✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Celebration

प — पालीचा खंडोबा १, Tue, 01/19/2016 - 12:31
फार क्लेशदायक आहे असं तुझ्याशिवाय जगणं, मी पर्यायांचा फारसा विचारच करत नाही ! कट केल्याप्रमाणे रात्री संगनमताने अंगावर येतात, तू जितकी हळुवारपणे यायचीस तितक्याच टोकाचा क्रूरपणा दाखवत ! दिवसाच्या उत्तरार्धात रात्रीच्या पुर्वार्धात अडकलेल्या कौमार्यवेळेत मनाचे पाखरू व्हरांड्यातल्या " फायरप्लेसवर" जाऊन बसते, गारठलेल्या गावातला गारठा, धुक्यासह माझ्या घरात शिरतो, तेवणार्‍या रोशनदानाचे तरंग घरात नाचायला लागतात ! आता मला कविता करावीशी वाटते, तू नसताना ? मी कवितेची कल्पनासुध्दा करू शकत नाही, तुझ्या नसण्याचे भान मला असले तरी, कल्पना अनभिज्ञ आहे ! पावसाळाभर दमट पडलेल्या तुझ्या वसनांनचा आवेगी सुगंध नाकपुड्या, घोड्यासारख्या फुरफुरवतो, "फायरप्लेसमधे" जळणारी ओली लाकडेही त्यात भर घालतात, उष्णता कमी विरहच जास्त देतात ! तुझ्या तसबिरीवर मी तूच विणलेला क्रोशा पांघरलाय, वार्‍यावर हलताना, नक्षीला चिरून, रोशनदानाचे तरंगते प्रकाश, तुझ्या तसबीरीला उजळवतात ! अचानक कोनाड्यातल्या इटालियन कटग्लासाला गार हाताचा स्पर्श करून मी, सेलिब्रेशन साठी ठेवलेली Chivas Regal काढतो, तुझ्या नसण्याचं माझ्या एकांताचं एकट्या फायरप्लेसचं दमट सुगंधाचं मला आता Celebration करायचं असतं Celebration मधे तुझं नसणं तितकच प्राकर्षाने जाणवत ! विजयकुमार............................ 23 / 11 / 2008

प्रतिक्रिया द्या
1836 वाचन

💬 प्रतिसाद (10)

Jabbardast sundar. English

निनाव
Tue, 01/19/2016 - 20:31 नवीन
Jabbardast sundar. English shabdaancha waapar khoopach sundar jamlaay. wah.. punha punha waachale kaahi kaDve..
  • Log in or register to post comments

आ भा री आहे मित्रा

पालीचा खंडोबा १
Tue, 01/19/2016 - 21:30 नवीन
आ भा री आहे मित्रा
  • Log in or register to post comments

सुरेख सेलिब्रेशन

देव मासा
गुरुवार, 01/21/2016 - 08:18 नवीन
सुरेख सेलिब्रेशन
  • Log in or register to post comments

सरेखच कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 18:14 नवीन
शेवटच्या समारोपाच्या ओळी खासच द्याट इज नॉट क्वश्चन. पण - आता मला कविता करावीशी वाटते, तू नसताना ? मी कवितेची कल्पनासुध्दा करू शकत नाही, तुझ्या नसण्याचे भान मला असले तरी, कल्पना अनभिज्ञ आहे ! वरील ओळीत जरा गडबड वाटली. कल्पना अनभिज्ञ आहेत म्हणुन कविता न सुचणे आणि एकीकडे कविता करावीशी वाटते तु नसतांना हे काँबीनेशन जमलं नाही असे वाटते की मला नीटसे समजले नाही काय माहिती. पण मला वरील ओळींचा आनंद घेता आला नाही. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 18:16 नवीन
प्रतिसादाचं शीर्षक सुरेख कविता असं करावं अशी संपादकांना विनंती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवी कल्पनेतही तिचे नसणे मान्य

पालीचा खंडोबा १
Fri, 01/22/2016 - 11:55 नवीन
कवी कल्पनेतही तिचे नसणे मान्य करत नाही असा अर्थ आहे. ह्या कविता पूर्वी लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यावेळेची मन:स्थिती तितकी लक्ष्यात राहिली नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही नेहमीच असं टोचणारं

सूड
गुरुवार, 01/21/2016 - 18:29 नवीन
तुम्ही नेहमीच असं टोचणारं लिहीता का? वाचून झाल्यावर डोकं सुन्नं होतं.
  • Log in or register to post comments

सूड

पालीचा खंडोबा १
Fri, 01/22/2016 - 11:56 नवीन
टोचणारे नाही हो भोगणारे लिहितो. सगळेच काही मला लागू होत नाही काही वेळा इतर माझ्याशी जे शेअर करतात त्यांच्या वेदनाही इथे उमटतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

चाणक्य
गुरुवार, 01/21/2016 - 18:43 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

माझी लकेरी नावाची कविता

पालीचा खंडोबा १
Fri, 01/22/2016 - 11:58 नवीन
माझी लकेरी नावाची कविता वेगळीच आहे टोचणारी नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा