reply to by बोका-ए-आझम

आपली कै हरकत नै. पण तुम्ही नै आयडी घ्यायचा. बोका ए आझम ही प्रतिमाच आमच्या मनामधे घट्ट होऊ द्या. आपली प्रतिमा म्हणजे आपण रविंद्र महाजनी. शांत, गंभीर, शक्यतो विचार करुन बोलणे, वगैरे इत्यादी. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी हे बायकोला दाखवलं आत्ता. तिला हसणं आवरत नाहीये. शांत, गंभीर, विचार करून - सहन होत नाहीये तिला!

In reply to by बोका-ए-आझम

हाहा. हसमुख, मिश्किल आणि राजा माणुस तर नक्की आहात, हे तरी वहिनी मान्य करा. :( ( कौतुक करतोय तुमचं. भेटल्यावर मित्रांचा पेयपानाचा बंदोबस्त करा.) -दिलीप बिरुटे

निमो धागा आवडला. मस्तय. खरं तर मला आयडीवरुन बरेच चित्र रंगवावी वाटली पण मिपाकरांचे प्रतिसाद वाचण्यातच मला हल्ली मजा येते. निमो आपला धागा मौजमजेच्या खालील परंपरेतील धागा आहे. उदाहरण द्याययचं तर मिपाकरांनो तुमचे वय काय, मनोक्रमी मिपाकर, बालपणीचे मिसळप्रेमी असे अनेक धागे हे पुरुषांनी काढलेले आहेत. आज पहिल्यांदा एक महिलेने बिंधास्तपणे आयडी वरुन काही कल्पना रंगवली आहे एक वाचक मिपाकर म्हणुन धागा आवड्ला. निमो लिखते रहो. आपण मिपाच्या मुख्य बोर्डावर नेहमीच धागे रंगवत असतात लिहित राहा. बाकी, उपेंद्र लिमयेत आणि आमच्यात काही साम्य लोकांना आढळतात. बाकी, टॉलीवूडचा हिरो तर आहेच आहे. बाकी, लेखनासाठी शुभेच्छा. ;) -दिलीप बिरुटे (मिपास्टार)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण नेहमीच प्रोत्साहन देत असता त्यासाठी धन्यवाद. तुम्ही वर काही धाग्यांचे उल्लेख केलेत तसाच काहीसा धागा अपेक्षित होता, आणि हाच धागा इतर कोणी काढला असता तर किमान द्विशतकी झाला असता हेही नक्की. असो, चालायचे. बाकी शरद पोंक्षे आणि तुमच्यातही काही साम्य आढळतात. (आता मात्र पळा.. :)

In reply to by नीलमोहर

>>>>> बाकी शरद पोंक्षे आणि तुमच्यातही काही साम्य आढळतात :( आजपासून प्रोत्साहन प्रतिसाद भत्ता बंद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी सगळ्यांचे जाऊ दे, तुम्हाला तुम्ही स्वतः कोणासारखे वाटता? 'खरं तर मला आयडीवरुन बरेच चित्र रंगवावी वाटली पण मिपाकरांचे प्रतिसाद वाचण्यातच मला हल्ली मजा येते.' - रंगवा की चित्रं, ते प्रतिसादांचे पतंग उडविण्यची शिकवण तुमचीच न..

मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे असाच विचार का यावा? कायम तू लिहिते त्याला चांगलंच म्हणत राहावे अशी अपेक्षा आहे का? आपण कोलित द्यायचे आणि नंतर वंडरिंग व्हाय मुद्रेत जायचे हेही चुकीचेच आहे.अशा धाग्यावर काय प्रतिसाद अपेक्षित होते?

In reply to by स्पा

तेच की कित्ती काळीज पिळवटणारं आणि कटु लिहीलंय बघ की!! गोग्गोड लिहायचं आणि चार लोकं लिहीत असतील त्याच्या नेमकं उलट लिहायचं, पण ते चितळे यांच्या साजूक तुपात तळून मग पाकात घोळलेलं असलं पाहिजे. -सुरंग उडविले. ;)

In reply to by अजया

मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे असाच विचार का यावा? - गरज नसतांना, कारण नसतांना तिरकस प्रतिसाद येत असल्यावर असा विचार मनात आला तर काय चुकलं. काही कंपूतील लोक माझ्या धाग्यांवर प्रतिसाद देत नाहीत हे माझ्या लक्षात येत नसेल असे तुम्हाला वाटते का ? अर्थात त्याने मला काही फरक पडतो असे मुळीच नाही. माझ्या धाग्यांवर निवडक लोक चांगले प्रतिसाद देतात, (या लोकांत तुम्हीही आहात) कधी कुठे न लिहीणारेही माझ्या धाग्यांवर आवर्जून प्रतिसाद देऊन जातात याचे मला कायमच अप्रूप वाटते, किंबहुना तीच माझे इथे लिहीत राहण्यामागची प्रेरणा आहे. कायम तू लिहिते त्याला चांगलंच म्हणत राहावे अशी अपेक्षा आहे का? - अशी अपेक्षा करण्याइतकी मूर्ख वा स्वकेंद्रीत मी नाही. आपण कोलित द्यायचे आणि नंतर वंडरिंग व्हाय मुद्रेत जायचे हेही चुकीचेच आहे. - तुम्हाला कोलीत दिसले, काहींना निखळ टाईमपास दिसला, ज्याची त्याची दृष्टी. तुमच्या मनात माझ्याविषयी असा विचार आला म्हणजे तुम्ही अजून मला ओळखलेच नाही, हे अर्थात माझे दुर्दैव. अशा धाग्यावर काय प्रतिसाद अपेक्षित होते? -पहिलेच दोन प्रतिसाद धाग्याला अपेक्षित उत्तरे देणारे होते. त्यानंतरही अनेकांचे जसे, मराठी कथलेखक, भाऊंचे भाऊ, मितभाषी, जेपी, श्री गावसेना प्रमुख, जव्हेरगंज इ.चे प्रतिसाद धाग्याला पूरक होते. कदाचित ह्यां लोकांनी कुठलाही चष्मा न लावता पाहिले असावे त्यामुळे त्यांना कोलीत वगैरे न दिसता साधेसरळ प्रश्न दिसले ज्यांची त्यांनी तशीच उत्तरे दिली.

In reply to by नीलमोहर

-ज्यांना खटकले ते चष्माच लावून वाचतात आणि चांगले म्हणाले ते बिनचष्म्याचे का?हेही एक अॅझम्प्शनच नाही का? -
गरज नसतांना, कारण नसतांना तिरकस प्रतिसाद येत असल्यावर असा विचार मनात आला तर काय चुकलं. काही कंपूतील लोक माझ्या धाग्यांवर प्रतिसाद देत नाहीत हे माझ्या लक्षात येत नसेल असे तुम्हाला वाटते का ? अर्थात त्याने मला काही फरक पडतो असे मुळीच नाही.
याबाबतीत सहमत आहेच.दरवेळी अनाहिता अंकाला अगदी हाच अनुभव घेतो आम्ही.काही लोक तर कसे खोड्या काढता येतील हेच बघायला येतात! आम्ही आता अशांसाठी 'गच्छ सुकर भद्रं ते' ही पाॅलिसी वापरतो.ट्राय करायला हरकत नाही.

In reply to by अजया

-ज्यांना खटकले ते चष्माच लावून वाचतात आणि चांगले म्हणाले ते बिनचष्म्याचे का?हेही एक अॅझम्प्शनच नाही का? - असे होऊ शकते ना, म्हणून तर 'बी पॉझिटिव्ह' 'बी पॉझिटिव्ह' हा मंत्र जपण्याची हल्ली फार गरज पडते ;) आधी मी जे आवडेल त्या सर्व धाग्यांवर प्रतिसाद द्यायचे, नंतर कळत गेलं आपण सगळ्यांना प्रतिसाद देतो मात्र ते viceversa होत नाही, काय लिहीलेय पेक्षा कोणी लिहीलेय पाहून सिलेक्टीव्हली प्रतिसाद येतात, म्हणजे आपण किती मोठे ...... बनतोय, मग आता जशाला तसे धोरण स्वीकारते आहे तरी अर्थात जिथे द्यायचे तिथे प्रतिसाद देतेच. अनाहितांबद्दल काही बोलणे म्हणजे वादाला निमंत्रण, पण मी म्हटले तसे एक हाथ दो एक हाथ लो ही जगाची रीत आहे. त्यांच्याकडून निवडक लोकांना, लेखांना प्रतिसाद देणे इ.होत असेल तर त्यांच्यासोबतही तसे होऊ शकते. 'गच्छ सुकर भद्रं ते' म्हणजे काय सांगा, ट्राय करायला बरं :)

In reply to by नीलमोहर

अनाहितांबद्दल काही बोलणे म्हणजे वादाला निमंत्रण, पण मी म्हटले तसे एक हाथ दो एक हाथ लो ही जगाची रीत आहे. त्यांच्याकडून निवडक लोकांना, लेखांना प्रतिसाद देणे इ.होत असेल तर त्यांच्यासोबतही तसे होऊ शकते
एकदा अनुभव घेतला की कोणीतरी तुम्हाला मुद्दाम टार्गेट करुन खोड्या काढतंय,कोणाच्या तरी सांगण्यावरून बरळतय तरच अनाहिताकडून असे दिसून येईल.आणि या प्रकाराला सुरुवात कोणी केली हेदेखील दाखवायला मिपावरचे धागे साक्ष आहेत आणि अनाहिताचे अंक देखील.कोण कुठे प्रतिसाद देतात दिसून येईलच.

बिनधास्त लिहा. नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा ! +1000000000 हेच म्हणतो !! लय वैताग देतात राव हि मंडळी !

विदागाराच्या माहितीप्रमाणे नीलमोहर यांच्य एकूण २१ धागे आहेत.पैकी दोन दिवाळी अंकासाठी. एक शशक. राहिले १८. त्यात ९ धागे म्हणजे ५०% मिपासंबंधी आहेत. याबद्दल नीलमोहर यांना मिपाभूषण पुरस्कार लकडी पुलावर देण्यात येईल. बहुधा नीलकांतचेही मिपाचे काय होणार, मिपावरचे आयडी/डुप्लिकेट आयडी याबद्दल इतके धागे ९ वर्षात झाले नसावेत.

In reply to by पैसा

माझ्याा लेखनाचं विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद :) २१ पैकी ९ म्हणजे साधारण ४० % धागे मिपाविषयी आहेत, यावरूनही माझं मिपा प्रेम सिध्द होत नसेल तर अजून कशानेच ते होणार नाही. कोणी 'मिपामुक्ती केंद्र' अथवा 'मिपाहॉलिक्स अ‍ॅनॉनिमस' काढणार असेल तर डाऊन पेमेंटने पूर्ण फी भरून पहिले सदस्यत्व घेण्यास मी तयार आहे. बाकी पुरस्कार साभार परत.. जो मिल रहा है काफी है..

In reply to by नीलमोहर

कोणी 'मिपामुक्ती केंद्र' अथवा 'मिपाहॉलिक्स अ‍ॅनॉनिमस' काढणार असेल तर डाऊन पेमेंटने पूर्ण फी भरून पहिले सदस्यत्व घेण्यास मी तयार आहे.
हसून मेलो. ऑफिसमधले इतर सहकारी माझ्यासाठी बहुतेक "येरवड्यात" बुकिंग करावं की नको या आविर्भावात पाहात आहेत.

लेख वाचला. नीमो काकींचे रडार वर आल्याबद्दल अभिनंदन करतो. ललिता पवार, दुर्गा खोटे, रिमा, रोहिणी हट्टंगडी या अशा नायिका आहेत ज्या खरोखर तशा खाष्ट वगैरे नसताना तसं वागण्याचा उत्तम अभिनय करतात. - फुंकर मारुदे आणि ए अभ्या.. प्यान्ट सांभाळून हुबा ऱ्हा बे. उगा फ्लेक्स गुंडाळून बसायला लागायचं. ;)

मिपावर असे मोजकेच हलकेफुलके धागे वाचायला वाचायला मिळतात म्हणुन मिपा सोडवत नाही.

In reply to by सूड

अबे जाऊ देतोच आहे बे. एक कमेंट नोंदवली फक्त, तीही आता ब्रिगेडच्या नजरेस पडल्यावर उडवतील यात शंका नाही.

In reply to by बॅटमॅन

काकू म्हंटलंस तर मला तिच पोस्ट पुतण्या करावी लागेल.कशाला फुकटचे अवांतर. नीमो छान काहीतरी घेऊन ये नेहमीसारखं!I am never shy of words to appreciate anybody!! आता तुझ्या या धाग्यावर येणे नाही.फाटे फुटायला लागले!

In reply to by बॅटमॅन

लय आहोतच आम्ही.आंटी काकू आमच्यात नातीच म्हणतात.तुम्ही जे शेपुट जोडलं ना त्याचं एक्स्टेन्शनच आहे ते!

In reply to by अजया

आंटी काकू आमच्यात नातीच म्हणतात.
शब्द वापरला की नातं झालं हा अच्रतपणा त्या कोनाड्यात चालत असेल, बाहेर चालत नाही.

In reply to by बॅटमॅन

तुम्हांला काय वाटतं याचं कोनाड्याला देणंघेणं नाही. कोणाला उगाच काहीही संबोधणे यालाच आम्ही अच्र्त्पणा म्हणतो!

In reply to by अजया

तुम्हांला काय वाटतं याचं कोनाड्याला देणंघेणं नाही.
द फीलिंग इज़ म्युच्युअल. हा चिकटपणा तिथेच राहिलेला बरा.
कोणाला उगाच काहीही संबोधणे यालाच आम्ही अच्र्त्पणा म्हणतो!
स्वतःच स्वतःचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. =))

In reply to by नीलमोहर

गाने का नामः ओम शांति ओम.. शांति शांति ओम..

In reply to by बॅटमॅन

तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हु मै. ओ हैरान हु मै. तेरे मासूम सवालोसे परेशान हू मै, ओ परेशान हु मै. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ता त्या दुसर्‍या सरांना मात्र मिस करत आहे, त्यांना सांगता आले असते की जेव्हा मनात विचारांचा गोंधळ असतो अशा वेळेस तो कोलाहल मिटवण्यासाठी आम्ही 'मैं खुदा' ऐकत नाही, असे संगीत ऐकतो ;)

यानिमीत्त सत्कार समितीची ओळख.. -- नाखु काका -देवेंद्र फडणवीस (विरोधी नामोहरम) पैसाताय - स्म्रुती इराणी(रोखठोक), टवाळ कार्टा -धनंजय मुंडे(कायम विरोधी बाकडा नशिबात), जेपी-राहुल गांधी(अत्यंत बालीश)

१० महिन्यांनंतर, २१ धाग्यांनंतर सत्कार शब्द ऐकला म्हणून मोठ्या आशेने काम सोडून धावत आले तर इथे काहीच नाही.. सत्काराला बोलवतात आणि करतच नाहीत :( तुमच्याकडे पोगो चॅनलच दिसणार नाही, बसा शोधत.. छोटा भीम :p

जेपी-राहुल गांधी(अत्यंत बालीश)....... काय हे ????????????

नीलमोहर = स्मिता पाटील वल्ली = गवि = यशोधरा = स्वाती दिनेश = बयाटमन = बिका = स्नेहान्किता = -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्मिता पाटील ?? लाजवताय की बकरा बनवताय सर, राजहंस आणि बदकाची तुलना होते का कधी? (तेही डाएटवर असलेलं बारीक बदक) समजायला मी मारे स्वतःला तब्बूसारखी बुद्धिमान, मितभाषी, गूढ वगैरे समजते, पण नंतर आरशात स्वतःचा गबाळा काकूबाई अवतार पाहून मग... असोच, तिच्या करंगळीच्या कोपऱ्यातील नेलपेंटच्या कणाचीही कोणाला सर नाही. वल्ली - टेडी बेअर (कोण रे म्हटलं ते ;) गवि -? यशोधरा - काजोल स्वाती दिनेश = ? बयाटमन = इरफान खान बिका = गिरीश ओक स्नेहान्किता = का रे दुरावा, एका लग्नाची गोष्ट मधील इला भाटे

आता मी आपल्या मिपावरील वावराचा अभ्यास केला. मनातल्या मनात एक विदा तयार केला आणि त्याचं विश्लेषण केलं तेव्हा लक्षात आलं की आता आपण थांबलं पाहिजे, आपण थांबत नसाल तर आपल्याला थांबवलं पाहिजे, चिमण्यांच्या शाळेतून आपलं नाव काढून टाकलं पाहिजे असं काहीसा एक विचार मनात आला. आणि माझ्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की - आता आपण काही गंभीर लिहावं म्हणजे डोळ्यात पाणी बीनी आलं पाहिजे. आपल्या लेखाची आठवण आली की महिलांनी (मिपावरच्या नै रे भो) डोळ्याला पदर बिदर लावून स्फुंदून स्फुंदून रडल्या पाहिजे, पुरुषांनी हाफिसात रुमाल काढून, शेतावरील लोकांनी उपरण्याने, शाळेतील मुलांनी रुमालांनी डोळे पुसले पाहिजेत. आपल्याकडे लेखन करण्याची क्षमता आहे, अजून काय म्हणु, हं सर्जनशीलता आहे, अजून काय म्हणु हं, शब्द संग्रह आहे, अजून काय म्हणू बरं, हं कल्पकता आहे, आणि मुख्य म्हणजे मिपावर मुख्य खेळाडु प्रमाणे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, म्हणजे तुम्ही विराट कोहली वगैरे आहात. (खुप कौतुक केलंय हं, माझा एखादा धागा आला की, प्रा.डॉ. काय भारी लिहिता, वगैरे असा मोठा प्रतिसाद लिहायचा) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची हीपण तक्रार आहे की प्राडाॅ हुच्च केपेसिटी असूनसुद्धा लेखनात वापरत नाहीत :) न्हेमी काय नुसत्या रनाच काढायच्या ? कधीतरी क्लासिकपण खेळ दाखवावा !

In reply to by सस्नेह

आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा. ज़रा मिपा इंजॉय करू देत नै ही म्हातारी माणसं. :( छ्या. मीपा सोडलं आजपासून. आता फक्त वाचनमात्र. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता या प्रतिसादाचा पूर्वार्ध सहज सोप्या मराठीत सांगा हि विनंती, चिमण्यांची शाळा काय, काही कळाले नाही :(

मला तर तऱ्हाट जोकर हे सिंहासन मधले दिगु टिपणीस (निळू फुले)वाटतात ,राजकारणामुळे हताश झालेले व सत्ताधारी आणि विरोधी दोघांकडून निराश झालेले।

रामदास काका आणिप्रभू मास्तरांबद्दल काय ल्यायचे.

क्रिकेटच्या भाषेत - रामदास = डॉन ब्रॅडमन किंवा व्हिव रिचर्ड्स बाकीचे फक्त रन्स करतात, हे सामने गाजवतात !!

खालील पात्रान साठी आप आपल्या आवडी प्रमाणे आय डी जुळवा दशरथ राजा : कैकयी: मंथरा: कौसल्या: सुमित्रा: राम : बॅटमॅन लक्ष्मण: टका शत्रुघ्न: क मु भरत: सध्या इतकेच

In reply to by मी-सौरभ

ब्यॅट्या आणि राम????...गोकुळ आणेल तो रामायणात =)) भरतः चिमण दशरथ राजा : कैकयी: मंथरा: कौसल्या: सुमित्रा: यांच्याबाबत स्फोटक दारुगोळा तयार आहे ;) जाताजाता शुर्पणखा, अशोकवनातल्या दासी, इंद्रजीत, रा-वण यांना पण घ्या

In reply to by टवाळ कार्टा

मी भरत? नायबा.केअरटेकर राजा नायबा मी. बॅट्या राम? अयायायागं!!!! रच्याकने= रावण "अण्णांना" विसरलास कै?

In reply to by अत्रुप्त आत्मा

या अभिनेत्याविषयी कुणाला काही विशेष माहिती आहे का? जालावर शुभांगी गोखलेंचे पती यापलिकडे विशेष माहिती मिळत नाही.

In reply to by सतिश गावडे

असं काय करता सगासर!! :( हे मोहन चंद्रकांत गोखले! मराठीतील दिवंगत अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र व सध्याचे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे मोठे बंधू. यांचे "सूर्याची पिल्ले" हे नाटक यूट्यूबवर उपलब्ध आहे! ती जुनी अतिप्रसिद्ध "अरे ये पीएसपीओ नही जानता" जाहिरात यांचीच. त्यातल त्यांच, "मुझे लगा पीक स्पीड परफॉर्मन्स आऊटपुट" हे त्यांच्या अभिनयामुळे लै लहानपणी बघितलेल अजून तस्संच आठवतं! Sandy

In reply to by चांदणे संदीप

'लिमिटेड माणुसकी' हा चित्रपट विशेषत्वाने आठवतो. अगदीच कुणा नवगताला 'विठूमाऊली तू माऊली जगाची' हे गाणं व त्याचा 'अरे संसार संसार' हा चित्रपट सांगावा. फार लवकर गेला हा माणूस त्यामानाने.

In reply to by एस

विठूमाऊली हे गाणं मला त्यांच्या चित्रपट अभिनय प्रवासातलं ठळकपणे आठवणारं गाणं! अतिशय बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्याच्या अकाली जाण्याने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीही एका गुण्या अभिनेत्याला मुकली असेच मला वाटते! :( PSPO चा मोठ्ठा फ्यान! Sandy

तर्राट जोकर -- शोलेमधील अंग्रेजोके जमानेके जेलर असरानी. नाना स्कोच -- शोलेमधील सुरमा भोपाली जगदीप. अस्मादिक -- गब्बरसिंग

श्रीरंग जोशी पिंजरा मधिल मास्तरच्, पण त्यांच्या प्रतिसादावरुन वाटत नाही की ते कधी बाईच्या नादाला लागून पिंजर्यातला पोपट बनतील. श्रीरंग साहेब हल्केच घ्या.