मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 4:02 pm

सदस्य मित्र मैत्रिणींनो,

मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो.
मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच!
मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल.
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत.
तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे.
मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे.
सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते.
सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का?
मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का?
कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि.
किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल.
एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल .
-
कळावे आणि कळ्वावे
मी
शान्तिप्रिय!
(प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )

हे ठिकाणसद्भावना

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

15 Feb 2016 - 4:05 pm | मुक्त विहारि

तुम्हीच ठिकाण आणि इतर बाबी ठरवा आणि इथे तसा धागा काढा.

आहे काय आणि नाही काय?

मी-सौरभ's picture

15 Feb 2016 - 4:10 pm | मी-सौरभ

तेव्हा कट्ट्याला शुभेच्छा!!

गॅरी ट्रुमन's picture

15 Feb 2016 - 4:12 pm | गॅरी ट्रुमन

मी वांकुसं (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये नोकरीला आहे आणि राहायला वाशीला आहे.गेले एकामागोमाग एक असे किमान ८-१० कट्टे मी मिस केले आहेत. तेव्हा इतर मिपाकरांना भेटायला नक्कीच आवडेल.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 4:57 pm | टवाळ कार्टा

अरेच्चा...मग आपला कट्टा तुम्ही कट्ट्यात धरत नै तर :)

गॅरी ट्रुमन's picture

15 Feb 2016 - 4:58 pm | गॅरी ट्रुमन

मग आपला कट्टा तुम्ही कट्ट्यात धरत नै तर

तो मिनिकट्टा होता फुलफ्लेज्ड कट्टा नव्हता :)

होबासराव's picture

15 Feb 2016 - 4:13 pm | होबासराव

मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत.
मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे.
ब्वॉर्र.
प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास

वेलकम टु मिपा..

आदूबाळ's picture

15 Feb 2016 - 4:33 pm | आदूबाळ

लोल.

'जीवनातील आनंद वाढवण्यासाठी रोज वापरा ... मिपा' अशी काहीशी प्रगल्भ जाहिरात दिसली.

तर्राट जोकर's picture

15 Feb 2016 - 4:46 pm | तर्राट जोकर

||सावधान. तुमचा प्रतिसाद प्रगल्भ नाही. सावधान||

प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास

शान्तिप्रिय's picture

15 Feb 2016 - 4:39 pm | शान्तिप्रिय

लोल लोल लोल
आम्ही जाहिराती फक्त पाहतो. करत नाही. :)

पक्षी's picture

15 Feb 2016 - 4:44 pm | पक्षी

मी मिपा गेल्या २ वर्ष पासून follow करत आहे. पण आत्ताच थोडी वळवळ सुरु केली आहे. जरी मिपाकर मला ओळखत नसले तरी मी जवळजवळ सर्वाना ओळखतो आणि भेटण्याची इच्छा आहे.

होबासराव's picture

15 Feb 2016 - 4:47 pm | होबासराव

शान्तिप्रिय पक्षी = कबुतर :)) शांतिदुत

मित्रानो हलकेच घ्या गम्मत करतोय.

शान्तिप्रिय's picture

15 Feb 2016 - 4:54 pm | शान्तिप्रिय

हलकेच घेतोय. तरिही मजेशीर प्रतिसादांबरोबर आपली मुंबैकर मिपाकरांना भेटण्याबद्दल मतेही कळवा.
वाट्ल्यास दहावीच्या परिक्षेनंतर कट्टा घेउया. आता ज्यांच्याकडे दहावी बाराविचे पाल्य आहेत त्यांना
सवड असणार नाही हे मी जाणून आहे.

मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत स्थळ, वेळ, जागा इत्यादि.
हाकानाका ;)

वेळ आणि ठिकाण ठरवा...आणि धागा काढा.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 5:46 pm | टवाळ कार्टा

तु येणार???

दादर किंवा ठाण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असला तर येईन. ;)

खेडूत's picture

16 Feb 2016 - 10:16 am | खेडूत

यांबू आणि डोंबू आपलं ते डोंबिवली ही दोनच मध्यवर्ती ठिकाणे गणली जातात असं ऐकलं आहे!

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 12:24 pm | मुक्त विहारि

आम्ही सध्या डोंबूला असल्याने , सध्यातरी डोंबू हेच आमच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण.

अभ्या..'s picture

15 Feb 2016 - 5:54 pm | अभ्या..

धाग्याकर्त्याकडून टोटल स्पॉन्सर्ड कट्टा अस्ल्यास मेनु कळवा.
बघू जमल्यास. ते टीटीएमेम आम्हाला जमत नै.

नवी मुंबईत मिपाकट्टा कधी का होत नाही ?
वाशीसारख्या

मध्यवर्ती

ठिकाणी

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 6:38 pm | टवाळ कार्टा

काय सालस प्रतिसाद हो =))

अदि's picture

16 Feb 2016 - 11:54 am | अदि

की बात अजयातै... वाशीला कट्टा झालाच पाहिजे.

भेटु एकदा वाशीला नक्की.

लवकर ठरव कट्टा मी तयार आहे..असेही खुप दिवस झाले भेटून...

कोणताही रविवार चालेल.मी वाशीतच पडिक असते ;)

गॅरी ट्रुमन's picture

16 Feb 2016 - 12:48 pm | गॅरी ट्रुमन

हो वाशीला कट्टा झालाच पाहिजे.

पिंगू's picture

16 Feb 2016 - 12:54 pm | पिंगू

कधी करणार?

हेमन्त वाघे's picture

16 Feb 2016 - 10:47 pm | हेमन्त वाघे

तिकडेच rahto

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2016 - 12:04 pm | गॅरी ट्रुमन

अरे वा. नव्या मुंबईतले बरेच मिपाकर आहेत. एखाद्या सुटीच्या दिवशी प्लॅन जमवायला हवा.

बाकी व्य.नि वर बोलूच.

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2016 - 12:52 pm | टवाळ कार्टा

इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ‍ॅडवा...आम्चा संचार जुनी/नवी/बृहद मुंबै सकट ठाणे/डोंबोली/पाल्घर्/पन्वेल असा सर्वत्र असतो :)

अजया's picture

15 Feb 2016 - 6:41 pm | अजया

काय सालस दाद हो!

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 6:46 pm | टवाळ कार्टा

मी आहेच्च सालस...जल्लां कोनी भरोसाच नाय ठेवत

पैसा's picture

15 Feb 2016 - 6:47 pm | पैसा

मीच सालस आहे.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 6:52 pm | टवाळ कार्टा

हा प्रतिसाद पुरावा म्हणून पकडायचा का =))

पैसा's picture

15 Feb 2016 - 6:53 pm | पैसा

जरूर! घेऊन नीलकांत किंवा प्रशांतकडे जा. आणि मग काय झाले ते सांगायला विसरू नको ब्रे का!

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 7:10 pm | टवाळ कार्टा

कशाला? आणि का?

पैसा's picture

15 Feb 2016 - 7:30 pm | पैसा

ते काय कोर्टात जायचे नाहीयेत. मिपावर म्हणजे प्रशांत किंवा नीलकांतकडेच जाणार ना! थांब, मीच बोलावून आणते कोणालातरी.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 7:31 pm | टवाळ कार्टा

=))

टका सालस तर मी महासालस आहे.
पुरावा म्हणून पकडलेला चालेल.जरा मला आय डी घेऊ दे.
*आमच्याइथे कंपूबाजांना कट्टा स्पाॅन्सर करुन मिळेल.
सही- महासालस© अतीसालस© फारसालस©

पैसा's picture

15 Feb 2016 - 7:01 pm | पैसा

माझा एक भलामोठ्ठा कंपू आहे. त्याला कट्टा पॉन्सर करणारा हवाच आहे.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 7:12 pm | टवाळ कार्टा

नेहमी करणाराच शोधा...एक तरी पाँसर करणारी अज्जून दिसली नै कधी

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 7:11 pm | टवाळ कार्टा

अस्से पाहिज्जे...तुम्चे नेहमीच कौतुक वाट्टे

क्या बात है शान्तिप्रियजी..!!! अगदी मनातलं बोललात.
मलाही मिपाकरांना भेटायची खूप खूप इच्छा आहे. भेटतंच नाहित मेले. तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. अवश्य येईन.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 6:46 pm | टवाळ कार्टा

तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा.

बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 6:48 pm | प्रचेतस

नाय हो.
साधं सरळ प्रांजळपणे बोललोय.

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 6:52 pm | टवाळ कार्टा

तुम्ही प्रांजळ?

मी प्रांजळ आहे किंवा नाही असे कुठे म्हणालोय हो टवाळजी कार्टा?

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2016 - 7:10 pm | टवाळ कार्टा

अस्स कां....मग चालूदेत

बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))

मी चुकून "अ‍ॅम्वेचा" प्रश्न वाचलं. आणि कट्ट्याच्या प्रयोजनाविषयी अनेक शंका पिंगून गेल्या.

कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय, एरवी सिंहगड मार्ग, जंगली महाराज मार्ग, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग इत्यादि ठिकाणच्या कट्ट्यांना प्राधान्य देण्यात येईल.

होबासराव's picture

15 Feb 2016 - 7:30 pm | होबासराव

:))

एस's picture

15 Feb 2016 - 7:55 pm | एस

मिपा सदस्यांना तुम्हांला कशासाठी भेटायचे आहे? इथला आभासीपणाही तितकाच रोचक नाहीये का?

शान्तिप्रिय's picture

15 Feb 2016 - 8:12 pm | शान्तिप्रिय

आभासीपणा रोचक आहेच. प्रत्यक्ष भेटीपेक्षा नाही.
- माझे मत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2016 - 10:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभासी जिंदगीच ख़ास आहे. जालावर भेटून ओळखी वाढवू नयेत. कट्ट्याला शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 11:00 pm | मुक्त विहारि

आम्हाला तर ह्या ओळखीमुळे कुठलाच त्रास झाला नाही.

होबासराव's picture

15 Feb 2016 - 7:59 pm | होबासराव

.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2016 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी आणि किमान तीन धागे काढा.

तो नियम पुणे कट्ट्याला...

मुंबई कट्ट्यासाठी १ धागा पुरेसा होतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2016 - 9:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही. मुंबैवाले डोंबिवली मुंबैचा भाग कसा नाही म्हणुन ओरडाआरडा करायला लागतात. धागे तीन नाही काढायला लागले तरी व्हायचा तो सावळा गोंधळ होतोचं.

१००% मान्य...

पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात.

सध्या विषय कट्ट्याबाबत असल्याने, कट्ट्याबाबतच चर्चा करावी असे नाही.ते मिपाधर्माला योग्य पण नाही.

बाद्वे,

पुण्यात पण नक्की कुठे कट्टा करावा?

सध्या तरी आकुर्डी हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, असे माझे मत.

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 9:36 pm | प्रचेतस

मला चालेल. तिथे जवळच गणेश तलाव नामक एक निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणे.
तेथे सर्व मिपाकरांस भेटायला मला निश्चित आवडेल.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2016 - 9:39 pm | मुक्त विहारि

एक मस्त उद्यान आहे. तिथेच कट्टा करू.

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 9:44 pm | यशोधरा

पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. >>तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक! =))

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 9:45 pm | प्रचेतस

हो.
ते देखील उगा गाजावाजा न होतात म्हणे.

हो ना, होतात ना....

पण कट्टे ठरवायलाच इतका वेळ खर्ची पडतो की विचारता सोय नाही.

पुण्यात कट्टा ठरेपर्यंत आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात.

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 10:02 pm | यशोधरा

आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात. >>तुम्हांला ठरतात असं म्हणायचय का? =))

मुक्त विहारि's picture

15 Feb 2016 - 10:10 pm | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात....असेच म्हणायचे आहे...

कधी-कधी मुद्दाम धागे काढून तर कधी-कधी फोना-फोनी करुन.

असतील हो होत, पण आम्हाला पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!!

तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!!

एकदम खरी गोष्ट...

उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा (आणि ते पण रांगा वगैरे लावून,) एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळण्यातले सूख काही औरच.

पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा "नंदी पॅलेसला" याच.

कुवैतकर, जर्मनीकर येवून गेले आणि जातांना "नंदी पॅलेसचे" कौतूक पण करून गेले. .तुमच्या बदलापूर पासून डोंबोली काही जास्त दूर नाही.

बाद्वे,

नंदी पॅलेस मध्ये श्रीखंडाचे पाणी (ज्याला पुण्यात "पियुष" असे म्हटले जाते) ते मात्र मिळत नाही.

डिस्केमर : मी नंदी पॅलेसचा मालक पण नाही आणि जाहीरात पण करत नाही.पुढे मागे जर "नंदी पॅलेस" पेक्षा उत्तम हॉटेल निघाले तर तिथे जाऊ.

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 10:44 pm | यशोधरा

उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा >>आहेत म्हणून जाऊ शकतो. तुमच्याकडे नाईत?
घ्या!पाणीसुद्धा मिळत नै त्या पॅलेसात??..काय उपेग! नुसतंच नाव पॅलेस! :P

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2016 - 10:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण ते नंदी पॅलेसला पाणी प्यायला जातचं नाहीत. त्यांचं सुवर्णजल असतं असं ऐकुन आहे.

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 10:58 pm | यशोधरा

मिळतच नै तर कसं पिणार?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2016 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मिळतं. त्यांनी बरेचं वेळा उल्लेख केलाय.

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 12:04 pm | मुक्त विहारि

"श्रीखंडाचे पाणी" मिळत नाही.

यशोधरा's picture

16 Feb 2016 - 12:09 pm | यशोधरा

आणि इतकं छान छान ते नंदी पॅलेस असूनसुद्धा तुम्ही शेवटी त्या "श्रीखंडाच्या पाण्याचीच" आठवण काढता की नै?

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 12:21 pm | मुक्त विहारि

पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच.

त्यामुळे आम्हाला वाटले की, समस्त पुणेरी जन तिन्ही-त्रिकाळ ह्या श्रीखंडी पाण्यानेच तहान भागवत असावीत.

अगदीच नाही भागली तहान तर, मग ते जेमतेम अर्ध्या बशीतले अमृत-तुल्य नामक पेय आहेच.

वट्ट ५ रुपये घेतलेन त्याने.

पुणेरी जन मात्र भलतेच सहनशील हो...

तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत. बहूदा आकुर्डी, पुणे महानगर पालिकेत येत नसल्याने, उत्तम हवा, रुंद रस्ते, तरणतलावावर जास्त नसलेली गर्दी, इत्यादी सामान्य माणसांसाठी आवश्यक गोष्टी अद्याप तरी टिकून आहेत.

यशोधरा's picture

16 Feb 2016 - 12:28 pm | यशोधरा

पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. >> ह्याच त्या अपुणेकरांच्या सवयी! पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील आणि मागून उग्गाच गळे काढतील!

तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत.>> ह्या, ह्या, ह्या! =)) असणारच तुम्ही, तुम्हांला चॉईसच नाहीये! हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही.

आणि मागून उग्गाच गळे काढतील!

होना एक कप भर (घोट सुद्धा भरत नाही हो.) चहा पण धड देत नाहीत. (गोव्यातला एका मिपासदस्या कडून मिळालेली ऐकिव माहिती.)

"हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही."

काय करणार? मनुष्य स्वभाव आहे.एकदा पुणेकर झालो तर, पुण्याबाबत अभिमान बाळगायलाच लागतो.बरं नुसता अभिमान काही कामाचा नाही.तो जाज्वल्यच असायला लागतो. (लग्न झाल्या पासून आम्ही. अभिमान नावाचा शब्द विसरलो.पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार.)

यशोधरा's picture

16 Feb 2016 - 12:41 pm | यशोधरा

त्या पण पुण्याच्या नैत. तेव्हा, ह्या, ह्या, ह्या...
पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार - एक म्हण आठवतेय ब्वॉ. पण ठीके, या आमच्या पुण्यात.

प्रचेतस's picture

16 Feb 2016 - 12:29 pm | प्रचेतस

अगदी खरंय मुविकाका.
आमचं पिंपरी चिंचवड भारतातल्या सर्वाधिक स्वच्छ १० शहरापैकी एक म्हणून निवडलं गेलंय आणि तुमचं कल्याण डोंबिवली .....ह्या ह्या ह्या.... =))

यशोधरा's picture

16 Feb 2016 - 12:33 pm | यशोधरा

अग्गोबाई, पयला नंबर???? मज्जाये ब्वॉ डोंबोलीकरांची!

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 1:05 pm | मुक्त विहारि

हेच खरे...

पण निसर्गरम्य पुण्याला मागे टाकून पिंचिला पहिला नंबर मिळाला.

ह्या, ह्या, ह्या! वाया गेलेला बाण हो =))

पिंपरी चिंचवडचे हार्दिक अभिनंदन.

या आनंदाप्रीत्यर्थ प्रचेतसजी पिंचिमधे अभामिपासंमेलन (संपूर्ण स्पॉन्सर्ड) कधी करणार आहेत ?

पैसा's picture

16 Feb 2016 - 1:22 pm | पैसा

मला चहा मिळाला त्याचा फटू काढून ठेवलाय. स्पॉन्सर करणारा मिळाला कि सांगा, सगळेच जाऊ.

यशोधरा's picture

16 Feb 2016 - 1:30 pm | यशोधरा

सगळ्यांना पुणेकरांकडूनच काही ना काही हवे असते! पुणेकरांना मात्र कोणी काही बोलावत नाही, हे निरीक्षण नोंदवत आहे!!!

तुम्हीही या की पिंचिकरांच्या पार्टीला. उगीच पिंचि पुण्याजवळ आहे म्हणून वयं पञ्चाधिकं शतम् करु नका.

आम्ही येऊच हो. अपुणेकरांना खाऊ पिऊही घालू. कोणाला श्रीखंडाचे पाणी हवे असल्यास तेही पाजू. पुरावे म्हणून फोटोही काढू!