Skip to main content

आमचे आजोबा [बालकविता]

लेखक विदेश यांनी गुरुवार, 03/03/2016 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पाय अन आधार काठी तीन पायांचे आमचे आजोबा.. पाठ ताठ खांदेही ताठ ना दुखतो एकही खुबा.. दृष्टी शाबूत दातही मजबूत हास्याचा तर नित्य धबधबा.. धाक दरारा अजून वाटतो गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा.. गिरणीत जाती घेऊन हाती दहा किलोचा दळण डबा.. चौरस आहार सतत विहार आरोग्याचा मंत्र अजूबा.. नव्वदीतला तरुण जणू हा पार शंभरी करणे मनसुबा .. ......... विजयकुमार देशपांडे .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9708
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

मस्तच. आरोग्याचा मंत्र अजूबा हे वाचून माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांच्या नंबरला मी 'अजूबा, अजूबा' ही रिंगटोन ठेवलेली. :( आता नाही वाजणार कधीच ती. . तुमच्या विदेश नावाची फोड आज कळली. धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by अभ्या..

माझ्या माहितीप्रमाणे ते तुझ्याच गावचे आहेत :-) .
धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.
अनुमोदन.

In reply to by अभ्या..

माझ्या माहितीप्रमाणे ते तुझ्याच गावचे आहेत :-) .
धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.
अनुमोदन.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरे वा. देशपांडे अन गाववाले. वावा. मग तर काय जोरात डॉल्बी लावून शुभेच्छा. ;)

अभ्या.. श्रीरंग_जोशी एक एकटा एकटाच प्राची अश्विनी पद्मावति हरिदास बोका-ए-आझम ... प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !

In reply to by विदेश

सर, नमस्कार. मिपा वर बघून आनंद झाला. देशपांडे सर माझे फेबु मित्र आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह नुकतेच प्रकाशीत झाले आहेत व मी वाचले आहेत.

काल पुण्यातले एकशेएक वर्षांचे घाटपांडे डॅाक्टर अजूनही दवाखाना चालवतात ते टिव्हिवर पाहिले आणि कविता आठवली.