मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?
धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__
लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ?
लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा
दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो.
सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते.
जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी?
धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा
केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे.
हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही
तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण
त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार
आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता.
संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे
लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची
अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.
(सर्व चित्रे आंतर जालावरून साभार)
(सर्व चित्रे आंतर जालावरून साभार)वर्गीकरण
प्रतिक्रिया
सा संस्थळावर कसे लिहावे ही
लोकांनी आपल्या (अति)ज्ञानाचे
भारी
पाय पाठवून द्या .
फोल विडंबन
हो हो
धन्यवाद जज्जसाहेब,
क्या आयडिया हय! फस्क्लास!
=))
होय हो, आता आडात नाय तर पोहर्
विडंबन मस्त...
हा हा हा
नीलमोहरजी
मारवाजी,
मस्त !