Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 08/26/2015 - 10:22
आयुष्य मागते काहीं रखरखाट तप्त कुठेसा त्या रस्त्यावरती ओला तो थेंब शुष्क रुधिराचा भिरभिरति नकळत डोळे शोधी आधार छताचा ते खांब चारच होते ना मागमुस भिंतीचा सुकलेल्या ओष्ठांना हलके स्पर्श तप्त अश्रुंचा थांबले गालांवर मोती ओघळला श्वास कोरडासा त्या श्वासांमधले अंतर मोजण्यापल्याड असते मी फ़क्त मोजतो श्वास अन्तरही फसवे असते जगणे बुभुक्षिताचे भूक संपता संपत नाही ते स्वप्न शोषिती माझे शोधती सत्य आभासी ते दिवे दूर जाताना सावली सोडते साथ बांधू पाहतो नशिबा पाठीवर बांधुनी हात ते दिवस कोडगे होते रात्री लाजिरवाण्या स्वप्नांचे इमले इतुके विश्वास बाटगा होता ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगंधी होते मी जगण्यावरती हसतो विशाल

Submitted by जव्हेरगंज on Wed, 08/26/2015 - 10:25

Permalink

:-)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 08/26/2015 - 21:57

Permalink

छान!

छान! मात्र या वेळी वृत्तबद्ध नाही वाटली. "मुक्त कविता" लिहिलंस, पण विशालकडून अशा कवितेची सवय नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 08/27/2015 - 10:42

In reply to छान! by पैसा

Permalink

म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा

म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा हाताळून पाहावा :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/28/2015 - 10:47

In reply to म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा by विशाल कुलकर्णी

Permalink

नाही रे!

यातली कल्पना खूप सुरेख आहे, पण काही ओळी पूर्ण वृत्तात आहेत आणि कुठे एखाद दुसरी मात्रा कमी जास्त वाटतेय. पूर्ण मुक्तछंदात लिहिलंस तरी ते खटकत नाही, छानच वाटेल. पण यात जरा गोंधळल्यासारखं वाटलं. म्हणजे कवितेची सुरुवात वृत्तबद्ध आहे, आणि नंतर ती बदलत गेलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on गुरुवार, 08/27/2015 - 06:51

Permalink

मस्त

ती हलके हलके हसते ते नकळत मीही जगतो ते जगणे सुगंधी होते मी जगण्यावरती हसतो मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/27/2015 - 07:48

Permalink

सुंदर!

सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on गुरुवार, 08/27/2015 - 12:14

Permalink

वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना

वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना तितक्याच ताकदीने पोहोचवताहेत. दुःखाची गडद गहिरी छटा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 08/27/2015 - 17:38

In reply to वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना by मांत्रिक

Permalink

धन्यवाद मंडळी !

धन्यवाद मंडळी ! धन्यवाद मांत्रिक _/\_
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 08/28/2015 - 10:42

Permalink

सुरेख...

सुरेख... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3234 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com