✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

श
शान्तिप्रिय यांनी
Mon, 02/15/2016 - 16:02  ·  लेख
लेख
सदस्य मित्र मैत्रिणींनो, मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो. मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच! मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल. मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते. सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का? मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का? कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि. किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल. एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल . - कळावे आणि कळ्वावे मी शान्तिप्रिय! (प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
17785 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

कोथरुड, बावधन परिसरात ठरवा अवश्य येइन

होबासराव
Mon, 02/15/2016 - 18:42 नवीन
.
  • Log in or register to post comments

कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय,

सूड
Mon, 02/15/2016 - 19:15 नवीन
कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय, एरवी सिंहगड मार्ग, जंगली महाराज मार्ग, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग इत्यादि ठिकाणच्या कट्ट्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

बाडिस

होबासराव
Mon, 02/15/2016 - 19:30 नवीन
:))
  • Log in or register to post comments

जस्ट एक प्रश्न.

एस
Mon, 02/15/2016 - 19:55 नवीन
मिपा सदस्यांना तुम्हांला कशासाठी भेटायचे आहे? इथला आभासीपणाही तितकाच रोचक नाहीये का?
  • Log in or register to post comments

आभासीपणा रोचक आहेच. प्रत्यक्ष

शान्तिप्रिय
Mon, 02/15/2016 - 20:12 नवीन
आभासीपणा रोचक आहेच. प्रत्यक्ष भेटीपेक्षा नाही. - माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/16/2016 - 22:26 नवीन
आभासी जिंदगीच ख़ास आहे. जालावर भेटून ओळखी वाढवू नयेत. कट्ट्याला शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

जालावर भेटून ओळखी वाढवू नयेत.

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 23:00 नवीन
आम्हाला तर ह्या ओळखीमुळे कुठलाच त्रास झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भ्रम आहेत, सब माया है ;)

होबासराव
Mon, 02/15/2016 - 19:59 नवीन
.
  • Log in or register to post comments

अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/15/2016 - 21:20 नवीन
अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी आणि किमान तीन धागे काढा.
  • Log in or register to post comments

अपॉइंटमेंट घ्या सहा महिने आधी आणि किमान तीन धागे काढा....

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 21:25 नवीन
तो नियम पुणे कट्ट्याला... मुंबई कट्ट्यासाठी १ धागा पुरेसा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मुंबईकरांचं मध्यवर्ती

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/15/2016 - 21:27 नवीन
मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही. मुंबैवाले डोंबिवली मुंबैचा भाग कसा नाही म्हणुन ओरडाआरडा करायला लागतात. धागे तीन नाही काढायला लागले तरी व्हायचा तो सावळा गोंधळ होतोचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही....

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 21:33 नवीन
१००% मान्य... पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. सध्या विषय कट्ट्याबाबत असल्याने, कट्ट्याबाबतच चर्चा करावी असे नाही.ते मिपाधर्माला योग्य पण नाही. बाद्वे, पुण्यात पण नक्की कुठे कट्टा करावा? सध्या तरी आकुर्डी हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, असे माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मला चालेल. तिथे जवळच गणेश

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 21:36 नवीन
मला चालेल. तिथे जवळच गणेश तलाव नामक एक निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणे. तेथे सर्व मिपाकरांस भेटायला मला निश्चित आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गणेश तलावाच्या बाजूलाच

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 21:39 नवीन
एक मस्त उद्यान आहे. तिथेच कट्टा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण आमचे कट्टे मात्र लगेच

यशोधरा
Mon, 02/15/2016 - 21:44 नवीन
पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. >>तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हो.

प्रचेतस
Mon, 02/15/2016 - 21:45 नवीन
हो. ते देखील उगा गाजावाजा न होतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक!

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 22:00 नवीन
हो ना, होतात ना.... पण कट्टे ठरवायलाच इतका वेळ खर्ची पडतो की विचारता सोय नाही. पुण्यात कट्टा ठरेपर्यंत आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे

यशोधरा
Mon, 02/15/2016 - 22:02 नवीन
आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात. >>तुम्हांला ठरतात असं म्हणायचय का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्हांला ठरतात असं म्हणायचय का?

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 22:10 नवीन
आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात....असेच म्हणायचे आहे... कधी-कधी मुद्दाम धागे काढून तर कधी-कधी फोना-फोनी करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असतील हो होत, पण आम्हाला

सूड
Mon, 02/15/2016 - 22:24 नवीन
असतील हो होत, पण आम्हाला पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत.

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 22:34 नवीन
तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!! एकदम खरी गोष्ट... उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा (आणि ते पण रांगा वगैरे लावून,) एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळण्यातले सूख काही औरच. पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा "नंदी पॅलेसला" याच. कुवैतकर, जर्मनीकर येवून गेले आणि जातांना "नंदी पॅलेसचे" कौतूक पण करून गेले. .तुमच्या बदलापूर पासून डोंबोली काही जास्त दूर नाही. बाद्वे, नंदी पॅलेस मध्ये श्रीखंडाचे पाणी (ज्याला पुण्यात "पियुष" असे म्हटले जाते) ते मात्र मिळत नाही. डिस्केमर : मी नंदी पॅलेसचा मालक पण नाही आणि जाहीरात पण करत नाही.पुढे मागे जर "नंदी पॅलेस" पेक्षा उत्तम हॉटेल निघाले तर तिथे जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

उगाच १० ठिकाणी १० गोष्टी

यशोधरा
Mon, 02/15/2016 - 22:44 नवीन
उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा >>आहेत म्हणून जाऊ शकतो. तुमच्याकडे नाईत? घ्या!पाणीसुद्धा मिळत नै त्या पॅलेसात??..काय उपेग! नुसतंच नाव पॅलेस! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पण ते नंदी पॅलेसला पाणी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/15/2016 - 22:54 नवीन
पण ते नंदी पॅलेसला पाणी प्यायला जातचं नाहीत. त्यांचं सुवर्णजल असतं असं ऐकुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मिळतच नै तर कसं पिणार?

यशोधरा
Mon, 02/15/2016 - 22:58 नवीन
मिळतच नै तर कसं पिणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मिळतं. त्यांनी बरेचं वेळा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/15/2016 - 23:00 नवीन
मिळतं. त्यांनी बरेचं वेळा उल्लेख केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पाणी मिळते पण...

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 12:04 नवीन
"श्रीखंडाचे पाणी" मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि इतकं छान छान ते नंदी

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 12:09 नवीन
आणि इतकं छान छान ते नंदी पॅलेस असूनसुद्धा तुम्ही शेवटी त्या "श्रीखंडाच्या पाण्याचीच" आठवण काढता की नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय करणार?

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 12:21 नवीन
पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. त्यामुळे आम्हाला वाटले की, समस्त पुणेरी जन तिन्ही-त्रिकाळ ह्या श्रीखंडी पाण्यानेच तहान भागवत असावीत. अगदीच नाही भागली तहान तर, मग ते जेमतेम अर्ध्या बशीतले अमृत-तुल्य नामक पेय आहेच. वट्ट ५ रुपये घेतलेन त्याने. पुणेरी जन मात्र भलतेच सहनशील हो... तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत. बहूदा आकुर्डी, पुणे महानगर पालिकेत येत नसल्याने, उत्तम हवा, रुंद रस्ते, तरणतलावावर जास्त नसलेली गर्दी, इत्यादी सामान्य माणसांसाठी आवश्यक गोष्टी अद्याप तरी टिकून आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

=))

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 12:28 नवीन
पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. >> ह्याच त्या अपुणेकरांच्या सवयी! पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील आणि मागून उग्गाच गळे काढतील! तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत.>> ह्या, ह्या, ह्या! =)) असणारच तुम्ही, तुम्हांला चॉईसच नाहीये! हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील.....

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 12:38 नवीन
आणि मागून उग्गाच गळे काढतील! होना एक कप भर (घोट सुद्धा भरत नाही हो.) चहा पण धड देत नाहीत. (गोव्यातला एका मिपासदस्या कडून मिळालेली ऐकिव माहिती.) "हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही." काय करणार? मनुष्य स्वभाव आहे.एकदा पुणेकर झालो तर, पुण्याबाबत अभिमान बाळगायलाच लागतो.बरं नुसता अभिमान काही कामाचा नाही.तो जाज्वल्यच असायला लागतो. (लग्न झाल्या पासून आम्ही. अभिमान नावाचा शब्द विसरलो.पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

त्या पण पुण्याच्या नैत.

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 12:41 नवीन
त्या पण पुण्याच्या नैत. तेव्हा, ह्या, ह्या, ह्या... पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार - एक म्हण आठवतेय ब्वॉ. पण ठीके, या आमच्या पुण्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अगदी खरंय मुविकाका.

प्रचेतस
Tue, 02/16/2016 - 12:29 नवीन
अगदी खरंय मुविकाका. आमचं पिंपरी चिंचवड भारतातल्या सर्वाधिक स्वच्छ १० शहरापैकी एक म्हणून निवडलं गेलंय आणि तुमचं कल्याण डोंबिवली .....ह्या ह्या ह्या.... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्या ह्या ह्या.... =))

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 12:33 नवीन
अग्गोबाई, पयला नंबर???? मज्जाये ब्वॉ डोंबोलीकरांची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचे डोंबू पहिला नंबर सोडत नाहीत...

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 13:05 नवीन
हेच खरे... पण निसर्गरम्य पुण्याला मागे टाकून पिंचिला पहिला नंबर मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ह्या, ह्या, ह्या! वाया गेलेला

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 13:12 नवीन
ह्या, ह्या, ह्या! वाया गेलेला बाण हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पिंपरी चिंचवडचे हार्दिक

गवि
Tue, 02/16/2016 - 12:54 नवीन
पिंपरी चिंचवडचे हार्दिक अभिनंदन. या आनंदाप्रीत्यर्थ प्रचेतसजी पिंचिमधे अभामिपासंमेलन (संपूर्ण स्पॉन्सर्ड) कधी करणार आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:D

पैसा
Tue, 02/16/2016 - 13:22 नवीन
मला चहा मिळाला त्याचा फटू काढून ठेवलाय. स्पॉन्सर करणारा मिळाला कि सांगा, सगळेच जाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नावे ठेवतात, तरीही

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 13:30 नवीन
सगळ्यांना पुणेकरांकडूनच काही ना काही हवे असते! पुणेकरांना मात्र कोणी काही बोलावत नाही, हे निरीक्षण नोंदवत आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुम्हीही या की पिंचिकरांच्या

गवि
Tue, 02/16/2016 - 13:51 नवीन
तुम्हीही या की पिंचिकरांच्या पार्टीला. उगीच पिंचि पुण्याजवळ आहे म्हणून वयं पञ्चाधिकं शतम् करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आम्ही येऊच हो. अपुणेकरांना

यशोधरा
Tue, 02/16/2016 - 13:59 नवीन
आम्ही येऊच हो. अपुणेकरांना खाऊ पिऊही घालू. कोणाला श्रीखंडाचे पाणी हवे असल्यास तेही पाजू. पुरावे म्हणून फोटोही काढू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ह्या ह्या ह्या.

प्रचेतस
Tue, 02/16/2016 - 13:25 नवीन
ह्या ह्या ह्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुणेकर पाणी पण श्रीखंडाचे

मृत्युन्जय
Tue, 02/16/2016 - 13:45 नवीन
पुणेकर पाणी पण श्रीखंडाचे पितात हेच यातुन सिद्ध झाले. श्रीखंड पुण्यात वेगळे मिळते. त्यात केशर वेलदोडा नसेल तर ते आम्ही गोड दही म्हणुन खातो. असो. एक धागा काढलाय मागेच. सारखे सारखे एवढे मोट्ठाले धागे नाही हो काढता येत. तुम्ही या एकदा पुण्याला, तुम्हाला तुमच्या त्या डोंबिलीपेक्षा उत्तम खायला घालतो (पैसे तुम्ही द्यायचे हो. पुणेकर स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी (देखील) पदरच्या पैशाला तोशीष देत नाही हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ये कुछ बात नाही हुई.

सुबोध खरे
Tue, 02/16/2016 - 20:41 नवीन
ये कुछ बात नाही हुई. मुंबईला या. कट्टा करू. खर्च हि आम्ही देऊ. मित्रांसाठी काहीही. हा का ना का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+ १

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 21:22 नवीन
+१ त्या खर्चात काही वाटा आम्ही पण घेवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एवढी लांबलचक प्रक्रिया?

शान्तिप्रिय
Mon, 02/15/2016 - 21:22 नवीन
एवढी लांबलचक प्रक्रिया?
  • Log in or register to post comments

ती प्रक्रिया पुण्यासाठी...

मुक्त विहारि
Mon, 02/15/2016 - 21:26 नवीन
मुंबई विभागाला एखादा धागा पुरेसा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

मला तर ट्रेक,प्रदर्शन ,रेल्वे

कंजूस
Tue, 02/16/2016 - 08:21 नवीन
मला तर ट्रेक,प्रदर्शन ,रेल्वे प्रवास वगैरे ठिकाणी भेटलेल्या नवीन लोकांशी बोलायला फार आवडते.काला घोड्याला एक नवीन ओळख झाली.हॅाटेलकेंद्रित कट्टा आवडत नाही हे स्पष्ट मत. छंदकेंद्रीत आवडतो.
  • Log in or register to post comments

हॅाटेलकेंद्रित कट्टा आवडत नाही हे स्पष्ट मत.

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 12:02 नवीन
आम्ही मिपाकरांना भेटायला जातो. हॉटेल तर फक्त भेटण्याचे ठिकाण आहे. कुणाला हॉटेल मध्ये साग्रसंगीत कट्टा आवडतो, तर कुणाला रमत गमत केलेला काळा घोडा कट्टा.तर कुणाला बागेत, तर कुणाला लेणी बघत. कट्ट्याच्या उत्सवमुर्तीला, जे ठिकाण आवडते, तिथे जमायचे. आम्हाला लेण्यांपासून ते समुद्र किनार्‍या पर्यंत कुठलेही ठिकाण चालून जाते. शक्यतो घरी नको, बंधने जास्त येतात.बोलतांना विषयाला धरून बोलल्या जातेच असे नाही आणि विषय जर "विषयाकडे" वळला तर, भलतीच पंचाईत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पियुष

इरसाल
Tue, 02/16/2016 - 12:42 नवीन
पियुष म्हणजे तेच का ते श्रीखंडाचा ड्बा धुतलेले पाणी कि काय असते असे म्हणतात तेच ना ?
  • Log in or register to post comments

श्रीखंडाचा ड्बा धुतलेले पाणी...

मुक्त विहारि
Tue, 02/16/2016 - 21:44 नवीन
ह्यालाच पुण्यात पियुष नावाने ओळखले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा