✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इतिहासाचे मारेकरी आणि पहारेकरी

व
विकास यांनी
Wed, 04/15/2015 - 20:48  ·  लेख
लेख
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे. सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली. मात्र हिटलरच्या जर्मनीबरोबर आणि त्याच अंगाने जाणार्‍या जपानबरोबर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून जरी मैत्री केली असली तरी, "जर-तर" च्या भाषेत चुकून पण जर्मनी-जपान कोणीही तात्पुरते आशियाच्या बाजूने जिंकत आले असते तर भारताचे पण खरे नव्हते असे वाटते. अर्थात हे देखील समजते की त्यावेळेस (१९४१) जर्मनीची सगळी दुष्कृत्ये बाहेर आली नव्हती...असो. आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सुभाषबाबूंचे पुतणनातू सुर्या बोस यांच्या जर्मनीत झालेल्या भेटीची बातमी आली आहे. सुर्या बोस यांच्या वडीलांवर देखील त्या काळात पाळत ठेवली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देखील श्री. सुर्या बोस यांचे खालील म्हणणे वाचण्यासारखे आहे...
"I gave the PM a few points in writing, including the issue of surveillance on the family so that the truth comes out," Surya said. He said he impressed on Modi that India as a nation was strong enough to face the truth, even if it was unpalatable. "The declassified information needn't paint a glorious picture of Netaji. It may say something negative. In all probability, it will. We must not shirk from the truth even if it adversely affects Netaji's image. The family is ready to face it," he said.
या बातमीत श्री बोस यांनी इतिहासाकडे अलिप्तपणे बघण्याची दाखवलेली वृत्ती आणि धैर्य हा या चर्चेचा विषय आहे. सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते. तसेच नेहरूंच्या नंतरचे पंतप्रधान शास्त्री, नंदा आणि इंदीरा गांधी, त्यांच्या त्या त्या वेळच्या गृहमंत्र्यांसकट सर्वच जबाददार होते. त्यात यशवंतराव चव्हाण देखील आले. तरी देखील अंतिमतः या निर्णयांवर वेळोवेळच्या पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्या शिवाय हे केले गेले असे म्हणत केवळ गृहमंत्र्यांवर जबाबदारी टाकली जाणार असेल तर ती मोठ्ठी दिशाभूल आहे आणि त्यातून केवळ पंतप्रधान हे स्वतः निर्णय घेत नव्हते इतकेच सिद्ध होऊ शकेल, जबाबदारी टळू शकणार नाही. बरं त्यांनी तसे करणे ही कदाचीत त्या काळातील (फॉरवर्ड ब्लॉक आणि तत्सम अतिरेकी डाव्या संघटनांमुळे) गरज देखील असेल आणि ते त्या त्या नेत्यांनी गोपनिय ठेवले असेल तर त्यातही काही चूक नाही. पण ते आता इतक्या वर्षांनी इतिहास म्हणून प्रसिद्ध झाले तर वास्तव जगासमोर येऊ शकेल. अर्थात या सर्वांचा लसावि असे म्हणता येऊ शकेल तो म्हणजे काँग्रेस....आणि गंमत म्हणजे एकीकडे पाळत ठेवणारे दुसरीकडे त्यांना राष्ट्रभक्त देखील म्हणत होते. याच काळात सावरकरांना (मला वाटते चीन युद्धाच्या वेळेस देखील) अटक/स्थानबध्दता करण्यात आली होती. श्यामाप्रसाद मुखर्जींचा (१९५३) गुढ मृत्यू झाला होता. भगतसिंग बद्दल देखील बोलले गेले आहेच. असे अनेक असेल जे कदाचीत बाहेर येणार नाही अथवा काळाच्या ओघात "गंगार्पण" झाले आहे. सुभाषबाबूंचे दुसरे पुतणनातू आणि सध्या तॄणमूल कडून खासदार असलेले अमेरीकास्थित सुगाता बोस मात्र नेहरूंना जबाबदार ठरवायला तयार नाहीत तर केवळ पटेलांनाच चूक ठरवत आहेत. गंमत म्हणजे ते इतिहास आणि राजकीय विषयातले तज्ञ आणि हार्वर्ड मधे प्राध्यापक आहेत! अर्थात त्यांना प्रत्यक्षात बोलताना ऐकलेले असल्याने, त्यांच्या असल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही... दुर्दैवी मात्र नक्की वाटते. दुसरे सन्माननीय प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी अजून यासंदर्भात (एरवी मांडतात तशी) मते मांडलेली नाहीत. कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात बोलले गेलेले दिसले नाही. बाकीचे डावे विचारवंत देखील "सुभाषबाबूंच्या पहारेकर्‍यांबद्दल" गप्पच आहेत आणि कागदपत्रे जाहीर करा असे देखील म्हणलेले वाचले तरी नाही. मात्र हे आणि त्यांचे डावे पूर्वज याच काळापासून ते आजतागायत कुठलाही पुरावा नसताना तत्कालीन संघापासून ते आजच्या बालस्वयंसेवकापर्यंत सर्वांना "गांधीचे मारेकरी" म्हणून समाजाची दिशाभूल करत राहीले. या इतिहासाच्या मारेकर्‍यांनी आणि पहारेकर्‍यांनी स्वतःचे विचार रुजावेत म्हणून बुद्धीवादीपणाने हिंदू आणि हिंदूत्वाचा द्वेष पसरवत, त्यांच्याबद्दल खोटे बोलून, त्यावर खोटे संशोधन करून आजपर्यंत या तथाकथीत विचारवंतांनी देशाचे सामाजिक-आर्थिक-राजकीय नुकसान केले आहे. या मारेकर्‍यांचे आणि पहारेकर्‍यांचे भांडे फोडणे आणि त्यांच्या असल्या (वि)कृतीशील विचारसरणीस दूर करणे ही काळाची गरज आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
माध्यमवेध
मत

प्रतिक्रिया द्या
25296 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/15/2015 - 22:07 नवीन
वाचनीय. आता जबाबदारी नरेंद्रची. त्या फाईल्स उचलाव्यात व सरळ टी.व्ही.वर येऊन वाचून दाखवून 'पर्दाफाश' करावा. मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments

मोठ्या बहुमताने निवडून दिले

पॉइंट ब्लँक
Wed, 04/15/2015 - 23:31 नवीन
मोठ्या बहुमताने निवडून दिले आहे लोकांनी भाजपाला.तेव्हा एवढे करायला काहीच हरकत नाही.
अस्स जालं होय. तुमच्या खांग्रेसला चाळीस वर्ष निवडून दिलं होत, त्यांना बरं जमलं नाही ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आपणास कसे माहीत की माईसाहेब

DEADPOOL
Sun, 01/24/2016 - 12:51 नवीन
आपणास कसे माहीत की माईसाहेब काँग्रेसलाच मतदान करायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

विकासराव...

अर्धवटराव
Wed, 04/15/2015 - 22:08 नवीन
बाण लागला बरोब्बर :)
  • Log in or register to post comments

जाणता राजा

विकास
Wed, 04/15/2015 - 23:36 नवीन
जाणत्या राजाने समजूत घातली आहे. ती वाचल्यावर समजले की ती हेरगिरी नव्हती तर काळजी करण्याची पद्धत होती म्हणून. =)) "When the NCP was in power in Maharashtra and I was a Union minister working in Delhi, people like Bhujbal in the state used to keep a tab on my movements. The department concerned has to keep an eye on important people, who are doing pivotal work in public life for their safety. Hence, the Maharashtra state that kept an eye on me was not for espionage. When I was the home minister in Maharashtra, the department also kept an eye on my movements for safety," he said. "Similarly, the relatives of Netaji Subhash Chandra Bose were important for the country. The government would have been held accountable if anything untoward had happened with them. As a result, the IB had kept an eye on Bose's family for their safety and not for espionage," added Pawar, who was in the city to review activities of the NCP in the district and attend a number of programmes.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

म्हणजे नक्कीच काही तरी घोळ

काळा पहाड
गुरुवार, 04/16/2015 - 00:58 नवीन
म्हणजे नक्कीच काही तरी घोळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

=))

विकास
गुरुवार, 04/16/2015 - 01:19 नवीन
मी तसं काही म्हणलेले नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ते बोल्लं की त्याचं उल्टंच

काळा पहाड
गुरुवार, 04/16/2015 - 13:30 नवीन
ते बोल्लं की त्याचं उल्टंच अस्तंय हो.. लईच चालू हाय बेनं.. म्हून म्हन्लं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बाण कुठला हे तर महाभारत आहे.

hitesh
Wed, 04/15/2015 - 23:22 नवीन
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे.
  • Log in or register to post comments

?

