सावध
लेखनप्रकार
रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्षात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतो. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात. त्यांचे प्रतिध्वनी गावशिवारात घुमत राहतात.
हा अंधारातला राक्षस आज माझ्याकडे दैत्यासारखा नजर रोखून पाहतोय. मी उठतो. दबकत दबकत चालत जाऊन त्याचा कानोसा घेतो. त्याच्या अगदीच जवळ जायचे धाडस माझ्याकडे नाही. मी भिंतीचा आधार घेत तिकडे डोकावतो. आणि ते डोळे माझ्याकडेच वळतात. माझा थरकाप उडतो. तोंडातून आवाजही बाहेर पडत नाही. लूत मारल्यासारखा मी तसाच कितीतरी वेळ घाबरुन ऊभा राहतो.
आता मात्र मी पाठीमागून वार करायचे ठरवतो. विहीरीला वळसा घालून ओढ्यात उतरतो. आवाज न करता हळूहळू पुढे चालत राहतो. प्रसंग बाका असतो. अशावेळी दोस्त नेहमी धावून येतात, पण यावेळी त्यांनी टांग दिली. मात्र ऐनवेळी माझ्या हाकेला ओ देतील याची पक्की खात्री होती. मग मी पुढे जातच राहतो.
कडुलिंबाच्या झाडाखाली एक गोठा होता. ईथेच तो दैत्य असावा. जरा जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर अचानक काहितरी धडपड करुन जागेवरुन ऊठलं. मग एक जोरदार हंबरडा. ते दोन डोळेही माझ्याकडे रोखले गेले. ही तर म्हैस निघाली. पुन्हा एकदा मी तिथे तसाच सुन्न डोक्याने ऊभा राहतो. साली ही म्हसरंसुध्दा आम्हाला घाबरवून सोडतात.
खाली माग घालून मी निराश हताश मनाने परत वडाखाली येतो. अंग झाडतो. बुंधा गाठतो. आणि पुन्हा एकदा सुक्ष्मात निजतो.
वाचने
4310
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
हॅत्त तेरी की!
हे पुर्वी लिहील होत का ??
बाकी काय कल्ला नाय..
In reply to हे पुर्वी लिहील होत का ?? by जेपी
हे पुर्वी लिहील होत का ??हो ! पण तुम्हाला कसं कळलं ?
In reply to हे पुर्वी लिहील होत का ?? by जव्हेरगंज
बास का राव,
तुमी लिहाव आणी आमी वाचु नये.,अस होईल का ?
In reply to बास का राव, by जेपी
च्यामारी !!
पण मी कुठेच प्रकाशित केलं नव्हतं.
SO,
नेशन वॉन्ट्स टू नोव्हेअर यू हॅव रीड धीस !!
In reply to च्यामारी !! by जव्हेरगंज
च्यामारी जव्हेरभाउ. का टेन्शान घेतासा इतकं?
लिहिलं व्ह्तं का इचारताहेत? आधी वाचलय थोडीच म्हणताहेत. ;)
In reply to च्यामारी जव्हेरभाउ. का by अभ्या..
टेन्शान नाय हो, जरा कुतुहल वाटलं !
माझा मोबाईल हॅक झाला की काय ;-)
In reply to टेन्शान नाय हो, जरा कुतुहल by जव्हेरगंज
जव्हेरगंज साहेब,
अश्या प्रकारची कथा मिपावर लिहीली होती अस वाटतय..
मी वाचली होती अस ही वाटतय..
कदाचीत मला भ्रम झाला असेल...
चुभुदेघे...
बाकी चालु द्या..
In reply to जव्हेरगंज साहेब, by जेपी
मला माहित आहे तुम्ही कुठे वाचलीय!
पण...
असो !
:)
In reply to मला माहित आहे तुम्ही कुठे by जव्हेरगंज
टेल टेल...
माझा भ्रम आहे का ?खरच कथा वाचली आहे..
हवतर व्यनी करा,खरड टाका..
लघुकथा आवडली.
जव्हेरगंज,
नेहमीप्रमाणे कथा झकास आहे. पण प्रत्ययी नाही. का ते कळले असेलंच! ;-)
आ.न.,
-गा.पै.
दिवसा तुम्ही आम्हाला म्हसरांवर लक्ष्य ठिवायला सांगता, अन सोत्ता त्यांच्याव रात्री लक्ष्य ठिवता हे वागनं बरं नव्हं !!!
त्या म्हसरांना (रात्री तरी) काय निवांतपणा नको का जरा !!!
मिपावरच्या (अजब-गजब) प्राण्यांच्या सानिद्ध्यातला नाखुस मिपाकरवाला
हॅत्त तेरी की!