✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

स
संपादक मंडळ यांनी
Fri, 07/24/2015 - 10:53  ·  लेख
लेख
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
79230 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

धाग्या साठी इर्शाद.....

प्यारे१
Wed, 08/05/2015 - 00:16 नवीन
धाग्या साठी इर्शाद..... येऊ च दया नवा धागा. खुपच रौद्र आणि (बंगाली) भीषण सुन्दर आहे फ़ोटो...
↩ प्रतिसाद: किल्लेदार

Technical details

कपिलमुनी
Wed, 08/05/2015 - 00:54 नवीन
Shutter speed इत्यादी पण सांगा
↩ प्रतिसाद: किल्लेदार

shutter speed आणि aperture काय घेऊन बसलात....

किल्लेदार
गुरुवार, 08/06/2015 - 18:33 नवीन
shutter speed आणि aperture काय घेऊन बसलात कपिलमुनी. वेळच इतका कमी मिळाला की फक्त नीट फ्रेम करून हाणला. पण तरीही landscape घेताना जास्त aperture value घेतलेली चांगली. पण कमी प्रकाश असल्यामुळे ६.३ च ठेऊ शकलो. shutter स्पीड १/६० होती जी हाताने फोटो काढायला पुरेशी नाही. त्यामुळे burst मोड मध्ये बंदूक चालवली. :)….
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मस्त फोटो.

एस
गुरुवार, 08/06/2015 - 21:32 नवीन
माझ्या अंदाजाप्रमाणे क्रॉप्ड सेन्सर कॅमेरा + १८-१०५ मिमी लेन्स १८ मिमीवर ठेवली असावी. वाइड अँगलचे परिदृश्य (पर्स्पेक्टिव्ह) फारच छान पकडले आहे. कारमधून घेतलाय तरी एकदम कमी उंचीवरून घेतलाय असे वाटते. लेन्सचा अंदाज बरोबर आहे की अल्ट्रावाइड अँगल लेन्स (११-१६) वापरलीये? बर्स्ट मोडचा वापर करण्याची समयसूचकता आवडली.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अल्ट्रावाइड अँगल चा भास....

किल्लेदार
Fri, 08/07/2015 - 19:12 नवीन
कॅनन १००० D + १८-५५ लेन्स वापरले आहे. १८ मी. मी. वर barrel distortion आले आहे आणि त्यामुळे क्षितिजरेषा सरळ ठेवायला त्रास झाला (अजूनही ती सरळ नाहीच). अल्ट्रावाइड अँगल चा भास cropping करून साधला आहे. :) (चला इतरांना पण तसं वाटलं …… लेन्स चे पैसे वाचले :) ) हा फोटो तुम्हाला वाटला तसा खाली बसूनच घेतला आणि नंतर कार मध्ये जाऊन बसताना तारांबळ उडाली…… याचे काही वेगळे फोटोज नंतर नक्की डकविन.
↩ प्रतिसाद: एस

अरे वा! मस्त!

एस
Fri, 08/07/2015 - 20:01 नवीन
अरे वा! मस्त! फोटोंच्या प्रतीक्षेत.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

भारीच.

नाव आडनाव
गुरुवार, 08/06/2015 - 11:21 नवीन
भारीच.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अहाहा..

ब़जरबट्टू
Fri, 08/07/2015 - 14:02 नवीन
काय टायमिंग आहे राव... आवडला !!
↩ प्रतिसाद: किल्लेदार

(No subject)

नीर
गुरुवार, 08/06/2015 - 11:10 नवीन
Image removed. Image removed.

आमचाही सहभाग

अनुरोध
गुरुवार, 08/06/2015 - 16:57 नवीन
Image removed.

पब्लिक शेअर नाहीये

पैसा
गुरुवार, 08/06/2015 - 19:01 नवीन
पब्लिक शेअर नाहीये. ते करा फोटोच्या सेटिंगमधे. आत्ता शेअर चा ऑप्शन येत नाही फोटोवर.
↩ प्रतिसाद: अनुरोध

दुवाही चुकलेला आहे

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/06/2015 - 20:24 नवीन
त्यांनी खालील दुवा वापरला आहे. जो बहुधा अ‍ॅड्रेसबार मधून कॉपी केलाय. फोटोचा दुवा असता तर .jpg अंतर्भूत असतं. https://www.flickr.com/photos/133598057@N08/shares/j81SX1
↩ प्रतिसाद: पैसा

किल्लेदार भारी आहे फोटो

जगप्रवासी
गुरुवार, 08/06/2015 - 18:45 नवीन
किल्लेदार भारी आहे फोटो. तुम्ही काढाच वेगळा धागा, आम्हा पामरांना पण दाखवा की तुमचे फोटो

मी पण मी पण

कोमल
गुरुवार, 08/06/2015 - 21:17 नवीन
कैक दिवसांच्या विश्रांती, मनःशांती, मनोसाधने नंतर आम्ही परतायचा निर्णय घेतला. वाटेत पाहिलं तर गडावर खळबळ दिसली. कानोसा घेतला आणि खबर निघाली की गडावर "छायाचित्रणकला स्पर्धा" चालू आहे. म्हंटंले चलां आंपण पण हजेरीं लांवावी.. ख्याख्याख्या... स्पर्धेसाठी Image removed. Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious स्पर्धेसाठी Image removed. Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious खांलील पैंकी कोणताही एक घ्या स्पर्धेसाठी आणि विषय संपवां!!! ख्याख्याख्या Image removed. Image removed. सर्व छायाचित्रे गगनबावडा येथे तुफान पावसात काढले आहेत. खॉक् खॉक् खॉ. कॅमेरा: Nikon Coolpix 13 MP Full Resolution: Flickr राम राम

धिश्क्लेमरची काय गरज नस्ते ओ.

अभ्या..
Fri, 08/07/2015 - 13:54 नवीन
धिश्क्लेमरची काय गरज नस्ते ओ. ;) थोडा आमच्या इकडे खरा पाऊस पडावा ही त्या शंकरराव अन सगळ्या देवांकडे इनंती.
↩ प्रतिसाद: कोमल

आम्बा घाट उतरल्या वर गाडीतुन घेत्लेला फोटो

शामसुन्दर
Fri, 08/07/2015 - 13:50 नवीन
Image removed.

ओला पाऊस

इन कम
Fri, 08/07/2015 - 20:44 नवीन
Image removed.

ओला पाऊस

इन कम
Fri, 08/07/2015 - 20:45 नवीन
Image removed.

ओला पाऊस

इन कम
Fri, 08/07/2015 - 20:49 नवीन
Image removed.

जलशिल्प

सर्वसाक्षी
Fri, 08/07/2015 - 21:43 नवीन
Image removed.

पाऊसवेडी फुले

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/10/2015 - 10:06 नवीन
नुकताच पाउस पडून गेला होता ... गडावर वारे सुटले होते आणि ही इवली इवली फुले पाऊस आणि वाऱ्यावर मस्त झुलत आणि नाचत होती! पाऊसवेडी :) Image removed.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा