विस्तारीत धागा या इथे http://www.misalpav.com/node/3256
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
हेन्री शॅरियर यांचं "पॅपिलॉन" खुप आवडलं होतं. ही त्यांची सत्य जीवनकथा आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली लेखकाला फ्रेंच गिनियाच्या भर समुद्रातील एकाकी बेटावर असलेल्या, मृत्युचं साम्राज्य म्हणुन ओळखल्या जाणार्या तुरुंगात पाठवलं जातं. तिथुन त्यांच्या साहसी पलायनाची ही कथा. सात वेळा अपयश येवुन शेवटी लेखक तिथुन पळ काढण्यात यशस्वी झाले. त्यानंतरचे त्यांचे पुनर्वसनाचे प्रयत्नही तेवढेच रोमांचक आणि रंजक आहेत.
या पुस्तकाचा पुढचा भाग ही आला होता "बँको" या नावाने. पण तो तेवढासा रुचला नाही.
तसेच "गंथर बान्हमान" या जर्मन नाझी आर्मीतल्या वॉर कुरिअरचे "डेझर्टर" ही खुप सुरेख आहे. हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि कठोर युद्धनीतीमुळे सर्वसामान्य सैनिकांची होणारी ससेहोलपट यात खुप प्रखरपणे आली आहे. ऐन युद्धतळाहुन 'गंथर' यांनी आपल्या एका सहकार्यासह मोटारसायकल वरुन पळ काढला. पण त्या सहकार्याछा मध्येच मृत्यु झाल्याने त्यांना पुढचा काही हजार मैलाचा प्रवास एकट्यानेच करावा लागला. हे पुस्तकही अतिषय रोमांचकारी आहे.
मराठीतील म्हणाल तर राजा शिवछत्रपती हे शिवशाहीरांचे पुस्तक, रविंद्र भटांचे आळंदीच्या दैवी भावंडांच्या जिवनावरील "इंद्रायणीकाठी" आणि विद्या सप्रे यांचं भक्त मीरेच्या जिवनावरील "कृष्णमयि", स्वा. सावरकरांचं "माझी जन्मठेप" आणि गोपाळ गोडसेंचं " गांधीहत्या आणि मी", तसेच आचार्य रजनिशांचं "स्वर्ण पाखि था जो कभी" हे भारतभुमीविषयक पुस्तक ही मनापासुन आवडलेली.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
ह्यातली व्यक्तिचित्र इतकी जिवंत वाटतात, तुम्हाआम्हाला नेहमी कुठेना कुठे भेटणारी वाटतात हेच हे पुस्तक आवडण्याचं प्रमुख कारण आहे. इतक्या जिवंत आणि जिवाभावाच्या वाटणार्या व्यक्तिरेखा अन्य कुठल्याच पुस्तकात मला दिसल्या नाहीत!
आपला,
(गजा खोत प्रेमी) तात्या.
हो तोत्तोचान मी वाचले आहे, मला ते आवडले होते अजुन चिपर बाय डसन हे ही मस्त आहे.
मला आवडलेली पुस्तके
नॊट विदाऊट माय डॊटर
दि ग्रेट एस्केप
चारचैघी (नाव लक्षात येत नाही पण हेच असावे )(शांता शेळके यांनी अनुवादित केले आहे.)
"नॉट विदाऊट माय डॉटर" हे बेट्टी महमूदीचं पुस्तक, अंगावर काटा आणतं. ही गोरी, अमेरीकन बाई एका ईराण्याशी लग्न करते. चार वर्ष छान जातात, पण पुढे तो कट्टर ईस्लामिक बनतो. हे दोघे आणि यांची छोटी मुलगी ईराण मधे जातात आणि तिथे या मायलेकींना कोंडलं जातं. बेट्टी तिथून कशी निसटते, विथ हर डॉटर याचं खूप छान वर्णन... जरूर वाचावं असं...
अप्रतिम पुस्तक.
तिथकीच भेदक कथा.. इस्लामचे कायदे, बायको आणि मुलीला प्रॉपर्टी या प्रकारात मोडणं, तिथला लोकांच्या सवयी/तपशील (जसे एकाच परातीत जेवणे, स्त्रीयांचे बुरखे आतून शेंबडाने बरबटलेले असणे वगैरे) नेमके टिपले आहेत... एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारे पुस्तक वाचायचे असेल तर हे त्या यादी अग्रक्रमाने येईल.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
बेट्टी महमूदीचं पुस्तक अंगावर काटा आणणारचं आहे..तिची धडपड वाचताना फारच अस्वस्थ वाटलं..खरचं जबरदस्त अनुभव आहे.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
दि ग्रेट एस्केप हे पुस्तक ३ कैद्यांनी केलेल्या सुटके वर आहे.
त्यांचे तुरूंगातुन पलायन त्याचे त्यांनी केलेले प्लॆनिंग, मग एक दोन वेळ फसलेला प्रयत्न, आणि शेवटी तुरूंगातुन पळुन जाण्यात यशस्वी झाल्यावर पायी केलेला प्रवास ह्याचे वर्णन अप्रतिम आहे.
आणि
चौघीजणी ह्या पुस्तकात गरीब घरातल्या ४ बहिणींची मस्त कथा आहे.
त्याचे असणारे एकमेकींवरचे प्रेम आणि त्यांनी गरीब परिस्थित कसे दिवस काढले अजुन बरेच खुप सुंदर आहे पुस्तक आहे.
रत्नाकर मतकरी यांची जवळजवळ सगळे गूढकथा संग्रह मी वाचले आहेत.
पण मला आवडलेले पुस्तक "ऐक.. टोले पडताहेत".
यातील सर्व कथा छोट्या पण अतिशय परिणामकारक आहेत.
संपूर्ण कथेला शेवटच्या परिच्छेदात कलाटणी देण्याचे मतकरींचे तंत्र मला खूप आवडते.
मतकरींची जेवणावळ" कथा लहानपणी चोरून वाचली होती. तो थरार कित्येक महिने गेला नव्हता.
बरेच वर्षानी ती कथा पुन्हा अचानक हाती पडली. आणि नक्की त्यातल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला तो थरार जाणवला होता हे कळाले नाही.
हातातून काहीतरी निसटून गेल्या सारखे वाटले :(
पुस्तक का आवडले / इतरानी ते का वाचावे तेही लिहा.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मला आवडलेले पुस्तक -
संभाजी -- लेखक - विश्वास पाटील
ही एक अतिशय छान ऐतिहासिक कादंबरी आहे.
विश्वास पाटील यांची शैली इतकी छान आहे की ते प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहतात.
ही कादंबरी वाचताना संभाजी महाराजांचे उमदे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील संभाजी महाराजांचे औरंगजेबाने केलेले हाल पाहून तर अंगावर काटा उभा राहतो.
संभाजी महाराजांविषयीचे पसरलेले अथवा जाणूनबुजून पसरवलेले गैरसमज लेखकाने अतिशय परखडपणे दूर केले आहेत.
( वैयक्तिक मत )
जरीला कोसलापेक्षा जास्त छान वाटले....
येकदम झकास...
उरलेली नेमाडे यांची पुस्तके वाचली नाहीयेत..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
कोसलाचं कौतुक खुद्द भाईकाकांनीही केलं होतं! नेमाड्यांनी भाईकाकांचा जन्मभर दुस्वास केला परंतु भाईकाका इतक्या मोठ्या मनाचे की त्यांनी नेमाड्यांच्या दुस्चासाकडे दुर्लक्ष करून कोसलाचं कौतुकच केलं!
जयवंत दळवींनी जेव्हा याबाबत विस्तृत लिहिलं होतं तेव्हा मला भाईकाकाद्वेष्ट्या नेमाड्यांची कीव आली! बिच्चारे नेमाडे!
असो,
तात्या.
कोसला एकंदर चांगले आहे पण प्रसंगी शब्दबंबाळ, नशाबाज वाटू लागते. विशेषतः अजंठाच्या लेण्यांतील बुद्ध दर्शनाच्या वेळी. त्यातील काही वाक्ये खासच आहेत, जसे 'माझ्या कवडीइतक्या दु:खानं त्याचं वाळवंटाइतकं दु:ख मोजवत नाही' वगैरे. पण त्याच वेळी '...तिथे रक्ताचे तेंब टपटपू लागतात. माझी बधीर जीभ ते चाटू लागते ...' वगैरे नक्कीच शब्दबंबाळ वाटले.
(रक्तबंबाळ)बेसनलाडू
दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'बुद्धदर्शन' नावाच्या धड्यात हे सगळे होते आणि उपरोल्लेखित वाक्ये नेहमी प्रश्नपत्रिकेत संदर्भासह स्पष्ट करायला यायची ;)
(स्मरणशील)बेसनलाडू
बेलाशेठ,
बुद्धदर्शनाचा प्रसंग हा कोसलातील अत्युच्च प्रसंग आहे. अजिंठाला जाण्यापुर्वी पांडुरंगच्या बहिणीचा ज्या परिस्थितीत मृत्यू झाला ती लक्षात घ्या. 'तिच्यासोबत तिचं छोटंसं गर्भाशयही गेलं आणि खानेसुमारीची प्रचंड मोठी रांग नाहीशी झाली' अशा अर्थाचे वाक्य वाचून आम्ही हादरलो होतो. हे सगळं दडपण मनावर असताना सांगवीकरला अजिंठ्यामध्ये सुचलेले विचार हे एक मोठे तत्त्वज्ञान आहे. मला तरी ते शब्दबंबाळ न वाटता अल्पाक्षरी वाटले. बरेच काही सांगायची इच्छा असूनही शब्द जवळ नाहीत म्हणून सांगवीकरने तो प्रसंग आवरता घेतला असे वाटले.
आपला,
(सुरेश) आजानुकर्ण
कर्णा,
शब्दबंबाळपणाचा आक्षेप/मत फक्त ठराविक वाक्यांपुरताच मर्यादित आहे. एकंदर पुस्तक, व्यक्ती, प्रसंग इ. चांगले आहे तसेच काही अल्पाक्षरी वाक्येही फारच सूचक आणि चांगली आहेत, हे कबूल केलेच आहे.
(सहमत)बेसनलाडू
तोत्तोचान, चिपर बाय डझन,
शाळा, झेन गार्डन -> मिलिंद बोकील,
नॉट विदाऊट माय डॉटर, चौघीजणी(ओरिजिनल नॉव्हेल - Little Women by Louisa May Alcott) अनुवाद शांता शेळके.
माझे लंडन, चिनिमाती, दक्षिणरंग, मेक्सिकोपर्व्,इजिप्तायन्,ग्रीकांजली,तुर्कनामा - प्रवासवर्णनं -> मीना प्रभु..
पुलंची सर्व, एकेकाळी वपुंची सर्व..गौरी देशपांडे, सानिया यांची सर्व.. आहे मनोहर तरी, सोयरे सकळ -> सुनीता देशपांडे
fountainhead, all dan brown collection, all of jeffery archer, हॅरी पॉटर सिरीज..
मोस्ट फेव : The goal by Dr. Eliyahu Goldratt
एंडलेस लिस्ट.. !
लिहीता लिहीता एका पुस्तकाची अट लक्षातच राहीली नाही! :|
मस्त धागा आहे विजुभौ. आपल्याला एखादी गोष्ट करावी असं वाटत असताना दुसर्या कुणी ती करावी आणि आपल्याला कसल्याही कष्टांविना आयती मिळावी, याहून जास्त सुखाचं काही असतं का?!
माझं सध्याचं आवडतं पुस्तक -
(कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल. :()
नाटक - एक पडदा आणि तीन घंटा
नाटकातील काल आणि अवकाश यांचा अभ्यास
राजीव नाईक
अक्षर प्रकाशन
काही काही नाटकं एका रात्रीत घडतात. काही जवळपास पन्नास-साठ वर्षांचा कालावधी साकारतात. काही किती काळात घडतात याला काही महत्त्वच नसतं. काही नेमक्या कोणत्या काळात घडतात, यावर नाटकाचं नाटकपण ठरतं. काही एकाच वेळी दोन काळांत. काही काळाच्या गोठलेल्या पोकळीत. त्यासाठी वापरलेल्या नाट्यांतर्गत क्लृप्त्या तर कितीक. हे काळाचं झालं.
काही नाटकं राजमहालात घडतात. काही बेडरुममधे. बरीचशी दिवाणखान्यात! शिवाय त्यांचे प्रयोग निरनिराळ्या मंचांवर होतात. कमानी सेट, ग्रीक नाट्यघर, निकट मंच, कधी थेट रस्त्यावर होणारं पथनाट्य. पीटर ब्रुक यांच्या महाभारतासारखी काही तळ्याकाठचा उसना अवकाश नाटकासाठी वापरणारी. हा अवकाश.
या स्थळ-काळाचे लागेबांधे काय असतात नाटकातल्या आशयाशी? त्यामुळे प्रेक्षकांना नक्की काय बदल जाणवतो? कसं ठरतं हे सगळं?
निरनिराळ्या नाटकांची उदाहरणं देत अगदी साध्यासोप्या भाषेत केलेली ही चिकित्सा एखाद्या कादंबरीइतकी मनोरंजक आहे. त्यामुळे घाट आणि निरनिराळी साधनं यांच्याही फार चटकन परिचय होतो आणि ते सिनेमे पाहताना वा इतर पुस्तकं वाचतानाही फार फार उपयोगी पडतं.
कित्तीतरी लोकांना हे नाव सुचवून सुचवून दमले. कुण्णी म्हणता कुण्णी वाचलं नाही. मग शेवटी मीच खरडतेय त्याच्याबद्दल
त्या बर्याच मंडळींपैकी मी एक आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
ते वाचलंय. एकेकाळी केलेल्या अभ्यासाचं टेक्स्ट आहे ते.
राजीव सरांचंच 'खेळ नाटकाचा' हे ही जरूर वाचा.
यातल्या बर्याच गोष्टी आम्हाला(ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथील त्यांनी शिकवलेली पहिली बॅच) 'प्रयोगाचे सौंदर्यशास्त्र' आणि 'जागतिक रंगभूमी' हे शिकवताना त्यांनी मांडलेली निरीक्षणे आहेत.
वाचल्यावर परत एकदा सरांच्या लेक्चरला बसल्यासारखं वाटलं. मरायचो आम्ही त्यांच्या लेक्चरसाठी. वाट बघत असायचो. क्लिष्ट विषय सहजपणे समजावून देणे अगदी डोक्यात पक्का बसेल असा समजावून देणे हे त्यांनीच करावं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मला आवडलेलं सर्वात पहिलं पुस्तक, 'मी पाहिलेला रशिया' लेखकः जादूगार रघुवीर.
फार लहानपणी वाचलं आहे.
आवडण्याचे कारण त्या वयात (इयत्ता ७वी किंवा ८वी) जादूगार रघुवीर हे माझे दैवत होते. दूसरे कारण घरबसल्या परदेशदर्शन.
आईने लावलेली वाचनाची आवड जोपासताना पुढील आयुष्यात अनेक पुस्तके आवडली, पण विजूभाऊंनी एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे बंधन घातले आहे.
आई..........आई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आपली आई. आईबद्दल आपण कितीही बोललो, लिहिले तरी ते व्यक्त होत नाही, अर्थात आईचं प्रेम अनुभव, सर्वच मिळण्यासाठीही नशीब असावं लागतं. मॅक्झिम गार्कीच्या आईपासून साने गुरुजींच्या शामच्या आईपर्यंत ....यशवंताच्या आईपासून नारायन सुर्व्यांना बाळगणार्या आईपर्यंत. कितीही वाचायला मिळालं तरी ते अपुर्णच वाटत असते.
'आई समजून घेतांना' हे उत्तम कांबळेचे (दै. सकाळचे संपादक ) पुस्तक वाचतांना आणखि एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी तानत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांचा वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई. ' तुझ्या लहाणपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाचा चॉकलेटचा एकच घास करतो तुला मागचं दिवस कसं आठवत नाही'' लेखकाला वारंवार भुतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाथी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते. लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले जेवलीस का ? ती म्हणायची, ढकलंलं दोन तुकडं पोटात...कशी आहेस ? असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय.....'' डॉक्टरांकडे जाऊया का ? ' डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो ? असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट तिच्यासमोर आजच्या सुखात भुतकाळातील भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणी रमुन जातो. पैसे नसल्यामुळ डोक्याचे केसांचा पु़ंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई. फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई. असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहुन स्वतःहुन नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून ' आई समजून घेतांना लेखाकाची दमझाक होते. पुस्तक वाचल्यानंतर तोंडावर पुस्तक टाकून शुन्य अवस्थेत वाचकांना घेऊन जाणार्या पुस्तकांपैकी हे नक्कीच नाही. हे पुस्तक वाचतांना मधेच कंटाळा येतो. पुस्तक सोडून द्यावेसे वाटते. तरीही एक वेगळे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक चुकवू नये असेही प्रामाणिकपणे वाटते.
हा प्रतिसाद मस्तच
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
बार्बेरीअन्स ऍट द गेट.
सिल्वेर बेअर्स.
ब्युटीफूल माईंड.
जत्रा साप्ताहीकात क्रमशा कादंबरी यायची.प्र. वा.बोधे(कोयनानगर)नावाचे लेखक होते.या लेखकांच्या सगळ्या कादंबर्या.एव्हढा ओरीजीनल स्टफ परत वाचला नाही.
यादी खूप मोठी आहे विजूभाऊ
प्रभाकर पे॑ढारकरा॑चे रार॑ग ढा॑ग (मौज प्रका.) हे माझे अतिशय आवडते पुस्तक आहे. लेखक स्वतः पटकथा लेखक व दिग्दर्शक असल्याने (शिवाय वडील साक्षात भालजी पे॑ढारकर!) हे पुस्तक वाचता॑ना आपण एखादा चित्रपट पाहात आहोत असे वाटते. अतिशय ओघवती शैली आणि अचूक शब्द फेक ही पे॑ढारकरा॑ची खासियत. सगळ्यात महत्वाचे कथासार- स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला जी गोष्ट पटली नाही त्याच्याविरूद्ध सगळ्या सिस्टीमशी लढा द्यायची कथानायकाची जिद्द पाहून मन स्तिमीत होते.
मी ती काद॑बरी खूपदा वाचली. ऍक्च्युअल रार॑ग ढा॑ग व त्याच्याशी स॑बधित काही सत्य माहीती माझ्या हाती लागल्यावर मी अशा निष्कर्षाप्रत आलो की ही गोष्ट बरीचशी खरी आहे. मी लेखकाची भेटही घेतली व खातरजमा करून घेतली.
ह्या निता॑तसु॑दर काद॑बरीवर चित्रपट होणे अत्य॑त गरजेचे आहे.
यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक लेखकांची निवडक पुस्तके सांगतो ...
१. भाईकाका : एक शुन्य मी [ त्यांचे सगळ्यात मास्टरपीस ], व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी.
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.
३. ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते.
४. प्र. के. अत्रे : मी कसा घडलो, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा.
५. फ्रीडम ऍट मिडनाईट : लॉरी कॉलीन्स आणि डोमनीक लाऽपेरी
भारतीय स्वातंत्रसंग्रामाचे एका त्रयस्थाच्या दॄष्टीतुन केलेले विवेचन. गांधी, गोडसे, नेहरु , जीना व ब्रीटीश सत्ताधार्यांचे
अनेक आपल्याला माहित नसलेले पैलु सापडले. अप्रतिम !
६. संभाजी -- लेखक - विश्वास पाटील
७. वि. ग. कानिटकर : नाझी भस्मासुराचा उदयास्त,
८. बाकी शुन्य : कमलेश वालावलकर
९. शिरीष कणेकर : डो. कणेकरांचा मुलगा, डॉलरच्या देशा [ अप्रतिम ]
१०. अविनाश धर्माधिकारी : अस्वस्थ दशकाची डायरी
अशी लिस्ट पुर्ण होऊच शकणार नाही.
पण "इति लेखनसीमा"
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
दांडेकर
कर्णा, आपल्या अभ्यासाबद्दल आदर आहे आणि मताबद्दलही ...
पण न आवडल्याची कारणे द्यावीत म्हणजे आपल्याला तुलना करणे सोपे जाईल ...
"अजिबात आवडले नाही" म्हणुन विषय पुर्ण होत नाही ....
असो. हा विषय आणि धागा वादाचा नाही ...
तरी "न आवडल्याची " कारणे व स्पष्टीकरण दिल्यास आम्हाला आनंद होईल ...
शेवटी काय तर कोलबेर म्हणतात तेच खरे , मला (माझ्या आवडीला) आवडले. इतरांनी ते वाचावे(च) असा माझा आग्रह नसतो.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
गडबडीत असाल तर काही हरकत नाही, नंतर कधीतरी ...
जर "ती जखम" पुन्हा भळभळुन वाहणार असेल त्यर टाळलेलेच बरे नाही का ?
पण आपल्याबरोबर चर्चेला मजा आली असती.
असो. पुन्हा कधी तरी.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते.
हे म्हणजे "सोबतचे पहिले पान" का ?
पुस्तकाचे नाव खरचं आत्ता आठवत नाही.
खुप जुने होते, माझ्या आजोबांनी विकत घेतलेले, मी वाचताना पार चिंध्या चिंध्या झाल्या होत्या ....
तरीही वडीलांना फोन करुन नाव विचारेन आणि "मिपावर" टाकेन ...
अवांतर : "सोबती" हे बेहर्यांनी चालवलेले मासीक / पाक्षीक असावे ...
त्यातल्याच निवडक लेखांचा हा संग्रह असण्याची शक्यता आहे. नक्की माहित नाही.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सोबत हे नाव. बाईंडरच्या वेळी लालन सारंग आणि विजय तेंडुलकरांवर अतिशय घाणेरडे आरोप सोबत मधून झाले होते. विशेषतः शंकर सखाराम यांचे लेख व भाषणे.
आपला,
(नाट्यकर्मी) आजानुकर्ण बाईंडर
माझ्या मते "सोबतचे पहिले पान" सारख्या संग्रहातून बेहर्यांची केवळ एकच बाजू समोर येते : समाज-संघटक , अनिष्ट-प्रथांचे विरोधक वगैरे. बाकी बेहर्यांची किर्ती एक "बुली" म्हणूनच होती.
नावाबद्दल थोडेसे कंफ्युजन होतेच मला तरी पण तुटक आठवत होते म्हणुन टाकले ...
बाकी ते "सखाराम बाईंडर" चे म्हणाल तर मला जास्त काही वावगे वाटाले नाही.
कुणा एकाची बाजु घेताना दुसर्यावर टीका करावीच लागेल. टीका फक्त जास्तच बोचरी व जहरी होती इतकेच.
पण त्यांची शैलीच तशी होती.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे व बेहरे हे दोघेही "बिनधास्त व सडेतोड" लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत. भाषेच्या सभ्यतेविषयी आणि साजाविषयी त्यांची मते काहीशी टोकाची आहेत.
ज्यांचा त्यांचा स्वभाव...
[ त्या दोघांचेही एकदा वाजले होते पण तो प्रश्न निराळा ]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ग. वा. बेहरे : एक ललितलेखसंग्रह - नाव माहित नाही पण त्या काळच्या सामाजीक व राजकीय परिस्थीतीवर अतिशय रोखठोक व मौलीक भाष्य. संदर्भ जरी आता बदलले असले तरी अजुन सुद्धा आवडते.
कदाचीत आपल्याला "हार आणि प्रहार" या लेख संग्रहाबाबत बोलायचे असावे. तो चांगला आहे. अर्थात ते आता वाचताना त्या काळातली पूर्वपिठीका माहीती असणे महत्वाचे आहे.
प्रतिक्रिया
नक्कीच...
विस्तारीत धागा
पॅपिलॉन आणि डेझर्टर
किती .... किती सांगू तुला ? ( हे एक छान नाट्या गीत आहे )
मला
कारण..
छान विषय
"नॉट
+१
+२
नॉट विदाउट माय डॉटर. हे
चित्रपट...
:)
माझे
रत्नाकर मतकरी
मतकरींची
पुस्तक का आवडले
मला आवडलेले पुस्तक -
मला आवडलेले पुस्तक
मला आवडलेले पुस्तक
सहमत
( वैयक्तिक
सहमत आहे
कोसलाचं
कोसला
बेला
आक्षेप
तोत्तोचान,
मस्त धागा
कित्तीतरी
वाचलंय!
मला आवडलेलं....
अजुन एक.
मला थोडेसे आवडलेले पुस्तक
आई..........आई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आपली आई. आईबद्दल आपण कितीही बोललो, लिहिले तरी ते व्यक्त होत नाही, अर्थात आईचं प्रेम अनुभव, सर्वच मिळण्यासाठीही नशीब असावं लागतं. मॅक्झिम गार्कीच्या आईपासून साने गुरुजींच्या शामच्या आईपर्यंत ....यशवंताच्या आईपासून नारायन सुर्व्यांना बाळगणार्या आईपर्यंत. कितीही वाचायला मिळालं तरी ते अपुर्णच वाटत असते.
'आई समजून घेतांना' हे उत्तम कांबळेचे (दै. सकाळचे संपादक ) पुस्तक वाचतांना आणखि एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी तानत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांचा वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई. ' तुझ्या लहाणपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाचा चॉकलेटचा एकच घास करतो तुला मागचं दिवस कसं आठवत नाही'' लेखकाला वारंवार भुतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाथी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते. लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले जेवलीस का ? ती म्हणायची, ढकलंलं दोन तुकडं पोटात...कशी आहेस ? असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय.....'' डॉक्टरांकडे जाऊया का ? ' डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो ? असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट तिच्यासमोर आजच्या सुखात भुतकाळातील भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणी रमुन जातो. पैसे नसल्यामुळ डोक्याचे केसांचा पु़ंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई. फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई. असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहुन स्वतःहुन नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून ' आई समजून घेतांना लेखाकाची दमझाक होते. पुस्तक वाचल्यानंतर तोंडावर पुस्तक टाकून शुन्य अवस्थेत वाचकांना घेऊन जाणार्या पुस्तकांपैकी हे नक्कीच नाही. हे पुस्तक वाचतांना मधेच कंटाळा येतो. पुस्तक सोडून द्यावेसे वाटते. तरीही एक वेगळे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक चुकवू नये असेही प्रामाणिकपणे वाटते.
हा
मोठी यादी आहे .
बोधे?
वय झालं बाबा.
रार॑ग ढा॑ग
यादी बरीच मोठ्ठी आहे, तरीही काही निवडक ...
फालतू पुस्तक
का बरे ?
देतो
अरे बापरे ...
बेहरे ..
आत्ता खरचं नाव आठवत नाही ...
सोबती नाही सोबत
बरोबर
बरोबर असावे ...
हार आणि प्रहार