✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मामलेदार मिसळ पंढरी

म
मीउमेश यांनी
Tue, 02/09/2016 - 13:00  ·  लेख
लेख
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते. अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले. पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती. अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला. आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले, मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान? सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??", बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली. क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं. अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय ) त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते". अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास ! मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो आमचे काही अलिखित नियम आहेत रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे, नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे. मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
33890 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

free image uploader

हेमन्त वाघे
Sun, 02/14/2016 - 01:08 नवीन
Image removed.
free image uploader

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

अड्मीन हा धागा कृपया काढून टाका - परत खाली प्रतिसाद दिला aahe

हेमन्त वाघे
Sun, 02/14/2016 - 01:13 नवीन
अड्मीन हा धागा कृपया काढून टाका - परत खाली प्रतिसाद दिला aahe
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

आजची भेट - मामलेदार ला

हेमन्त वाघे
Sun, 02/14/2016 - 01:12 नवीन
आज इकडचे वाचून मामलेदार ला जुनाच आलो . मिसळ चांगली होती पण इकडे सांगितली तेवढी पण जगावेगळी नव्हती ! Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मामलेदार मधे मिसळी भरल्या जात

खटपट्या
Sun, 02/14/2016 - 12:28 नवीन
Image removed. मामलेदार मधे मिसळी भरल्या जात असताना !!!
  • Log in or register to post comments

कोल्हापूर बावडा मिसळ पाव आणि

Rahul D
Sun, 02/14/2016 - 14:55 नवीन
कोल्हापूर बावडा मिसळ पाव आणि चहा अतिशय उत्कृष्ट. मी पुण्याचा असूनही पुण्यातील काटाकीर , बेडेकर मिसळ विशेष आवडत नाही.
  • Log in or register to post comments

२०० झाल्याबद्दल दोन करंट मिसळ

रमेश भिडे
Sun, 02/14/2016 - 16:45 नवीन
२०० झाल्याबद्दल दोन करंट मिसळ विथ अनलिमिटेड रस्सा!
  • Log in or register to post comments

इतक्या लोकांचे मिसळपुराण

भिंगरी
Sun, 02/14/2016 - 20:48 नवीन
इतक्या लोकांचे मिसळपुराण वाचले.प्रत्येक टिकाणच्या मिसळीची स्वत:ची अशी खासियत असते. तशीच आमची भिवंडीची 'कंपनीची मिसळ' जुन्या अस्सल भिवंडीकरांना ही मिसळ खाल्ल्याशिवाय न्याहारी झाली असे वाटतच नसे.जोडीला दुधीहलवा आणि पुरी खाल्ले की त्रुप्त झाले. मात्र त्यासाठी सकाळी लवकर जावे लागते. सकाळी नऊ नंतर मिसळ संपलेली असते.सकाळी मित्रांबरोबर गप्पा मारत कंपनीची मिसळ खायची आणि रात्री 'निशान'मध्ये बसून चहा पित दिवसभरच्या घडामोडींवर चर्चा करणे हा भिवंडीकरांचा दिनक्रम आहे. आता भिवंडीत अनेक ठिकाणचे लोक कामासाठी आले आहेत.त्यामध्ये अस्सल भिवंडीकरांची संख्या कमी होत चालली आहे..त्यामुळे ही मिसळीची महती सांगणारे कमी होत चालले आहेत.
  • Log in or register to post comments

मुंबईत असताना मी एकदा मिसळ

सूक्ष्मजीव
Tue, 02/16/2016 - 17:19 नवीन
मुंबईत असताना मी एकदा मिसळ खाण्यासाठी म्हणून ठाण्याला गेलो होतो, भरीस भर म्हणून पुण्याहून एका मित्राला खास मिसळ खाण्यासाठी ठाण्याला बोलावले होते. त्यादिवशी नेमका रविवार होता व हॉटेल बंद होते. तेंव्हा तिथल्या काही दुकानवाल्यांनी एका हॉटेलचे (आमंत्रण की काहीतरी) नाव सांगितले, व तिथे हीच मिसळ मिळते असे सांगितले. तिथे जाऊन मिसळ खाल्ली पण आवडली नाही. :-( मालालेदार मिसळवाल्यांचे असे एखादे हॉटेल ठाण्यात आहे का? बाकी चिंचवडमधल्या नेवाळे मिसळ बद्दल कुणीच बोलले नाही........
  • Log in or register to post comments

इथे

नाखु
Tue, 02/16/2016 - 17:29 नवीन

इथे उल्लेख

आहे पिंचीकर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूक्ष्मजीव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा