Skip to main content

मला आवडलेले पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/08/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो. चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात. जमले तर मुम्बै/पुण्यात एखादा पुस्तक कट्टा / शेअर लायब्ररी सुरु करुया. निदान सुरुवात तरी करुया चाकोरी बाहेरची पुस्तके या नन्तर एक नवा धागा मला आवडलेले पुस्तक / ते का आवडले तेही साम्गायचे आहे. एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल तोत्तोचानः अनु चेतना गोसावी एका लहान मुलीची कथा लहान मुलाना एक व्यक्ती म्हणुन वागणुक द्यायला हवी . मुलाना घालुन पाडुन बोलण्यापेक्षा " तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस" हे वाक्य त्या मुलीच्या मनात एक आत्मविष्वास जागवते. शाळेने नाकारलेले हायपर ऍक्टीव्ह मुलगी आणि तिच्या नव्या शाळेतली तिच्या सारखीच मुले त्यांच्या शाळेतले वातावरण. युद्धावेळचे वातावरण त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम या सर्वांचे वर्णन. केवळ मनोरंजन न होता मुलांच्या जगात डोकावयाचे संधी देणारे पुस्तक. "तारे जमीन पर" पहाताना मला या पुस्तकाची आठवण होत होती . संग्रही असावेच असे पुस्तक.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34670
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by sachin_Pune

आणि एक आहे ना पुस्तक त्यांचं, झुंबर; चारही छान आहेत पुस्तकं. मलापण आवडली ती पुस्तकं.

एक होता कार्व्हर अनुवाद :- वीणा गव्हाणकर.. हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)

जी. ए. च्या पुस्तकान्चा कुणीच कसा उल्लेख केला नाही. त्यान्च्या सगळ्या पुस्तकातल मला आवडलेल ' माणसे: अरभाट अणि चिल्लर'. मी शाळेत असताना वाचल होत, पण अजुनी त्यातले सन्वाद जसेच्या तसे लक्शात आहेत. इथे कोणी वाचलय का?

स्टुडीओ - सुभाष अवचट यांचे पुस्तक. माझे अतिशय आवडते. सृजनाची प्रक्रीया, कलाकार म्हणून वाढणे, कलाकाराच्या व्यक्तित्वातली गंमत... आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे. तसं काही हे आत्मचरीत्र नाही पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाशी निगडीत आहे. हे पुस्तक म्हणजे सिप बाय सिप हळू हळू घशात उतरणारी आणि कणाकणाने हळूहळू नशा चढवणारी ही एक वाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी या यादीत व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

१. शाळा - मिलिंद बोकील २. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत ३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर ४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे ५. बरसात चांदण्याची - सु.शि. बाकी सर्व प्रतिक्रियांमधे व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.

'लस्ट फॉर लाइफ' कादंबरीचे मूळ लेखक - आयर्व्हिंग स्टोन स्वैर अनुवाद 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग' - माधुरी पुरंदरे अप्रतिम पुस्तक. कलंदर आणि झपाटलेला अश्या चावून चोथा झालेल्या शब्दांच्या कैक योजने पलिकडे असलेल्या रंग आणि रेषा जगणार्‍या गॉग च्या आयुष्यावरची कादंबरी. प्रत्येकाने वाचावी अशी. गॉग आवडत असेलच तर परत त्याच्या प्रेमात पडाल. (त्याच्याबाबत प्रेमात पडणे नाहीतर पाठ फिरवणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. हा ठिक आहे म्हणत गॉगला ओलांडू शकत नाही आपण.) गॉग माहीत नसेल तर नवीन जग तुमच्यापुढे उलगडेल. गॉग आवडत नसेल तर तुम्हाला तो समजायला मदत होईल. काही असो. वाचा नक्की. अवांतरः कोणी अ‍ॅमस्टरडॅमला असेल, जाणार असेल तर तिथलं गॉग म्युझियम न चुकता बघा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सहमत. हे पुस्तक खूपच छान आहे. लहानपणीच वाचले होते. तेव्हापासून गॉग मनात रुतून बसलाय. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

माची वरला बुधा .... गो.नि.दा. फार छान लिहीलय.... भटकायची आवड असल्या मुळं मला ते जाम आवडत... आणि गो.नि.दा. एकदम सोप्या भाशेत लिहीतात...

वाचलेली सगळी पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही , पण तरीही.. कादंबरी : १. रथचक्र : श्री. ना. पेंडसे २. क्यालिडोस्कोप : अच्युत बर्वे ३.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर ४. ब्र : कवित महाजन. ५.बलुत : दया पवार ६.स्वामी : अर्थात रणजीत देशमुख ७. ईजाळं : ऊत्तम बंडू तुपे ८.राहीच्या स्वप्नांचा ऊलगडा : भारत सासणे ९.धर्मांनंद : जयवंत दळवी. १०. बनगरवाडी : धाकटे माडगुळकर कादंबरी : अनुवादित १.वंशव्रुक्ष : एस. एल्.भैरप्पा ( कादंबरीचा राजा) अनु: ऊमा कुलकर्णी. २.पाडस : अनु : राम पटवरधन ३. नेमसेक : जुंपा लाहीरी ४. अरण्यक : बिभुती भूशण बंदोपध्याय ५. संस्कार : यु. आर. अनंतमूर्ती आठवणी /(आत्म)चरीत्राऐवजी / तत्सम १.तो प्रवास सुंदर होता : के.र्.शिरवाडकर २."रामुभैया च्या आठवणी" (नाव आठवत नाही :क्षमा) : रवी दाते. ३.के.ई.एम. वार्ड नं १६ : डॉ.रवी बापट. ४.पोरवय : गुरूदेव टागोर : अनु : पु.ल. ५.आहे मनोहर तरी : सुनिताबाई देशपांडे. ६.माझ्या जीवनाची सरगम : सी.रामचन्द्र. ७.ईडली ऑर्किड आणि मी : विट्टळ कामत. ८. मैत्र : पु. ल. ९. बायंडर चे दिवस : कमलाकर सारंग १०. कार्यरत : डॉ. अनिल अवचट प्रवास-वर्णन पु.लं ची चार : अपूर्वाई / पूर्वरंग / बंगचित्रे / जावे त्यान्च्या देशा / { म्हैस !(?)} कथासंग्रह १. काजळ माया : जी.ए. २. सांज शकुन :जी.ए ३.पिंगळा वेळ : जी.ए. ४.रक्त चन्दन :जी .ए. ५. हंस अकेला : मेघना पेठे नाटक १. आत्मकथा : महेश एलकुंचवार २.पुरूष : जयवंत दळवी ३. सूर्याची पिल्ले : वसंत कानेटकर ४.किरवंत : प्रेमानंद गज्वी. ५.ती फुलराणी : पु.ल. ६. लग्न : जयवंत दळवी ७. घाशिराम कोतवाल : विजय तेंडुलकर ८. तुज आहे तुज पाशी : पु.ल. ९.रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर १०. नटस्म्राट : शिरवाडकर खाता -खाता "वाचण्याबद्दल" बोलणे आणि "खाण्याबद्दल" वाचणे आवड्त असेल , तर अवश्य भेटु या म्हटलं !!!

बर्‍याच काळानंतर हा धागा वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यातले खूप थोडेजण अजुनमिपोआवर कार्यरत आहेत