✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अशीहि एक धर्म निरपेक्शता

द
दिवाकर कुलकर्णी यांनी
Sat, 10/03/2015 - 23:31  ·  लेख
लेख
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
30266 वाचन

💬 प्रतिसाद (208)

प्रतिक्रिया

गुरुजी

बोका-ए-आझम
Mon, 10/05/2015 - 21:32 नवीन
त्याच्यासाठी निव्वळ राज्यसभा नाही तर राज्यांच्या विधानसभांमध्येही बहुमत लागेल कारण हा मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आपल्याला हा निर्णय आवडलेला

अनुप ढेरे
Tue, 10/06/2015 - 10:25 नवीन
आपल्याला हा निर्णय आवडलेला नाही हे जनतेने मतपेटीतून पुढील निवडणुकात दाखवून दिले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या ४१४ वरून १९५ वर घसरली.
हे अत्यंत फारफेच्ड आहे. यामागे बोफोर्स घोटाळ्याचे आरोप हे मुख्य कारण होतं राजीव गांधींच्या पराभवामागचं.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वन मॅन्स मार्टियर इझ टेररिस्ट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/05/2015 - 12:48 नवीन
वन मॅन्स मार्टियर इझ टेररिस्ट फॉर ऑपोसिशन!!!

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/05/2015 - 13:13 नवीन
औरंगझेबाकडे चाकरी करणारे जाट्,रजपूत्,मिर्झाराजे जयसिंग ह्यांचे काय करायचे ? शिवाजी राजेंकडे चाकरी करणार्या मुसलमान सरदारांचे काय करायचे ? सगळाच गोंधळ.

असे ऐकुन आहे की रंग्याची

मृत्युन्जय
Mon, 10/05/2015 - 13:31 नवीन
असे ऐकुन आहे की रंग्याची चाकरी करणारे हिंदु सरदार सुद्धा जिझीया द्यायचे. हो पण नविन जावईशोधांनुसार समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये औरंगजेबाने जिझिया लावल्याचा काहिच पुरावा नसावा. किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो. सुरुवातीला "जिजाया" अश्या नावाने असणारा कर नंतर मुस्लिम शासनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणुन आधी जिझाया आणि मग जिझिया झाला अस्शीही नोंद कुठे मिळु शकते.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

असे ऐकुन आहे की रंग्याची

फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 10/05/2015 - 13:57 नवीन
असे ऐकुन आहे की रंग्याची चाकरी करणारे हिंदु सरदार सुद्धा जिझीया द्यायचे. हो पण नविन जावईशोधांनुसार समकालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये औरंगजेबाने जिझिया लावल्याचा काहिच पुरावा नसावा. किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो. सुरुवातीला "जिजाया" अश्या नावाने असणारा कर नंतर मुस्लिम शासनकर्त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणुन आधी जिझाया आणि मग जिझिया झाला अस्शीही नोंद कुठे मिळु शकते.
जिझिया कर मुस्लिम लोकोत्तर राजांनी हिंदूंवर का लादला हे आपण सम्जून घेतले पाहिजे,मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते, खलिफाच्या तत्कालीन आदेशानुसार जे लोक ईस्लाम्ची मानवतावादी तत्वे व नैतिक मुल्ये नाकारतात त्यांना जगण्याचा हक्क न्हवता , त्यामुळे भारतातील हिंदूच्या कत्तली कराव्यात असा आदेश खलिफाने मुघलांना दिला होता,परंतु मुघल शासनकर्ते हिंदूंचे पालक असल्याने त्यांनी याला नकार दिला होता. हिंदू जरी परधर्मिय असले तरी ,ईस्लामची मुळ तत्व पाळत असल्याने ते एक प्रकारे मुस्लिमच ठरतात असा युक्तीवाद मुघलांच्या वकिलांनी खलिफाच्या दरबारात केला. पुढे फार माथेफोड झाली परंतु हिंदूंना आम्ही मारणार नाही असे बाणेदारपणे मुघलांनी खलिफाला ठणकावले. जुजबी कर लावू असे आश्वासन देऊन मुघलांनी वेळ मारुन नेली आणि आपल्या हिंदू प्रजेचे प्राण वाचवले. असे लोकोत्तर मुघल हिंदूद्वेष्टे असतील काय!!!????
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 10/05/2015 - 14:06 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

फुल्थ्रॉटल कॉमेडी =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/05/2015 - 14:15 नवीन
फुल्थ्रॉटल कॉमेडी =)) =)) =))
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

विशेष दखल...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/05/2015 - 14:20 नवीन
मुस्लिम साम्राज्य आलम दुनियेत पसरले होते, ही वेग्वेगळी साम्राज्यं फक्त ईराणच्या खलिफाला उत्तरदायी होते, या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या महान जावईशोधांसाठी

श्रीगुरुजी
Mon, 10/05/2015 - 22:40 नवीन
या महान जावईशोधांसाठी इतिहासाचे नवीन नोबेल पारितोषिक घडवायला पाठवले आहे !
या धाग्यावरील नानासाहेबचा प्रत्येक प्रतिसाद सहस्त्र नोबेल पारितोषिकांच्या योग्यतेचा आहे!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

येस्सार..... अगदी हजार टक्के

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 14:20 नवीन
येस्सार..... अगदी हजार टक्के अनुमोदन. ते गुरू तेग बहादूर सिंगांना 'हिंद की चद्दर' म्हणतात ते आक्शी खोटंय.. तमाम मुघलांना तो किताब शिखांनी दिला होता. बखरींच्या लिखाणात काय तरी गडबड झाली भवतेक.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

दादा

नाखु
Mon, 10/05/2015 - 14:06 नवीन
जरा ही महामहीम अफजखान यांचा करूण अंत वाचा आणि विचार करा आपल्या पूर्वसूरींनी किती म्हणून पातक केले आहे ते. पुढील २५ मिनिटे मी आणि तुम्ही मिपा मौन पाळूयात कसें ! खालसा ते खुलासा. एक वैचारीक चळवळ
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पुढील २५ मिनिटे मी आणि तुम्ही

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 17:00 नवीन
पुढील २५ मिनिटे मी आणि तुम्ही मिपा मौन पाळूयात कसें !
तेवढं सोडून बोला!
↩ प्रतिसाद: नाखु

हायटेक भंगारवाली!

प्यारे१
Mon, 10/05/2015 - 13:19 नवीन
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, हिन्दी बोलणार्‍या महिलेनं आपला खेळणी विक्री करण्याचा व्यवसाय अंतरात्मा की आवाज ऐकून बंद केला असून ती आता भंगार खरेदी विक्रि करु लागली आहे. या कामी तिला एका संस्थळाची मदत मिळत असल्याचे समजले आहे. -मिपाटीआय

फुजींची फुल्ल दिवाळी सुरू आहे

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 14:27 नवीन
फुजींची फुल्ल दिवाळी सुरू आहे इकडे. धम्माल विनोदी धागा बनवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दिडशे प्रतिसादांकडे जोरात घोडदौड. जेपी आणि कार्य्कर्ते... होशियार....

विनोदी!!!!!! आर यु सिरीयस?

फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 10/05/2015 - 14:42 नवीन
विनोदी!!!!!! आर यु सिरीयस? भूतकालीन मुस्लिम राज्यकर्ते कसे अत्याचारी होते याची खोटी वर्णने करुन सांप्रत काळातील मुस्लिमांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे काम चालू आहे, ईतिहासात क्वचीत एखाद्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून चूक झालीही असेल ,पण् त्याचे दाखले देऊन जर सांप्रत काळातील मुस्लिमांना नागरीकत्वाच्या व्याख्येतून वगळण्याची भाषा होत असेल तर त्याला विरोध होणारच, आणि माझ्यासारखे सामान्य मुस्लिम याविरोधात जन्प्रबोधन करतच राहणार.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

>>>>>>>> ईतिहासात क्वचीत

प्यारे१
Mon, 10/05/2015 - 15:01 नवीन
>>>>>>>> ईतिहासात क्वचीत एखाद्या मुस्लिम राज्यकर्त्याकडून चूक झालीही असेल आज एकही प्रतिसाद सीरियस न लिहायला एक एप्रिल आहे काय????
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

तुमचा हा प्रतिसाद सर्वथा

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 15:13 नवीन
तुमचा हा प्रतिसाद सर्वथा मान्य पण.... त्यासाठी तुम्ही टकाटक खोटी धूळफेक तरी करू नका. जिझीया कराचे जे काही एक्ल्प्लेनेशन दिले आहे ते तद्दन डिनायल मोड आहे. तुमच्या ह्या विधानांना ऐतिहासिक पुरावा नाही. कश्मिर पासून खालपर्यंत मुस्लिम राज्यकर्त्यांनी धर्मांतरासाठी काय काय अनन्वित अत्याचार केलेत ते सर्व तुम्ही अमान्य कराल तर कसं चालेल? शिखांनी तर एक स्मारक बनवले आहे मुस्लिमांनी धर्मांतरासाठी कसे टॉर्चर केले गेले ते. एवढं धडधडीत सत्य तुम्ही आज मुसलमानांना वाचवण्यासाठी बोलताय ते तुमच्यावरच उलटेल. तेव्हा सांभाळून. आजच्या मुस्लिमांना स्वतःची बाजू मांडायला इतिहासाचा खोटा आधार घ्यायची काय जरूर? आजचा मुस्लिम कसा राष्ट्रभक्त आहे, धर्मापेक्षा देशाशी निष्ठा ठेवून आहे हे फक्त वागण्या-बोलण्यातून दाखवणे पुरेसे आहे. मुस्लिम-आतंकवादाचा विरोध करणे पुरेसं आहे. एमआयएम सारख्या देशतोडू पक्षांना नाकारणं पुरेसं आहे. पुर्वीचं सगळं विसरून तुम्हाला राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायचं असेल तर खुल्या दिलानं लोक इथे स्वागत करायला तयार आहेत. तुमची किती तयारी आहे ते कधी दाखवाल?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

आयला..

ब़जरबट्टू
Mon, 10/05/2015 - 14:46 नवीन
बेक्कार विनोदी धागा... :) फुटल्या गेलो आहे.. भाई आप महान है.. जिझिया करा एक्स्पेनेशन राक्स :)

खानाचे हस्सुन हसुन गडबडा

तुडतुडी
Mon, 10/05/2015 - 15:42 नवीन
खानाचे हस्सुन हसुन गडबडा लोळाल्याने आणि बेंबीच्या देठापासून हसल्याने लहान आतड्याबरोबरच मोठ्या आतड्यावरही अतिअति ताण आल्याने पोटाचा अल्सर होऊन अल्पषा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले.
आयला . आमालाबी हसून हसून गडबडा लोळवलत कि वो . आणि हो खानाचे म्हणू नका खानांचे किवा खान साहेबांचे म्हणा . फुलथ्रॉटल जिनियस ला वाईट वाटायला नको . माईसाहेब कुरसूंदीकर - 'अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही' हवे प्रतिसादातले शब्द वाचले नैत का वो काकू ?
अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे.
अफजलखान फक्त सरदार नव्हता तर तो क्रूर आणि हिंसक होता . वाई पर्यंत येईपर्यंत त्याने वाटेत हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले . मुद्दामच तुळजापूर , पंढरपूर हि गावं नष्ट केली . आधी देवूळ आणि मग देवळातल्या मुर्त्या फोडायच्या ,मग गाय कापून टाकायची . कारण हिंदूंना गाय पवित्र . मग तिच्या रक्ताने मूर्तीला आणि देवळाला शिंपण करायचं . हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची .पुरुषांच्या कत्तली करायच्या . अशी खूप पुण्याची कामं आफ्जुल्ल्याने वाई पर्यंत येईपर्यंत केली . का ? तर तो मुस्लिम होता आणि त्याच्या दृष्टीने हिंदू काफर (अल्लाला न मानणारे म्हणजे नास्तिक ). अफजल खानची हि सगळी कृत्य धर्मांधपणाची नसून फार चांगली होती नै का . त्या मूर्ख हिंदूंना काय कळतंय हो ? विनाकारण बोंबा मारत असतात .
औरंगझेबाकडे चाकरी करणारे जाट्,रजपूत्,मिर्झाराजे जयसिंग ह्यांचे काय करायचे .
त्यांचं औरंगजेबानेच करून टाकलय . मिर्झाराजा जयसिंगाला स्वतःचा स्वार्थ साधून घेतल्यावर औरंग्याने विष देवून मारला ना .
किंबहुना जिझिया हा शब्दच शिवाजी महाराजांनी जिजाबाईंच्या नावाने मुसलमानांवर लावलेल्या करावरुन पडल्याचाही काही पुरावा समकालीन कागदपत्रांमध्ये मिळु शकतो
आयला किती हसवायचं ते ? जिझिया कर हा फक्त हिंदुस्थानमध्ये नाही तर इराणमध्ये पारशानवर सुधा लावला गेला असल्याचा पुरावा आहे . टिपू सुलतानाने केरळ मधल्या हिंदुंवर अत्याचार करण्यासाठी खास फौज उभी केली होती म्हणे . त्यातले १ लाख फक्त हिंदू स्त्रियांना बाटवण्यासाठी नियुक्त केले होते . औरंग्याने दक्षिण दिग्विजयाच्या मनसुब्याने दक्षिणेत प्रवेश करताना वाटेत ७५ देवळं फोडली होती . इराणमध्ये १७ व्या शतकात शहा अब्बासचं राज्य असताना रंग्याने त्याच्या वकिलामार्फत शहा अब्बासला पत्र पाठवलं होतं . खाली त्याने 'आलमगीर' अशी सही केली . आलमगीर म्हणजे दुनियेचा राजा . तेव्हा शहाने त्याला उलट टोला दिला , 'तुझ्याच दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक राजाला तू आजपर्यंत हरवू शकला नाहीस. तू कसला दुनियेचा राजा ? ' फुलथ्रॉटल जिनियस साहेबांना मी पा चा कॉमेडी किंग खिताब देण्यात यावा . सगळी हस्तलिखितं , सगळ्या बखरी , सगळा इतिहास खोटा . भारताचा आणि इतर बाटवलेल्या देशांचा सुधा . तुमचं तेवढं खरं . आपल्या अगाध ज्ञानाने आमचं अज्ञान दाखवून दिल्याबद्दल मानाचा मुजरा .

अफजलखान फक्त सरदार नव्हता तर

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 16:10 नवीन
अफजलखान फक्त सरदार नव्हता तर तो क्रूर आणि हिंसक होता . वाई पर्यंत येईपर्यंत त्याने वाटेत हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले . मुद्दामच तुळजापूर , पंढरपूर हि गावं नष्ट केली . आधी देवूळ आणि मग देवळातल्या मुर्त्या फोडायच्या ,मग गाय कापून टाकायची . कारण हिंदूंना गाय पवित्र . मग तिच्या रक्ताने मूर्तीला आणि देवळाला शिंपण करायचं . हिंदू स्त्रियांची अब्रू लुटायची .पुरुषांच्या कत्तली करायच्या . अशी खूप पुण्याची कामं आफ्जुल्ल्याने वाई पर्यंत येईपर्यंत केली . का ? तर तो मुस्लिम होता आणि त्याच्या दृष्टीने हिंदू काफर (अल्लाला न मानणारे म्हणजे नास्तिक ). अफजल खानची हि सगळी कृत्य धर्मांधपणाची नसून फार चांगली होती नै का . त्या मूर्ख हिंदूंना काय कळतंय हो ? विनाकारण बोंबा मारत असतात .
हाय दैय्या. काय तो इतिहासाकडे पाहण्याचा महान दृष्टीकोन. कुराणाचा आपल्या मताने अर्थ लावनारे अन् इतिहासाचा आपल्या मताने अर्थ लावणारे यांच्यात काहीच फरक नाही हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद! माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर देणं अजून कोणाला शक्य झालं नाहीये. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' असले "बायकांत बहू बडबडला" टाइप स्लोगनं लिहिण्यापेक्षा दहशतवाद संपवला का नाही?
↩ प्रतिसाद: तुडतुडी

केवळ तिच्या हिंदी

वेल्लाभट
Mon, 10/05/2015 - 15:51 नवीन
केवळ तिच्या हिंदी(मराठीमिश्रित) प्रश्नावरून तुम्ही ती मुस्लिम असल्याचा आडाखा कसा बांधलात हे दुर्लक्षित केलं आणि ती मुस्लिम आहे हे गृहीत धरलं, तर अनुभव छान. फारच थोडक्यात सांगितलात पण. आणि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच.

अरे धागा काय, प्रतिक्रिया काय

अन्या दातार
Mon, 10/05/2015 - 15:56 नवीन
अरे धागा काय, प्रतिक्रिया काय? ती पुतळे विकणारी बाई एव्हाना घरी गेली असेल.

.

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 16:32 नवीन
दिवाळी कधीच गेली. आता बाइने गणपतीही विकून पुढच्या दिवाळीची तयारी सुरु केली असणार.
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हुम्म्म

इरसाल
Mon, 10/05/2015 - 16:42 नवीन
एका गावात एक पहिलवान असतो. येता जाताना तो सतत याची त्याची मस्करी, मारपीट करत असतो गावात दोन छाडमाड टपोरी रहात असतात. त्यांच ह्या पैलवानापुढे काही चालत नाही. मग ते विरुद्ध बदला घेण्यासाठी बाकीच्या गाववाल्यांसमोर पैल्वानाची तारीफ करायला सुरुवात करतात. त्यामुळे होतं काय तर आक्ख गाव पैलवानाला शिव्याशाप द्यायला लागत. ह्यांच पाहुण्याच्या काठीने साप मारायचं उद्दिष्ट साध्य, मग ह्या दोन छाड्माड लोकांच रोजचं काम पैलवानाची तारीफ करायची. लोकं देताय शिव्या, हे करताय तारीफ. असं करणारे मिपावर २/३ जणं आहेत म्हणे. बघा लिंक लावुन.

कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी

अरुण मनोहर
Mon, 10/05/2015 - 17:24 नवीन
कॅप्टन जॅक स्पॅरो - ह्यांनी म्हटले आहे, वन मॅन्स मार्टियर इझ टेररिस्ट फॉर ऑपोसिशन!!! म्हणजेच आपला तो शहीद आणि परक्याचा तो आतंकवादी ! हेच तत्व आपला कोण आणि परका कोण हे तपासण्यासाठी लागू पडते. तुम्ही त्याला काय समजता ह्यावरून तुम्ही आमचे की परके, हे देखील स्पष्ट होतेच की!

पानिपतच्या युद्धात आपल्याच

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 17:52 नवीन
पानिपतच्या युद्धात आपल्याच तोफखान्याची कोंडी करणारे आपले मानावेत की परके?
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

देशद्रोहीच म्हणावे लागतील.

बोका-ए-आझम
Mon, 10/05/2015 - 18:04 नवीन
एवढंच काय पण तुळोजी आंग्र्यांचं आरमार पेशवा बाळाजी बाजीराव यांनि इंग्रजांच्या मदतीने बुडवलं तोही देशद्रोहच होता. पण असा देशद्रोह करणारे अनेक होते. त्यामुळे फक्त पेशव्यांकडे बोट दाखवणं हे चुकीचं आहे. तसंच संपूर्ण पेशवाईकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघणं हेही चुकीचं आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आँ

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 18:12 नवीन
पेशवे दोषी हे ठरवताना इतरांचा उल्लेख करणे कंपल्सरी का असावे बरे ?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

असं कसं, असं कसं?

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 18:29 नवीन
असं कसं, असं कसं? इथे लोक काही मुस्लिमांनी केलेल्या अतिरेकी कारवायांवरून सबंध मुस्लिम समाजास पुर्वग्रहदूषित नजरेने बघतात त्याचं काय मग? (मी काही पेशव्यांचंच एकमेव उदाहरण म्हणून दिलेलं नव्हतं. असे अनेक सगळीकडेच होते. असतातच.)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

-१

बोका-ए-आझम
Mon, 10/05/2015 - 18:07 नवीन
असहमत. खरा क्रांतिकारक कधीही जाणूनबुजून निरपराध माणसांचा जीव घेत नाही. त्यामुळे एकाचा दहशतवादी तो दुस-याचा क्रांतिकारक हे म्हणणंच चुकीचं आहे.
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

शिवाजी महाराज हे प्रजेवर

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 18:19 नवीन
शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज
. हे योग्यच. उत्तम.
त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या.
हित्ते चुकले बघा! (असे आपले मला वाटले हां) अशी प्रतिमा कधी उभी झाली? कशी होऊ शकेल? शिवाजीमहाराजांचा इतिहास माहित असलेल्या कोणालाही ह्यापेक्षा अधिक ठाऊक असते. महाराष्ट्रामध्ये अशी प्रतिमा सर्वसामान्याच्या मनात तयार करणे फारच कठीण काम आहे असे मला तरी वाटते. अर्थात, एका सामान्य नागरिकाच्या दृष्टीतून मी माझे मत मांडतेय. सर्वसामान्य मतदार इतकाही मूर्ख नाही हो! कदाचित तुमचा रोख एका राजकीय पक्षाकडे आणि घराण्याकडे असावा पण त्यांनीही महाराजांविषयी असे काही पसरवले होते, हे मान्य करणे कठीण आहे.
अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला?
- Really? खरोखर?
तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे.
पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे म्हणून तो दहशतवादी आहे हे कोण म्हणालेय? मला खरंच असे दिसले नाहीये, तुम्ही सांगता का?
'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?
कधीतरी पोवाडे ऐका साहेब. लोक काव्य ऐका. महाराजांविषयीची/ बद्दलची अभ्यासू लोकांची भाषणे/ लेख ऐका, वाचा. माहिती मिळेल. अफजलबद्दलच्या गोष्टी, जयसिंगासोबतची वागणू़क, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, स्वतःच्या पोटच्या पोराला दिलेली सजा, मोरे, कित्येक घटना आहेत हो. दुसरे म्हणजे सामान्य जनमानस तुम्हांला वाटते तेवढे मूर्ख नसते. असो. शेवटी, बरं बाबा, तुमचंच खरं आणि योग्य. धन्यवाद. :)

लोक काव्य ऐका.

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 18:52 नवीन
लोक काव्य ऐका. महाराजांविषयीची/ बद्दलची अभ्यासू लोकांची भाषणे/ लेख ऐका, वाचा. माहिती मिळेल. अफजलबद्दलच्या गोष्टी, जयसिंगासोबतची वागणू़क, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, स्वतःच्या पोटच्या पोराला दिलेली सजा, मोरे, कित्येक घटना आहेत हो.
परत तुम्ही तीच तीच कॅसेट घासत आहात. महाराजांविषयी मलाच अभ्यास करायला सांगत आहात. तुम्हाला अजूनही प्रश्न कळला नाहीच असे दिसते आहे. हा प्रश्न "महाराजांनी काय केले?" हा नाही आहे हे पुन्हा एकदा सांगतो.
दुसरे म्हणजे सामान्य जनमानस तुम्हांला वाटते तेवढे मूर्ख नसते. असो
हे जे सामान्य जनमानस आहे ना ते तुमच्या अभ्यासू लोकांची भाषणे/लेख वाचत नाही. शहानिशा करायला स्वतः माहिती मिळवून वाचत नाही. हे सामान्य जनमानस फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, त्यापूर्वी निवडणुकांमधे होणार्‍या प्रचारसभा यांतून दील्या जाणार्‍या हेतुपुरस्सर (गरजेपुरत्या, अर्धवट) माहितींमधून सतत भडकवलं जातं. सोसायटीची मतं चार बाकड्यांच्या बदल्यात विकणारे, रेशनकार्ड-झोपडी-दारू-पैसा-कपडे याबदल्यात मते विकणारे, एवढ्या तेवढ्यावरून रस्त्यांवर तोडफोड, दंगल करणारे, तुमच्या आमच्या सारखे अभ्यासू लोकांची पळी धरणारे, चार भिंतीच्या सुरक्षित चौकोनात बसून निवांत चर्चा-परिसंवाद घालणारे नसतात. हेही फार जवळून पाहिलंय. त्यामुळे सामान्य जनमानस किती हुशार आहे याबद्दल खरंच चर्चा नको. कारण तो एका वेगळ्या आणि प्रदिर्घ धाग्याचा विषय आहे. अधिक माहितीसाठी "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" हे अप्रतिम नाटक बघून घ्या. "महाराजांचे आम्ही काय केले?" हा प्रश्न व त्याचे उत्तरही मिळून जाईल कदाचित. 'जाणता राजा' ला होणारी गर्दी व उपरोल्लिखित नाटकाला झालेला/होणारा विरोध/गर्दी पुरेसा बोलका आहे.
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो, प्रतिसादाशेवटी मी म्हटलेच

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 18:55 नवीन
हो, प्रतिसादाशेवटी मी म्हटलेच आहे की तुम्ही म्हणताय तेच योग्य आणि बरोबर. वाचले नै? :)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे

फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 10/05/2015 - 18:33 नवीन
पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे म्हणून तो दहशतवादी आहे हे कोण म्हणालेय? मला खरंच असे दिसले नाहीये, तुम्ही सांगता का?
आता कसा संघिष्ट पवित्रा घेतलात! हीच तर तुम्हा लोकांची खासियत आहे. म्हणे टीपू सुलतान यांनी एक लाखाची फौज निर्माण केली होती , हिंदू स्त्रीयांवर अत्याचार करायला. अरे कीती खोटे फेकावे याला तारत्म्य तरी हवे.... टिपू सुलतान हे अत्यंत नैतिक राजे होते, आपल्या साम्राज्यातील कोणत्याही स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आदेशच त्यांनी दिला होता.बहामणी साम्राज्याला जे जमले नाही ते टिपूने केले होते.

हा प्रतिसाद पाहून तुमच्या

यशोधरा
Mon, 10/05/2015 - 18:35 नवीन
हा प्रतिसाद पाहून तुमच्या जिनियसपणाविषयी माझी खात्री झालीच :)
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

>>> टिपू सुलतान हे अत्यंत

श्रीगुरुजी
Mon, 10/05/2015 - 21:04 नवीन
>>> टिपू सुलतान हे अत्यंत नैतिक राजे होते, आपल्या साम्राज्यातील कोणत्याही स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आदेशच त्यांनी दिला होता.बहामणी साम्राज्याला जे जमले नाही ते टिपूने केले होते. नानासाहेब, आता पुरे नाही का झालं? आतापर्यंत अनेक बेताल प्रतिसाद दिलेत आणि प्रत्येक प्रतिसादाची सर्वांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली. तरी अजून हौस फिटलेली दिसत नाही. ती ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके वाचणे थांबवा. नाहीतर असेच बेताल प्रतिसाद देत बसाल आणि अजून टवाळी सहन करावी लागेल.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

नानासाहेब,

फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 10/05/2015 - 21:25 नवीन
नानासाहेब, आता पुरे नाही का झालं? आतापर्यंत अनेक बेताल प्रतिसाद दिलेत आणि प्रत्येक प्रतिसादाची सर्वांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली. तरी अजून हौस फिटलेली दिसत नाही. ती ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके वाचणे थांबवा. नाहीतर असेच बेताल प्रतिसाद देत बसाल आणि अजून टवाळी सहन करावी लागेल..>>>>>>>>>>>>>>> मी बेताल प्रतीसाद दिलेले नाहित, मी फक्त सत्यांश सांगितला. (बायदवे, राजा शिवछत्रपती, जाणता राजा ही तद्दन व्यावसायिक कलाकृती आहेत, या असल्या गल्लाभरु गोष्टींना समकालीन पुरावे समजणार्यांनी मी कोणती पुअस्तके वाचावित हे ठरवू नये.)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी बेताल प्रतीसाद दिलेले

श्रीगुरुजी
Mon, 10/05/2015 - 22:49 नवीन
मी बेताल प्रतीसाद दिलेले नाहित, मी फक्त सत्यांश सांगितला.
नाना, आता पुरे. हसून हसून इतकं पोट दुखतंय की अफझुल्यासारखा माझा कोथळा बाहेर येईल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन आणि अत्यंत विश्वसनीय ऐतिहासिक संशोधनानुसार, शिवाजी महाराजांनी अफझुल्याला पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून मारले नाही. अफझुयाने शिवाजी महाराजांची गळाभेट घेतल्यावर त्यांच्या कानात महाराजांनी नानासाहेबांचे प्रतिसाद सांगितले. ते ऐकल्यावर अफझुल्या इतक्या जोराने हसायला लागला की शेवटी हसताहसता तो गडाबडा लोळू लागला आणि अति हसल्यामुळे पोट दुखुन त्याची आतडी बाहेर आली व तो मेला. त्यामुळे महाराजांनी अफझुल्याला पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून मारले ही शुद्ध लोणकढी थाप आहे हे सिद्ध झाले आहे.
(बायदवे, राजा शिवछत्रपती, जाणता राजा ही तद्दन व्यावसायिक कलाकृती आहेत, या असल्या गल्लाभरु गोष्टींना समकालीन पुरावे समजणार्यांनी मी कोणती पुअस्तके वाचावित हे ठरवू नये.)
हो बरोबर. तुमचे संदर्भ ग्रंथ म्हणजे ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके हे मी विसरलेलो नाही.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

https://en.wikipedia.org/wiki

सुबोध खरे
Mon, 10/05/2015 - 20:14 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Jizya

हंगाशी ...!!!

दत्ता जोशी
Mon, 10/05/2015 - 20:46 नवीन
मला पहिल्यांदा डिरेक्टलि विचारलाय तर डिरेक्टलि उत्तर देतो. १. वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती लागू आहेत. माझ्या आधीचा स्वतःची पोस्ट वाचण्याची तसदी घ्यावी. २. "'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?" आडून आडून नाही. जन्म आणि शिक्षणाने सांगलीकर आहे. वयाची सुरवातीची २५ वर्षे सांगलीत काढलीत. माझ्या बायोडाटाची काळजी नसावी. चांगल्यापैकी मजबूत आहे. स्वतःचे खरे नाव तरी टाका उगीच नपुंसक बड बड वगैरे लिहून स्वतःला शूर वीर नका समजू. मिरजेत दंगल झाली नाही म्हणणारे काल संध्याकाळी जन्माला आले असावेत. तेव्हा त्यांनी वेळेवर दुध पिण्याची काळजी करावी. सांगली मिरजेत गेली ६ वर्षे प्रत्येक गणेश उत्सवाआधी flagmarch होतो का होतो ते दुधाचे दात आले कि बघावेत. ३. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? अरे व्वा. शिवरायांच्या स्वराज्याची व्याख्याच तुम्ही बदलून टाका आणि स्वराज्यावारच प्रश्नचिन्ह उभे करा. आणि म्हणे मी शिवाजी भक्त. ४. फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे? नाही ना हो दाखवता येत. कारण ते बाहेरून इथे हिरवा धर्म पसरवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी आले नव्हते. त्यांनी इथे येवून आमची देवळे फोडली नाही. स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. आपला धर्म जबरदस्तीने पसरविला नाही. आमची विद्यापीठे उध्वस्त केली नाहीत हिंदू आणि बौध धर्मग्रंथ जाळले नाहीत. मुस्लिमांनी जिथे जिथे आक्रमण ती सर्व राष्ट्रे आज मुस्लिम राष्ट्रे आहेत. ( आजच्या युगातहि हेच सुरु आहे.) पण तुमच्या पुस्तकात हे सर्व पांढर्या पानावर सफेद शाईने लिहिले असल्याने (किंबहुना त्या सगळ्या वस्तुस्थितीवर व्हाइट वॉश दिला असल्याने) काय बोलावे? इथल्या लोकसभेवर हल्ले होतात, मुंबईत बॉम्ब स्फोट होतात, निरपराध निः शास्त्र लोकांवर मशीन गन चालवली जाते आणि ते करणारे काश्मीर मुक्तीसाठी लढणारे स्वतंत्र सैनिक आहेत म्हणणाऱ्या लोकांशी काय वाद घालायचा? अहो त्या मराठी सरदारांना व्हिजन नव्हती. स्वराज्य म्हणजे काय, त्यांचा उद्देश काय , ते कशाशी खातात हे माहिती नव्हते.त्यांचा विरोध स्वतःची वतनदारी टिकवून ठेवण्यासाठी होता. त्यांना स्वतःची स्पेस हवी होती. इतकेच. पण तुमच्या दृष्टीने ते अविचारी स्थानिक वतनदार- सरदार आतंकवादीच असणार!

मिरजेत दंगल झाली नाही

बॅटमॅन
Mon, 10/05/2015 - 20:52 नवीन
मिरजेत दंगल झाली नाही म्हणणारे काल संध्याकाळी जन्माला आले असावेत. तेव्हा त्यांनी वेळेवर दुध पिण्याची काळजी करावी. सांगली मिरजेत गेली ६ वर्षे प्रत्येक गणेश उत्सवाआधी flagmarch होतो का होतो ते दुधाचे दात आले कि बघावेत.
२००९ च्या अगोदर कधी मोठी दंगल झालीय ओ मिरजेत?
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

आडून आडून नाही. जन्म आणि

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 22:30 नवीन
आडून आडून नाही. जन्म आणि शिक्षणाने सांगलीकर आहे. वयाची सुरवातीची २५ वर्षे सांगलीत काढलीत. माझ्या बायोडाटाची काळजी नसावी. चांगल्यापैकी मजबूत आहे. स्वतःचे खरे नाव तरी टाका उगीच नपुंसक बड बड वगैरे लिहून स्वतःला शूर वीर नका समजू.
माझे प्रश्न तुम्हाला असले तरी 'दत्ता जोशी' या व्यक्तिस वा सदस्य आयडीस व्यक्तिशः नसून आपल्या प्रतिसादांतून जे विचार पाझरले त्यास उद्देशून आहेत. ते 'डॉन बॉस्को' असते तरी तसेच असते. लगेच अंगावर घेऊन हमरी तुमरीवर यायला हा काही आठवडी बाजारातला चौक नाही. तस्मात आपला बलदंड बायोडाटा आपणापाशीच ठेवणे. योग्य ठिकाणी उपयोगी पडेल.
शिवरायांच्या स्वराज्याची व्याख्याच तुम्ही बदलून टाका आणि स्वराज्यावारच प्रश्नचिन्ह उभे करा. आणि म्हणे मी शिवाजी भक्त.
तुम्ही तुमची व्याख्या लावून जातीय तेढ वाढवा. चालु द्या.
कारण ते बाहेरून इथे हिरवा धर्म पसरवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी आले नव्हते. त्यांनी इथे येवून आमची देवळे फोडली नाही. स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. आपला धर्म जबरदस्तीने पसरविला नाही. आमची विद्यापीठे उध्वस्त केली नाहीत हिंदू आणि बौध धर्मग्रंथ जाळले नाहीत.
अशा हिरव्या लोकांना महाराजांनी आपल्या पदरी ठेवले, विश्वासाची पदं दिलीत. असे का बरे केले असावे महाराजांनी इतक्या जहरी हिरव्या पिलावळीसोबत? तसेच इंग्रजांनीही यातले बरंच काही उपद्व्याप केलेत. तितकेच अत्याचार त्यांनीही केलेत. खरे तर भारताचा खरा इतिहासच लपवून, नष्ट करून टाकण्याचे पातक इंग्रजांना जाते. त्यांच्याबद्दल एवढ्या तीव्र भावना कधी व्यक्त होत नाहीत जेवढ्या मुस्लिम शासकांबद्दल होतात.
इथल्या लोकसभेवर हल्ले होतात, मुंबईत बॉम्ब स्फोट होतात, निरपराध निः शास्त्र लोकांवर मशीन गन चालवली जाते आणि ते करणारे काश्मीर मुक्तीसाठी लढणारे स्वतंत्र सैनिक आहेत म्हणणाऱ्या लोकांशी काय वाद घालायचा?
मी तरी नाही म्हटले की लोकसभेवर हल्ला करनारे, मुंबईत बॉम्बस्फोट करणारे, निशस्त्र लोकांवर गोळ्या चालवणारे यांना दया दाखवा. आपल्या बादशहाच्या 'सत्ते'मधे होणारी बंडाळी तत्कालिन सर्व उपलब्ध पर्यायांचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न करणारा अफझल खान, दुसर्‍यांच्या भूमीवर अशांतता पसरवून देशाच्या प्रगतीस खिळ घालण्याचा प्रयत्न करणार्‍या ह्या परदेशी दहशतवाद्यांचं प्रतिक आहे ते कसं हे काही समजलं नाही. केवळ तो मुस्लिम होता, त्याने अत्याचार केले इतकंच सूत जुळवून 'तोही तसाच' आणि 'हेही तसेच' असे करत "सगळेच मुस्लिम अथपासून इथपर्यंत असेच" असा शॉर्टकट मारून तुम्हाला इतिहास व आंतरराष्ट्रीय राजकारणाची कितपत जाण आहे हे कळून आले.
त्या मराठी सरदारांना व्हिजन नव्हती. स्वराज्य म्हणजे काय, त्यांचा उद्देश काय , ते कशाशी खातात हे माहिती नव्हते.त्यांचा विरोध स्वतःची वतनदारी टिकवून ठेवण्यासाठी होता. त्यांना स्वतःची स्पेस हवी होती. इतकेच. पण तुमच्या दृष्टीने ते अविचारी स्थानिक वतनदार- सरदार आतंकवादीच असणार!
करेक्ट. कारण तेव्हा त्या लोकांना स्वतःच्या वैयक्तिक फायद्यापुढे आपल्याच लोकांवर होणारे अत्याचार दिसत नव्हते. तुम्ही वर जे वर्णिले ते काहीही त्यांच्या डोळ्यादेखत घडत नव्हते. त्यांना तसे काही वाटतच नव्हते. म्हणून आमच्यासाठी अशा नराधम शासकांचे कुकर्म डोळेझाक करणारे पराक्रमी सरदार-योद्धे हेही तेवढेच अन्यायी जेवढे तुम्हाला तथाकथित सिक्युलर हे आतंकवाद्यांइतकेच देशद्रोही वाटतात. तुम्ही त्यांना आपले म्हणून सोडून देताय ते एवढ्याच साठी की ते फक्त हिरवे नाहीत भले त्यांनी कितीही अपराध केलेले असू दे. तोच न्याय आपण अशा दहशतवादी कृत्यांमधे सामील असणार्‍या 'भटकवलेल्या' स्थानिक मुस्लिमांना लावत नाही कारण ते हिरवे आहेत. असो. आंतरजालावर वैयक्तिक काही घेत जावू नका.
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

अंध मानवतावादी आणि सिक्युलरच .!

दत्ता जोशी
Mon, 10/05/2015 - 21:01 नवीन
अशा आतंक वाद्यांना फाशी देवू नका म्हणून याचना अर्ज करणारे. अश्या आतंकवाद्यांना फाशी दिले तर देश पेटेल म्हणणारे आणि फाशी दिल्यावर त्यांच्या मयतीला गोल टोपी घालून जमा होणारे, मतांसाठी इतिहासाला व्हाइट वॉश देवून स्वतःची अस्मिता विकणारे ..भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान जिंकले कि फटाके वाजवणारे, इराक मध्ये सद्दामला फाशी झाली म्हणून इथे रस्त्यावर मोर्चे काढणारे, बेंगळूरूत पोलिस स्टेशन जाळणारे, आणि त्यांचे लांगुल चालन करणारे कसले सेक्युलर ते तर सिक्युलरच...

अशा आतंक वाद्यांना फाशी देवू

फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 10/05/2015 - 21:43 नवीन
अशा आतंक वाद्यांना फाशी देवू नका म्हणून याचना अर्ज करणारे. अश्या आतंकवाद्यांना फाशी दिले तर देश पेटेल म्हणणारे आणि फाशी दिल्यावर त्यांच्या मयतीला गोल टोपी घालून जमा होणारे, मतांसाठी इतिहासाला व्हाइट वॉश देवून स्वतःची अस्मिता विकणारे ..भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान जिंकले कि फटाके वाजवणारे, इराक मध्ये सद्दामला फाशी झाली म्हणून इथे रस्त्यावर मोर्चे काढणारे, बेंगळूरूत पोलिस स्टेशन जाळणारे, आणि त्यांचे लांगुल चालन करणारे कसले सेक्युलर ते तर सिक्युलरच...
मुस्लिम असे काही करत नाहीत,हा तद्दन खोटा प्रचार आहे.या देशातला प्रत्येक मुस्लिम हा देशभक्तच असतो.पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारे कुठेबघितले हो जोशि? आणि याकुबच्या मयतीला आलेले लोक अत्यंत कमी होते, कुठला तरी फोटो मॉर्फ करुन चिकटवण्याची भक्तांची सवय आपल्याला ठाऊक नाही काय.?
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

आज मिपा मूतपिठचा रेकॉर्ड

टवाळ कार्टा
Mon, 10/05/2015 - 21:50 नवीन
आज मिपा मूतपिठचा रेकॉर्ड मोडतयं
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

पाकिस्तान जिंकल्यावर फटाके

धनावडे
Mon, 10/05/2015 - 23:47 नवीन
पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारे कुठेबघितले हो " वाईत २००४ मध्ये
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

मग बिघडलं कुठं ?

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 23:55 नवीन
पाकिस्तान भारतात येऊन अखंड हिंदुस्तान व्हावा हे हुतात्मा नथुरामपंत गोडसेगुरुजी यांचे स्वप्न होते ना ? मोदीनीदेखील भारतमातेकडून पाकमावशीला साडी भेट दिली आहे ना ?
↩ प्रतिसाद: धनावडे

घ्या ! हिंदुही पोलिस चौकी जाळतात !

dadadarekar
Mon, 10/05/2015 - 23:00 नवीन
मोदींच्या वाराणशीत गंगेत गणपती विसर्जन प्रकरणावरून संतप्त हिंदुनी पोलिस चौकी जाळली ! http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49231442&section=top-stories बघा बघा . किती धूर झालाय !
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

.

dadadarekar
Tue, 10/06/2015 - 05:44 नवीन
हिंदुनी सगळा इतिहास हा फॅब्रिकेटेड लिहिला आहे. अफजलखान , समान नागरी कायदा, मुस्लिमांची धर्मांधता यावर तावातावाने लिहायला आले. पण गेल्या काही महिन्यात झालेल्या घटना ... समाजसुधारकांच्या खुनाच्या केसेस एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेली अटक , बीफ खाल्ले असा आरोप करुन भाजपाशी संबंधित गटाने एका मुस्लिमाची केलेली हत्या , गणेश विसर्जावरून मोदींच्या वाराणशीत सुरु असलेली जाळपोळ व दंगल ... यावर मात्र कुणी धागे / प्रतिसाद लिहिलेले नाहीत. इतिहासात कोणत्या धर्माने / कोण्त्या व्यक्तीनी काही का केलेले असेना आज मला जो धर्म आवडतो मी तोच स्वीकारणार व त्यात आनंदाने रहाणार. हे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे. ....
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा