Skip to main content

म्हणता म्हणता ......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/10/2015 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच नाही म्हणता म्हणता चंद्राभवती पडले खळे, खळेच पडले इतके सुंदर चंद्र दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता चाफ्याभवती पान उमटले पानच इतके गर्भरेशमी, फूल दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता बागेभवती जडली माया माया इतकी गर्दसावळी बाग दिसेना त्यानंतर! काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!
लेखनविषय:

वाचने 2346
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मला कविता खूप आवडली

शब्दरचना छान जमलीय पण शेवटच्या 2 ओळींचा अर्थ लक्षात नाही आला. पहिल्या 3 कडव्यांमधे मांडलेला विचारांची माळ शेवटच्या कडव्यात तुटली असे वाटले

आवडलं हे कडवं.
काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!