फार क्लेशदायक आहे
असं तुझ्याशिवाय
जगणं,
मी पर्यायांचा फारसा
विचारच करत नाही !
कट केल्याप्रमाणे रात्री
संगनमताने
अंगावर येतात,
तू जितकी
हळुवारपणे
यायचीस
तितक्याच टोकाचा
क्रूरपणा दाखवत !
दिवसाच्या उत्तरार्धात
रात्रीच्या पुर्वार्धात
अडकलेल्या कौमार्यवेळेत
मनाचे पाखरू
व्हरांड्यातल्या " फायरप्लेसवर"
जाऊन बसते,
गारठलेल्या गावातला गारठा,
धुक्यासह माझ्या घरात
शिरतो,
तेवणार्या रोशनदानाचे
तरंग
घरात नाचायला लागतात !
आता मला कविता
करावीशी वाटते,
तू नसताना ?
मी कवितेची कल्पनासुध्दा
करू शकत नाही,
तुझ्या नसण्याचे भान
मला असले तरी,
कल्पना अनभिज्ञ आहे !
पावसाळाभर दमट पडलेल्या
तुझ्या वसनांनचा
आवेगी सुगंध
नाकपुड्या, घोड्यासारख्या
फुरफुरवतो,
"फायरप्लेसमधे" जळणारी
ओली लाकडेही त्यात
भर घालतात,
उष्णता कमी
विरहच जास्त देतात !
तुझ्या तसबिरीवर मी
तूच विणलेला क्रोशा
पांघरलाय,
वार्यावर हलताना,
नक्षीला चिरून, रोशनदानाचे
तरंगते प्रकाश,
तुझ्या तसबीरीला उजळवतात !
अचानक कोनाड्यातल्या
इटालियन कटग्लासाला
गार हाताचा स्पर्श करून मी,
सेलिब्रेशन साठी ठेवलेली
Chivas Regal
काढतो,
तुझ्या नसण्याचं
माझ्या एकांताचं
एकट्या फायरप्लेसचं
दमट सुगंधाचं
मला आता Celebration
करायचं असतं
Celebration मधे
तुझं नसणं तितकच प्राकर्षाने जाणवत !
विजयकुमार............................
23 / 11 / 2008
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
Jabbardast sundar. English
Jabbardast sundar. English shabdaancha waapar khoopach sundar jamlaay.
wah.. punha punha waachale kaahi kaDve..
आ भा री आहे मित्रा
आ भा री आहे मित्रा
सुरेख सेलिब्रेशन
सुरेख सेलिब्रेशन
सरेखच कविता.
शेवटच्या समारोपाच्या ओळी खासच द्याट इज नॉट क्वश्चन.
पण -
आता मला कविता
करावीशी वाटते,
तू नसताना ?
मी कवितेची कल्पनासुध्दा
करू शकत नाही,
तुझ्या नसण्याचे भान
मला असले तरी,
कल्पना अनभिज्ञ आहे !
वरील ओळीत जरा गडबड वाटली. कल्पना अनभिज्ञ आहेत म्हणुन कविता न सुचणे आणि एकीकडे कविता करावीशी वाटते तु नसतांना हे काँबीनेशन जमलं नाही असे वाटते की मला नीटसे समजले नाही काय माहिती. पण मला वरील ओळींचा आनंद घेता आला नाही.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
सुरेख कविता
In reply to सरेखच कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाचं शीर्षक सुरेख कविता असं करावं अशी संपादकांना विनंती.
-दिलीप बिरुटे
कवी कल्पनेतही तिचे नसणे मान्य
In reply to सरेखच कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवी कल्पनेतही तिचे नसणे मान्य करत नाही असा अर्थ आहे. ह्या कविता पूर्वी लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यावेळेची मन:स्थिती तितकी लक्ष्यात राहिली नाही
तुम्ही नेहमीच असं टोचणारं
तुम्ही नेहमीच असं टोचणारं लिहीता का? वाचून झाल्यावर डोकं सुन्नं होतं.
सूड
In reply to तुम्ही नेहमीच असं टोचणारं by सूड
टोचणारे नाही हो भोगणारे लिहितो. सगळेच काही मला लागू होत नाही काही वेळा इतर माझ्याशी जे शेअर करतात त्यांच्या वेदनाही इथे उमटतात
+१
आवडली
माझी लकेरी नावाची कविता
माझी लकेरी नावाची कविता वेगळीच आहे टोचणारी नाही