✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला आवडलेले पुस्तक

व
विजुभाऊ यांनी
Wed, 08/27/2008 - 18:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34539 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

अगदी अचुक ...

छोटा डॉन
गुरुवार, 08/28/2008 - 16:55 नवीन
आजच मी माझ्या वडीलांना फोन करुन पुस्तकाचे नाव विचारले ... ते "हार आणि प्रहारच" आहे. पटकन शंकानिरसन केल्याबदाल "विकासरावांना" धन्यवाद .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कृपया एका

विजुभाऊ
गुरुवार, 08/28/2008 - 09:56 नवीन
कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्ताकाबद्दल लिहावे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आठवले ...

छोटा डॉन
गुरुवार, 08/28/2008 - 20:10 नवीन
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.
ज्याचे नाव आठवत नव्हते ते आठवले. "दास डोंगरी राहतो" असे काही तरी आहे. एकदम मस्त, समर्थ रामदासांवर आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ठिकठिकाणी त्यांच्या "श्लोकांनी" सजवलेले आहे त्यामुळे एकदम रसाळ वाटते. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मला आवडलेले पुस्तक..

मनीषा
Wed, 08/27/2008 - 23:50 नवीन
वास्तव रामायण लेखक - डॉ. प. वि. वर्तक यात त्यानी आकाशातील ग्रह-ता-यांच्या स्थिती वरुन रामायणाची कालनिश्चिती केली आहे. तसेच रामायणातील अनेक घटना , ज्या आपण केवळ पुराण कथा म्हणून ऐकतो/ वाचतो आणि काही वेळा त्याचा विपर्यास केला जातो, त्याचे अतिशय तर्कशुद्ध विश्लेश्ण केले आहे. तसेच रामायण हे नुसते काल्पनीक पुराण नसुन सत्यकथा आहे या बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती दिली आहे. तसेच रामायण नक्की कुठे घडले.. सीतेला शोधण्यासाठी राम कुठे आणि कसा गेला हे सुद्धा त्यानी अनेक पुरावे देउन सांगीतले आहे..
  • Log in or register to post comments

+१

विकास
गुरुवार, 08/28/2008 - 00:00 नवीन
मला देखील वास्तव रामायण आवडले. तसेच त्यांचे स्वयंभू पुस्तकपण छान आहे. अर्थात दोन्ही पुस्तकात काही गोष्टी अवास्तव आहेत पण त्यामुळे संपूर्ण पुस्तकाची व्हॅलीडीटी कमी झाली असे वाटत नाही... उ.दा. शिवलींगाबद्दल खूप चांगली माहीती देत असताना अचानक त्याचा संबंध अणूभट्टीशी लावणे कारण त्याचा अकार पण तसाच असतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

लेखक - डॉ. प.

विसोबा खेचर
गुरुवार, 08/28/2008 - 00:14 नवीन
लेखक - डॉ. प. वि. वर्तक म्हणजे सूक्ष्मरुपाने मंगळावर वगैरे जाणारे तेच ना? ;) आपला, (नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

असे का?

विकास
गुरुवार, 08/28/2008 - 00:22 नवीन
नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला ध्वनीरुपाने येणारे तात्या माहीती आहेत. आता जरा काळजी वाटते मागे पुढे कुठे तात्या उभे नसतील न अशी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

डॉ. प. वि. वर्तक

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/28/2008 - 10:15 नवीन
होय! मी पण त्यांच्याबद्दल असंच काही ऐललेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मी डॉ.वर्तकांची वाचलेली पुस्तके

चतुरंग
गुरुवार, 08/28/2008 - 00:25 नवीन
वास्तव रामायण, स्वयंभू, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण (हे संपूर्ण वाचून झाले नाही, एकदोनच भाग वाचलेत) पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. त्यातील माहिती त्यांनी कशी शोधून काढली असावी ह्याबद्दल त्यांच्याशीच चर्चा करुन जास्ती समजून घेता यायला हवे. ग्रह गणित, संस्कृत इ.चा त्यांचा व्यासंग चांगलाच आहे. वेगळ्या नजरेने रुढ गोष्टींकडे बघायची त्यांची शैली हटके आहे. मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. अर्थात माझे थोड्या वाचनाने आणि परिचयाने झालेले हे मत आहे. ही पुस्तके वाचूनही बरीच वर्षे झाली. पुन्हा वाचायची इच्छा आहे. रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

बरेचसे मान्य...

