✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !!

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sun, 05/17/2015 - 16:43  ·  लेख
लेख
आपला मिपा वार्ताहर : ठाणे दि १७ मे २०१५ - श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!). आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना टकाच्या भ्रमणध्वनीवर डॉ. खरे यांचा फोन आला (तो त्यांचा फोन आहे हे मला नंतर कळले ). त्यांनी टकाला " उद्या सकाळी ७ वाजता एक छोटा कट्टा ठाण्यात आयोजित केलेला आहे … तू येऊ शकशील का?" असे विचारले असावे (मला नक्की फोनवर काय बोलणं चाललंय हे कळले नाही कारण टका इकडून जे काही बोलत होता त्या आवाजावरून पलीकडे त्याच्या कोणी नातेवाईकापासून एखाद्या विवाहोत्सुक मुलीपर्यंत कोणीही असण्याची शक्यता होती). ते म्हणणे ऐकून घेऊन टकाने " मामलेदार सुद्धा माझ्याबरोबर आहे " असे सांगितले मग मला कळले की आपल्या मिपा परीवारापैकीच कोणीतरी असावे. पलीकडे डॉक होते. त्यांनी कट्ट्याचा कार्यक्रम थोडक्यात मला सांगितला. मी तसाही अट्टल कट्टेकरी व्हायची दीक्षा घेतलेलीच असल्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रम अगदी छोटासाच होता. श्री सर्वसाक्षी यांच्या ठाण्यातल्या घरी जमून त्यांच्या खिडकीतून समोरच हाकेच्या अंतरावर असलेले पोपट आणि इतर पक्षांचे निरीक्षण , थोडा खाऊ पिऊचा सहभाग ( रात्रकट्टेकर्यांनी नसते दृकश्राव्य चित्रपट डोळ्यांसमोर आणू नयेत हि णम्र इनंती !) आणि नेहमीप्रमाणेच असीमित गप्पा असा ढोबळ कार्यक्रम होता. अजून कोण कोण येणार आहे ते काही कळले नाही पण ते विचारायची गरज कधी नसतेच हे आता मला चांगलेच कळले आहे. फोन ठेवल्यानंतर टकाला विचारले त्यावर तो "हो… जायचंच !!! आपण सायकलच घेऊन जाऊ " असं म्हणाला. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे सायकलरजनीफेरी आटोपती घेऊ असे टका आणि मी ठरवले आणि सकाळी ६. ३० ला भेटायचे ठरवून आपापल्या घरी गेलो. आजची सकाळ झाल्यावर उठल्या उठल्या ६. ०० वाजता ठरल्याप्रमाणे टकाला फोन केला. एकदा बेल वाजून संपली. म्हटले उचलेल नंतर…. पण कसचे काय…. ६. ३० झाले तरी त्याचा पत्ता नाही ( त्याचा भ्रमणध्वनी मात्र माझ्यावर वैतागला असणार त्याची रैवारची झोप मी मोडली म्हणून ). डॉकना "कायप्पा"वर सांगितले कि टका काहीच प्रतिसाद देत नाही ( इथे मिपावर तर त्याचे प्रतिसाद उतू जात असतात !!) मग जाणवले की बहुतेक टकाचा "टांगारु" झाला असावा. मग मीही सायकलचा कार्यक्रम रद्द केला आणि सरळ यांत्रिक वाहनस्वारी केली (ये दोस्ती हम नाही तोडेंगे…. !!) . सकाळी बरोबर ७ वाजता मी डॉकनी दिलेल्या पत्त्यावर क्याडबरी जंक्शनला पोचलो तर तिथे कोणीच नव्हते. थोड्या वेळाने माझ्या शेजारून एक काका चालत गेले. त्यांना पाहून मला वाटले कि मी आधी यांना भेटलोय पण कुठे ते आठवेना. थोड्याच वेळात एका बाईकवर डॉक, दुसर्या बाईकवर मदनबाण आणि त्याच्या मागे मगाचचे माझ्या शेजारून चालत गेलेले काका होते (तेव्हा माझी ट्यूब पेटली की ते रामदासकाका होते…. अर्रर्रर … काका, आय माय स्वारी… ). मग आम्ही सगळेच श्री सर्वसाक्षी यांच्या घरी पोचलो. यापूर्वी मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो. एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व !! त्यांनी मनापासून सगळ्यांचे आगत स्वागत केले. तिथे पोचल्या पोचल्या समोरच त्यांच्या सहाव्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीतून समोरच दुर्मिळ असा निसर्ग, झाडे आणि किलबिलाट करणारे पोपट आणि इतर पक्षी पाहूनच मन प्रसन्न झाले( काही वर्षांनंतर हे सगळे फक्त फोटोतच पहायला मिळणार की काय असे उगाच वाटून गेले) ते पाहून सगळ्यांनी आपापले क्यामेरे सरसावले आणि खिडकीकडे धाव घेतली. तितक्यात मागाहून विमे आणि प्रास हेही येउन पोचले. मग काय… बाहेर झाडावर हिरवे पोपट आणि आता घरात मनाने हिरवे (एवरग्रीन हो… )असणारे मिपावृक्षावरचे पोपट यांचा एकदमच किलबिलाट सुरु झाला …"आणि मिपाच्या किल्लेदारांनी मजल्यावरच्या सगळ्यांना जाग आणली" !! पोपट किती ओरडतात, काय खातात याबाबत श्री सर्वसाक्षी माहिती देत होते. पोपटांच्या अनुषंगाने सुरु झालेला विषय पुढे हळूहळू फ्लेमिंगो , बुलबुल, सनबर्ड यावरून पुढे सरकत होता. दरम्यान मदनबाणने सगळ्यांना मोगरा अत्तर लावले ( आक्षी गुर्जींची आठवण झाली वो !!!). त्यानंतर पहिल्या चहाचा आणि बिस्किटांचा राउंड पार पडला. मिपाकर एकत्र बसल्यावर त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसतो ह्याचा प्रत्यय नेहमीप्रमाणे आलाच ! कबुतर कावळे यावरून गप्पांची गाडी चतुष्पादांवर ( कुत्रा, कोल्हा ) वगैरेवरून पुढे जाऊ लागली. मग नागा आणि मिझोराम मध्ये कुत्रे कसे खातात , आदिवासी पाड्यात उंदीर कसे मारून खातात याचीही वर्णने झाली. तिथून ही मिपागप्पा रेल्वेगाडी वेगवेगळ्या विषयांच्या थांब्यांवर थांबून पुन्हा सुसाट धावत होती. शेतीविषयक सल्ले , ऑफिसातले चहावाले आणि चहा पिणारे यांच्या विविध कहाण्या आणि अनुभव, कामगारांचे स्वभाव, सुकाणूचक्र चालक उर्फ ड्रायव्हर यांचा माज … एकूणच मराठी माणसाची त्याच्याच मुळावर येणारी निष्क्रियता, संध्यानंदच्या बातम्या, कायप्पाचे फोरवर्ड वगैरे गप्पा झडू लागल्या. एव्हाना विमेने "किसन शिंदे येत आहे" असे जाहीर केले आणि तेवढ्यात तोही आलाच… (एक सल्लागार मंडळ सदस्य आणि एक संपादक यांच्या बरोबर पुन्हा गप्पा सुरु झाल्या मात्र ह्यावेळी गप्पांचे विषय वेगळे होते. मिपावरच्या अलीकडच्या बर्याचशा घडामोडींचे संदर्भ येऊ लागले. त्यात " मिपावर एक साचलेपण आले आहे का" असाही प्रश्न आला. त्यावर सगळ्यांचेच एकमत झाले. यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत असे सगळ्यांचेच म्हणणे होते. तेवढ्यात चहाचा दुसरा राउंड झाला. बोलण्या बोलण्यात "अखिलमिपाकरटोपीघालू संघटनेचे अध्यक्ष"यांचे असीमगुणगौरववर्णन सुरु झाले आणि जुने जाणते लोक त्यांचे अनुभव कथन करू लागले. अस्मादिकांसकट सगळी नवीन मंडळी ( मिपाची नवीन पिल्लं…. गोजिरवाणी गं ती … ) त्या भयकहाण्या आश्चर्य आणि कुतूहलाच्या नजरेने आ वासून ऐकू लागली. किसंद्येव, प्रास आणि रामदास काका यांच्यात विमेवरून बराच खल झाला. त्याचा प्रत्यास म्हणून किसंद्येवाने प्रास आणि विमेला शेपरेट सुरुचीमध्ये मिसळ खायला न्यायचे कबूल केले ( नंतर गेले असणार !!) मग पुढे मिपावर धागे टाकायला प्रतिसाद द्यायला समस्त मंडळींना इतका वेळ कुठून मिळतो हा एक चर्चेचा अतर्क्य विषय समोर आला. हा विषय कधीही न संपणारा असल्याने तसेच त्याचे मूळ व कुळ दोन्ही न सापडणारे असल्याने थोडक्या वेळातच त्याच्यावर पडदा पाडून( वेळ लिमिटेड होता हो !!) सगळेजण इतर विषयांकडे वळले. तिथून पुढे विविध रोग, त्यावरचे उपचार आणि स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट यावर डॉकनी त्यांचे अनुभव सांगितले. दरम्यानच्या काळात सौ सर्वसाक्षी यांनी बरीच धावपळ करून सगळ्यांसाठी पोहे केले आणि त्याच्या बशा बाहेर येऊ लागल्या. सगळेचजण मग गप्पांसकट पोह्यांचा समाचार घेऊ लागले. भारतात रस्त्यांवरचा ड्रायव्हिंगचा अनुभव ह्यावर गप्पा पोचल्यावर हिरिरीने सर्वजण चर्चेत उतरले. मदनबाण आणि विमेने आपापले आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने मनात येणारे खुनशी विचार यावर भाष्य केले. समोरचा कितीही शहाणा असला तरी तो मूर्ख आहे , तो आपल्या रस्त्यात येणारच आणि आपल्याला त्याच्याशी न भांडता आपले मूळ विहित कार्य आणि उद्दिष्ट (जसे की बेस्टचे आहे… आपले उद्दिष्ट ३. ५ किमी प्रतिलिटर… बाकी आजूबाजूची वाहने किती का बोम्बलेनात आपल्या नावाने ) लक्षात घेऊन ड्रायव्हिंग करणे गरजेचे आहे असा निष्कर्ष निघाला. इतके सगळे गप्पाष्टक होईपर्यंत जवळपास १०. ३० झाले होते ( ९ ला कट्टा आटोपता घ्यायचा असे अगोदर ठरले होते ). सगळी मंडळी गडबडीने निघायला उठली. सौ सर्वसाक्षी यांनी सगळ्यांची ओळख करून घेतली ( बरोबरच आहे… कोण कोण येउन गेलं कळायला तरी नको का ?? वर्णनावर किती मिपाकर ओळखता येतील शंकाच असते नाहीतरी… ) सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन आपापली यांत्रिक वाहने इच्छित स्थळाच्या दिशेने मार्गस्थ केली पण आजच्या रविवारच्या सकाळचा एक आगळाच गंध कायम मनात दरवळत राहील…. प्रत्यक्षातले पोपट पुढे भविष्यात दिसोत न दिसोत, मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!( पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!) वि. सू -- "फटू, फाटू" अशा प्रतिक्रिया देऊन भुणभूणु नका … फटू प्रतिसादात येतीलच !! ते पाहून …. जळावे,असाच लोभ असावा ही विनंती !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
बातमी
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
25215 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

फटू ;)

आदूबाळ
Sun, 05/17/2015 - 17:01 नवीन
फटू ;)
  • Log in or register to post comments

फटूमध्ये आता पक्षी आणि

अजया
Sun, 05/17/2015 - 17:31 नवीन
फटूमध्ये आता पक्षी आणि मिपाप्राणी!!एक अभयारण्य वृत्तांत आवडला!!
  • Log in or register to post comments

आज सक्काळी मी इतक्या गाढ

टवाळ कार्टा
Sun, 05/17/2015 - 20:06 नवीन
आज सक्काळी मी इतक्या गाढ झोपेत होतो की माझा मोबल्या अलार्म वाजवून आणी मापचे कॉल घेऊन नंतर त्याने मान टाकली
  • Log in or register to post comments

अरेच्चा!!! कट्टा वृत्तांत

किसन शिंदे
Sun, 05/17/2015 - 20:41 नवीन
अरेच्चा!!! कट्टा वृत्तांत आलाही.. :) बाकी बर्‍याच दिवसांनी या सगळ्या नव्या-जून्या मिपाकरांना भेटून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत

सानिकास्वप्निल
Sun, 05/17/2015 - 20:50 नवीन
मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!
+११ एका वेगळ्या कट्ट्याचा मस्तं वृत्तांत :) फोटोची वाट बघत आहोत.
  • Log in or register to post comments

मस्त वृतांत.

नूतन सावंत
Sun, 05/17/2015 - 21:53 नवीन
मस्त वृतांत.
  • Log in or register to post comments

वृत्तांत आवडला

श्रीरंग_जोशी
Sun, 05/17/2015 - 21:55 नवीन
नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या कट्ट्याचा वृत्तांत आवडला. बाकी मिपाचा तथाकथित साचलेपणा तसा विचार करणार्‍यांना तो साचलेपणा लखलाभ असो. मिपाकरांची नवी पिढी असल्या साचलेपणाच्या भावनांमध्ये अडकून न पडता मिपाचा प्रवाह खळाळता ठेवण्यात योगदान देत आहे व पुढेही देत राहील असा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments

अहो, पण इतक्या मिपाकरांचे

अन्या दातार
Sun, 05/17/2015 - 22:00 नवीन
अहो, पण इतक्या मिपाकरांचे निदान एका विषयावर तरी एकमत झाले हेही नसे थोडके. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

यावरून आठवले

श्रीरंग_जोशी
Sun, 05/17/2015 - 23:26 नवीन
देवाचिया दादूलेपनाचा उबारा, न सहावेची साताही सागरा, भेण वोसरूनी राजभरा, दिधली द्वारावती!! आमच्या दहावी कुमारभारतीच्या पहिल्या पाठातील (नरिंद्रबासा भेटी अनुसरणं) हे वाक्य आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

फोटो न्हाय . . तर कट्टा न्हाय

अद्द्या
Sun, 05/17/2015 - 22:07 नवीन
फोटो न्हाय . . तर कट्टा न्हाय =))
  • Log in or register to post comments

झाले तयार एकाच कट्ट्यात

यशोधरा
Mon, 05/18/2015 - 11:12 नवीन
झाले तयार एकाच कट्ट्यात बाळकोबा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

व्हय . . अगदी पहिल्या २

अद्द्या
Tue, 05/19/2015 - 14:34 नवीन
व्हय . . अगदी पहिल्या २ मिनिटात =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी सांगू का...

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/17/2015 - 23:44 नवीन
मी सांगू का... हा खरा कट्टा मायला.. प्लॅन करुन हाटीलात खाण्यात मज्जा हायच,पन त्ये ऐन भुकेच्या वक्ताला येकदम शीद्द सादं ज्येवान येकदम मायींड फ्रेस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करुण जातं णा,त्येला तोडच णसतीया बगा.
पण आजच्या रविवारच्या सकाळचा एक आगळाच गंध कायम मनात दरवळत राहील…. प्रत्यक्षातले पोपट पुढे भविष्यात दिसोत न दिसोत, मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!( पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!) वि. सू -- "फटू, फाटू" अशा प्रतिक्रिया देऊन भुणभूणु नका … फटू प्रतिसादात येतीलच !! ते पाहून …. जळावे,असाच लोभ असावा ही विनंती !!
>>> ह्ये बगा.. ह्ये हाय तो फ्रेस्स्स्स्स्सनेस!
  • Log in or register to post comments

डॉक साहेबांनी फोनवले आणि या

मदनबाण
Mon, 05/18/2015 - 10:20 नवीन
डॉक साहेबांनी फोनवले आणि या कट्ट्याला हजेरी लावता आले... साक्षी काकांच्या घरी चहा पोहे आणि जबदस्त पन्हे पिउन या कट्ट्याचा आनंद लुटला ! :) पोपट आणि बुलबुल... Image removed. Image removed. Image removed. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma
  • Log in or register to post comments

मा झा प्र ति सा द को णी उ ड व

त्रिवेणी
Mon, 05/18/2015 - 11:07 नवीन
मा झा प्र ति सा द को णी उ ड व ला.
  • Log in or register to post comments

नाराज..... :(

विजुभाऊ
Mon, 05/18/2015 - 11:17 नवीन
नाराज..... :(
  • Log in or register to post comments

अरे हे काय ...

माझीही शॅम्पेन
Mon, 05/18/2015 - 12:17 नवीन
अरे हे काय ... थोडी कल्पना दिली असती तर नक्कीच आलो असतो , जुन्या कट्टे- करी आम्हास विसरले की काय ? गेला बाजार ग्रूप वर तरी आवतण्याच बाब्बो ! असो .. मजा करा !!
  • Log in or register to post comments

फोटो नाय तर कट्टा नाय, विषय

सूड
Mon, 05/18/2015 - 15:25 नवीन
फोटो नाय तर कट्टा नाय, विषय संपला.
  • Log in or register to post comments

+१

अन्या दातार
Mon, 05/18/2015 - 16:52 नवीन
साफ सहमत. येउन येउन फक्त दोनच फोटो तोही पोपट आणि बुलबुलचा. कट्टा झालाच नाही असे मानायला लै जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुढचा कट्टा तुमचंही घर असू

सूड
Mon, 05/18/2015 - 16:59 नवीन
पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!
हे फक्त ठाणे आणि आजूबाजूच्या मध्यवर्ती विभागांसाठी होतं असं समजतो.
  • Log in or register to post comments

नाय ब्वा.....पुणं पण असू शकतं....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 05/18/2015 - 18:05 नवीन
बादवे, काय काय दिसतं तुमच्या घरातून? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बादवे, काय काय दिसतं तुमच्या

सूड
Mon, 05/18/2015 - 18:10 नवीन
बादवे, काय काय दिसतं तुमच्या घरातून?
तुम्हाला काय काय बघायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

ते सर्व हे दाखवणार आहेत!

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/18/2015 - 18:34 नवीन
ते सर्व हे दाखवणार आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ते सर्व हे दाखवणार आहेत!

सूड
Mon, 05/18/2015 - 18:40 नवीन
ते सर्व हे दाखवणार आहेत!
आपणांस मुद्दा कळलेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बरं! :p

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/18/2015 - 18:50 नवीन
बरं! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चालु द्या निरर्थक अत्मरंजन!!!

बॅटमॅन
Mon, 05/18/2015 - 18:55 नवीन
चालु द्या निरर्थक अत्मरंजन!!!! ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ :P :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ही म्हणजे स्वमतांध दांभिकता

सूड
Mon, 05/18/2015 - 19:40 नवीन
ही म्हणजे स्वमतांध दांभिकता झाली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा शब्द समहाऊ अगदी सनावृतेची

बॅटमॅन
Mon, 05/18/2015 - 19:43 नवीन
हा शब्द समहाऊ अगदी सनावृतेची आठवण करून देणारा वाटतोय =)) "*** सनावृता" तशी स्वमतांध दांभिकता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

झकास लिखाण

पैसा
Mon, 05/18/2015 - 18:57 नवीन
मापं यांचं लिखाण नेहमीच आवडतं. ते फार कमी लिहितात अशी तक्रार आहे. साचलेपण, प्रवाहीपण याबद्दल काळजी करायचं काम नीलकांतवर सोडून आपल्याला जमेल ते करावं हा माझा फंडा. ते सगळ्यांनीच करावं असा आग्रह अजिबात नाही. बाकी फटु नसल्याने वाचकांचा पोपट करण्याची तयारी झाली आहे असे समजून फटु नाय तर कट्टा नाय. विषय संपला या सूड यांच्या निष्कर्षाला +१
  • Log in or register to post comments

आरोप एकदम मान्य.....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 05/19/2015 - 12:39 नवीन
पण काहीतरी अंतःप्रेरणा आल्यशिवाय लिखाण करणे जमत नाही.... तरीही लिहितं राहायला हवं.....तुमचे प्रोत्साहन हीच माझी प्रेरणा..... नक्की सुरु करेन परत लिहिणं... धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या

टवाळ कार्टा
Tue, 05/19/2015 - 15:11 नवीन
श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!).
काय ती अंतःप्रेरणा....ओसांडून वाहतेय नुस्ती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

टकाशेट...तीच प्रेरणा तुम्हालाही मिळो ही परमेश्वराचरणी प्रार्थना

माम्लेदारचा पन्खा
Sat, 05/23/2015 - 11:14 नवीन
तुम्ही जरा मनावर घ्या बुवा..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@ माम्लेदारचा पन्खा , तुमची

पिंपातला उंदीर
Mon, 05/18/2015 - 19:04 नवीन
@ माम्लेदारचा पन्खा , तुमची लिखाणाची शैली खरच खुप छान आहे.
  • Log in or register to post comments

मनापासून आभारी आहे

माम्लेदारचा पन्खा
Tue, 05/19/2015 - 12:41 नवीन
ध न्य वा द !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

मस्त वृत्तांत.

प्रचेतस
Mon, 05/18/2015 - 19:08 नवीन
मस्त वृत्तांत. सर्वसाक्षी, रामदास यांसारखे दिग्गज मिपाकर. कट्टा भलताच रंगला असणार. बाकी ही सुरुची मिसळ कुठली?
  • Log in or register to post comments

काय दिसतं तुमच्या घरातून?

कंजूस
Mon, 05/18/2015 - 21:18 नवीन
काय दिसतं तुमच्या घरातून? काय ऐकू येतं ते ऐकवलं आहे.
  • Log in or register to post comments

परत येकदा वाचीलं.. आनी आम्मी

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/18/2015 - 22:48 नवीन
परत येकदा वाचीलं.. आनी आम्मी ठान्यात आल्तो,तवा असाच रामदासकाकांच्या हापिसात घातल्येला धुमाकुळ आठिवला! त्या ठाने टिरिपमंदी लै मज्जा आल्ती..त्येचीच चित्र हित टाकावीशी वाटायलीत राव आता!
  • Log in or register to post comments

वर्णन मस्त ! पण फटू पायजेतच

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/19/2015 - 00:31 नवीन
वर्णन मस्त ! पण फटू पायजेतच पायजे !!
  • Log in or register to post comments

प ण मा झा प्र ति सा द गे ला

त्रिवेणी
Tue, 05/19/2015 - 10:27 नवीन
प ण मा झा प्र ति सा द गे ला कु ठ? कु णी उ ड व ला त्या ला?
  • Log in or register to post comments

सेल्फी नाहि का काढ्ला ?

अनुप७१८१
Tue, 05/19/2015 - 12:03 नवीन
सेल्फी नाहि का काढ्ला ?
  • Log in or register to post comments

शिंदे सरकार आणि प्रास

सुबोध खरे
Tue, 05/19/2015 - 22:25 नवीन
Image removed. शिंदे सरकार आणि प्रास भाऊ Image removed.मामलेदार Image removed. सर्व साक्षी Image removed. रामदास Image removed. मदनबाण Image removed. विमे
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे इथेही विमेचा

किसन शिंदे
Wed, 05/20/2015 - 07:39 नवीन
नेहमीप्रमाणे इथेही विमेचा फोटो गंडला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विमे चक्क ठाण्याला आला?

सूड
Wed, 05/20/2015 - 14:55 नवीन
विमे चक्क ठाण्याला आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

'मुंबईच्या' (एकेकाळच्या)

अन्या दातार
Wed, 05/20/2015 - 17:12 नवीन
'मुंबईच्या' (एकेकाळच्या) सेंटरला विमे का येणार नाहीत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आपण व्यनिव्यनि किंवा व्हॉट्सअ

सूड
Wed, 05/20/2015 - 17:29 नवीन
आपण व्यनिव्यनि किंवा व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉट्सअ‍ॅप खेळताना बोलू. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

म्हणजे तु अन्याबरोबर हे सगळे

टवाळ कार्टा
Wed, 05/20/2015 - 17:43 नवीन
म्हणजे तु अन्याबरोबर हे सगळे करतोस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुला का चवकश्या?

सूड
Wed, 05/20/2015 - 18:02 नवीन
तुला का चवकश्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तु जाहिरपणे लिल्हे म्ह्णून

टवाळ कार्टा
Wed, 05/20/2015 - 18:29 नवीन
तु जाहिरपणे लिल्हे म्ह्णून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आता उत्तर मिळणार नाही, हेही

सूड
गुरुवार, 05/21/2015 - 14:51 नवीन
आता उत्तर मिळणार नाही, हेही जाहीरपणे 'ल्हि'तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जाहिर संभाषणाबद्दल आभार आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 05/21/2015 - 21:51 नवीन
जाहिर संभाषणाबद्दल आभार आणि छुप्या कट्ट्याबद्दल णी षे ध...!! काळे झेंडे वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा