✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवाळी अंक २०१५: आवाहन

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 23:23  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर हो, गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने "लेखन करा" ऑप्शनखाली (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित कॉपी पेस्ट करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील. यावर्षी विडंबने आणि कथा यावर भर असावा अशी सर्वसाधारण कल्पना आहे. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने - विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, अन्यत्र पूर्वप्रकाशित असलेले साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट शोकांतिका असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : १५/१०/२०१५ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! साहित्य स्वीकारल्याची पोच २५/१०/२०१५ पर्यंत दिली जाईल. त्यानंतर अस्वीकृत साहित्य तुम्ही इतरत्र प्रसिद्ध करू शकता. मात्र दिवाळी अंकासाठी म्हणून पाठवलेले साहित्य आधीच किंवा दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यानंतर ३ महिनेपर्यंत अन्य संस्थळावर प्रसिद्ध करू नये ही विनंती. ५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण दीड महिना आहे. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद! -----------------------------
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
. . -----------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
106403 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

हे अत्युत्तम केलंत......

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/15/2015 - 19:37 नवीन
ता.क.: जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे म्हणून लिखाण पाठवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देत आहोत. कृपया आपले लिखाण लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. लिखाण स्वीकारले आहे की नाही याबद्दल ५ नोव्हेंबरपर्यंत कळवू. धन्यवाद!
दंडवत स्वीकारावा ___/\___ !!
  • Log in or register to post comments

आठवण करुन द्यायसाठी धागा वर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/21/2015 - 23:38 नवीन
आठवण करुन द्यायसाठी धागा वर आणतो आहे. लवकर पाठवा साहित्य.
  • Log in or register to post comments

मंडळी बरंच लेखन पोहचलं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/24/2015 - 17:44 नवीन
पण अजूनही बरीच मंडळी लेखन पाठवायची बाकी आहे. काय लिहिताय ना मग ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शन्वारपर्यंत एक पाकृ पाठवतो.

सूड
Mon, 10/26/2015 - 16:06 नवीन
शन्वारपर्यंत एक पाकृ पाठवतो.
  • Log in or register to post comments

कालच लेख पाठवलाय!

चतुरंग
Mon, 10/26/2015 - 16:13 नवीन
प्राडाँची पोचदेखील आली! :)
  • Log in or register to post comments

मंडळी खूप लेखन आलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/30/2015 - 20:37 नवीन
दिवाळी अंकासाठी भरभरुन लेखन आलं आहे, येत आहे. असाच मिपावर लोभ असु द्या मंडळी. _/|_ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अर्र येवढ्यात नका निरोपाचं

सूड
Fri, 10/30/2015 - 21:05 नवीन
अर्र येवढ्यात नका निरोपाचं भाषण करु. रेशिपी इज अबौट टु फिनिश!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आरं आने दो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/30/2015 - 21:09 नवीन
आपल्या रेशिपीमुळं मी थांबलोय. नै तर नीलकांतकडे फायनल ड्राफ्ट केव्हाच पाठवला असता. अजून आपल्यासारखे मिपाकरांचे लेखन बाकी आहे, ते मी विसरलो नाही. वाट पाहतोय. बाकी, मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

इमेल आणि व्यनि दोन्ही पाठवलं

सूड
Sat, 10/31/2015 - 01:08 नवीन
इमेल आणि व्यनि दोन्ही पाठवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन पोहचले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/31/2015 - 07:19 नवीन
आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मिपावर एकही व्यंगचित्रे

सुबोध खरे
Sat, 10/31/2015 - 12:42 नवीन
मिपावर एकही व्यंगचित्रे काढणारा एक मिपाकर नै याचं वैट वाटलं. डॉक्टर साहेब आम्ही चित्र काढलं तर त्या माणसाला व्यंग आहे असंच दिसतं. अजून व्यंगचित्र काय काढणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ळॉळ

वेल्लाभट
Mon, 11/02/2015 - 07:33 नवीन
हे बेस्ट होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा हा हा!

चतुरंग
Sun, 11/08/2015 - 22:44 नवीन
खल्लास कॉमेंट डॉक! ;) (व्यंगकवी)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लिखाण निवडले गेले आहे किंवा

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/31/2015 - 05:59 नवीन
लिखाण निवडले गेले आहे किंवा रिजेक्ट झाले आहे ची सूचना कधीपर्यंत मिळेल?
  • Log in or register to post comments

साहित्य..

हरीहर
Sun, 11/01/2015 - 00:13 नवीन
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत संपली (जर पुन्हा एकदा मुदतवाढ नसेल तर!) आता दिवाळी अंकाचे वेध लागले आहेत.. आमच्या सारख्या वाचनमात्र लोकांसाठी अंक प्रकाशीत होण्यापूर्वी या धाग्याव्र किंवा नवीन धाग्याच्या स्वरुपात या अंकाची वैशिस्ट्ये, लेख, लेखक यांचि माहिति दिलीत तर उत्सुकता आणखी वाढेल, येणा-या अंकासाठी वातावरण निर्मिती देखील होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत

शिव कन्या
Mon, 11/02/2015 - 06:40 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरीहर

दिवाळी अंक २०१५

दिपोटी
Sun, 11/08/2015 - 11:16 नवीन
आज रविवार, आठ नोव्हेंबर. मिपाचा दिवाळी अंक नेमका कोणत्या तारखेस प्रसिध्द होईल? - दिपोटी
  • Log in or register to post comments

संपादक महोदय..

हरीहर
Mon, 11/09/2015 - 20:45 नवीन
खरच.. कधी येनार आपला दिवाळी अंक...
  • Log in or register to post comments

मिपाचा "दिवाळी अंक २०१५"

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/10/2015 - 00:28 नवीन
मिपाचा "दिवाळी अंक २०१५" प्रसिद्ध झाला आहे... उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने त्याला उघडू शकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरीहर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा