आजच मी माझ्या वडीलांना फोन करुन पुस्तकाचे नाव विचारले ...
ते "हार आणि प्रहारच" आहे.
पटकन शंकानिरसन केल्याबदाल "विकासरावांना" धन्यवाद ..
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्ताकाबद्दल लिहावे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
२. गोनीदा : कुण्या एकाची भ्रमणगाथा, महाराष्ट्रदर्शन, अजुन एक आह एपण नाव आठवत नाही.
ज्याचे नाव आठवत नव्हते ते आठवले.
"दास डोंगरी राहतो" असे काही तरी आहे. एकदम मस्त, समर्थ रामदासांवर आहे.
चांगली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ठिकठिकाणी त्यांच्या "श्लोकांनी" सजवलेले आहे त्यामुळे एकदम रसाळ वाटते.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
वास्तव रामायण
लेखक - डॉ. प. वि. वर्तक
यात त्यानी आकाशातील ग्रह-ता-यांच्या स्थिती वरुन रामायणाची कालनिश्चिती केली आहे.
तसेच रामायणातील अनेक घटना , ज्या आपण केवळ पुराण कथा म्हणून ऐकतो/ वाचतो आणि काही वेळा त्याचा विपर्यास केला जातो, त्याचे अतिशय तर्कशुद्ध विश्लेश्ण केले आहे.
तसेच रामायण हे नुसते काल्पनीक पुराण नसुन सत्यकथा आहे या बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती दिली आहे.
तसेच रामायण नक्की कुठे घडले.. सीतेला शोधण्यासाठी राम कुठे आणि कसा गेला हे सुद्धा त्यानी अनेक पुरावे देउन सांगीतले आहे..
मला देखील वास्तव रामायण आवडले. तसेच त्यांचे स्वयंभू पुस्तकपण छान आहे.
अर्थात दोन्ही पुस्तकात काही गोष्टी अवास्तव आहेत पण त्यामुळे संपूर्ण पुस्तकाची व्हॅलीडीटी कमी झाली असे वाटत नाही... उ.दा. शिवलींगाबद्दल खूप चांगली माहीती देत असताना अचानक त्याचा संबंध अणूभट्टीशी लावणे कारण त्याचा अकार पण तसाच असतो. :)
लेखक - डॉ. प. वि. वर्तक
म्हणजे सूक्ष्मरुपाने मंगळावर वगैरे जाणारे तेच ना? ;)
आपला,
(नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला!) तात्या.
नुकताच सूक्ष्मरुपाने शनीवर जाऊन शनिदेवासोबत शनीग्रहावरची स्कॉच पिऊन आलेला
ध्वनीरुपाने येणारे तात्या माहीती आहेत. आता जरा काळजी वाटते मागे पुढे कुठे तात्या उभे नसतील न अशी :-)
वास्तव रामायण, स्वयंभू, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण (हे संपूर्ण वाचून झाले नाही, एकदोनच भाग वाचलेत)
पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही. त्यातील माहिती त्यांनी कशी शोधून काढली असावी ह्याबद्दल त्यांच्याशीच चर्चा करुन जास्ती समजून घेता यायला हवे.
ग्रह गणित, संस्कृत इ.चा त्यांचा व्यासंग चांगलाच आहे. वेगळ्या नजरेने रुढ गोष्टींकडे बघायची त्यांची शैली हटके आहे.
मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत. पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण. अर्थात माझे थोड्या वाचनाने आणि परिचयाने झालेले हे मत आहे. ही पुस्तके वाचूनही बरीच वर्षे झाली. पुन्हा वाचायची इच्छा आहे.
रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत.
चतुरंग
पुस्तके आचंबित करणारी वाटतात. ते बनवाबनवी करीत असतील असे वाटत नाही.
एकदम मान्य!
मी वर्तकांशी स्वतः तीन-चार वेळा भेटून बोललो आहे. माणूस शांत आणि साधा आहे. ते संशोधक वृत्तीचे आहेत.
मी त्यांना भेटलेलो नाही पण तीन भाषणे लहान (- म्हणजे मी लहान) असताना ऐकलेली आहेत. त्यांच्याबद्दल पुणेकरांकडून बरेच गंमतशीर किस्से ऐकलेले आहेत.
पण काही वेळा प्रचारकी थाटाचे थोडेसे अतिआग्रही/दुराग्रही वाटावे असे बोलणे व लिखाण.
"प्रचारकी" म्हणजे कुठल्या अर्थाने या वर आपले अनुभव सारखे आहेत का वेगळे ते ठरवावे लागेल ;) पण अजूनही लक्षात आहेत. त्यात फक्त एकच वाटते की थोडेफार "तर्कट" आहेत.
रामायण, महाभारताची कालनिश्चिती, त्यातले शास्त्रीय संदर्भ इ. वर त्यांचे बरेच पेपर्सही प्रसिद्ध झालेले आहेत.
१००% मान्य!
अधिक माहितीसाठी इथे पाहू शकता.
=)) त्यांचे संकेतस्थळ जर विश्वामित्राने बघितले तर तो ढसाढसा रडेल अथवा साक्षात ब्रम्हदेवाकडे तक्रार घेऊन जाईल" "जी पदवी मिळायला मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली, सरते शेवटी अहंभाव सोडावा लागला, ती पदवी म्हणजे ब्रम्हर्षी नाही , पण ब्रम्हश्री ही नवीन पदवी वर्तकांसाठी तयार केलीस का?
सुधा मूर्ती यांचे वाईज ऍण्ड आदर वाईज.. तसेच त्यांचेच गोष्टी माणसांच्या...
वाईज ऍण्ड आदर मध्ये सुधा मूर्तींना इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने समाजकार्य करताना आलेले माणसांचे अनुभव लिहिलेले आहेत. तर सुधा मूर्तीना लहानपणापासून ज्या व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पाडला त्यांच्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात जे आर डी टाटा, रतन टाटा, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम , नारायण मूर्ती.. यांच्याशिवाय बर्याच मोठमोठ्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. अतिशय सुंदर पुस्तके आहेत दोन्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल
२ विज्ञान कादंबर्या स्तके एकाच प्रतिसादात सांगून प्रतिसादाची संख्या मर्यादीत करत आहे. तेंव्हा क्षमस्व!
फाउंडेशन मालीका - आयझॅक ऍसिमोव्ह. रोबोची संकल्पना त्यात शेवटी शेवटी आली आहे असे धरले जाते (मला विशेष जाणवले नाही, पण त्या काळात वाटले असेल). बाकी त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा संबंध आपण आपल्या जगाला लावू शकतो. मिपावर सुरवातीस मी यावर लिहीले होते. आवडते वाक्य - "व्हायलन्स इज द लास्ट रेफ्यूज ऑफ इन्कॉपिटंट". (पेशन्स ठेवून) शेवटच्या पुस्तकापर्यंत वाचल्यास, "चराचर सृष्टीएकमेकांशी संलग्न आहे आणि त्या अर्थाने विश्व हे एकच जीव आहे ," असा यात अर्थ समजतो.
२००१ ए स्पेस ओडीसी - आर्थर सी क्लर्क. यात हॅल कॉम्प्यूटरचा जो आत्ताच्या काळातील सूपर काँप्यूटर आहे आणि स्पेसशिपचे वर्णन आहे जेंव्हा काहीच अस्तित्वात नव्हते. यात शेवटी - पुनरपी जननम पुनरपी मरणम ही संकल्पना सांगितली आहे.
मराठीत "यक्षाची देणगी" हे नारळीकरांचे पुस्तक आवडले होते.
२००१ ए स्पेस ओडीसी हा चित्रपट पहाताना मला तीनदा झोप लागली. शेवटी मी प्रयत्न सोडून दिला.
बहुतांशी पुस्तकांवरून काढलेल्या चित्रपटांप्रमाणेच ह्या संदर्भात घडले आहे. चित्रपट ग्रेट नाही आहे. शिवाय तो बराच जुना आहे, त्यातील सेटींग्ज पण जुन्या स्टाईलची, (बहुतेक वेळेस कथेमुळे) फक्त दोन व्यक्तींवर चित्रित केलेली असल्याने ते समजत नाही.
मी आयझॅक ऍसिमॉव्ह घेऊन ऑफिसच्या बसमध्ये वाचायचो,तेव्हा आजुबाजुच्या बर्याच भिवया आश्चर्य /आदर की आणखी काही कोण जाणे ह्या भावना घेऊन वर चढायच्या. तेव्हा मनाला छान गुदगुल्या व्हायच्या, आणि नाकावरचा चष्मा आणखी पुढे ओढुन मी सभोवतालास कस्पटासमान मानुन पुस्तकात शिरायचो......
...पण खरं सांगु, कथारुप जरी असलं, तरी माझ्या बालबुध्दीला काही झेपला नाही बॉ ऍसिमॉव्ह. बर्याचजणांच्या गप्पा ऐकुन 'फाऊंडेशन' घेतलं खरं, पण अजुनही शेवटची काही प्रकरणं वाचायची बाकीच आहेत.
शैली थोडीशी बोजड वाटली. हां पण 'सायकोहिस्ट्री'चं कव्हर मात्र छान!
गोनीदांचं छोटंसं पुस्तक आहे. त्यांची सगळीच पुस्तकं सुंदर आहेत पडघवली, मॄण्मयी, रानभुली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत... पण हा बुधा त्याच्या अतिशय साध्या निसर्गाच्या जवळ अशा आयुष्यानं फार कुठे तरी हलवून जातो..
जरूर वाचा...
नियम मोडून दुसरं पुस्तक म्हणजे विजय देवधरांचं अनुवादित डेझर्टर...
फक्त एक पुस्तक निवडणं शक्य नाही....
१) व्यक्ति आणि वल्ली, असा मी असा मी = पु.ल.देशपांडे
२) माणदेशी माणसं, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
३) शाळा - मिलिंद बोकील
४) आणि मी - मंगला गोडबोले
५) पार्टनर - व.पु.काळे
६) दिवसेंदिवस - शं. ना. नवरे (एका लग्न न झालेल्या मुलाची डायरी.... मस्त आहे.)
७) अनुवादितः डेझर्टर, पॅपिलॉन, नॉट विदाऊट माय डॉटर
८) गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
एक होता कार्व्हर
अनुवाद :- वीणा गव्हाणकर..
हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
जी. ए. च्या पुस्तकान्चा कुणीच कसा उल्लेख केला नाही. त्यान्च्या सगळ्या पुस्तकातल मला आवडलेल ' माणसे: अरभाट अणि चिल्लर'. मी शाळेत असताना वाचल होत, पण अजुनी त्यातले सन्वाद जसेच्या तसे लक्शात आहेत. इथे कोणी वाचलय का?
स्टुडीओ - सुभाष अवचट यांचे पुस्तक. माझे अतिशय आवडते.
सृजनाची प्रक्रीया, कलाकार म्हणून वाढणे, कलाकाराच्या व्यक्तित्वातली गंमत... आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे.
तसं काही हे आत्मचरीत्र नाही पण त्यांच्या जगण्याच्या अनुभवाशी निगडीत आहे.
हे पुस्तक म्हणजे सिप बाय सिप हळू हळू घशात उतरणारी आणि कणाकणाने हळूहळू नशा चढवणारी ही एक वाईन आहे असं म्हणायला हरकत नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
१. शाळा - मिलिंद बोकील
२. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत
३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर
४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे
५. बरसात चांदण्याची - सु.शि.
बाकी या यादीत व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.
१. शाळा - मिलिंद बोकील
२. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत
३. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर
४. कोसला, जरीला, झुल - भालचन्द्र नेमाडे
५. बरसात चांदण्याची - सु.शि.
बाकी सर्व प्रतिक्रियांमधे व.पुं. च नाव नसल्याचे बघुन विशेष आनंद झाला.
'लस्ट फॉर लाइफ'
कादंबरीचे मूळ लेखक - आयर्व्हिंग स्टोन
स्वैर अनुवाद 'व्हिन्सेंट व्हॅन गॉग'
- माधुरी पुरंदरे
अप्रतिम पुस्तक. कलंदर आणि झपाटलेला अश्या चावून चोथा झालेल्या शब्दांच्या कैक योजने पलिकडे असलेल्या रंग आणि रेषा जगणार्या गॉग च्या आयुष्यावरची कादंबरी. प्रत्येकाने वाचावी अशी.
गॉग आवडत असेलच तर परत त्याच्या प्रेमात पडाल. (त्याच्याबाबत प्रेमात पडणे नाहीतर पाठ फिरवणे ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. हा ठिक आहे म्हणत गॉगला ओलांडू शकत नाही आपण.)
गॉग माहीत नसेल तर नवीन जग तुमच्यापुढे उलगडेल.
गॉग आवडत नसेल तर तुम्हाला तो समजायला मदत होईल.
काही असो. वाचा नक्की.
अवांतरः कोणी अॅमस्टरडॅमला असेल, जाणार असेल तर तिथलं गॉग म्युझियम न चुकता बघा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सहमत. हे पुस्तक खूपच छान आहे. लहानपणीच वाचले होते. तेव्हापासून गॉग मनात रुतून बसलाय.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
प्रतिक्रिया
अगदी अचुक ...
कृपया एका
आठवले ...
मला आवडलेले पुस्तक..
+१
लेखक - डॉ. प.
असे का?
डॉ. प. वि. वर्तक
मी डॉ.वर्तकांची वाचलेली पुस्तके
बरेचसे मान्य...
मला आवडलेले..
+१
विज्ञान कांदंबर्या
HAL
२००१ ए स्पेस ओडीसी
२००१ ए स्पेस ओडीसी - चित्रपट
मी आयझॅक
माचीवरला बुधा
पुल
फक्त एक
प्रकाश नारायण संत
आणि एक आहे
खुप सुंदर पुस्तक
जी. ए.
स्टुडीओ!
माझी आवड
माझी आवड
'लस्ट फॉर लाइफ'
गॉग मनात
माची वरला
वाचलेली
बर्याच काळानंतर हा धागा