✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 10/19/2015 - 08:26  ·  लेख
लेख
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
274214 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

धन्यवाद.. असा प्रयत्न करतो

मोदक
गुरुवार, 11/03/2016 - 12:42 नवीन
धन्यवाद.. असा प्रयत्न करतो आता. बाकी फोटो घेतले नाहीत ते चांगले झाले. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

उत्तम लेख

दीपक११७७
गुरुवार, 11/03/2016 - 11:45 नवीन
उत्तम लेख. नियमित पणे पोट साफ करण्याचे चुर्ण घेतल्याने आतड्यात कीडे होणार नाहीत असा मझा समज आहे. कॄपया मार्गदर्शन व्हावे. धन्यवाद
  • Log in or register to post comments

मला वाटते वाटर थेरपी मध्ये--सकाळी तोड न धुता पाणी पिणे..

दीपक११७७
गुरुवार, 11/03/2016 - 13:01 नवीन
मला वाटते ८ तास तोड बन्द असल्याने जे विष लळेत जमा होते, ते अपलेच असल्याने आपल्या शरिरास घातक नसते ते सकाळी पण्याद्वारे शरीरात पसरते आणि toxins व अनावश्यक पदार्थ बाहेर फेकायला मदत करते,
  • Log in or register to post comments

विष हे आपलं किंवा परक्याचं ते

सुबोध खरे
Fri, 11/04/2016 - 12:18 नवीन
विष हे आपलं किंवा परक्याचं ते विषच असतं. तेंव्हा सकाळी उठल्यावर प्रथम तोंड धुवून साफ करावे( कोणतीही टूथ पेस्ट पावडर वापरून खळखळून चूल भरणे आवश्यक आहे.) आणि मगच जे जे काही खायचे / प्यायचे आहे ते खावे/ प्यावे. बेड टी हि इंग्रजी संकल्पना अत्यंत भंपक आहे. लकवा इ आजाराच्या रुग्णांच्या तोंडाला वास येतो याचे कारण लाळेतील प्रथिनांचे जंतू द्वारे विघटन होते म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७

पाचक चूर्ण

चित्रगुप्त
Sat, 11/05/2016 - 05:11 नवीन
@ दीपक११७७ पाचक चूर्णाबद्दल मला ठाऊक नाही कारण मी ते वापरत नाही. परंतु पोटात कृमि वगैरे असतील तर डॉ. खरे यांनी लिहीलेली १ गोळी घेणे योग्य. मुळात पचन नेहमी ठीक रहावे म्हणून चूर्ण वगैरेंपेक्षा आहाराची निवड, मात्रा, वेळा, वगैरेंविषयी नेहमी सजगततेने वागणे आवश्यक. तसेच चालणे, वगैरे व्यायामही आवश्यक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७

गोगलगायीच्या पाठीवर कासव

सुबोध खरे
Fri, 11/04/2016 - 12:31 नवीन
गोगलगायीच्या पाठीवर कासव बसल्यामुळे तिची गती जितकी असेल तितक्या गतीने हा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. ६. चरबी विषयी: मुळात जास्तीची चरबी शरिरात निर्माण कशी होते, आणि पोटावर तिचे थर का निर्माण होतात ? तूप वगैरे चरबीयुक्त जिन्नस अजिबात घेतले नाहीत, परंतु अन्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाण्यानेही चरबी साठत जाते का? ८. मांड्यांवर आणि नितंबांवर वगैरे 'सेल्युलाईट' जे जमा होते, ती चरबीच असते की आणखी काही? ते कमी करता येते का? कसे ? आपण खाल्लेल्या नऊ कॅलरी चे रूपांतर एक ग्रॅम चरबीत होते. मग या कॅलरी तुम्ही कोणत्याही स्वरूपात घ्या. संपूर्ण भात/ बटाटा/साबुदाणा इ फक्त कर्बोदके असलेले पदार्थ एक थेम्ब सुद्धा तूप न घेता खाल्लेत तरी अतिरिक्त कॅलरीचे चरबीत रूपांतर होते. याचे थर पुरुषांच्या बाबतीत प्रथम पोटावर आणि बायकांच्या बाबतीत प्रथम नितम्ब आणि कंबरेवर जमा होतात. सेल्युलाइट म्हणजे चरबीच पण गोळे गोळे या स्वरूपात त्वचेच्या खाली जमा होता असलेली. कर्बोदके, प्रथिने आणि चरबी/ तेल युक्त पदार्थ यांचे एकमेकात सहज रूपांतर होते. पण अतिरिक्त कर्बोदके आणि प्रथिने पण चरबीच्याच स्वरूपात साठवली जातात. चर्बीतही 'चांगली चरबी' आणि 'वाईट चरबी' असे काही असते का? चावला तर नाग चांगला कि मण्यार किंवा घोणस असा हा प्रश्न आहे. ७. 'सूज' मह्णजे नेमका काय पदार्थ असतो? सूज कश्यामुळे येते आणि कमी होते ? सूज अपायकारक असते की उपकारक ? सूज म्हणजे शरीराच्या कोणत्याही अवयवाला हानी पोहोचण्यामुळे तेथील उती (TISSUE) फुगून येतात त्याला सूज म्हणतात. मग यात स्नायू ना मुका मर असो कि हाड मोडणे असो किंवा त्वचेला भाजणे असो. सूज आली याचा अर्थ आपल्या शरीराची हानी झाली आहे आणि ती भरून काढण्यासाठी शरीर तेथे जास्त रक्त पुरवठा करीत आहे. यात शरीराची हानी हि अपायकारक आहे आणि सूज हि हा अपाय भरून काढण्यासाठी शरीराची प्रतिक्रिया आहे. ९. जिला आयुर्वेदात 'आम' वा 'आव' म्हणतात तो पदार्थ शरीरात कसा निर्माण होतो, आणि कुठे कुठे साठतो? त्याचे परिणाम ? आयुर्वेदाची मला काडीइतकीही माहिती नाही त्यामुळे या प्रश्नाला "पास"
  • Log in or register to post comments

सप्लिमेंट्स

चित्रगुप्त
Sat, 11/05/2016 - 05:21 नवीन
आभार डॉक्टर साहेब. आणखी एक प्रश्न म्हणजे 'सप्लिमेंट्स' म्हणून मिळणारी औषधे कुणी, केंव्हा, कश्यासाठी घेणे योग्य्/आवश्यक असते ? की नसतेच? आपल्याला त्याची गरज आहे वा नाही हे कसे ओळखावे ? माझ्या परिचिताना त्यांच्या ऑफिसातून दिवाळी का केंव्हातरी अश्या गोळ्यांचे एक मोठे खोकेच मिळाले होते, त्यांनी त्यातील स्वतः एकही न घेता सर्व पुडकी वाटून टाकली. मला मिळालेले बरेच दिवस पडून होते, नंतर बहुतेक ते फेकले. कारण इंग्रजांनी आधी लोकांना चहा फुकट वाटून सवय लावली, तसा हा औषध कंपन्यांचा उद्योग असावा, असे वाटले होते.
  • Log in or register to post comments

भाज्या / पदार्थ द्रव अवस्थेत

विजुभाऊ
Sat, 11/05/2016 - 21:03 नवीन
भाज्या / पदार्थ द्रव अवस्थेत प्यायले काय आणि घन अवस्थेत घेतले तर कसा फरक पडेल हे अजूनही समजले नाहिय्ये
  • Log in or register to post comments

द्रव अवस्थेत पीणे

चित्रगुप्त
Sun, 11/06/2016 - 02:27 नवीन
यावर पुष्कळ वर्षांमागे झालेल्या प्रयोगांविषयी कार्यक्रम डिस्कव्हरी का कशावरतरी बघितला होता. तेच पदार्थ पण द्रवरूपात घेतले तर जास्त वेळ पर्यंत भूक लागत नाही, असा निष्कर्ष त्या प्रयोगांचा होता. तस्मात ज्यांना वजन कमी करण्यासाठी कमी खाणे असेल, त्यांच्यासाठी उपयोगी आहे. आपले मिपाकर समीर शेलार यांनी मागे पाताळेश्वर कट्ट्यात माझ्याकडून जूसिंगची माहिती कळल्यावर तो प्रयोग करून सुमारे सहा महिन्यात सतरा किलो वजन कमी केले. याखेरीज अपचन, अ‍ॅसिडिटीचा त्रास संपून स्फूर्ती, चपळता वगैरेत खूप वाढ होऊन उगाच जास्त खाण्याची सवय संपली असल्याचे परवाच सांगितले. त्यांना संपर्क केल्यास त्यांनी नेमके काय काय केले, याची माहिती देतील.फोन नं. साठी मला व्यनि करावा.
  • Log in or register to post comments

अरे वा! अभिनंदन त्यांचे!!

संदीप डांगे
Sun, 11/06/2016 - 09:44 नवीन
अरे वा! अभिनंदन त्यांचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अरे वा! मग त्यांना ह्याच

यशोधरा
Sun, 11/06/2016 - 10:36 नवीन
अरे वा! मग त्यांना ह्याच धाग्यावर माहिती द्यायला उद्युक्त करा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्रगुप्त साहेब

खिलजि
Sat, 01/05/2019 - 18:43 नवीन
हा पण लेख मस्तंय ,,, बोले तो एकदम ज्ञानवर्धक
  • Log in or register to post comments

सगळे लेख प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/28/2023 - 11:49 नवीन
सर्व लेख प्रतिसाद वाचून काढले. वजनावर प्रयोग करायचे आहेत. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

@ प्रा.डॉ. बिरूटे: 'फाजील' चरबी किती आहे हे जाणून घेणे

चित्रगुप्त
Sat, 01/28/2023 - 17:27 नवीन
@ प्रा.डॉ. बिरूटे: आपल्या शरीरात 'फाजील' चरबी किती आहे, हे सांगणारी एक चाचणी असते. तिचे नाव विसरलो. मी पूर्वी एकदा करवून घेतली होती. यात एका विशिष्ट ठिकाणी (यंत्रावर ?) दहा-बारा मिनीटे फक्त उभे रहायचे असते. रक्त-मूत्र वगैरे काही नाही. 'फाजील' चरबी किती आहे, हे यातून समजले, की तेवढीच चरबी कमी करायला नेमके काय करावे हे ठरवता येईल. करून घेतलीत तर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/28/2023 - 21:59 नवीन
हे माहिती नाही पण माहिती घेतो. असेल तर चांगलेच आहे. सध्या भरपेट जेवणे हे टाळतो. हलका फुलका व्यायाम. यामुळे वजन वाढत नाही हे सध्या बरं आहे, पण वजन कमी झालं पाहिजे. फलभाजीज्यूस हेच बरं वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

DEXA BODY SCAN

चित्रगुप्त
Sat, 01/28/2023 - 23:51 नवीन
बहुतेक खालील चाचणी आहे. परंतु 'फालतू' चरबी किती, हे यातून कळेल का हे विचारून घ्यावे. बाकी पोटाचा घेर, BMI वगैरे, तसेच आपल्याला एकंदरित उत्साही, ऊर्जावान, चपळ वगैरे 'वाटते' का, हेही बघणे पुरेसे ठरावे. निदान सुरुवात करण्यासाठी तरी. DEXA BODY SCAN The DEXA Scan is a quick and painless, whole body scan that uses medical grade technology to provide measurements of Body Fat, Muscle Mass, and Bone Health. A DEXA Scan (Dual-Energy X-ray Absorptiometry), uses two different types of waves that are reflected by lean muscle, and bone differently. The scanner uses this information to create a detailed map of your body and measure body composition.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधीही लेख वाचला होता.भारी

Bhakti
Sat, 01/28/2023 - 14:25 नवीन
आधीही लेख वाचला होता.भारी भारी प्रयोग आहेत सगळ्यांचे. दो‌न वर्षांपासून माझेही विविध प्रयोग सुरू आहेत.प्रवास जरा उलटा आहे,आधी शरीराला चालण्याची,HIIT, Cardio,Full body अशा व्यायामाची सवय लावली.मग डायटकडे वळाले.खुप प्रकारचे डाएट केलं.१६ तास फास्टिंगच सुट होतंय.म्हणजे कसं तोंडाला सांगितले ना की १६ तास चुप्प बस की सोपं जातं.पोर्शन डाएटने भुक अर्धवट वाटते.नवे नवे डीपी टाकल्यावर ,कसं काय केलं ग विचारतात:)सारखं पुर्ण बंद करायचा प्रयत्न सुरू आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा