मिळू जाउनि इंग्रजी सागराला
In reply to न्यूनगंडाला मात विश्वासानेच by माहितगार
In reply to विश्वास मराठीप्रेमाने by वेल्लाभट
In reply to माध्यमावर फारसं काही अवलंबून by पिवळा डांबिस
In reply to तुमची गल्लत झालेली दिसते. by वेल्लाभट
तुमची गल्लत झालेली दिसते.असं? काय नेमकी गल्लत झाली ते सांगा बॉ!
नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच.विचार करूनच सांगतोय, आपल्या मुला-मुलींचं भविष्य महत्वाचं की इंग्रजीव्यतिरिक्त माध्यमाचा आग्रह महत्वाचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मात्र व्हर्नाक्युलर माध्यम घेतल्यावर सायन्सला गेलेल्या मुलांचा अकरावी/बारावीमध्ये पिट्ट्या पडतो हे सत्य आहे...
आणि तरीही हे एकदा वाचाच.युनेस्कोच्या लिंका देऊन तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांत काही साध्य होत नाही हो! १. मुळात विद्यार्थी हुशार हवा, बहुसंख्य तसे नसतात. २. हूशार विद्यार्थ्याला माध्यम कोणतंही असलं तरी यशस्वी करियर करण्यात फारसा अडथळा येत नाही. ३. सायन्सकडे कल असल्यास इंग्रजी माध्यम असल्यास जास्त सोपं पडतं हे माझे मुद्दे. आता करा प्रतिवाद.
In reply to तुमची गल्लत झालेली दिसते. by पिवळा डांबिस
In reply to बाय द वे by पिवळा डांबिस
तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.काही अंशी यात तथ्य असलं तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुलगा हुशार असेल तर it does not trouble him much. तो/ती चटकन आत्मसात करतात. टेक्निकल टर्म्स फक्त बदलतात, बाकी इंग्रजी त्याला येत असतंच. आम्ही सोसलं तुम्ही सोसा... असा विचार कुठलाही सुजाण पालक करणार नाही. इंग्रजीत टाकू हा विचार जसा मुलाच्या भल्यासाठी करतात तसाच मराठीत टाकू हाही भल्यासाठीच केलेला विचार आहे. पण भलं नक्की कशात आहे हा प्रश्न आहे.
In reply to बाय द वे by पिवळा डांबिस
बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते.दुसरे कारण असते की नाही हे माहित नाही पण बहुतांश वेळा पहिले कारण नक्कीच असते. मी पण त्याच सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी खूप काही दिले हे पण नक्कीच. तरीही नव्या काळाची पावले लक्षात घेऊन शाळेने योग्य निर्णय घेतला असे मला वाटते. तो निर्णय घेतला नसता तर काही वर्षांनी शाळा बंद झाली असती अशी भिती वाटते.तसे झाले असते तर अजून वाईट वाटले असते. मला वाटते की शाळेच्या माध्यमापेक्षा विचार कसा करायचा, प्रश्न कसे विचारायचे इत्यादी गोष्टी, ज्याला शिक्षणपध्दती म्हणता येईल ती अधिक महत्वाची आहे.मी शाळेत असताना ही शिक्षणपध्दती भलतीच उच्च दर्जाची होती हे नक्कीच. ती शिक्षणपध्दती तशीच ठेवली किंबहुना आणखी चांगली केली की झाले. मग शाळेचे माध्यम ही दुय्यम गोष्ट आहे. (माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही जास्त शिक्षणसंस्थांचा विद्यार्थी म्हणून राहिलेला आणि त्या अनेक संस्थांपैकी केवळ दोन संस्थांनी खरोखरची व्हॅल्यू अॅडिशन केली असे मानणारा आणि त्या दोन संस्थांपैकी सरस्वती सेकंडरी स्कूल ही एक आहे असे मानणारा आणि शाळा अजूनही मिस करणारा) ट्रुमन
In reply to माध्यमावर फारसं काही अवलंबून by पिवळा डांबिस
In reply to पुर्वी मारामार्आ झाल्या आहेत by मोगा
In reply to ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, by वेल्लाभट
महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली.ही गोष्ट महत्वाची तर आहेच! पण का? तुम्ही त्या शाळेच्या संचालकांना विचारून पाहिलंत का? काय म्हणतात ते?
In reply to महाराष्ट्रात पहिल्या पाच by पिवळा डांबिस
In reply to तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो by वेल्लाभट
उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादीकारण प्रत्येक मराठी/भारतीयाला आपला मुलगा/मुलगी इंजिनियरच व्हायला हवा/वी असते ना! :) सुतार, शिक्षक, वार्ताहर वगैरे व्हायला कितीजणांना चालेल? पूर्वी डॉक्टर चालायचं पण आता एमडी होउनही प्रॅक्टिस करण्यातल्या अडचणी दिसल्यापासून ते ही थंडावलंय!!! मला कधीकधी प्रश्न पडतो की वर्षानुवर्ष इतके इंजिनियर्स काढूनही भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं केविलवाणं का? :)
In reply to लाट by राही
लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून?ती तशीही होतेच की इंग्रजीतून शिकल्यावर. सवय म्हणजे सतत बोलण्याची नव्हे. माझं उदाहरण देतो, मी आणि माझा मित्र आमच्या पालकांचा सल्ला मनावर घेऊन संध्याकाळी ठराविक वेळी इंग्रजीत बोलत असू. मुद्दाम. त्याने बोलायची सवय लागली, भीती गेली. अशातच इंग्रजी गाणी, पिक्चर इत्यादींची ओळख झाली. आमच्या एका क्लासच्या बाईंनी मुद्दाम आम्हा विद्यार्थ्यांना बोलवून घरी व्हीसीआर वर इंग्रजी पिक्चर दाखवला होता मला आठवतं. बेन हर पिक्चर होता. त्यामुळे, सवय लावणं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे असे एफर्ट्स घेतले तर फायदा होतो.
In reply to ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच by संदीप डांगे
युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे.अनुमोदन. मुद्दा फक्त मराठीचा नाहीच आहे मुळी; पण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत म्हणून मराठी. अस्मिता वगैरे राजकीय शब्द झालेत आता.
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं.
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नयेपेठकर काका - समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? मला खरंच काही कळत नाही . आपण मराठीत शिकलो, मुले इंग्लिश मधे शिकली आणि मराठी पण बोलतात. कदाचित त्यांची मुले इंग्लिश मधे शिकतील आणि मराटीत अजिबात बोलणार नाहीत. ठीक आहे ना. बदल तर होतच असतो. हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्या जुनाट काळातच खिपचत पडणार्याची आठवण येते. फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?
In reply to 'युनेस्को' या एका जागतिक by प्रसाद१९७१
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही.ठीक आहे मग. राहिलं! तुम्ही शास्त्रीय पुरावा तपासा; किंवा ज्या संस्थेने हा विचार मांडलाय, (युनेस्को) त्या संस्थेशी संपर्क साधा, विचारा. मी त्या संस्थेची विश्वासार्हता लक्षात घेऊन त्याकडे बघतो. आणि माझी मतं आहेत ती वेगळी; केवळ युनेस्को म्हणते म्हणून लगेच मीही, अशातला भाग नाही.
In reply to 'युनेस्को' या एका जागतिक by प्रसाद१९७१
हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्या जुनाट काळातच खिपचत पडणार्याची आठवण येते.अशी मनोवृत्ती असलेले लोक प्रचंड डोक्यात जातात राव.
फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?सहमत आहे
In reply to 'युनेस्को' या एका जागतिक by प्रसाद१९७१
In reply to बदल स्विकारलेच पाहिजेत. पण जुने लगेच वाईट ठरते? by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर काका - स्पेसिफिकली by प्रसाद१९७१
In reply to बदल स्विकारलेच पाहिजेत. पण जुने लगेच वाईट ठरते? by प्रभाकर पेठकर
In reply to जुने वाईट नाही. by राही
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
In reply to एक काम करा बघू . by अद्द्या
In reply to मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" by प्रसाद१९७१
In reply to एकाला जे आवडेल ते दुसर्याला by अद्द्या
बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .मला वाटते लोक इंग्रजी माध्यमात जातात ते सुद्धा पुढे पैसे मिळवणे सोप्पे जावे म्हणुन.
कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत .मी ही तेच म्हणतोय. त्याचा भावनिक मुद्दा बनवायची गरज नाही मातृभाषा वगैरे शब्द वापरुन, हेच सांगतोय
In reply to बाकी देश सोडून जातात ते पैसे by प्रसाद१९७१
In reply to हेच सगळं सारखं लिहून काय by सूड
In reply to हेच सगळं सारखं लिहून काय by सूड
In reply to मुद्दा चांगला मांडला आहे वेल्लाभाऊ by बोका-ए-आझम
इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.- १००% सहमत. "मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही" - घरातून, पालकांकडून व्यवस्थित लक्ष दिले गेले तर मुले या दोन्ही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून. १०वी पर्यंतचे शिक्षण मराठीत, नंतर अचानक पुढील उच्च शिक्षण इंग्रजीतून घेणे त्यांना कठिण जाते, सर्वच लोक काही अतिहुशार नसतात. हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते. इंग्रजी आता जागतिक भाषा आहे आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे, त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे. माध्यम कोणतेही असो.. शिकणं, स्वतःला घडवणं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. अजून खूप काही लिहीता येईल पण... पुन्हा पुन्हा त्याच त्या चर्चांवर गिगाबायटी प्रतिसाद टाईपण्याचे कष्ट घेणार्या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं.
In reply to +१ by नीलमोहर
In reply to +१ by नीलमोहर
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.का? आणि हे आपल्याइथेच होतं की इतर इंग्रजेतर भाषिक देशातही होतं?
इंग्रजी आता जागतिक भाषा आहेहे आपण जितक्या ठामपणे सांगतो, मानतो, आपल्या मुलांची शिक्षणपद्धतीही बदलतो, तितक्या ठामपणे इतर इंग्रजेतर भाषिक देश म्हणतात का?
आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,माध्यम बदलायला हवंच का? त्या भाषेचे शिक्षण घेऊनही पुरेसं असतं असं नाही वाटत का?
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.त्यात कमीपणा नाही वाटत; कमीपणा मातृभाषेतून शिकण्यात वाटतो. असो. पुन्हा तीच चर्चा मलाही करायची नाही. पण जसं तुम्हाला गिगाबायटी प्रतिसादकांचं कौतुक वाटतं, तशीच मला 'बाहेरच्या जगात (हे जग तुमच्या घराच्या उंबरठ्यापासून सुरू होतं) इंग्रजी बोलावच लागतं' असं म्हणणा-यांची फार मजा वाटते.
In reply to +१ by नीलमोहर
In reply to +१ by नीलमोहर
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.याबद्दल काही विदा? पुरावा? कारण आत्ता २०१० ते २०१५ ह्या काळात जे विद्यार्थी मुलाखती देत असतील त्यांचे प्राथमिक शिक्षण अंदाजे १९९० ते १९९५ यादरम्यान सुरू झाले असावे, तेव्हा इंग्रजी शाळांचे स्तोम अजिबात नव्हते. तेव्हा कॉन्वेंट तुरळक होत्या. इंग्रजीचेही स्तोम माजले नव्हते. इंग्रजीचे स्तोम माजायला साधारण १९९५ सालानंतर सुरुवात झाली. ९१ च्या नीतीबदलानंतर ग्लोबलायझेशनची लाट आली. वायटूकेमुळे मुलं भराभर परदेशात गेली, परदेशातून आयटीचे बूम भारतात आले त्यांना सर्वप्रांतीय, सर्वभाषिक कामगारांना एकत्र काम करणे सोयीचे जावे म्हणून इंग्रजी संवादकौशल्य उत्तम असलेल्यांना निवडले जाऊ लागले. ह्यासर्व कारणामुळे इंग्रजी आवश्यक असा समज सर्वत्र पसरला. २००० सालानंतर मराठी शाळेत मुलांना टाकणारे झपाट्याने कमी झालेत. इंग्लिश स्पीकींगचे बूमही २००० सालानंतर प्रचंड फोफावले. 'आम्हाला इंग्रजी शाळेत का टाकले नाही' हा प्रश्न विचारू शकणारी पीढी आधीच नोकर्यांमधे आहे, भविष्यात जी विचारू शकेल ती इंग्रजी शाळेत आहे. त्यामुळे पालकांच्या नावाने ओरडणारे विद्यार्थी नक्की कोठे आहेत याचे कुतूहल आहे. माझे निरिक्षण असे आहे अशी भीती आताच्या बहुसंख्य (पिरातैंना वगळून) पालकांच्याच मनात आहे म्हणून ह्या भीतीलाच ते इंग्रजी शाळेत टाकण्यासाठीचे कारण, ढाल म्हणून वापरतात. तसंच प्रत्यक्ष अनुभवानुसार माझ्या अकोल्यातल्या (मुंबईच्या तुलनेने मागास) शाळेतले साठ टक्के वर्गबंधू मोठ्मोठ्या कंपन्यांमधे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सर्वांचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे, खरंच कोण पालकांना ओरडतंय हा प्रश्न पडलाय.
In reply to हे असेच सुरु राहिले तर अजून by sagarpdy
In reply to हे असेच सुरु राहिले तर अजून by sagarpdy
In reply to काय ते फाड्फाड अंग्रेजीचे आकर्षण! by पैसा
In reply to ओक काका, तुमचा यूनेस्को by pacificready
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.या प्रतिसादाशी १००% सहमत.
न्यूनगंडाला मात विश्वासानेच