विकास
Wed, 04/15/2015 - 23:31 नवीन
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे खोटारडे पणा ने तो लावला होता. स्वतःच्या विचारसरणीत असलेला अंगभूत द्वेष पसरवण्याकरता... आता राहूल गांधींना कोर्टात जावे लागणार असल्याने इतर शहाणपणाने तसे बोलणे टाळतील असे समजूयात. म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. अनुज धर या लेखक-पत्रकाराने आणि "मिशन नेताजी" नामक संस्थेच्या मागितलेल्या माहीती अधिकारांतर्गत विनंतीनुसार पश्चिम बंगालच्या सिआयडी खात्याने दोन जुन्या फाईल्स मुक्त केल्या त्यातील माहितीतून हे बाहेर आले. वास्तवीक काँग्रेस आणि भाजपाने देखील आधी राज्य असताना (आणि आत्ता मोदींच्या काळात हे प्रकरण बाहेर यायच्या आधी) ह्या संदर्भातील फाईल्स मुक्त करायला असमर्थता दर्शवली होती. का? तर सुरक्षा आणि मित्र राष्ट्रांना त्रास होऊ शकतो म्हणून! असो आता मुक्त झालेल्या पत्रांमधून नेहरूंचा हात स्पष्ट दिसतो: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

नाटक...

विकास
गुरुवार, 04/16/2015 - 00:48 नवीन
गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे. काय वेळ आली आहे! स्कॉलर्ली पुरावा नसल्याने कुठल्यातरी फुटकळ नाटकात काय लिहीले आहे त्यावरून ठरवले जात आहे. तरी देखील त्या नाटका संदर्भात य.दी फडक्यांचा http://www.mkgandhi-sarvodaya.org/godse.htm लेख वाचा. (आणि हो फडके हे काही उजवे नाहीत...) आणि त्यावर अजून चर्चा करायची असेल तर अवश्य नवीन धागा काढा. तेथे काथ्याकूट करूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

आणी

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/16/2015 - 12:50 नवीन
आणी धाग्यात तू ही आधीच ठरवले आहेस विकासा-
सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते.
म्हणजे आधी तू हे ठरवूनच टाकले आहेस व त्यावर चर्चा करायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पिकासा चा भाउ विकासा.. ;)

शलभ
गुरुवार, 04/16/2015 - 13:31 नवीन
पिकासा चा भाउ विकासा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बाकी , गांधीहत्या कुणी व

चिनार
गुरुवार, 04/16/2015 - 12:58 नवीन
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे हितेश भाऊ ! गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय "गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!" वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती. तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

popcorn

कपिलमुनी
Wed, 04/15/2015 - 23:48 नवीन
300 potential
  • Log in or register to post comments

@ विकास....अत्यंत समतोल व समयोचित लेख.....!!!!

विनोद१८
गुरुवार, 04/16/2015 - 00:04 नवीन
'येथे कुणा एकाची पाठराखण वा कुणाची निंदा' असे नसून, याविषयीची सत्यता काय हे जाणुन घेणे महत्वाचे. आजच केंद्र सरकारने एक समिती गठीत केली असुन ती समिती अशा अन्य ८५ फाईलींच्या बाबत त्या उघड करायच्या का याबद्दल निर्णय घेणार आहे, अशी बातमी दुरदर्शनवर एकली, तसे झाले तर याविषयीचे सत्य काय ते उघड होइलच. सुभाषबाबूंची भारतीय जनतेत स्वातंत्र्यकाळापुर्वीपासुनच 'हीरो' अशी प्रतिमा होती, आहे व राहील यात काहीच शंका नाही, त्यांच्या गूढ मृत्यूबद्दलचे सत्य जाणुन घेण्यात सगळ्यांनाच रस आहे, ते गूढ जर कुणी उकलले तर त्यामध्ये गैर ते काय ? त्याविरोधात एव्हढी कावकाव कशासाठी ?? येउद्या की सत्य बाहेर. येथे 'त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली' ते भारतात नसताना ( जिवंत असताना वा नसताना ) ती ही सतत २० वर्षे, याची गरज त्यावेळच्या आपल्या नवस्वतंत्र देशाच्या सरकारला का भासली ?? अगदी मागील पानावरुन पुढे यापद्ध्तीने ते का ?? येथे हा 'का' महत्वाचा ?? ती कोणी ठेवायला सांगितली हे दुय्यम असे मी समजतो. इंग्रजांनी तसे केले हे आपण समजु शकते, त्याबद्दल हा 'का' उद्भवत नाही परंतु नंतर आलेले तर आपलेच स्वकिय होते. असे कितीतरी 'राजकिय गूढ-मृत्यू' त्या कालखंडात झालेत, त्यांना न्याय मिळायला हवा असे जर कुणाला वाटले तर ते अयोग्य कसे ?? या गूढतेची उकल यथावकाश होइल अशी चिन्हे दिसताहेत. @.....हितेसभॉय, अरे या लोकशाहीतला तुझा विधाने करण्याचा, प्रतिक्रिया देण्याचा अधिकार मान्यच, पण तु स्वतः हिंदु नसताना / नास्तिक असताना व एक सर्वमान्य डु.आय.डी. असताना, वारंवार कोणत्याही विषयाला / चर्चेला ओढूनताणुन आमच्या हिंदु धर्माशी जोडुन, आमच्या देवदिकांना बोल लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला ?? तुझ्या उपासना पद्धतीबद्दल ( जर असलीच तर ) जर कोणी काही वावगे बोलले तर तु खपवून घेशील काय ?? एक लक्षात ठेव तुला येथे कोणीच गंभीरपणे घेत नाही पण तुला आता 'समजावून सांगण्याची' वेळ आली आहे. तेव्हा यापुढे आमच्या 'हिंदु धर्माबद्दल' लिहीताना जरा जपुन, अंत पाहू नकोस. तुझ्यासाठी तुर्त एव्ह्ढेच.....!!!
  • Log in or register to post comments

काहीसे विस्कळीत

क्लिंटन
गुरुवार, 04/16/2015 - 14:51 नवीन
लेख आवडला. त्यावर काहीसा विस्कळीत प्रतिसाद--- सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात जे काही झाले ते पब्लिक डोमेनमध्ये नक्कीच यायला हवे असे वा॑टते. राजनाथ सिंगांनी तसे करता येणार नाही यासाठी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल आणि इतर देशांशी संबंध बिघडू शकतील असे कारण त्यामागे दिले होते. त्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकेल हे कारणच मला पटलेले नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी राज्य सरकारची असते आणि ते काम राज्य सरकारला न जमल्यास शेवटी ती केंद्राची जबाबदारी ठरेल. सुभाषचंद्र बोस खरोखरच त्या विमान अपघातात गेले की नाही याविषयी बराच संभ्रम आहे.सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्यांचे म्हणणे आहे की सुभाषचंद्र नंतर रशियात गेले आणि त्यांना स्टॅलिनने ठार मारले. जर का ही माहिती उघड केली तर त्यामुळे रशियाशी संबंध बिघडायची भिती का वाटावी? एकतर रशियाने स्वतःच लेनिन आणि स्टॅलिन यांच्या राज्यपध्दतीला नाकारले आहे. या घटनेला किमान ६० वर्षे उलटली आहेत आणि भारत जर रशियाकडून तेल विकत घ्यायला तयार असेल तर पुटिन यांनाही फार काही तक्रार करायचे कारण असेल असे मला तरी वाटत नाही. सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आली आणि त्यामुळे त्यांच्या जनमानसातील प्रतिमेवर परिणाम झाला तरी हरकत नाही ही भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने सुभाषचंद्र बोसांविषयी लोकांच्या मनात जे काही समज-गैरसमज आहेत ते समजले तरी ते चांगलेच असेल. बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. एकतर सुभाषचंद्रांचे गुरू चित्तरंजन दास हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.मुस्लिमांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नसेल तर स्वातंत्र्यलढा यशस्वी होणार नाही असे गांधीजींना वाटत होते तसेच चित्तरंजन दासांनाही वाटत होते. १९२३ मध्ये त्यांनी बंगालमधील मुस्लिम पुढार्‍यांबरोबर (विशेषतः हकिम अजमल खान) 'बंगाल करार' याच उद्देशाने केला होता आणि त्यात मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. त्या कराराला काँग्रेसमधल्याच अनेक पुढार्‍यांचा विरोध होता. त्यांचे शिष्य सुभाषचंद्रांनी कलकत्ता महानगरपालिकेचे सी.ई.ओ असताना या आरक्षणाची अंमलबजावणीही केली होती. ज्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल गांधीजींविरूध्द हिंदुत्ववादी लोक आगपाखड करतात त्याच चळवळीविषयी सुभाषचंद्र बोस यांनी The Indian Struggle या पुस्तकात पान ५५ वर म्हटले होते--- "In 1921, besides the above three leaders, the Ali brothers (Moulana Mohammed and Moulana Shaukat Ali) had a unique position among the public. This was due partly to their own activities and their suffering during the Great War--partly to the new awakening among the Moslems -- but largely due to the propaganda conducted in their favour by the Mahatma. The Mahatma associated himseld so closely with them that they came to be looked upon as the right and the left hand of the Mahatma, In their company the Mahatma toured the country and one clearly remembers that in those days whenever there was a popular shout of 'Victory to Mahatma Gandhi' (Mahatma Gandhi Ki Jai), it would be accompanies by a shout of 'Victory to the Ali Brothers' (Ali Bhai-o-Ki Jai). Though after some years the Ali brothers parted company with the Mahatma, I do not think one could find fault with the latter for his intimate association with them. The real mistake in my opinion did not lie in connecting the Khilafat issue with the other national issues, but in allowing the Khilafat Committee to be set up as an independent organisation throughout the country, quite apart from the Indian National Congress. The result of this was that when later on Ghazi Mustafa Kemal Pasha, as the leader of the New Turkey, forced the Sultan to abdicate and abolished the office of Khialifa altogether, the Khilafat question lost all meaning and significance and the majority of the members of the Khilafat organisations were absorbed by sectarian, reactionary and pro-British Moslem organisations. If no separat Khilafat committees had been organised and all Khilafatist Moslems had been persuaded to join the ranks of the Indian National Congress, they would probably have been absorbed hy the latter when the Khilafat issue became a dead one." हेच जर का अन्य कोणत्या काँग्रेसच्या पुढार्‍याने म्हटले असते तर तो पुढारी दाढ्या कुरवाळणारा, तळवे चाटणारा वगैरे विशेषणांनी ओळखला गेला असता. सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला विरोध नक्की होता का याविषयीही प्रश्न उभा रहावा असे त्यांचे बर्लिन रेडिओवरून केलेल्या एका भाषणातील विधान होते . या भाषणाचा वृत्तांत ---" He assured Mr Jinnah that his Pakistan scheme would never materialise so long as the British were in India.He emphasised that Pakistan could be created only under a National Government." म्हणजे सुभाषचंद्रांचा पाकिस्तानला खरोखरच विरोध होता का? आणि तरीही सुभाषचंद्र असते तर अखंड भारत आपल्याला मिळाला असता हा एक काहीसा भाबडा समज हिंदुत्ववादी लोकांमध्ये आढळतो हे बघून काहीशी गंमतच वाटते.हा प्रकार फेसबुकवरील विविध ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितला आहे. सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायच्या धोरणाविरूध्द मी पूर्वीच मिपावर लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती नको. पण या निमित्ताने अशा काही इतर मुद्द्यांचीही चर्चा जरूर व्हावी असे नक्कीच वाटते.
  • Log in or register to post comments

असं म्हणणारा माणूस निदान

काळा पहाड
गुरुवार, 04/16/2015 - 15:23 नवीन
असं म्हणणारा माणूस निदान माझ्या तरी पहाण्यात नाहीत. बहुतांश लोकांना सुभाषबाबू एक हीरो (ज्यांनी थरारक गोष्टी केल्या) म्हणून आवडतात. त्यातल्या राष्ट्रवादी (पक्ष नव्हे) लोकांना या गोष्टी त्यांनी देशासाठी केल्या, देशासाठी खस्ता खाल्ल्या म्हणून आवडतात. त्यातल्या शिकल्या सवरलेल्यांना ते आयसीएस ची परिक्षा पास होवू शकणारे विद्वान होते आणि त्यावर लाथ मारू शकणारे स्वाभिमानी होते म्हणून आवडतात. नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी) सुभाषबाबू उठून दिसतात. ते आर्मी युनिफॉर्म मध्ये रुबाबदारही दिसतात. ज्या गोष्टी आम्ही सर्व सामान्य मध्यमवर्गी लोक करू शकत नाही त्या त्या करणारे ते त्या वेळचे बंडखोर वृत्तीचे नेते, एक कॅरिस्मॅटीक पर्सनॅलिटी म्हणून ते लोकांना आवडतात. त्यांचं आयुष्यच एखाद्या दंतकथे प्रमाणे आहे, त्यांचं नाहीसं होणं धरून. अशा व्यक्तीला जर रशियन स्थानबद्धतेत यातनामय मरण आलं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही शोधणारच. नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको (स्टॅलीन एक काळी लोकांचा हिरो होता म्हणे). जर असं काही नसेल तर नेहरूंना घाबरायचं काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आधी

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/16/2015 - 18:08 नवीन
नेहरूंच्या मेंगळट धोरणासमोर (लेटस फेस इट, ही वाज प्रॉबॅबली राहुल गांधी ऑफ दोज टाईम्स लिव्हींग इन द शॅडो ऑफ गांधीजी)
आणी
नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?आणी ५०च्या दशकात रशियन सरकारवर दबाव टाकणे म्हणजे बाकरवडी खाण्यासारखे सोपे वाटले का रे पहाडा? बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो. १९५७ पासून लोकसभेत हजेरी लावणार्या अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

माईसाहेबांशी सहमत (चक्क)

क्लिंटन
गुरुवार, 04/16/2015 - 18:41 नवीन
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?
अरे काय दिवस आले आहेत? चक्क मी माईसाहेबांशी सहमत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई . सहमत

hitesh
गुरुवार, 04/16/2015 - 20:05 नवीन
.गांधी नेहरु नेभळट होते असे लबाड संघवाले म्हणतात. नेहरुनी म्हणे नेताजीना संपवायला स्टालिनला पत्र लिहिले अsehee लबाड संघवाले म्हणतात. भगतसिंगाना फाशी देऊ नये म्हणुन गांधीजींनी इंग्रजांवर दबाव टाकला नाही असेही हेच लबाड लोक म्हणतात. यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. मग वेळ पडली की काँग्रेसचे नेहरु गांधी याना स्मरणीय मान. काँग्रेसच्या पटेलांचा पुतळा बांध. कम्युनिस्ट भगतसिंग , मुस्लिम्प्रेमी नेताजी यांना प्रेमाने आपले म्हणणे, असेही हे लोक करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तुम्ही मला लबाड संघवाले

काळा पहाड
गुरुवार, 04/16/2015 - 22:31 नवीन
तुम्ही मला लबाड संघवाले म्हणताय का हितेशभौ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

खरे आहे...

विकास
गुरुवार, 04/16/2015 - 22:52 नवीन
यांच्या पारड्यात कुणीही मोठे नेते नाहीत याचे फ्रस्ट्रेशन ते काढत असतात.. हो ना! ह्यांच्या पारड्यात मोठे नेते असते तर काँग्रेसच्या लोकांसारखे आज फटाके उडवता आले असते! पण कसचं काय... टाईम मॅगझिन मधे आलेल्या प्रेसिडंट ओबामांच्या "रीफॉर्म - इन - चार्ज" फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर असे नेत्याबद्दल वाचावे लागले नसते! (बाकी ओबामा पण चावटच आहेत.... मोदींना "फ्रॉम पॉव्हर्टी टू प्राइम मिनिस्टर" असे म्हणले "फ्रॉम आम आदमी/कॉमन मॅन टू प्राइम मिनिस्टर" असे नाही म्हणले! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

शब्द चुकला

हुप्प्या
गुरुवार, 04/16/2015 - 21:38 नवीन
दबाव हा शब्द चुकीचा वाटतो. नेहरु हे ब्रिटिशधार्जिणे होते आणि ते ब्रिटिश लोकांनाही सोयीचे होते. त्यामुळे हे परस्परांच्या सोयीची योजना होती. त्यामुळे मी तुमच्यासाठी हे करतो, तुम्ही माझ्यासाठी ते करा अशी देवाणघेवाण होणे अशक्य नव्हते. दुसर्‍या महायुद्धानंतर शीतयुद्ध जोरात होते. जेव्हा अमेरिकेची आणि रशियाची रस्सीखेच जोरात होती त्या काळात भारताचे राजकीय, भौगोलिक आणि एकंदरीत स्ट्रॅटेजिक महत्त्व रशियाच्या लेखी होते. ते तसेच अबाधित रहावे म्हणून स्टालिनने नेहरूना मदत केली असेल अशी शक्यता इतकी अवास्तव वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई, हे नक्की "ह्यां"चं मत

काळा पहाड
गुरुवार, 04/16/2015 - 22:29 नवीन
माई, हे नक्की "ह्यां"चं मत आहे की तुझं? तुझा युएसपी तुझे "हे" आहेत हे लक्षात घे.
मेंगळट धोरणे राबवणारा पंतप्रधान ब्रिटिश सरकारवर कसा काय दबाव टा़कू शकतो ब्वॉ ?
तू जरा नीट वाच.
अटलजींचे काय म्हणणे आहे ह्या विषयावर ?
अटल"जी"? फक्त अटल म्हणायचे पद्धत आहे ना? बाकी हे तू अटलजींनाच जावून का विचारत नाहीस? मी बीजेपी मध्ये पण नाही आणि अटलजींचा पीए पण नाही.
बाकरवडी खाण्यासारखे
माई तुझं वय काय, तू खातेस काय. जास्त तेलकट गोष्टी खात जावू नकोस. जोक्स अपार्ट, बोस हे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलत होते. ब्रिटिशांनी बोसना मारण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. असं असताना ब्रिटिशांनी बोस यांना रशियन सरकारकडून ताब्यात घेण्यासाठी आकाशपाताळ एक केलं असण्याची शक्यता आहे. या बाबतीत ब्रिटीशांना फक्त उकसवायची गरज असावी. बाकी काम त्यांनी केलं असेलच. बाय द वे,
आणि हे जर सिद्ध झालं
बोस हिरो होतेच पण तसे लिहिताना ईतरांना दोष का? असो. अग मै, जर नेहरूंनी असं पत्र लिहिलं असेल असं कुणीतरी लिहीतय, तर दोष काय शारूक खान ला देणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सुब्रमण्यम स्वामी

क्लिंटन
गुरुवार, 04/16/2015 - 19:07 नवीन
नेहरूंनी त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी जर ब्रिटीश सरकारवर (रशियन सरकारवर दबाव टाकण्यासठी) दबाव टाकला असेल आणि हे जर सिद्ध झालं, तर नेहरूंचं इतिहासातलं स्थानाबद्दल काय केलं जाईल हे तुम्हाला सांगायला नको
मध्यंतरी सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले होते की नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना स्टॅलीनकरवी संपवले. सुब्रमण्यम स्वामींच्या या म्हणण्यातील काही भाग तरी नक्कीच गंमतीशीर आहे. उदाहरणार्थ स्टॅलीनने १९४५ साली नेहरूंना पत्र लिहून सुभाषचंद्र बोसांचे काय करू हे विचारले. मला तरी ही गोष्ट पूर्ण हास्यास्पद वाटते. स्टॅलीनने १९२० च्या दशकाच्या शेवटी रशियन सैन्यात 'पर्ज' घडवून आणून लष्करातील जवळपास सर्व वरीष्ठ नेतृत्व संपविले होते. याच स्टॅलीनने लाखो रशियनांना ठार मारले होते.समजा सुभाषचंद्र बोस त्याच्या तावडीत सापडले असतील तर त्यांना ठार मारायचा आदेश द्यायला याच स्टॅलीनला ऑफ ऑल द पीपल, पंडित नेहरूंच्या सल्ल्याची गरज पडावी हे अनाकलनीय वाटते. दुसरे म्हणजे १९४५ मध्ये स्टॅलीनला नेहरूंना खिजगणतीतही धरायची गरज वाटली असेल असे मानायचे कारण नाही. रशियाने किती प्रतिकूल परिस्थितीत झगडून हिटलरचा पराभव केला हे जगासमोरच होते.युध्द संपल्यानंतर सुरवातीला दोस्त राष्ट्रांचे जर्मनीवर नियंत्रण होते. अशावेळी फ्रान्सला कोणताही भाग देण्यास स्टॅलीनने पूर्ण नकार दिला होता.कारण काय तर रशियाने सुमारे दोन कोटी लोकांची आहुती युद्धात दिली होती तर फ्रान्सने १५ दिवसातच हिटलरपुढे गुढघे टेकले होते अशा फ्रेंचांना विजयातील हिस्सा फुकटात द्यायची काही गरज नाही. फेब्रुवारी १९४५ च्या याल्टा कॉन्फरन्सच्या वेळी स्टॅलीनने रूझवेल्ट यांची राहायची व्यवस्थाही अधिक सोयीची केली होती आणि चर्चिलना फार महत्व दिले नव्हते. असा स्टॅलीन पंडित नेहरूंना सल्ला मागण्याइतके महत्व देऊ शकेल हे मला तरी अशक्य वाटते. मी पण पंडित नेहरूंचा अगदी फार मोठा चाहता आहे असे अजिबात नाही.पण म्हणून एखाद्याला झोडपायचेच म्हणून अशा कुठल्याकुठल्या मुद्द्यावरून राळ उठवायला मला तरी आवडत नाही. बाकी तुम्हाला कुठल्याकुठल्या कारणावरून सुभाषचंद्र बोस आवडत असतील तर ते तुमचे मत झाले.त्याचा आदरही आहे. पण माझ्या स्वतःच्या दृष्टीकोनातून आझाद हिंद सेनेचा पराभव झाला हे चांगलेच झाले. सुभाषचंद्रांच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेऊ शकणारच नाही.पण त्यांचा जपानबरोबर जायचा निर्णय मला स्वतःला अजिबात समर्थनीय वाटत नाही. याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

याविषयी या आणि या धाग्यावर

अनुप ढेरे
गुरुवार, 04/16/2015 - 20:02 नवीन
याविषयी या आणि या धाग्यावर पूर्वीच लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.
तेच धागे शोधत होतो. जबरदस्त चर्चा आहेत त्या. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

हा हा

आजानुकर्ण
गुरुवार, 04/16/2015 - 19:09 नवीन
मस्त प्रतिसाद क्लिंटनसाहेब, प्रतिसाद आवडला. प्रश्नः कम्युनिष्ट विचारसरणीचे भगतसिंग, फॉरवर्ड ब्लॉकसारख्या पक्षाची सुरुवात करणारे आणि मुस्लिमप्रेमी सुभाषबाबू, गायीला उपयुक्त पशू माना असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ सावरकर, संघावर बंदी आणणारे पटेल या सर्वांमध्ये एक साम्य आहे. त्यामुळे ते सर्व आम्हाला एकाचवेळी प्रिय वाटतात. उत्तरः त्यांचे आडनाव नेहरु किंवा गांधी नाही हेच. बाकी काय बोलणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

माहितीपूर्ण

विकास
गुरुवार, 04/16/2015 - 20:38 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद! बाकी यानिमित्ताने आणखी एक गोष्ट जरूर लिहावीशी वाटते. सुभाषचंद्र बोसांना अनेक हिंदुत्ववादी विचारांचे लोक सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरचे समजतात हे बघून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही. पण एक संदर्भ मी सावरकरी वाड्मयात पाहीला आहे तो म्हणजे सावरकर-सुभाषबाबू भेट. सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना आणि नंतर सैनिकी शिक्षण घ्या आणि सैन्यात भरती व्हा असे तरूणांना आवाहन केले होते. त्यावरून त्यांच्यावर टिका देखील झाली होती. (अत्रे, ज्यांनी त्यांना आधी "स्वातंत्र्यवीर" ही पदवी दिली, त्यांनी त्यावरून त्यांना "रिक्रूटवीर" म्हणून हिणावले देखील!). अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा... पण या रिक्रूट भरतीचा उपयोग आझाद हिंद सेनेला काही अंशी झाला. तसेच नंतर नेव्हीचे बंड झाले त्यावेळेस ब्रिटीश घाबरू शकले. तेंव्हा सांगायचा मुद्दा हा की दोघांचे स्वातंत्र्यासाठी मार्ग समान असल्याने आणि कदाचीत सुभाषचंद्रांना देखील काँग्रेसने त्यावेळेस वाळीत टाकल्याने बाकी इतिहास न वाचता सावरकरांच्या बरोबरचे समजत असावेत. बाकी मुद्यांशी सहमतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

शिवाय...

अर्धवटराव
गुरुवार, 04/16/2015 - 21:35 नवीन
अभिनव भारतीचा विसर्जन समारंभ करताना सावरकरांनी अध्यक्षस्थानी सुभाषबाबुंचा फोटो ठेवला होता असं कुठेतरी वाचलं होतं. अमेरीका व जपान अखेरचे शांतीप्रयत्न करत असताना देखील जपान महायुद्धात नक्की उतरेल अशी बातमी सावरकरांच्या सोर्सेसनी त्यांना दिली होती. तेंव्हा महायुद्धाचा पुरेपूर उपयोग करुन घ्यायचा असेल तर सुभाषबाबुंना देशाबाहेरुन प्रयत्न या मताचे सावरकर होते (नक्की संदर्भ आठवत नाहि). तसंही सावरकर वगैरे मंडळींचं बरचसं काम गुप्त रुपात चालत असल्यामुळे त्याचे उघड संदर्भ जगजाहीर व्हायचे चान्सेस कमि आहेत. पण सुभाषबाबु आणि सावरकर कुठेतरी लिंक्ड असावे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

काही मुद्दे

क्लिंटन
Fri, 04/17/2015 - 18:44 नवीन
टिळकांच्या बरोबरचे समजतात असे मी कधी वाचलेले नाही.
नरहर कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे 'अहिंसक मार्गाचा अवलंब न करणारे सगळे गांधीविरोधी आणि सगळे गांधीविरोधी हे हिंदुत्ववादी' या न्यायाने सावरकर, भगतसिंग, गदर पार्टी , अनुशीलन समिती इत्यादी सगळे बरोबरचे समजले जातात. आणि सावरकरांचे प्रेरणास्थान असलेले लोकमान्य टिळकही-- मग भले स्वतः टिळकांनी लखनौ करार केला होता, लोकमान्यांनीही गांधीजींप्रमाणेच लोकांच्या प्रबोधनावर भर देऊन लोकांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य हवे ही जाणीव निर्माण करण्यावर भर दिला होता इत्यादी गोष्टींना फाट्यावरच मारायचे. म्हणूनच टिळकांचा उल्लेख केला. अशा स्वरूपाची चित्रेही बघायला मिळतात. त्यात तर शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस आणि चंद्रशेखर आझाद एकत्र दाखविले आहेत.काही चित्रांमध्ये भरीला भर म्हणून राणा प्रतापही असतात.तेव्हा गांधीजींच्या मार्गाला विरोध असलेले सर्व लोक क्रांतिकारक आणि सगळे हिंदुत्ववादी अशा प्रकारची एक धारणा असते.त्याला उद्देशून मी हे विधान केले.
अर्थात त्यांचा वरकरणी उद्देश त्यांनी लपवला नव्हता. एका भाषणात (आठवणीतून) त्यांनी सांगितल्याचे वाचले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे हे नक्की त्यावेळेस अचानक देश सांभाळायला सैन्य कुठून आणायचे, तेंव्हा आता तयारी करा...
याच बरोबर सावरकरांचा उद्देश होता की सैन्यात जाऊन शस्त्रे आणि ती चालवायचे प्रशिक्षण मिळवा.त्या बंदुकांची तोंडे कुठे वळवायची ते कधीही ठरवता येईल. मागे एक गोष्ट वाचल्याची आठवते. चिंतामणराव देशमुख लोकमान्यांना भेटायला गेले होते आणि स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचे आहे असे त्यांनी लोकमान्यांना म्हटले.त्यावर लोकमान्यांनी त्यांना सांगितले की आज ना उद्या स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि त्यानंतर अर्थतज्ञ आणि बँकर्सची देशाला गरज पडेल. अशावेळी चिंतामणरावांसारखे लोक देशाला गरजेचे असतील म्हणून लोकमान्यांनी चिंतामणरावांना स्वातंत्र्यलढ्यात न पडायचा सल्ला दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

असेच काही

प्रदीप
Sat, 04/18/2015 - 14:16 नवीन
शेषराव मोरे ह्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून लिहीलेल्या "१९४७- काँग्रेसने आणी गांधीजींनी अखंड भारत का नाकारला' ह्या पुस्तकात, 'नेताजी व हिंदू मुस्लिम प्रश्न' ह्या उपप्रकरणांत तत्कलीन भारतीय मुस्लिमांच्या मागण्या व त्यांतून उद्भवलेले जटिल प्रश्न, ह्यांजवर नेताजींची भूमिका काय होती, ह्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. [आवृत्ति दुसरी, पृष्ठे ३०८- ३१५] अनेक संदर्भ देऊन मोरे लिहीतात की नेताजींच्या मते, हिंदू-मुस्लिम समस्या खर्‍या अर्थाने अस्तित्वात नव्हतीच, तर ब्रिटीशांनी ती फूट मुद्दाम निर्माण केलेली होतीं. नेताजींच्या म्हणण्यानुसार "भारतीय जनतेत (राष्ट्रीय व भावनिक दृष्टींनी) फूट पडत नसल्यामुळे त्यंनी भारताची भौगोलिक व राजकीय फाळणी करण्याचे ठरविले. तीच पकिस्तानची योजना होय, की जी ब्रिटीशांच्या सुपीक मेंदूतून जन्माला आलेली आहे", नेताजींच्या मते, पाकिस्तान ही एक 'अजब', 'अव्यवहारीक' व 'अशक्यप्राय' योजना होती. ऑगस्ट १९४२ साली त्यांनी 'स्वतंत्र भारत व त्याचे प्रश्न' नावाच्या लेखात लिहीले होते की "भारतातील आजची मुस्लिम समस्या ब्रिटीशांची कृत्रिम निर्मीती आहे... ब्रिटीशांचे राज्य संपताच ती अदृश्य होऊन जाईल. ....प्रत्येकाला नोकरी, अन्न, शिक्षण आणि धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाल्यास (स्वतंत्र) भारतात अल्पसंख्याकांचा प्रश्नच स्किल्लक उरणार नाही'. 'पाकिस्तान' मागणीवरील तोडगा म्हणून मुस्लिम लीगकडे भारताची सर्व सत्ता देऊन टाकण्याचा नेताजींचा प्रस्ताव होता. जून १९४० मध्ये त्यांनी जिनांची भेट घेऊन लीगने काँग्रेसबरोबर स्वातंत्रयलढ्यात सहभागी होण्याचा व नंतर जिनांनी 'स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा' प्रस्ताव ठेवला होता. मोरे लिहीतात की नेताजी, बंगाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशबंधू चित्तरंजन दास ह्यांचे शिष्य होते. ह्या दासांनी काँग्रेसपुढे १९२३ साली 'बंगाल करार' मांडला होता. काँग्रेसने तो तेव्हा फेटाळला, पण (देशबंधूंच्या नेतृत्वाखालील) बंगाल प्रांतिक काँग्रेसने १९२४ साली तो मान्य केला. त्या करारातून, नेताजींच्या म्हणण्यानुसार 'देशबंधूंनी सर्व मुसलमानांची खात्री करून दिली की ते मुसलमानांचे खरे मित्र आहेत'. ह्या 'बंगाल करारा'नुसार राज्यातील ५२ टक्के मुसलमानांना विधीमंडळात ६० टक्के, तर नोकर्‍यांत ५५ टक्के जागा राखीव होत्या. १९३८ च्या काळात जिना सुभाषबाबूंना म्हणाले होते की "मि. बोस, माझे मित्र चित्तरंजन दास ह्यांचे आपण शिष्य आहात. त्यामुळे तुमचे आणि माझे जमायला काहीच हरकत नाही. माझे आणी गांधींचे मात्र जमणे शक्य नाही". सुभाषबाबूंच्या 'आझाद हिंद फौजेच्या' प्रतिनिधी मंडळात ७ पैकी ४ प्रतिनिधी (लेफ्टनंट) मुसलमान होते. ही 'आझाद हिंद फौज'ही पाकिस्तानच्या विचारापासून मुक्त नव्हती. इक्बाल शेदाई हे त्या फौजेतील क्रमांक दोनचे प्रभावशाली नेते. त्यांना फौजेचे मुख्यालय इटलीतील रोम येथे पाहिजे होते. नेताजींना हे मान्य झाले नाही. परिणाम असा झाला की शेदाईंनी आझाद हिंद फौजेत फूट पाडून 'आझाद मुस्लिम फौज' स्थापन केली. नेताजींनी १९४२ साली 'आझाद हिंद फौजे'च्या प्रचारासाठी 'आझाद हिंद रेडियो' केंद्र सुरू केले. पण नंतर फौजेतील मुस्लिमांन खूष ठेवण्यासाठी दुसरे 'आझाद मुस्लिम रेडियो' केंद्र चालू केले. सदर उपप्रकरणाचा समारोप करतांना मोरे लिहीतात की "रासबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस ह्यांना हिंदु- मुस्लिम प्रश्न महत्वाचा वाटत नव्हता; फाळणीची मागणी अजब, अव्यवहार्य व अशक्यप्राय म्हणून गंभीरपणे विचारात घ्यावीशी वाटत नव्हती. स्वतंत्र व अखंड भारतात मुसलमानांचा प्रश्न कसा मिटवावा ह्याबद्दल त्यांची कोणतीही योजना नव्हती व ब्रिटीश गेले की हा प्रश्न आपोआप अदृश्य होईल असे त्यांना वाटत होते. त्या काळातील जिनांच्या गर्जना, मुस्लिम प्रश्नांचे गांभीर्य व सैन्यातील मुस्लिम प्राबल्य लक्षात घेता असे म्हणणे भाग आहे की नेताजींची आझाद हिंद फाउज विजयी झाली असती तरी अखंड व स्वतंत्र भारतात स्थिर लोकसत्ताक सरकार स्थापन होऊ शकले नसते: अराजक व हिंदु- मुस्लिम यादवी युद्धाचे आव्हान उभे ठाकले असते. स्वातंत्र्यप्राप्तीएवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न हिंदू मुस्लिम समस्या आहे, हे नेताजींच्या लक्षात आले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पांचाली माई

होबासराव
गुरुवार, 04/16/2015 - 18:14 नवीन
तुझ्या ह्यांच (नं. ३ भगेंन्द्र कुमार) काय मत आहे ह्या बाबतित
  • Log in or register to post comments

काही गैरसमज

हुप्प्या
गुरुवार, 04/16/2015 - 21:44 नवीन
सुभाषचंद्र बहुधा निधर्मी, कम्युनिस्ट विचारांचे होते तरी ते हिंदुत्ववाद्यांना आवडतात म्हणून इतके आश्चर्य का वाटावे? सावरकर कमालीचे विज्ञाननिष्ठ होते. हिंदुत्त्ववाद्यांना तेही प्रिय आहेत. समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात. शत्रूचा शत्रू तो माझा मित्र असे रोखठोक धोरण जास्त भावणारे होते. गांधी व नेहरूंचे ब्रिटिशांना मदत करण्याचे धोरण अनाकलनीय होते. निदान तटस्थ रहाता आले असते. हिटलर वा जपानी लोकांचे अत्याचार हे आवडतात म्हणून सुभाषचंद्रांना समर्थन द्या असे कुणाही भारतीयाला वाटले असेल असे वाटत नाही. भारतात ज्यू वा चिनी लोकांवर (अगदी मूठभर संख्येने असले तरी) वंशमूलक अत्याचार झालेले नाहीत. तसे करावेत असे कुणाला वाटत असेल असे मला वाटत नाही. तेव्हा हिटलरबद्दल आकर्षण असेल तर केवळ ब्रिटिशांचा शत्रू म्हणूनच. लाखो ज्यूंची कत्तल करणारा म्हणून नाही. तसेच सुभाषचंद्रांविषयीचा आदर हा कम्युनिस्ट विचारसारणी होती, खिलाफतचा समर्थक म्हणून नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

