Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जव्हेरगंज on Mon, 09/21/2015 - 23:32
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कथा
भाषा
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
प्रतिभा
विरंगुळा
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच. व्हय, बांधावरच घडलं आसं. मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात. रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार. तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू. जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं. सरळ माझ्याकडचं येत चालली. "कारं राजाभाव हीरीवर चालला व्हय?" हातातलं खुरपं डोक्यावर धरत तिनं ईचारलं. "व्हय, लाईट गीलती, बघतू आलीय का, मक्यावर पाणी सोडलयं" मी बी आपलं टावेलानं तोंड पुसत पुसत बोललू. "बराय बाबा, पाणी तरी हाय हीरीला, बायकु कुठं दिसत न्हाय?" हीला नस्त्या चौकश्या. "आसलं घरीच , घर सारवाय काढलयं" "सरपानाला काय आसल तर बघु कारं? सकाळच्याला पाणी तापवायला हुईल तेव्हढचं" आस्सं, म्हंजी हीला सरपानाला आमचचं शेत घावलं तर. "आगं बघकी, त्या तिथं एक बाभळ वाळलीय, बघ काय घावतयं का, काटकुटं बघुन जा" म्या तिला वाट मोकळी करुन दिली. तशी शितली पुढं गीली. ही शितली मजी पवाराच्या रामाची बायकु. बाय नुसती उफाड्याची. माझ्यासंग आपणहुन बोलायची. मी आपला बुजरा गडी, परक्या बायशी बोलताना जरा चार हात लांबच ऱ्हायचू. पण ह्या शितलीसंग गुलुगुलू बोलू वाटायचं. लय दिसापस्न नजर ठिवून व्हतु पर काय हातात घावली न्हाय. हिरीवर गीलु. लाईट आली नव्हती. थुडी वाट बघुन परत मळ्यावर आलू. शितली खुरप्यानं लाकडं तोडत व्हती. म्या उगाच इचारायचं म्हणून ईचारलं. "काय गं, इकटीला येवडा भारा झेपल का? नस्ता न्हीव लागतू घरापतुर" "कशाला राजाभाव, मला सवय हाय, तसबी सरपान सांच्यालाच न्हेनार हाय, आता नुसतचं बांधून ठिवतीय" "आसं, मग आता कुठं दौरा हाय?" "लय ऊन झालय बघ, आता पलिकडं माळयाच्या खोपीत जाऊन पडणार हाय, तेवढच बरं वाटतं जीवाला, सांच्याला जाताना ह्यो भारा बी घीऊन जाईन" आयला बराय हीचं, माळ्याच्या खुपीत आतापतुर हरीभाऊचा कब्जा हुता. पण म्हातारं गेलं पंधरा दिवस लेकीकडं गेलतं. खुपीत आता कोणच न्हवतं. मी पण ऊन्हाचं तिकडचं पालथा पडायचू. शितलीनं भारा बांधुन लिंबाच्या झाडाखाली ठिवला. साडीवरनं पालापाचुळा झटकला. म्हशीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "कालवाड का लांब बांधलीयं? सावलीत बांध की लिंबाच्या" "आगं म्हशी ढोसऱ्यात्यात, सारखं त्यंच्यावर ध्यान ठिवाय लागतं" " बरं राजाभाव, जाव कारं? डोकं लय ठणकायला लागलयं, ह्या उनात नकू नकू झालयं" शितली खुपीकडं जात जात म्हणाली. "चालतयं की, मी हाय हीतच, काय लागलं तर सांग" मी आपला तिला पाठीमागनं बघत बोललू. शितली बांधावरनं खुपीकडं निघाली, जरा पुढं गीली नसल तर मधनचं माझ्याकडं वळुन बघत म्हणाली "आली आसल तुला बी झोप तर यी रं म्हागणं, खुपीत लय जागा हाय". डुलक्या चालीनं शितली पुढं पुढं जात ऱ्हायली. माझ्याकडं एकदा नजर रोखुन झटक्यात खुपीत शिरली. मायला हीचा डाव समजायला जरा येळच लागला. पर शेवटी हातात घावलीच म्हणायची. शितली खुपीत झुपली आसलं. मलाबी थुडी जागा ठिवली आसलं. आता डोळ्याला बी जरा पेंग याय लागलीय. तवा मंडळी, मी हाय खुपीत , तुम्ही तेवढं म्हसरावर लक्ष ठिवा.
  • Log in or register to post comments
  • 17000 views

प्रतिक्रिया

Submitted by दिवाकर कुलकर्णी on Mon, 09/21/2015 - 23:52

Permalink

झकास!,

आमी ठिवतो म्हसरावर लक्स,तुमी म्होर चं ऐकवा
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 09/22/2015 - 00:06

Permalink

तुम्ही रामभाव का राजाभाव?

तुम्ही रामभाव का राजाभाव? का असा दुजाभाव?
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 09/22/2015 - 00:30

In reply to तुम्ही रामभाव का राजाभाव? by अभ्या..

Permalink

चुक रिपेअरींगला पाठवली आहे.

चुक रिपेअरींगला पाठवली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 09/22/2015 - 18:45

Permalink

जव्हेरगंज म्हणजे काय हो ?

जव्हेरगंज म्हणजे काय हो ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 09/22/2015 - 18:51

In reply to जव्हेरगंज म्हणजे काय हो ? by द-बाहुबली

Permalink

कडब्याची कशी गंज असते तशी

कडब्याची कशी गंज असते तशी जवाहिरांची गंज. लै मोठी लठठ असते. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 09/22/2015 - 18:53

In reply to कडब्याची कशी गंज असते तशी by अभ्या..

Permalink

किंवा रत्नाने जवाहिराने

किंवा रत्नाने जवाहिराने मढवलेला गंज असतो. भगुनं आसतं ओ एक उंच. ताक घुसळऊन ठ्येवत्यात त्यात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 09/22/2015 - 18:54

In reply to किंवा रत्नाने जवाहिराने by अभ्या..

Permalink

नायतर हिरे मोती ह्यांना गंज

नायतर हिरे मोती ह्यांना गंज लागला की जो चुरा पडतो त्याला जव्हेरगंज म्हणत्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 09/22/2015 - 23:29

In reply to नायतर हिरे मोती ह्यांना गंज by अभ्या..

Permalink

मायला, या ढेपिनिशन्स कुटुन

मायला, या ढेपिनिशन्स कुटुन पाडल्या म्हणायच्या. का म्हुन गरीबाच्या आयडीमागे लागलाय. लैच आवाडल्याला दिसतुय. मग चालु द्या.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Wed, 09/23/2015 - 13:33

In reply to मायला, या ढेपिनिशन्स कुटुन by जव्हेरगंज

Permalink

जब कोइ मिपाकर होताहय तब वह

जब कोइ मिपाकर होताहय तब वह गरीब श्रीमंत नही होता... वह सिर्फ मिपाकर व्होताहै. जरा जव्हेरगंजचा अर्थ इस्कटुन सांगाकीराव..
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 01/25/2019 - 21:18

In reply to जब कोइ मिपाकर होताहय तब वह by द-बाहुबली

Permalink

वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल

वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल. जय हिंद.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Wed, 09/23/2015 - 20:31

In reply to वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल by जव्हेरगंज

Permalink

वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल

वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल.
का तुम्हास्नी ठाव नायी ?
आता त्यांस्नी तुमी ईचारालच,
काहीहीं हं ज....
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता on Sat, 09/26/2015 - 19:19

In reply to वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल by द-बाहुबली

Permalink

जव्हेरगंज!!

दत्ताजी शिंदे यांच्या हत्तीचे हे नाव होते. ह्या जव्हेरगंज देखील मीपा च्या गर्दीत घुसला आणि धमाल उडवली!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 09/26/2015 - 19:32

In reply to जव्हेरगंज!! by अनिता

Permalink

तुम्हीच का त्या? खफवर माझं

तुम्हीच का त्या? खफवर माझं पहीलं कोडं सोडविण्याऱ्या? कधीपासुन शोधतोय तुम्हाला. अहो हेच नामाचा ईस्कुट करायला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 09/22/2015 - 18:52

Permalink

जव्हेरगंज!!

जव्हेरगंज!! एक गाव बारा भानगडी भारी पकड़ताय गावात!!! आम्ही बारके होतो तवा एकाच्या कांद्याच्या चाळीत अन एकाच्या कापसाच्या गंजीत असले चमत्कार चिक्कार पाहिलेत! एकदम आठवले!! :D :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/22/2015 - 19:04

Permalink

गावातल्या बर्‍याच जनांच्या

गावातल्या बर्‍याच जनांच्या गुडघ्यांवर जखमा दिसतेत. काय कारन म्हायत्ये का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 09/22/2015 - 19:13

In reply to गावातल्या बर्‍याच जनांच्या by प्यारे१

Permalink

तुमी समध्या गावाचे गुडघे

तुमी समध्या गावाचे गुडघे तपासुन र्‍हायलाय जनु?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/22/2015 - 20:06

In reply to तुमी समध्या गावाचे गुडघे by संजय पाटिल

Permalink

बघायला कशाला पायजे ?

बघायला कशाला पायजे ? फुटके गुडघे म्हणजे शान असते गावात. म्हाईत न्हाई काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पीके on Tue, 09/22/2015 - 20:25

In reply to बघायला कशाला पायजे ? by प्यारे१

Permalink

आयला, आसं पण आसतय व्हय?

आयला, आसं पण आसतय व्हय? आमचं तर गुड्घं आनी कोपरं पन पार सोलुन निघलं व्हतं.... ल्हान पनी कब्बडी, खोखो आनी पकडापकडी लय खेळायचू राव, त्याची आठवन झाली..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 09/22/2015 - 21:00

In reply to आयला, आसं पण आसतय व्हय? by पीके

Permalink

हंगाशी.....

त्ये पकडापकडीच नडलय बगा!
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Tue, 09/22/2015 - 19:28

Permalink

जरा त्ये क्रमशः लिवायचं

जरा त्ये क्रमशः लिवायचं राह्यलं बघा!
  • Log in or register to post comments

Submitted by पीके on Tue, 09/22/2015 - 20:28

In reply to जरा त्ये क्रमशः लिवायचं by दमामि

Permalink

त्ये इलच हो, पण त्यो टक्या

त्ये इलच हो, पण त्यो टक्या कुठं हाय?
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Wed, 09/23/2015 - 10:38

In reply to त्ये इलच हो, पण त्यो टक्या by पीके

Permalink

टक्या म्हनलं, जरा मिपावर लक्ष

टक्या म्हनलं, जरा मिपावर लक्ष ठेवा ....
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 09/25/2015 - 08:41

In reply to टक्या म्हनलं, जरा मिपावर लक्ष by दमामि

Permalink

ही 'टक्या' नक्की काय भानगड

ही 'टक्या' नक्की काय भानगड हाय? कुणी सांगल काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 09/22/2015 - 21:01

Permalink

मस्तं....

कथेचा ग्रामिण बाज (आणि अर्थात तपशिल) भारी आवडला बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Wed, 09/23/2015 - 09:20

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Wed, 09/23/2015 - 10:06

Permalink

लै भारी

एक नंबर.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 09/23/2015 - 11:51

Permalink

कडक!

भाषा, वागणं येकदम डिट्टेलवार वर्णन. भाग दुसरा??
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 09/23/2015 - 20:28

In reply to कडक! by तुषार काळभोर

Permalink

टाकु काय? :)

टाकु काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Wed, 09/23/2015 - 20:50

In reply to टाकु काय? :) by जव्हेरगंज

Permalink

झोप

झोप झाली आसल खुपीत तर टाका. शितली बी जाईन आता उन्ह उतरल्यावर. तवा तुमाला येळ गावलच.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 09/24/2015 - 11:53

In reply to झोप by चाणक्य

Permalink

जरा आजुन एक डुलका काढु द्या.

जरा आजुन एक डुलका काढु द्या. मग टाकतु म्होरचा भाग. लय घाय तुमास्नीबी:)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 12:00

In reply to जरा आजुन एक डुलका काढु द्या. by जव्हेरगंज

Permalink

हे तर सांटा बांटा च्या पुढचंय

हे तर सांटा बांटा च्या पुढचंय. सांटा आपल्या GF ला सांगतो घरला ये कुनीच नाही. ही येऊन बघते तर दाराला कुलूप. काढ़ा तुम्ही डुलका च काढ़ा
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 09/24/2015 - 12:16

In reply to हे तर सांटा बांटा च्या पुढचंय by प्यारे१

Permalink

लगता हय हमारे डुलके का मतलब

लगता हय हमारे डुलके का मतलब आप ठिक से समजे नही भाय :) अब सगळच ईस्कटनेका दिल नही करता हय.:) सांभ्याळयो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 12:24

In reply to लगता हय हमारे डुलके का मतलब by जव्हेरगंज

Permalink

नशीब. लयनीवर हायसा. बाकी झापा

नशीब. लयनीवर हायसा. बाकी झापा ज़रा नीट लावून घ्या. आनि काय उनाची तिरीप येत असली तर समदे कवडसे लिपून घ्या जा. काय त्ये मोबाइल मंदी रिकार्ड हुतंय बगा हल्ली. म्हंजे तुमि असनार झोपंत. उगा काय तरांगडं नको गया!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 09/24/2015 - 12:27

In reply to लगता हय हमारे डुलके का मतलब by जव्हेरगंज

Permalink

आयला!

त्या खुपीकड बगा आधी, तीच लय इस्कटली आसन! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दा विन्ची on Wed, 09/23/2015 - 20:48

Permalink

लई वेळा टाका राव.

लई वेळा टाका राव. तुमास्नी म्हाईत नसल पण खुपीला मागच्याबाजूला एक बारकी फट हाय . तिथं आमी काल पस्न थांबलुया.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Wed, 09/23/2015 - 20:53

In reply to लई वेळा टाका राव. by दा विन्ची

Permalink

हा हा हा.........

जबरी प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Fri, 09/25/2015 - 09:51

Permalink

भन्नाट!

जबरी :)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Fri, 09/25/2015 - 10:50

Permalink

जबरदस्त. कथेचा ग्रामीण बाज

जबरदस्त. कथेचा ग्रामीण बाज खूप आवडला. बाकी क्रमशः टाकायचे राहून गेले का?
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Fri, 09/25/2015 - 11:52

Permalink

है हा हुर्रर्र......च च च

है हा हुर्रर्र......च च च वो जव्हेर भौ, तुमची म्हैस् सुटली ओओओओ. आर कूड़ै, माळ्याच्या खुपीकड चाल्ली ओओओओ
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 09/25/2015 - 17:51

In reply to है हा हुर्रर्र......च च च by बाबा योगिराज

Permalink

कायबी करा, पर लवकर धरा. तिला

कायबी करा, पर लवकर धरा. तिला खुपीकडं येऊ देऊ नकासा.:)
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Fri, 09/25/2015 - 18:27

In reply to कायबी करा, पर लवकर धरा. तिला by जव्हेरगंज

Permalink

हो हो हो हैं हैं हैं.......

हो हो हो हैं हैं हैं....... . वो तुमची म्हस मारू रायली ना वो..... सांभाळा तिला.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 09/25/2015 - 18:33

In reply to हो हो हो हैं हैं हैं....... by बाबा योगिराज

Permalink

एखादा 'रेडा' दिसतुय का बघा

एखादा 'रेडा' दिसतुय का बघा तिथं. त्याशिवाय न्हाय आता ती शांत व्हायची.:)
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Fri, 09/25/2015 - 18:51

In reply to एखादा 'रेडा' दिसतुय का बघा by जव्हेरगंज

Permalink

हात्तीच्या मारी

आता ह्ये बी आमिच कराच का???
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 09/25/2015 - 12:00

Permalink

दुस्रा

भाग कधी ?????
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/25/2015 - 12:46

In reply to दुस्रा by नाखु

Permalink

काय नाखु काका,

काय नाखु काका, तुम्ही पण? याचा काय दुसरा भाग असणार आहे? आपापले हत्ती घोड़े गाढ़वं फुर्फुरवा आणि ठोका...धाव कल्पनेच्या विस्तृत झोपडीत. जिथं नसेल कुठल्याही बंधनाची म्हस जिच्यावर ठेवावं लागेल तुमचं....लक्ष ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 09/26/2015 - 09:34

In reply to काय नाखु काका, by प्यारे१

Permalink

प्यारे भौ

उगा श्रीरामाने विंट्री मारून मा(सा)ज करण्यापेक्षा यांनाच चान्स द्यावा अशी समस्त वाचक वर्गाची इच्छा आहे. अभामिपादुस्राभाग्नियमीत्वाचक्समीक्षक्भशक्प्रतीक्षा संघ संचालीत जे पी मित्रंमंडळ सह्कार्याने दमामी यांनी चालीवलेली संयुक्त साहीत्य चळवळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Sat, 09/26/2015 - 10:34

Permalink

त्ये पुढ असा झालं...

शितली अन राजाभाउच काय चाललय ते मी अन दा विन्ची बाभळी मागुन बघत हुतो. "म्या दा विंचीला म्हटलो आज राजाभाऊ बार उडवतय बघ." त्यो म्हणाला "अरं राजाभाऊ नुसतच बोलबच्चन हाय. ऐन टायमाला गडी गळफाटतोय बघ" त्याची न माजी पाच पाच रुपयांची शर्यत लागली. म्हनुन मग खुपीच्या मागच्या बाजूच्या फटिला म्या अन दा विन्ची डोळ लावुन बसलो. शितली लगबगीने खुपीत शिरली आनी तिच्या मागुन राजाभाऊ धोतार वर करीत आता आलं. दा विन्ची म्हणाला "बेन खाल मुंडी अन पाताळ धुंडी निगालं, एवडा बाराचा असल अस वाटल नव्हता गड्या." मी म्हणालो " आता गप ऱ्हां उगा गडबड करू नकु न्हायतर सगळा इस्कोट होईल." शितली लई लाडात आलती. तिनी लाजत लाजत राजाभाऊ कडे फायल आणी पदराशी चाळा करता म्हनाली "नुसता बघत काय हुबा रायलाया शरट काडा कि" राजाभाऊ ने लगबगीने शर्ट काडला आणी तिकडच खुटीला लावला. शितली राजाभाऊच्या आणखी जवळ सरकली आनी म्हनली "त्यो बनेल बी काडा ना ...." राजाभाऊने झटकन बनेल बी उतरवला. शितली लई खुश झाली आणी मोठ्यांदा म्हनाली " ए शिरप्या आता बाहेर ये, हे बघ दूद प्यायल न्हाई की ह्ये असा होत. बाग कशी एक एक बरगडी दिसतीय. म्हनुन सारक सांगत असतोय रोज दुद पिता जा. आता ऐकशीलना माज्या बाळा? पिशील ना रोज दूद? " म्या दा विंचीचे तोंड घट दाबुन धरलं तरी पन राजाभाऊला चाहुल लागलीच . आता त्यो चप्पल घेउन आमच्या माग पळत येतुया. आमचीबी म्हसर जरा तुमी बागा आम्ही आलुच.....दा मिण्टात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 09/26/2015 - 10:38

In reply to त्ये पुढ असा झालं... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

दं ड व त.

दं ड व त. अगगगगग!!! _/\_!!!!! ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 09/26/2015 - 11:28

In reply to त्ये पुढ असा झालं... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

आगाआयाया….

ठ्ठो! ख्वाह्याइङ्ग! होहोहोहोहो! वारलो!
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Sat, 09/26/2015 - 12:02

In reply to त्ये पुढ असा झालं... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

हा हा हा

पैजारबुआ __/\__ ख्या ख्या ख्या... बाब्बो मेलो ना....
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com