Skip to main content

जीवनमान

काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 12/02/2024 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते. तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.

भारताच्या तुलनेत

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 29/12/2022 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे. हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का?

योजना ब / क / ड ....

लेखक Trump यांनी शुक्रवार, 10/12/2021 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
योजना ब / क / ड .... नैसगिक आपत्ती, अपघात, विसळभोळेपणा, कोणचा तरी मुद्दाम केलेला खोडसाळपणा, चोरी, अवक्तशीरपणा इत्यादी संकटातुन कोणी चुकलेली नाही. हि संकटे एक - एक आली तर थोडे स्वता:ला संभाळण्यासाठी वेळ आणि संधी मिळते. पण जर ती एकत्र आली तर मग मात्र खरे नाही. १. साधारणतः जुन २०१४ मध्ये मला मुलाखतीला जायचे होते. ज्या ठिकाणी मी राहयला होतो ते घर बंद होते आणि माझ्याकडे किल्ली नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाखतीचा बोर्‍या उडला. २. २०२१ मध्ये मी विंडोसमध्ये मायक्रोसॉफ्ट्चे खाते जोडले, पण मला परवलीचा शब्द ( पासवर्ड ) त्या खात्याचा आठवत नव्हता. संगणकने स्वतः मला न विचारता संकेताक्षर बदलले.

कायदे पाळणे हा मूर्खपणा आहे का ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 29/07/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-… आज ही बातमी वाचून हसावं की रडावं तेच कळेना राव ! आयुष्यभर झगडून एक एक पै जोडून घर विकत घेण्यासाठी १७६० कायदे पाळणारा माणूस मूर्ख असतो काय ? हे कुठंतरी थांबायला हवं.... हेच करायचं होतं तर इतका आटापिटा का केला आधी ? लोकांचा अजून किती अंत पाहणार ? नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न !

मिपा संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का?

लेखक नीलमोहर यांनी सोमवार, 18/01/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
धागापेरणी आपलं ते प्रेरणा: __/\__ लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढण्याची (काय गरज आहे) ? लोकांनी आपल्या (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे काढावेत/काढू नयेत या विषयावर सर्वत्र खूप चर्चा केली जाते. सार्वजनिक संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला निव्वळ टाईमपास लेखनाचा दर्जा न देता सकस अभिव्यक्तीचा दर्जा दिला जातो. तर काही संस्थळ संस्कृती मध्ये धाग्याला फक्त टाकावू लेखनाचा दर्जा दिला जातो. सुजाण लोकांत सुविचारी लिखाणाचे प्रदर्शन केले जाते तर अजाण लोकांत ते सर्वज्ञपणाच्या बुरख्यात झाकले जाते. जर धागालेखन म्हणजे फक्त (अ)ज्ञान दाखवणे नसेल तर (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे किंवा झाकणे कशासाठी? धाग्याला गुणवत्तापूर्णच राहिले पाहिजे. ही कसली मानसिकता आहे जेव्हा लोकांकडून कसदार लेखनाची अपेक्षा केली जाते तेव्हा (अ)विचाराने भारलेले लोक म्हणू लागतात हे आमच्या (अ)विचार स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण, एखाद्या सुविचारी परिवारातील व्यक्तीला सांगितले तुला जसे लिहायचे ते लिही तुला कोणी काही म्हणणार नाही, तर तो (अ)विचाराचे प्रदर्शन होईल असे धागे नक्कीच लिहीणार नाही. कारण त्याच्या डोक्यात स्वतंत्रता म्हणजे (अ)ज्ञानाचे प्रदर्शन करणे हा विचार रूजलेला नसेल. आपणच हा विचार आपल्या लेखनातून लिहिणाऱ्याच्या मनात रूजवतो. (अ)ज्ञानाचे प्रदर्शन होईल असे धागे टाकणे म्हणजे स्वतंत्रता. संस्थळावर धाग्याचा विकास होण्यासाठी लेखनाला सकस, सक्षम, व समर्थ व्हावेच लागेल. कारण उच्च प्रतीचे लेखन हाच सार्वजनिक संस्थळ जगताचा आधार आहे, जर त्याचेच पतन झाले तर सार्वजनिक संस्थळ जगताची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.