आयुष्य मागते काहीं
रखरखाट तप्त कुठेसा
त्या रस्त्यावरती ओला
तो थेंब शुष्क रुधिराचा
भिरभिरति नकळत डोळे
शोधी आधार छताचा
ते खांब चारच होते
ना मागमुस भिंतीचा
सुकलेल्या ओष्ठांना हलके
स्पर्श तप्त अश्रुंचा
थांबले गालांवर मोती
ओघळला श्वास कोरडासा
त्या श्वासांमधले अंतर
मोजण्यापल्याड असते
मी फ़क्त मोजतो श्वास
अन्तरही फसवे असते
जगणे बुभुक्षिताचे
भूक संपता संपत नाही
ते स्वप्न शोषिती माझे
शोधती सत्य आभासी
ते दिवे दूर जाताना
सावली सोडते साथ
बांधू पाहतो नशिबा
पाठीवर बांधुनी हात
ते दिवस कोडगे होते
रात्री लाजिरवाण्या
स्वप्नांचे इमले इतुके
विश्वास बाटगा होता
ती हलके हलके हसते
ते नकळत मीही जगतो
ते जगणे सुगंधी होते
मी जगण्यावरती हसतो
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3248
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
छान!
म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा
In reply to छान! by पैसा
नाही रे!
In reply to म्हणलं जरा मुक्तछंदसुद्धा by विशाल कुलकर्णी
मस्त
सुंदर!
वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना
धन्यवाद मंडळी !
In reply to वृत्तबद्ध नसली तरी शब्द भावना by मांत्रिक
सुरेख...