मराठी शाळाही धरत आहेत इंग्रजीची कास. लोकसत्ता मधे अशा आशयाची बातमी आहे. माझ्याच शाळेची ती बातमी आहे. हे सांगताना खंत वाटते. मी स्वत: सरस्वती सेकंडरी स्कूल चा एक माजी विद्यार्थी असून हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. माझे संपूर्ण शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून, मराठी माध्यमातून झाले आहे. आणि सरस्वती ही शाळा महाराष्ट्रातील अग्रेसर मराठी शाळांपैकी एक आहे ही बाब नेहमीच सुखावते. परंतु इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा शाळेचा निर्णय दु:खद आहे. आज असंही मराठी लोकांवर, मराठी भाषेवर जे वैचारिक आक्रमण सुरू आहे ते चिंताजनक आहे. असं असताना मराठी शाळांनी स्वत:हूनच इंग्रजीची कास धरणं हे म्हणजे माघार घेण्यासारखं आहे. मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांइतक्याच किंबहुना त्यांच्याहून जास्त चांगल्या असू शकतात, असा खरा तर शाळेचा पवित्रा हवा होता, पण तो तसा नाही.
आज अवघी जनता ‘ट्रेंड’ च्या मागे धावणारी झालेली आहे. डोळ्यावर झापडं बांधून फक्त सगळे करतात ते आपण करावं अशा प्रकारची एक विचारहीन संस्कृती आकार घेते आहे. त्यामुळे ‘कुणी ठरवलं इंग्रजी माध्यम इतर भाषिक माध्यमाहून श्रेष्ठ?’, ‘मराठीमधून शिक्षण म्हणजे मुलांचं भवितव्य अंधारात, आणि इंग्रजी ही भविष्याची गुरुकिल्ली असं कसं?’ हे आणि असे प्रश्न फार कमी लोकांना पडतात, आणि ज्यांना पडतात तेही त्या प्रश्नांची गळचेपी करून पुन्हा प्रवाहात सामील होतात. माझ्या अगदी निकटच्या व्यक्तीला जेंव्हा 'मी माझ्या मुलाला/मुलीला बेस्ट एज्युकेशन देणार. टॉपच्या कॉन्व्हेंट मधे नाव नोंदवलंय' असं म्हणताना ऐकतो तेंव्हा काय म्हणावं कळत नाही. बरं या व्यक्ती स्वतः मराठी माध्यमातून शिकलेल्या असतात हे विशेष खटकणारं असतं.
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं. युनेस्कोने मल्टिलिंग्वल म्हणजे बहुभाषिक राष्ट्रांना मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. गूगल वर ‘युनेस्को मदरटंग एज्युकेशन’ हे शब्द टाकून शोध घेतला असता हा आणि असे अनेक मजकूर तुम्हाला वाचता येऊ शकतात. सरस्वतीच नव्हे, इतर कुठल्याही शाळेत आपल्या पाल्याला टाकू बघणार्या प्रत्येक पालकाला मी सांगेन की तुम्ही या पत्रिका जरूर वाचा. समजून घ्या. आणि मगच तुमचा निर्णय घ्या. कारण हे म्हणणं कुणा सामाजिक संस्थेचं किंवा व्यक्तीचं नसून युनेस्कोचं आहे.
इंग्रजी माध्यमाविरोधात काहीही बोललं की अनेकांना असं वाटतं की इंग्रजीला असलेला हा विरोध आहे. विरोध इंग्रजी भाषेला नसून इंग्रजी माध्यमाला आहे. इंग्रजी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नुसती आली पाहिजे नाही तर त्यात प्राविण्य मिळवलं पाहिजे. परंतु त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला हवेत, इंग्रजी माध्यमाची गरज नाही. लहानपणापासून नियमितपणे इंग्रजीत संभाषण करायची सवय लावली, सराव केला, तर मुलांना इंग्रजी बोलण्याचा न्यूनगंड कधीच भेडसावत नाही. इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी कविता, गाणी यांच्याशीही योग्य वेळी त्यांचा परिचय करून दिला, तर ते फायद्याचं ठरतं.
'मी नाटकं वगरे बघत नाही. त्यात खूप हाय लेव्हल मराठी असतं' हे वाक्य जेंव्हा एखाद्या मराठी व्यक्तीकडून ऐकायला मिळतं तेंव्हा मात्र कीव करावीशी वाटते, त्यांची आणि त्यांच्या पालकांची. हीच गत इतर भाषांचीही आहे. ही एकट्या मराठीची समस्या नाही, ही भारतातल्या प्रत्येक प्रादेशिक भाषेची समस्या आहे. दुर्दैव हे की आपण इंग्रजीप्रेमात इतके आंधळे झालो आहोत की आपल्याला याच्या परिणामांची पर्वाच नाही. आपल्या मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही, असा आजकालचा विचार आहे.
सरस्वती शाळेत झालेल्या भावी पालकांच्या बैठकीत मी उपस्थित होतो. तिथे शाळेतर्फे एका व्यक्तीने असं मत मांडलं की हा मराठीचा वृथा अभिमान आहे आणि तो अयोग्य आहे. शिवाय मराठीतून शिकलेली मुलं ही पुढे जाऊन स्पर्धात्मक जगात मागे पडतात. यावर मी इतकंच म्हणू शकतो आणि जे मी तिथे त्या व्यक्तीशीही बोललो, की वृथा अभिमान इंग्रजीचा असू शकतो; मराठीचा, मातृभाषेचा अभिमान वृथा कसा, हे मला कळत नाही. शिवाय मी आणि माझ्यासारखे तमाम मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी आज आयुष्यात आपापल्या जागी यशस्वी आहेत. ते कुठेही मागे पडलेले नाहीत आणि या विचाराचं जर एखादी शाळा प्रतिनिधित्व करत असेल तर तो त्या शाळेच्या लेखी पराभव आहे. मराठी शाळेतल्या पालकांना आज मुलांना इंग्रजी शाळेत घालावंसं वाटतं, तिथली फी त्यांना परवडते, यातून हे सिद्ध होतं की ते स्पर्धात्मक युगात यथायोग्य टिकलेले आहेत. ते मागे फक्त एकाच बाबतीत पडले की त्यांना स्वतःच्या मातृभाषेतून झालेल्या शिक्षणाचा विसर पडला आणि ते कमीपणाचं वाटू लागलं.
तरीही, सरस्वती शाळा, तिथले शिक्षक, आणि शाळेचा इतिहास हे सगळं फार उच्च दर्जाचं आहे. त्यामुळे माध्यम कुठलं हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवून एक गोष्ट विश्वासाने सांगेन की सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा, ठाणे ही शाळा इतर शाळांपेक्षा नेहमीच उजवी ठरलेली आहे, आणि पुढेही ठरेल. तेंव्हा मुलाच्या/मुलीच्या भविष्याकरिता सरस्वतीच्या पर्यायाचा जरूर विचार करा.
ब्लॉग दुवा हा: www.apurvaoka.com/2015/11/english-marathi-medium-school.html
वाचने
10378
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्यूनगंडाला मात विश्वासानेच
विश्वास मराठीप्रेमाने
In reply to न्यूनगंडाला मात विश्वासानेच by माहितगार
'म्हणजे नेमके काय ?' ते
In reply to विश्वास मराठीप्रेमाने by वेल्लाभट
माध्यमावर फारसं काही अवलंबून
तुमची गल्लत झालेली दिसते.
In reply to माध्यमावर फारसं काही अवलंबून by पिवळा डांबिस
तुमची गल्लत झालेली दिसते.
In reply to तुमची गल्लत झालेली दिसते. by वेल्लाभट
बाय द वे
In reply to तुमची गल्लत झालेली दिसते. by पिवळा डांबिस
तर सायन्सकडे जायचं असेल तर
In reply to बाय द वे by पिवळा डांबिस
सहमत आहे
In reply to बाय द वे by पिवळा डांबिस
पोरगं बालवाडीत असताना कसं
In reply to माध्यमावर फारसं काही अवलंबून by पिवळा डांबिस
पुर्वी मारामार्आ झाल्या आहेत
ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे,
In reply to पुर्वी मारामार्आ झाल्या आहेत by मोगा
महाराष्ट्रात पहिल्या पाच
In reply to ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, by वेल्लाभट
तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो
In reply to महाराष्ट्रात पहिल्या पाच by पिवळा डांबिस
उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक
In reply to तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो by वेल्लाभट
लाट
लहानपणापासून इंग्रजीतून
In reply to लाट by राही
इंग्रजी माध्यम = यशाचा झटमार्ग असा समज
मराठी माध्यम...
ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच
युनेस्कोच्या 'मातृभाषेत
In reply to ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच by संदीप डांगे
'युनेस्को' या एका जागतिक
ह्या गोष्टीला खरेच काही
In reply to 'युनेस्को' या एका जागतिक by प्रसाद१९७१
बाडिस
In reply to 'युनेस्को' या एका जागतिक by प्रसाद१९७१
बदल स्विकारलेच पाहिजेत. पण जुने लगेच वाईट ठरते?
In reply to 'युनेस्को' या एका जागतिक by प्रसाद१९७१
पेठकर काका - स्पेसिफिकली
In reply to बदल स्विकारलेच पाहिजेत. पण जुने लगेच वाईट ठरते? by प्रभाकर पेठकर
चाकोरी बाहेर वगैरे...
In reply to पेठकर काका - स्पेसिफिकली by प्रसाद१९७१
जुने वाईट नाही.
In reply to बदल स्विकारलेच पाहिजेत. पण जुने लगेच वाईट ठरते? by प्रभाकर पेठकर
व्यावसायिक गणितं.
In reply to जुने वाईट नाही. by राही
खरा धोका हिंदी कडुन आहे.
अरे वा!
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
सहमत
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
सहमत.
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
सहमत
In reply to अरे वा! by बोका-ए-आझम
.
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
.
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
एक काम करा बघू .
In reply to खरा धोका हिंदी कडुन आहे. by प्रसाद१९७१
मालक - मी मुद्दाम तसे "भंकस"
In reply to एक काम करा बघू . by अद्द्या
एकाला जे आवडेल ते दुसर्याला
In reply to मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" by प्रसाद१९७१
बाकी देश सोडून जातात ते पैसे
In reply to एकाला जे आवडेल ते दुसर्याला by अद्द्या
वोक्के माझ्याकडून विषय संपला
In reply to बाकी देश सोडून जातात ते पैसे by प्रसाद१९७१
हेच सगळं २-३ दा बोलुन झालंय
हेच सगळं सारखं लिहून काय
तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू
In reply to हेच सगळं सारखं लिहून काय by सूड
काळाचा महिमा !
In reply to हेच सगळं सारखं लिहून काय by सूड
आपण काही ग्रुहीतके मनातुन
मुद्दा चांगला मांडला आहे वेल्लाभाऊ
थोडी भर......
In reply to मुद्दा चांगला मांडला आहे वेल्लाभाऊ by बोका-ए-आझम
+१
@ पिलीयन रायडर,
In reply to +१ by नीलमोहर
हल्ली बाहेरच्या जगात
In reply to +१ by नीलमोहर
मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन
In reply to +१ by नीलमोहर
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये
In reply to +१ by नीलमोहर
भाषेला ताकद द्या पैश्याची आणि
हे असेच सुरु राहिले तर अजून
लोकं इंग्रजीत गोंधळ घालायला लागली तर...
In reply to हे असेच सुरु राहिले तर अजून by sagarpdy
=)) खरय काळाचा महिमा न सांगता
In reply to हे असेच सुरु राहिले तर अजून by sagarpdy
जेव्हा एखाद्या भाषेच्या
काय ते फाड्फाड अंग्रेजीचे आकर्षण!
व्यापारी निर्णयच आहे
In reply to काय ते फाड्फाड अंग्रेजीचे आकर्षण! by पैसा
ओक काका, तुमचा यूनेस्को
सहमत
In reply to ओक काका, तुमचा यूनेस्को by pacificready
शाळेनं मराठी माध्यमच ठेवावं
वा वा वेल्लाभट अगदी सुरेख लेख
रेवतीताईंशी सहमत