मामलेदार मिसळ पंढरी
लेखनप्रकार
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले.
पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती.
अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला.
आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले,
मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान?
सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??",
बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली.
क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं.
अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय )
त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो.
गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते".
अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास !
मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो
आमचे काही अलिखित नियम आहेत
रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही
आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे
टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे
वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे
समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे,
नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे
पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे
सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे
पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे.
मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वाचने
33991
वाचनखूण
प्रतिक्रिया
209
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक by होबासराव
हाव, आन पानीपुरी
In reply to हाव, आन पानीपुरी by संदीप डांगे
अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक
In reply to अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक by कैलासवासी सोन्याबापु
फुग्गेच! :))
मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही
In reply to मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही by उगा काहितरीच
धानोरीला जकात नाक्याजवळ
In reply to धानोरीला जकात नाक्याजवळ by उगा काहितरीच
पाव छान मऊ लुसलुशीत असतात.
In reply to पाव छान मऊ लुसलुशीत असतात. by अभ्या..
तसे पाव पण ट्राय केले (करावे
पुण्यातली मिसळ
In reply to पुण्यातली मिसळ by राजेंद्र मेहेंदळे
अगदी हेच लिहायचे होते.
In reply to अगदी हेच लिहायचे होते. by भक्त प्रल्हाद
पुण्यातील रामनाथची मिसळ
गाववाले
In reply to गाववाले by होबासराव
अकोला छाप (जसे आवडते तसे)शँपल
In reply to गाववाले by होबासराव
पुण्यात फुग्गे :D
In reply to पुण्यात फुग्गे :D by कैलासवासी सोन्याबापु
पैल्यांडाव ते वरण पायल्यावर
मध्यंतरी वाडीला गेलो होतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
In reply to मध्यंतरी वाडीला गेलो होतो by मदनबाण
जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले
In reply to जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले by गवि
ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही
In reply to ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही by माझीही शॅम्पेन
तिथे पियुष पण भारी मिळते !!!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punchIn reply to तिथे पियुष पण भारी मिळते !!! by मदनबाण
तात्पुरते वायदे आझम का हो? =)
In reply to मध्यंतरी वाडीला गेलो होतो by मदनबाण
मामलेदार मिसळ मध्ये तीन प्रकारच्या मिसळ मिळतात
In reply to मामलेदार मिसळ मध्ये तीन प्रकारच्या मिसळ मिळतात by मीउमेश
मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असे
In reply to मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असे by गवि
ते 'आमंत्रण', तिकडेच खाल्ली
In reply to ते 'आमंत्रण', तिकडेच खाल्ली by संदीप डांगे
ते मामलेदार वाल्यांचंच आहे ना.
In reply to मध्यंतरी वाडीला गेलो होतो by मदनबाण
.
In reply to . by मोगा
एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ by मदनबाण
फिके पेठे हे फिके "पेढे" असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
मिसळ्पाववर मिसळपाववर धागा
सोलापुर रोड भिगवण
मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा
In reply to मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा by स्पा
मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा आहे
In reply to मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा आहे by मुक्त विहारि
चला मूवी तुमच्या घरीच बसू आता
In reply to चला मूवी तुमच्या घरीच बसू आता by स्पा
चालेल....
आता धागा इतर मिसळींनी हायजॅक
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
बेडेकर बेष्ट!
In reply to बेडेकर बेष्ट! by अनिरुद्ध.वैद्य
Vaishnavi chi Chan aasate
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
काटाकिर्र
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
पुण्यात इन्क्म टॅक्स
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
पुर्रेपूर मिसळ …
बर्याच शहरातल्या मिसळ
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
-))
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
काहीजण गावाची लाल करण्यासाठी
In reply to काहीजण गावाची लाल करण्यासाठी by अभ्या..
चल येतो का
In reply to चल येतो का by स्पा
जाऊ की. इलासरावांना आणि इतर
In reply to जाऊ की. इलासरावांना आणि इतर by अभ्या..
हिहि
In reply to हिहि by स्पा
ओ.. काय तो विदा तयार झाला का ?
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
हाहा
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
स्पा बुवा
In reply to स्पा बुवा by सुबोध खरे
+१
In reply to +१ by कैलासवासी सोन्याबापु
टुंडे कबाब दा जवाब नही!
धाग्यावर प्रतिसाद लिहिताना
In reply to धाग्यावर प्रतिसाद लिहिताना by शान्तिप्रिय
यात वयक्तिक काय दिसले ब्वो
पु ल देशपांडेंची..... , चुकून
आपल्या गावाचा जाज्वल्य अभिमान
In reply to आपल्या गावाचा जाज्वल्य अभिमान by मृत्युन्जय
ठिणग्या
In reply to आपल्या गावाचा जाज्वल्य अभिमान by मृत्युन्जय
हा हा, असं नै हो ते. गावोगावी
In reply to हा हा, असं नै हो ते. गावोगावी by संदीप डांगे
पुणेकरांना कळले की पुण्याच्या
In reply to पुणेकरांना कळले की पुण्याच्या by मृत्युन्जय
=))
In reply to हा हा, असं नै हो ते. गावोगावी by संदीप डांगे
येवा हिंजवडीत मंग! सक्काळी ९
In reply to आपल्या गावाचा जाज्वल्य अभिमान by मृत्युन्जय
हं. आणतात लोकं विस्तू
मा मि..
पुण्यातल्या शक्य तेवढ्या सर्व
In reply to पुण्यातल्या शक्य तेवढ्या सर्व by भीमराव
करायचा किनै मग.
In reply to करायचा किनै मग. by अभ्या..
अभ्या... कधी सोलापूरात आलो तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punchIn reply to अभ्या... कधी सोलापूरात आलो तर by मदनबाण
येच बाणा. कॅमेरा तेवढा घेऊन
बर्लिन किंवा टोरोंटो/न्युयॉर्क/लंडन
In reply to बर्लिन किंवा टोरोंटो/न्युयॉर्क/लंडन by राजेंद्र मेहेंदळे
अॅमस्टरडॅम लिहायचे राहिलेच
In reply to बर्लिन किंवा टोरोंटो/न्युयॉर्क/लंडन by राजेंद्र मेहेंदळे
कुणी व्हिजा देत असेल तर मी
पिंचि परीसरातील
रच्याकाने : जळगावात मामा चौकाजवळ सुमारे १८ वर्षांपुर्वी खालेल्या शेव्+ चव्दार तिखट रस्सा आणि पाव याची अजून आठवण येते खरी.
मिसळपाव्वाला वारकरी नाखुस.In reply to पिंचि परीसरातील by नाखु
बाकी कोल्हापुरच्या नावाखाली
In reply to पिंचि परीसरातील by नाखु
निसर्ग
In reply to पिंचि परीसरातील by नाखु
बालाजी मिसळ मोरया मंदिराजवळ
या गावची न त्या गावची
In reply to या गावची न त्या गावची by पैसा
शिळी भजी नसतील तर मिसळ मिसळच
मिसळ नामक पदार्थ ज्यात
In reply to मिसळ नामक पदार्थ ज्यात by जेपी
सहमत.
In reply to मिसळ नामक पदार्थ ज्यात by जेपी
जेपीभौ संभालके ! मिसळपावला
In reply to जेपीभौ संभालके ! मिसळपावला by उगा काहितरीच
बटाटा वड्या सोबत सांबर
In reply to बटाटा वड्या सोबत सांबर by जेपी
कड्ड्ड्ड्डक लागतं. मी आवर्जून
माझे पण २ पर्याय
In reply to माझे पण २ पर्याय by मी-सौरभ
इंदोरीचा पालथा मिसळवालापण आहे
In reply to इंदोरीचा पालथा मिसळवालापण आहे by मोहनराव
बाबौ इंदोरी मधे समाधानला
In reply to इंदोरीचा पालथा मिसळवालापण आहे by मोहनराव
आहे!! आहे!! मो रा
- पालथा
- चन्दू
- आता एक नविन कोहिनूर म्हणुन झालय भंडारा डोंगराजवळ, ते पण छान आहे.
ईकडे आलास की घेऊन जाईन.In reply to माझे पण २ पर्याय by मी-सौरभ
माउली मिसळ, घरगुती चव........
In reply to माझे पण २ पर्याय by मी-सौरभ
पिंपळे गुरव मधली माउली मिसळ
आमचीही मामलेदार मिसळ! :)
नाव माहित नाही पण माळशेज घाट
In reply to नाव माहित नाही पण माळशेज घाट by धनावडे
एक*
जियो मिपावर मिसळवारी आणा
मायला इतक्या ठिकाणच्या
मामा मिसळीचा उल्लेख कुणी कसा नाही काढला?