विकास
गुरुवार, 08/28/2008 - 00:58 नवीन
पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. एकदम मान्य! मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. मी त्यांना भेटलेलो नाही पण तीन भाषणे लहान (- म्हणजे मी लहान) असताना ऐकलेली आहेत. त्यांच्याबद्दल पुणेकरांकडून बरेच गंमतशीर किस्से ऐकलेले आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. "प्रचारकी" म्हणजे कुठल्या अर्थाने या वर आपले अनुभव सारखे आहेत का वेगळे ते ठरवावे लागेल ;) पण अजूनही लक्षात आहेत. त्यात फक्त एकच वाटते की थोडेफार "तर्कट" आहेत. रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत. १००% मान्य! अधिक माहितीसाठी इथे पाहू शकता. =)) त्यांचे संकेतस्थळ जर विश्वामित्राने बघितले तर तो ढसाढसा रडेल अथवा साक्षात ब्रम्हदेवाकडे तक्रार घेऊन जाईल" "जी पदवी मिळायला मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली, सरते शेवटी अहंभाव सोडावा लागला, ती पदवी म्हणजे ब्रम्हर्षी नाही , पण ब्रम्हश्री ही नवीन पदवी वर्तकांसाठी तयार केलीस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मला आवडलेले..

प्राजु
गुरुवार, 08/28/2008 - 00:01 नवीन
सुधा मूर्ती यांचे वाईज ऍण्ड आदर वाईज.. तसेच त्यांचेच गोष्टी माणसांच्या... वाईज ऍण्ड आदर मध्ये सुधा मूर्तींना इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने समाजकार्य करताना आलेले माणसांचे अनुभव लिहिलेले आहेत. तर सुधा मूर्तीना लहानपणापासून ज्या व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पाडला त्यांच्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात जे आर डी टाटा, रतन टाटा, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम , नारायण मूर्ती.. यांच्याशिवाय बर्‍याच मोठमोठ्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. अतिशय सुंदर पुस्तके आहेत दोन्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/28/2008 - 10:17 नवीन
मलाही आवडलं हे पुस्तक. मोठ्या लोकांबरोबरच छोट्या, सामान्य लोकांकडूनही शिकता येतं ते पण लिहिलं आहे त्यांनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

विज्ञान कांदंबर्‍या

विकास
गुरुवार, 08/28/2008 - 00:16 नवीन
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल २ विज्ञान कादंबर्‍या स्तके एकाच प्रतिसादात सांगून प्रतिसादाची संख्या मर्यादीत करत आहे. तेंव्हा क्षमस्व! फाउंडेशन मालीका - आयझॅक ऍसिमोव्ह. रोबोची संकल्पना त्यात शेवटी शेवटी आली आहे असे धरले जाते (मला विशेष जाणवले नाही, पण त्या काळात वाटले असेल). बाकी त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा संबंध आपण आपल्या जगाला लावू शकतो. मिपावर सुरवातीस मी यावर लिहीले होते. आवडते वाक्य - "व्हायलन्स इज द लास्ट रेफ्यूज ऑफ इन्कॉपिटंट". (पेशन्स ठेवून) शेवटच्या पुस्तकापर्यंत वाचल्यास, "चराचर सृष्टीएकमेकांशी संलग्न आहे आणि त्या अर्थाने विश्व हे एकच जीव आहे ," असा यात अर्थ समजतो. २००१ ए स्पेस ओडीसी - आर्थर सी क्लर्क. यात हॅल कॉम्प्यूटरचा जो आत्ताच्या काळातील सूपर काँप्यूटर आहे आणि स्पेसशिपचे वर्णन आहे जेंव्हा काहीच अस्तित्वात नव्हते. यात शेवटी - पुनरपी जननम पुनरपी मरणम ही संकल्पना सांगितली आहे. मराठीत "यक्षाची देणगी" हे नारळीकरांचे पुस्तक आवडले होते.
  • Log in or register to post comments

HAL

वाचक
गुरुवार, 08/28/2008 - 07:58 नवीन
अवांतरः HAL ही अक्षरे सांकेतिक स्वरुपात IBM कडे बोट दाखवतात असा एक दावा आहे - बघा IBM च्या आधीचे प्रत्येक अक्षर म्हणजे HAL :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

२००१ ए स्पेस ओडीसी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/28/2008 - 10:21 नवीन
२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

२००१ ए स्पेस ओडीसी - चित्रपट

विकास
Fri, 08/29/2008 - 04:30 नवीन
२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला. बहुतांशी पुस्तकांवरून काढलेल्या चित्रपटांप्रमाणेच ह्या संदर्भात घडले आहे. चित्रपट ग्रेट नाही आहे. शिवाय तो बराच जुना आहे, त्यातील सेटींग्ज पण जुन्या स्टाईलची, (बहुतेक वेळेस कथेमुळे) फक्त दोन व्यक्तींवर चित्रित केलेली असल्याने ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी आयझॅक

धमाल मुलगा
गुरुवार, 08/28/2008 - 10:48 नवीन
मी आयझॅक ऍसिमॉव्ह घेऊन ऑफिसच्या बसमध्ये वाचायचो,तेव्हा आजुबाजुच्या बर्‍याच भिवया आश्चर्य /आदर की आणखी काही कोण जाणे ह्या भावना घेऊन वर चढायच्या. तेव्हा मनाला छान गुदगुल्या व्हायच्या, आणि नाकावरचा चष्मा आणखी पुढे ओढुन मी सभोवतालास कस्पटासमान मानुन पुस्तकात शिरायचो...... ...पण खरं सांगु, कथारुप जरी असलं, तरी माझ्या बालबुध्दीला काही झेपला नाही बॉ ऍसिमॉव्ह. बर्‍याचजणांच्या गप्पा ऐकुन 'फाऊंडेशन' घेतलं खरं, पण अजुनही शेवटची काही प्रकरणं वाचायची बाकीच आहेत. शैली थोडीशी बोजड वाटली. हां पण 'सायकोहिस्ट्री'चं कव्हर मात्र छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माचीवरला बुधा

मैत्र
गुरुवार, 08/28/2008 - 03:48 नवीन
गोनीदांचं छोटंसं पुस्तक आहे. त्यांची सगळीच पुस्तकं सुंदर आहेत पडघवली, मॄण्मयी, रानभुली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत... पण हा बुधा त्याच्या अतिशय साध्या निसर्गाच्या जवळ अशा आयुष्यानं फार कुठे तरी हलवून जातो.. जरूर वाचा... नियम मोडून दुसरं पुस्तक म्हणजे विजय देवधरांचं अनुवादित डेझर्टर...
  • Log in or register to post comments

पुल

गणा मास्तर
गुरुवार, 08/28/2008 - 06:41 नवीन
पुलंचे 'एक शुन्य मी'. अगदी प्रत्यकाने वाचावेच असे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments

फक्त एक

सुचेल तसं
गुरुवार, 08/28/2008 - 08:32 नवीन
फक्त एक पुस्तक निवडणं शक्य नाही.... १) व्यक्ति आणि वल्ली, असा मी असा मी = पु.ल.देशपांडे २) माणदेशी माणसं, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर ३) शाळा - मिलिंद बोकील ४) आणि मी - मंगला गोडबोले ५) पार्टनर - व.पु.काळे ६) दिवसेंदिवस - शं. ना. नवरे (एका लग्न न झालेल्या मुलाची डायरी.... मस्त आहे.) ७) अनुवादितः डेझर्टर, पॅपिलॉन, नॉट विदाऊट माय डॉटर ८) गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

प्रकाश नारायण संत

sachin_Pune
गुरुवार, 08/28/2008 - 10:48 नवीन
प्रकाश नारायण संत - शारदा संगीत, पंखा, वनवास
  • Log in or register to post comments

आणि एक आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/28/2008 - 11:40 नवीन
आणि एक आहे ना पुस्तक त्यांचं, झुंबर; चारही छान आहेत पुस्तकं. मलापण आवडली ती पुस्तकं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sachin_Pune

खुप सुंदर पुस्तक

शिप्रा
गुरुवार, 08/28/2008 - 11:49 नवीन
एक होता कार्व्हर अनुवाद :- वीणा गव्हाणकर.. हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments

जी. ए.

अभिषेक पटवर्धन
गुरुवार, 08/28/2008 - 13:48 नवीन
जी. ए. च्या पुस्तकान्चा कुणीच कसा उल्लेख केला नाही. त्यान्च्या सगळ्या पुस्तकातल मला आवडलेल ' माणसे: अरभाट अणि चिल्लर'. मी शाळेत असताना वाचल होत, पण अजुनी त्यातले सन्वाद जसेच्या तसे लक्शात आहेत. इथे कोणी वाचलय का?
  • Log in or register to post comments

स्टुडीओ!

नीधप
Wed, 07/08/2009 - 19:49 नवीन
स्टुडीओ - सुभाष अवचट यांचे पुस्तक. माझे अतिशय आवडते. सृजनाची प्रक्रीया, कलाकार म्हणून वाढणे, कलाकाराच्या व्यक्तित्वातली गंमत... आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे. तसं काही हे आत्मचरीत्र नाही पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाशी निगडीत आहे. हे पुस्तक म्हणजे सिप बाय सिप हळू हळू घशात उतरणारी आणि कणाकणाने हळूहळू नशा चढवणारी ही एक वाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

माझी आवड

सचीन जी
Wed, 07/08/2009 - 19:59 नवीन
१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी या यादीत व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.
  • Log in or register to post comments

माझी आवड

सचीन जी
Wed, 07/08/2009 - 20:00 नवीन
१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी सर्व प्रतिक्रियांमधे व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.
  • Log in or register to post comments

'लस्ट फॉर लाइफ'

नीधप
Wed, 07/08/2009 - 20:03 नवीन
'लस्ट फॉर लाइफ' कादंबरीचे मूळ लेखक - आयर्व्हिंग स्टोन स्वैर अनुवाद 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' - माधुरी पुरंदरे अप्रतिम पुस्तक. कलंदर आणि झपाटलेला अश्या चावून चोथा झालेल्या शब्दांच्या कैक योजने पलिकडे असलेल्या रंग आणि रेषा जगणार्‍या गॉग च्या आयुष्यावरची कादंबरी. प्रत्येकाने वाचावी अशी. गॉग आवडत असेलच तर परत त्याच्या प्रेमात पडाल. (त्याच्याबाबत प्रेमात पडणे नाहीतर पाठ फिरवणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. हा ठिक आहे म्हणत गॉगला ओलांडू शकत नाही आपण.) गॉग माहीत नसेल तर नवीन जग तुमच्यापुढे उलगडेल. गॉग आवडत नसेल तर तुम्हाला तो समजायला मदत होईल. काही असो. वाचा नक्की. अवांतरः कोणी अ‍ॅमस्टरडॅमला असेल, जाणार असेल तर तिथलं गॉग म्युझियम न चुकता बघा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

गॉग मनात

भोचक
Fri, 07/10/2009 - 14:37 नवीन
सहमत. हे पुस्तक खूपच छान आहे. लहानपणीच वाचले होते. तेव्हापासून गॉग मनात रुतून बसलाय. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

माची वरला

विमुक्त
Fri, 07/10/2009 - 14:49 नवीन
माची वरला बुधा .... गो.नि.दा. फार छान लिहीलय.... भटकायची आवड असल्या मुळं मला ते जाम आवडत... आणि गो.नि.दा. एकदम सोप्या भाशेत लिहीतात...
  • Log in or register to post comments

वाचलेली

तर्री
Fri, 07/10/2009 - 23:05 नवीन
वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही.. कादंबरी : १. रथचक्र : श्री. ना. पेंडसे २. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे ३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर ४. ब्र : कवित महाजन. ५.बलुत : दया पवार ६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख ७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे ८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे ९.धर्मांनंद : जयवंत दळवी. १०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर कादंबरी : अनुवादित १.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी. २.पाडस : अनु : राम पटवरधन ३. नेमसेक : जुंपा लाहीरी ४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय ५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम १.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर २."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते. ३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट. ४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल. ५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे. ६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र. ७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत. ८. मैत्र : पु. ल. ९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग १०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट प्रवास-वर्णन पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा / { म्हैस !(?)} कथासंग्रह १. काजळ माया : जी.ए. २. सांज शकुन :जी.ए ३.पिंगळा वेळ : जी.ए. ४.रक्त चन्दन :जी .ए. ५. हंस अकेला : मेघना पेठे नाटक १. आत्मकथा : महेश एलकुंचवार २.पुरूष : जयवंत दळवी ३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर ४.किरवंत : प्रेमानंद गज्वी. ५.ती फुलराणी : पु.ल. ६. लग्न : जयवंत दळवी ७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर ८. तुज आहे तुज पाशी : पु.ल. ९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर १०. नटस्म्राट : शिरवाडकर खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!
  • Log in or register to post comments

बर्‍याच काळानंतर हा धागा

विजुभाऊ
Mon, 09/19/2016 - 14:29 नवीन
बर्‍याच काळानंतर हा धागा वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यातले खूप थोडेजण अजुनमिपोआवर कार्यरत आहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा