Celebration
लेखनविषय:
फार क्लेशदायक आहे
असं तुझ्याशिवाय
जगणं,
मी पर्यायांचा फारसा
विचारच करत नाही !
कट केल्याप्रमाणे रात्री
संगनमताने
अंगावर येतात,
तू जितकी
हळुवारपणे
यायचीस
तितक्याच टोकाचा
क्रूरपणा दाखवत !
दिवसाच्या उत्तरार्धात
रात्रीच्या पुर्वार्धात
अडकलेल्या कौमार्यवेळेत
मनाचे पाखरू
व्हरांड्यातल्या " फायरप्लेसवर"
जाऊन बसते,
गारठलेल्या गावातला गारठा,
धुक्यासह माझ्या घरात
शिरतो,
तेवणार्या रोशनदानाचे
तरंग
घरात नाचायला लागतात !
आता मला कविता
करावीशी वाटते,
तू नसताना ?
मी कवितेची कल्पनासुध्दा
करू शकत नाही,
तुझ्या नसण्याचे भान
मला असले तरी,
कल्पना अनभिज्ञ आहे !
पावसाळाभर दमट पडलेल्या
तुझ्या वसनांनचा
आवेगी सुगंध
नाकपुड्या, घोड्यासारख्या
फुरफुरवतो,
"फायरप्लेसमधे" जळणारी
ओली लाकडेही त्यात
भर घालतात,
उष्णता कमी
विरहच जास्त देतात !
तुझ्या तसबिरीवर मी
तूच विणलेला क्रोशा
पांघरलाय,
वार्यावर हलताना,
नक्षीला चिरून, रोशनदानाचे
तरंगते प्रकाश,
तुझ्या तसबीरीला उजळवतात !
अचानक कोनाड्यातल्या
इटालियन कटग्लासाला
गार हाताचा स्पर्श करून मी,
सेलिब्रेशन साठी ठेवलेली
Chivas Regal
काढतो,
तुझ्या नसण्याचं
माझ्या एकांताचं
एकट्या फायरप्लेसचं
दमट सुगंधाचं
मला आता Celebration
करायचं असतं
Celebration मधे
तुझं नसणं तितकच प्राकर्षाने जाणवत !
विजयकुमार............................
23 / 11 / 2008
वाचने
1850
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
Jabbardast sundar. English
आ भा री आहे मित्रा
सुरेख सेलिब्रेशन
सरेखच कविता.
In reply to सरेखच कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख कविता
In reply to सरेखच कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवी कल्पनेतही तिचे नसणे मान्य
तुम्ही नेहमीच असं टोचणारं
In reply to तुम्ही नेहमीच असं टोचणारं by सूड
सूड
+१
माझी लकेरी नावाची कविता