Skip to main content

आयडी = ?

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 15/03/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्‍याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्‍याने इमॅजिन करतो. हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत: श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी, एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण. (वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;) तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ? होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)

वाचने 15984
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

जयंत काका - म्हणजे संस्कारी बाबूजी सारखे = आलोकनाथ

In reply to by महासंग्राम

आणि बोका भौ म्हणजे - इसेर ह्यारेल गॅरी ट्रुमन- एखाद्या अमेरिकन प्रेसिडेंट सारखे ( म्हणजे पर्ल हार्बर मधल्या प्रेसिडेंट सारखे )

तो पण फूल और कांटे चा... दोन मोटरसयकलीवर पाय ठेवून हात उंचावून कालेजात एण्ट्री मारणारा!!

निलमनोहर = इंदिरा गांधी मुक्त विहारी = वागळे की दुनिया वाले वागळे विवेक ठाकुर = आसाराम बापू + अर्नब गोस्वामी

पैसा = रोहिणी हट्टंगडी पिलीयन रायडर = ललिता पवार स्रुजा = अलका कुबल अजया = दुर्गा खोटे

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

तुम्हाला वर मुंडी करायची सोय नाही राहिली आता!

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

@
पैसा = रोहिणी हट्टंगडी पिलीयन रायडर = ललिता पवार स्रुजा = अलका कुबल अजया = दुर्गा खोटे
http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

आर यू ऑब्सेस्ड विथ आयडी? बादवे, मी कोणाला आठवावा इतका प्रसिद्ध आहे की काय मिपावर? हम्म! मिपावावर कम करना चाहिये. इदर पडीक नई रेहना चाहिये. क्या बोल्ताय? रच्याकने वरील बरीच मंडळी आणि त्यांची हिरोहिरविणी प्रतिके यांत काहीही साम्य नाही असे ठामपणे म्हणू शकतो. :-)

In reply to by एस

थोडं चुकलं, ऑब्सेस्ड विथ मिपा असं पाहिजे ते :) तुमच्या समोरचंही नाव खोडून नंतर दुसरं लिहीलं, आधी आमिर खान लिहीलं होतं, इथे आमिर - सुरूवातीचा गोंडस, चांगले काम करणारा, बुद्धिमान वाटणारा तो आणि आत्ताचा सार्कॅस्टीकली भांडेफोड करणारा निरागस पीके.

पिलीयन रायडर = ललिता पवार मि ह्यालाहि एव्ह्ढा नाहि हसलो जेव्हढा अजया = दुर्गा खोटे ह्याला हसलो. अजयाताई आता फ्रि मध्ये ३० हि दात विदाऊट अ‍ॅनेस्थेशिया काढतिल ह्यांचे :) ह्.घ्या.

In reply to by बॅटमॅन

समांटरः प्रिया बापट किंवा उमेश कामत सुद्धा फक्त छान दिसणं आणि छान अभिनय करणं एवढं करतात. जास्त जनरल नॉले़ज वगैरे च्या भानगडीत पडत नाहित असं एक दोन कार्यक्रमात पाहिलं आहे. प्रिया बापटचं नाव आलं म्हणून लिहिलं. बाकि चालु द्या.

आणि आता दुसरे आयडी घ्या ना राव! मिपावर इतके आयडी आहेत. थोड्या अनवट प्रवासवर्णनांसारखेच कमी परिचित आयडी व त्यांची वर्णने असावीत असे भविष्यात असा धागा काढू इच्छिणार्‍यांना विनंती.

In reply to by एस

+१! कंटाळा आला तेच तेच आयडी आणि त्यांची कौतुक वाचून! आमचा आयडी कुणालाच आठवत नाही म्हणून अशा सर्व धाग्यांचा निषेध! :)

In reply to by रातराणी

निषेध ठेव तुझ्याजवळ, तू कुहू (स्पृहा जोशी) वाटतेस, एका लग्नाची कितवी गोष्ट मधली, किंवा मग कभी कभी मधील राखी सिलसिला मधील रेखा, युअर चॉइस :)

In reply to by नीलमोहर

बापरे काय रेंज आहे कराक्टेरची एक अत्यंत बालिश आहे, एक काकूबाई आहे आणि एक उनाड ;) ह्या सगळ्याचं मिश्रण असलेला कुणी होऊन गेल नाही का ;) तरी पण एक पुरस्कार ठेऊन घेते आणि बाकीचे उदार अंत:करनाणे परत करते. जाव ऐश कर लो.

In reply to by रातराणी

अरेरे उनाड ? असा शब्द वापरावा तोही एका स्त्रीसाठी, निषेध असो. ह्या सगळ्याचं मिश्रण असलेला कुणी होऊन गेल नाही का - कंगना चालेल ? पण तुला अमृता सुभाष जास्त सूट होईल, छान आहे ती:)

माझी बाईको म्हणते "should we leave mipa?,intolerance is on growth ". आमिर खान अर्र|||गेला बाजार मकरंद अनासपुरे म्हटल असत तर ...

In reply to by जेपी

तुमच्यासाठी आधी सचिन लिहिले होते, सचिन म्हाणजे 'अलबेला, आला आला जयराम आला', वाला तो गोग्गोड सचिन अर्थात, म्हागुरू नाही, पण परत कन्फ्यूजन झालं मग नेम चुकला :)

In reply to by नीलमोहर

आग्गाग्गा....जेपी म्हाग्रुंसार्खे "चला ना...चला ना...चला ना...गडे..." असे गाणे म्हणत मिपाकरांना संन्यास घ्यायला उद्युक्त करत आहे असे दृष्य डोळ्यासमोर आले =))

किचेन = केतकी माटेगावकर

श्रीरंग,जोशी--आलोकनाथ, भाते-ज्यु.आलोकनाथ, उगा काहितरीच-सेकंड ज्यु.आलोकनाथ.. गुर्जी-जॉनी लिवर, जव्हेरगंज-मकरंद अनासपुरे.. विपु--रागीट मकरंद अनासपुरे.. तजो- साऊथ ईंडीयाचा कुठलाही स्टार...

In reply to by जेपी

श्रीरंग जोशी आलोकनाथ आणि मी ज्यु.आलोकनाथ! श्रीरंग आणि मी जवळपास एकाच वयाचे असु. तरीही मला ज्यु.आलोकनाथ म्हणल्यापध्दल धन्यवाद. दोन वर्षांपुर्वी मिपा कट्टयावर एका मिपाकराने मला कुलदीप पवार म्हणले होते ते आठवले. आता त्यांना माझ्यात आणि कुलदीप पवार यांच्यात काय साम्य दिसले ते तेच जाणोत. बाकी, भावी संपादक म्हणुन आगाऊ शुभेच्छा!

श्री गावसेना प्रमुख = निळू फुले प्रचेतस = जयवंत वाडकर श्रीगुरूजी = श्रीराम लागू(पिंजरामधले)

रच्याकने वरील बरीच मंडळी आणि त्यांची हिरोहिरविणी प्रतिके यांत काहीही साम्य नाही असे ठामपणे म्हणू शकतो. :-)
सहमत आहे. नीमोकडून अशा फालतू धाग्याची अपेक्षा नव्हती :(

फर्मासच धागा खुपच मस्त आशयाशी सहमत -- स्पारंग गोडबोले

टवाळ कार्टा = दगडू परब(टाईमपासवाला) आत्मबंध = भाऊ कदम

प्रा . डॉ. दिलीप बिरुटे = दिलीप प्रभावळकर असा माझा पक्का समज कितीतरी वर्षे होता ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(पळतो!) . . . मी नाय्ये बर्का आता इथे.... गावाकडं गेलोय!

म्हटले कि नीलगाय आठवते

अरे रे वाईट झाले!! सगळा टीआरपी इकडे आला!!! पहिल्या दीड तासातच 23 प्रतिसाद!!! ओपनिंग चांगलं हाय....चालू द्या

सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल जे एन यु वगैरे वगैरे येत राहतात, लोकांना गिगाबायटी प्रतिसाद द्यायला जमतं याचं नवल वाटतं इत्यादीबाबत खफवर बोलायचे आणि पुन्हा आपणच फक्त विडंबने किंवा काथ्याकुटातलेच धागे काढायचे हे काही पटले नाही. ललित, कथा, भटकंती, इतिहास, कविता, पाकृ आणि अजूनही बरंच काही लिहिण्यासारखं आहे. पण असो. बाकी ते मृणाल कुलकर्णी वाचून हहपुवा. :)))

In reply to by मधुरा देशपांडे

@ मधुरा देशपांडे, बाकी विषयांवर लिहिलेले आहे, लिहीत असते, तुम्ही वाचलेत का? - प्रतिसाद नसले की कळत नाही म्हणून विचारते. मृणाल कुलकर्णी एक उत्तम अभिनेत्री दिग्दर्शिका आहे, सौंदर्य बुद्धिमत्ता सशक्त अभिनय इ.अनेक गुण तिच्यात एकवटलेत. तुम्हीही अनेक गोष्टींत पारंगत आहात म्हणून तुमचे कौतुक होते ते, असो. एखाद्याला कॉम्पलीमेंट देणेही चूक कसे ठरू शकते हे स-उदाहरण दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. (कोणाला सई, अमृता इ.म्हटले असते तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या?.. कल्पनाही नको ;) @ स्नेहाताई, तुमचे बोट धरूनच मिपावर पावले टाकायला सुरुवात केलीय, तुमच्यात mpk hahk वाली गोड पण खंबीर आई दिसते शिवाय नवरा माझा नवसाचा मधील धमाल नेतीण बाईही, म्हणून तुमच्यासाठी रिमा लागू :)

In reply to by नीलमोहर

मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१ होतं ते, इतर कशाला नाही. गैरसमज नसावा. इतकंच म्हणायचं होतं की चांगलं लिहिण्याचं पोटेन्शियल असताना टैमपास धागे काढू नकोस :)

In reply to by सस्नेह

वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर मारा आणि चांगले लिहिताना टैम्पास धागे काढायला विस्रू नका...दुसर्यांच्या आवडी निवडी जपायला तुम्ही आंतरजालावर येत नाहीत =))

In reply to by टवाळ कार्टा

वरच्या म्हणजे माझ्या की नीमोच्या ? हा प्रतिसाद मला आहे की नीमोला ?
दुसर्यांच्या आवडी निवडी जपायला तुम्ही आंतरजालावर येत नाहीत =))
पसंद अपनी अपनी...

In reply to by नीलमोहर

तुमचे धागे मी वाचतच नाही असं अजिबात नाही. मध्यंतरी बर्‍याच कामात व्यस्त होते, त्यामुळे कदाचित काही वाचले नसतील आणि वाचले तिथेही प्रतिसाद दिले नाहीत किंवा द्यायला जमले नाही. तुमची बॅनर्स आवडली तेव्हा कौतुकही केलंच, आता नाही पटला एखादा धागा तर तसं लिहिलं. आणि याआधीही तुमच्या धाग्यांवर जमेल तसे, वेळ असेल तेव्हा आणि प्रामाणिकपणे वाटले ते लिहिलेच आहे. मौजमजा वाल्या धाग्यांचा प्रॉब्लेम नाही मला, विडंबनांचा पण नाही. हे सगळे मिपाचेच भाग आहेत. पण सतत तेच तेच होतंय असं वाटलं. असेच धागे सतत सुरू राहिले की मग पुढे प्रतिसादातून मात्र बरेचदा लेव्हल घसरत जाते. (हे पुन्हा तुम्हाला एकटीला नाही, जनरल बोलतेय) अनेक आयडी, डु आयडी सतत तेच धागे वर येत राहतात. आधीच राजकारण वगैरे धाग्यांवर धुळवड चालू आहे, त्यात फक्त मौजमजा म्हणून असे धागे काढायचे आणि तेही खफ वर तुम्हीच याबाबत बोलला आहात बरेचदा म्हणून जास्त जाणवले. मग इतर धुळवडीला तरी कशाला बोलायचे. मृणाल कुलकर्णीशी तुलना वगैरेचा राग अजिबातच आला नाही, ते ह. घेण्याइतपत मिपावर रुळलेली आहे. आता त्या तुलनेने हसू आले यात काय चूक? असो, अजून वाद वाढवायचे नाहीयेत. त्यामुळे लेखनसीमा.

काय हे ?? बाकीच्या रणधुमाळीत बदल म्हणून असे खेळीमेळीचे निव्वळ करमणुकीसाठी धागे लिहिते मी, त्यात कसलाही खोडसाळपणा फालतूपणा नाही. वर काही लोकांनी वेडेवाकडे प्रतिसाद दिलेत, असे लोक आणि प्रतिसाद मलाही नकोत माझ्या धाग्यावर, पण त्यासाठी धाग्याला वाईट म्हणायचं प्रयोजन समजत नाही. गंभीर लिहिले तरी प्रॉब्लेम, गंमतीशीर हलकेफुलके लिहिले तरी प्रॉब्लेम, का मुळात प्रॉब्लेमच वेगळा आहे.. To write or not to write.... असो, संमं धागा उडवला तरी चालेल.

In reply to by नीलमोहर

बिनधास्त लिहा.
गंभीर लिहिले तरी प्रॉब्लेम, गंमतीशीर हलकेफुलके लिहिले तरी प्रॉब्लेम, का मुळात प्रॉब्लेमच वेगळा आहे.. To write or not to write....
याच्याशी सहमत. कधीकधी लोक्स १०० कपडे असूनही काय घालू याची टोटल न लागणाऱ्या माणसांसारखे वागतात. सोडून द्या. त्यांची नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा!

In reply to by बोका-ए-आझम

हाहाहाहा भारी आयड्या. एक अ‍ॅडीषन. आपणच असल्या माणसाच्या पतंगाच्या मांजाला फुल्ल ढील द्यायची आधी. मग आपणच हळूच मांजा काटायचा. ट्रीपल मज्जा. टाइमपास झाला, मांजा काटल्याचे सुख, गेला उडत म्हणायला मोकळे.

In reply to by बोका-ए-आझम

बिनधास्त लिहा. नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे करताना म्हणायला गाणे आहेच. .

अन बाई मी पतंग उडवित होते.

अहाहाहाहा. लाखात अशी देखणी जयश्री गडकर आन आशा भोसले. (एखांदी आयडी साधी मानसं वाली जयश्री गडकर सारखी नाही का?) होउ द्या शिट्ट्या.

In reply to by अभ्या..

'साधी माणसंमधली जयश्री गडकर' असा आयडी घेतला तर संंमं मान्य करेल का ब्रे? काय म्हणता प्राडाॅ?

In reply to by बोका-ए-आझम

आपली कै हरकत नै. पण तुम्ही नै आयडी घ्यायचा. बोका ए आझम ही प्रतिमाच आमच्या मनामधे घट्ट होऊ द्या. आपली प्रतिमा म्हणजे आपण रविंद्र महाजनी. शांत, गंभीर, शक्यतो विचार करुन बोलणे, वगैरे इत्यादी. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी हे बायकोला दाखवलं आत्ता. तिला हसणं आवरत नाहीये. शांत, गंभीर, विचार करून - सहन होत नाहीये तिला!

In reply to by बोका-ए-आझम

हाहा. हसमुख, मिश्किल आणि राजा माणुस तर नक्की आहात, हे तरी वहिनी मान्य करा. :( ( कौतुक करतोय तुमचं. भेटल्यावर मित्रांचा पेयपानाचा बंदोबस्त करा.) -दिलीप बिरुटे