समूह जेव्हा एखाद्यावर फिदा

क्लिंटन
गुरुवार, 04/16/2015 - 22:37 नवीन
समूह जेव्हा एखाद्यावर फिदा होतो तेव्हा त्याचे १००% विचार पटलेले असतात असे नाही. तसे शक्य नाही. त्यातल्या त्यात उठून दिसणारी वैशिष्ट्ये आवडू वा नावडू शकतात.
बरोबर आहे ना. पण सावरकर विज्ञाननिष्ठ असले तरी त्यांना मुस्लिमांना राखीव जागा द्यावात असे वाटत होते का? अर्थातच प्रत्येकाला नक्की कोणते वैशिष्ट्य भावेल हा ज्याचा त्याचा मुद्दा झाला पण तरीही डावे विचार, मुस्लिम आरक्षण, खिलाफत चळवळ इत्यादी गोष्टी बघितल्या तर हिंदुत्ववाद्यांना अन्यथा न आवडणार्‍या गोष्टी सुभाषचंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. तरीही ते सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे कारण केवळ गांधींपेक्षा त्यांचा मार्ग वेगळा होता यापेक्षा वेगळा अर्थ काढता येईल का? एक तर अनेक लोकांना या गोष्टी माहित नसतात, आणि असल्या तरी ते सुभाषचंद्र गांधीजींपेक्षा वेगळ्या मार्गाचे म्हणून अशा अनेक अत्यंत क्रिटिकल गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की काय हा प्रश्न नक्कीच पडतो. २६ जानेवारी १९४३ रोजी सुभाषचंद्रांनी बर्लिनमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाल्यानंतर २६ जानेवारी १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला होता.त्यानंतर १९४७ पर्यंत २६ जानेवारी रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असे) कार्यक्रम आयोजित केला होता त्यात भाषण केले होते. नाझी रेजिमचा ज्यू द्वेष होता हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचे स्थलांतर चालू होते आणि अरबांमध्ये अस्वस्थता होती.ज्यू द्वेषामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने नाझी रेजिमचा या अरबांना पाठिंबा होता. याच अरबांपैकी जेरूसलेमचा मुफ्ती, ज्यूंची इराकमध्ये कत्तल करणारा इराकचा माजी पंतप्रधान इत्यादी या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी सुभाषचंद्रांनी केलेले भाषण बघितलेत तर ते कोणी केले आहे हे नाव न वाचता कोणी नुसते भाषण वाचले तर तो माणूस ताबडतोब दाढ्या कुरवाळणार्‍यांच्या गोटात सामील केला जाईल असे ते भाषण होते. या भाषणाच्या वेळी सुभाषचंद्र त्यांच्या सैनिकी गणवेषात किंवा धोतर-कुर्त्यामध्ये गेले नव्हते तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये गेले होते. आता ते काय घालून तिथे गेले यावरून फार तर्क करायची इच्छा नाही पण समोरचा ऑडिअन्स लक्षात घेता सुभाषचंद्र मुद्दामून काळ्या शेरवानीमध्ये तिथे गेले हे सूचकात्मक नव्हते का? "“By the beginning of the present century, the British … discovered the Muslim problem in year 1906 when Lord Minto was the Viceroy. Prior to this there was no such problem in India. In the great revolution in 1857, Hindus and Muslims had fought side by side against the British, and it was under the flag of Bahadur Shah, a Muslim, that India’s first war of independence was fought…. Consequently, the British policy has now fallen back on its last hope. If Indian people cannot be divided, then the country – India – has to be spilt up geographically and politically. This is the plan called Pakistan which has emerged from the fertile brain of a Britisher. Though the vast majority of the Indian Muslims want a free and independent India, though the president of the Indian National Congress today is Maulana Abul Kalam Azad, a Muslim, and though only a minority of the Indian Muslims support the idea of Pakistan, the British propaganda throughout the world gives the Indian Muslims are not behind the national struggle for liberty and want India to be divided up.” सुभाषचंद्र.ऑर्ग या वेबसाईटवर सुभाषचंद्रांची भाषणे दिली आहेत.त्यात बघूनही याची खात्री करता येईल. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की इतके विरोधाभास असूनही हिंदुत्ववादी विचारांचे लोक सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे नवल वाटते.विशेषतः ज्या कारणांसाठी गांधीजी दाढ्या कुरवाळणारे ठरतात नेमके तेच सुभाषचंद्रांनी केले तरी त्यांना पाठिंबा हे कोडे मला उलगडलेले नाही.आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे धोरण जपानसारख्या शत्रूच्या शत्रूसंदर्भात समर्थनीय नव्हते हे यापूर्वीच मिपावर मांडले आहे. भारतीय भूभागात इंटरेस्ट नसलेला इतर कोणताही शत्रूचा शत्रू परवडला असता आणि त्याला पाठिंबाच दिला असता पण जपानची केस वेगळी होती.त्यामुळे या कारणावरूनही लोक कसे काय सुभाषचंद्रांना पाठिंबा देऊ शकतात हेच कळत नाही. (स्पष्टीकरणः मला स्वतःला धर्माबिर्माचे फार नाही.पण तरीही मी एक उजव्या गटाचा राष्ट्रवादाला पाठिंबा देणारा आहे. तरीही माझ्यासारख्या विचारांचे अनेक सुभाषचंद्रांना कसा काय पाठिंबा देतात याचे कोडे नक्कीच वाटते. या बाबतीत तरी मी या टिपीकल उजव्यांप्रमाणे नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

जपान्यांना पाठिंबा.

अर्धवटराव
गुरुवार, 04/16/2015 - 22:54 नवीन
जर्मनी-जपानची बाजु घ्यायचं एक महत्वाचं आणि सोपं कारण म्हणजे जर हि राष्ट्रे युद्ध जिंकले असते (तशी शक्यता अगदी नगण्य नव्हती) तर ब्रिटीशांनी भारताला एक गुलाम भेट द्यावा तसा जर्मनी-जपानच्या हवाली केला असता. भारताकडे काहिच बार्गेन पॉवर नसती. सुभाषबाबुंच्या प्रयत्नांमुळे फॉर्मेलिटी म्हणुन का होईना, जपानने भारताला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला असता (तसंही आझाद हिंद सेनेचं सरकार जपान्यांनी मान्य केलच होतं). पुढे काय व्हायचं ते रामायण घडायचं ते घडलंच असतं, पण भारत एक स्वतंत्रराष्ट्र म्हणुन जपान्यांचा सामना करायला उभं राहिलं असतं. अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

गुलामगिरी

क्लिंटन
Fri, 04/17/2015 - 11:57 नवीन
अन्यथा ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी सुरु झाली असती.
पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात :( माझा मुद्दा १९४२-४३ च्या काळापेक्षा सध्याच्या काळास अधिक जास्त निगडीत आहे. सुभाषचंद्रांनी देश स्वतंत्र व्हावा याच उद्देशाने सगळा खटाटोप केला होता याविषयी कोणीही शंका घेऊच शकणार नाही.१९३७-३८ मध्येच ऑस्ट्रेलियातील आणि अमेरिकेतील वर्तमानपत्रांमध्ये जपान्यांनी चीनमध्ये कसे अत्याचार केले होते याविषयी बातम्या येत होत्या.इंग्लंडमधून आय.सी.एस झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पर्स्पेक्टिव्ह असलेल्या सुभाषचंद्रांनाही या बातम्या कळल्या नसतील हे मानणे तसे जडच जाते.पण सर्वसामान्यांना या बातम्या कळल्या नसतील तर ते नक्कीच समजू शकते.भारतातील सर्वसामान्य न्यू यॉर्क आणि मेलबर्नमधील वर्तमानपत्रे नक्कीच वाचत नव्हते.कदाचित त्याकाळी मी असतो तर त्या भारलेल्या वातावरणात आणि देश स्वतंत्र करायचाच आहे या उद्देशाने मी पण सुभाषचंद्रांना डोक्यावर धरले असते. पण २०१५ मध्ये पूर्वी माहित नसलेल्या या अनेक गोष्टी आता सर्वसामान्यांनाही माहित झाल्या असतानाही आजचे सर्वसामान्य लोक सुभाषचंद्रांना का डोक्यावर धरतात? नरहर कुरूंदकर म्हणाले होते ते किती बरोबर होते हे आता जाणवते-- "अहिंसेच्या मार्गाचा अवलंब न करणारे सगळेच क्रांतिकारक आणि सगळेच गांधीविरोधी. आणि असे सगळेच गांधीविरोधी म्हणजे हिंदुत्ववादी" अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.बहुदा म्हणूनच सुभाषचंद्रांना उजव्या गटाचेही लोक पाठिंबा देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जपानने

खंडेराव
Fri, 04/17/2015 - 14:00 नवीन
अंदमान बेटांवर भरपुर अन्याय केले. बरे ते अजुन पुढे आले नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१

क्लिंटन
Fri, 04/17/2015 - 14:07 नवीन
अंदमान बेटांवर भरपुर अन्याय केले. बरे ते अजुन पुढे आले नाहित.
जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले याविषयीचा हा लेख सुभाषचंद्रांच्या जपान्यांशी हातमिळवणी करायचे समर्थन करणार्‍या सगळ्यांनी वाचावा असा आहे. अनेकांना वाटते की जपान्यांना भारतीयांविषयी फार प्रेम होते आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून दिल्यानंतर आपल्याला गपगुमान स्वातंत्र्य दिले असते. जपान्यांनी अंदमानात नक्की काय केले हे वाचल्यास हा गैरसमज गळून पडायला हरकत नसावी.आपले मोठे नशीब की जपानी आणि आझाद हिंद सेना यांचा पराभव झाला.अन्यथा जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात केले होते अगदी तसेच अत्याचार भारतातही झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

जपान्यांचे अत्याचार

कपिलमुनी
Fri, 04/17/2015 - 17:01 नवीन
जपानी लोकांचे अत्याचार वाचल्यावर ते विकॄत असल्याची खात्री पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे ..

बबन ताम्बे
Fri, 04/17/2015 - 19:11 नवीन
बोका-ए- आझम यांची एक लेखमालिका आहे मिपा वर. त्यात काही लेखांमध्ये दुस-या महायुद्धात जपान्यांनी कीती कृर अत्याचार केले त्याचे शहारे आणणारे वर्णन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

क्लिंटन साहेब,

काळा पहाड
Sat, 04/18/2015 - 00:48 नवीन
क्लिंटन साहेब, स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा काही रोल होता का? बिलकुल होता. आझाद हिंद सेनेचं बनणं, त्यांचं ब्रिटिशांविरुद्ध उभं रहाणं आणि त्यांची कोहिमापर्यंत धडक यानं ब्रिटीश हादरले. त्यांची संपूर्ण मदार २ गोष्टींवर अवलंबून होती. १) भारतीय सैन्याची निष्ठा आणि २) त्यांच्या साम्राज्यावर न मावळणारा सूर्य (थोडक्यात, त्यांची आर्थिक आणि सामरिक महासत्ता असणं). दुसर्‍या महायुद्धानं दुसर्‍या गोष्टीची वाट लावली. आझाद हिंद सेनेनं बाकीच्या भारतीय सैन्यासमोर एक असं उदाहरण उभं केलं की ज्यामुळे त्यांच्या साम्राज्याला धोका उत्पन्न झाला. ब्रिटिशांनी शहाणपणाचा निर्णय घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

नक्कीच

क्लिंटन
Sat, 04/18/2015 - 11:27 नवीन
नक्कीच. स्वातंत्र्य मिळण्यात आझाद हिंद सेनेचा वाटा नक्कीच होता.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी हातमिळवणी करण्यापुरता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

Posterity will ask

arunjoshi123
Mon, 04/20/2015 - 17:39 नवीन
Posterity will ask uncomfortable questions about the vandalism of the Japanese and the role played by them for the freedom of India in collaboration with Subhas Chandra Bose. Ironically, Bose was in Port Blair between December 29-31, 1943. He visited the cellular jail where Diwan Singh, the president of the Indian Independence League and hundreds of his companions were languishing, but he did not visit them. After wining, dining and dancing in the Ross Island he went back to Singapore. This is how Tojo helped Bose to get freedom for India from the British.
असे लेखात लिहिले आहे. याची भाषा लेखकाच्या मानसिकतेची सूचक आहे. बाय द वे, जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर हेच अत्याचार त्यांनी मणिपूरमधे का केले नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

??

क्लिंटन
Mon, 04/20/2015 - 18:10 नवीन
अंदमानात अत्याचार केले त्याचे काय?
जॅपनीज सैन्य जर असलेच होते तर....
म्हणजे जपानी सैन्याने दक्षिण-पूर्व आशियात जो धुमाकूळ घातला होता त्याकडे दुर्लक्ष करून जपानी सैन्य तसले नव्हते असे तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या नंदनवनात सुखात रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

जपानी सैन्य तसले नव्हते

arunjoshi123
Mon, 04/20/2015 - 18:23 नवीन
जपानी सैन्य तसले नव्हते
नाह. नाह. मला तसले नव्हते, इ इ नै म्हणायचं. -------------------------------------------------- युद्धोत्तर काळात चुकुनमाकून जपानचं भारतावर राज्य असतं (एकतर यातल्या चुकुनमाकून शब्दावरच तुम्हाला आपत्ती आहे, पण ते असो.) तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे त्याचा स्रोत काय आहे हे जाणायचे आहे. म्हणजे जपानचे शांतिकालीन अत्याचार, इ इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

कै च्या कै

क्लिंटन
Mon, 04/20/2015 - 18:42 नवीन
तर ते अत्यंत दुष्टपणे भारताशी वागले असते असा जो आपणांस आत्मविश्वास आहे
का हो जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात अगदी १९४० च्या दशकात जे काही केले ते तुम्हाला दिसत नाही का?इतर ठिकाणचे सोडाच आपल्याच अंदमानातही केले ते पण तुम्हाला दिसत नाही का? जे त्यांनी अंदमानातही केले ते बंगालमध्ये कशावरून केले नसते? एखादी गोष्ट विष आहे हे समजले की त्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे हे मला समजते. तुम्हाला हवे असेल तर ते विष आहे की नाही हे पिऊन खात्री करावीशी वाटत असेलही. मला तसे वाटत नाही. आणि तुम्ही मला प्रश्न विचारत आहात की जपानी भारताशी दुष्टपणे वागले असते हा विश्वास कशावरून तसाच मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की ते भारताशी दुष्टपणे वागले नसते हा विश्वास तुम्हाला कशावरून वाटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

युद्धकालीन परिस्थिती आणि

arunjoshi123
Mon, 04/20/2015 - 18:57 नवीन
युद्धकालीन परिस्थिती आणि शांतिकालीन परिस्थिती यांत फरक आहे. I don't think either of us has adequate evidence to establish who was more cruel and whether Japan would have been a worse ruler in peacetime. असो, आपणाशी दर्जात्मक आणि वस्तुनिष्ठ संवाद झाला आहे त्याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

शांतिकालीन परिस्थिती

वॉल्टर व्हाईट
Mon, 04/20/2015 - 22:33 नवीन
युद्धकालीन परिस्थिती आणि शांतिकालीन परिस्थिती यांत फरक आहे
हा मुद्दा दमदार आहे खरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

नव्या मुद्द्यांविषयी

क्लिंटन
Tue, 04/21/2015 - 10:57 नवीन
नवे मुद्दे आल्यामुळे त्याविषयी लिहित आहे. माओने त्याच्या २७ वर्षांच्या राजवटीत लाखो लोकांना ठार मारले. स्टॅलिननेही तेच केले. आता हा शांततेचा काळ म्हणायचा की युध्दाचा? अन्य कोणत्या देशाशी प्रत्यक्ष युध्द चालू नसलेला काळ शांततेचा म्हटला तरी लाखांना ठार मारले जात असेल तर तो काळ शांततेचा कसा? जपानी फिलीपीन्समध्ये घुसले जानेवारी १९४२ मध्ये. नोव्हेंबर १९४४ मध्ये त्यांना तिथून मागे रेटले गेले. जानेवारी १९४२ नंतर जपान्यांनी पॅसिफिकमधील इतर अनेक ठिकाणे जिंकली होती आणि आपले क्षेत्र फिलीपीन्सपेक्षा बरेच वाढवले होते. अमेरिकन सैन्याने जपान्यांवर फिलीपीन्समध्ये हल्ला केला तो अगदी १९४४ मध्ये. मधल्या काळात तिथे शांतता होती की जपानी इतरत्र युध्दात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? दोन्ही बाजू आपल्या सोयीप्रमाणे तिथे शांतता होती किंवा युध्दजन्य परिस्थिती होती असे म्हणू शकतात. तसेच अंदमानात एकदा जपानी घुसल्यानंतर शांतता म्हणायची की जपानी इतरत्र युद्धात असल्यामुळे युध्दजन्य परिस्थिती? तेव्हा जपानी खुनशी होतेच आणि त्यांना युद्धजन्य परिस्थितीची सूट देता येईल असे मला तरी वाटत नाही. तुम्हीच अन्य एका प्रतिसादात जपान्यांना भारताविषयी तो बुध्दाचा देश म्हणून प्रेम वाटत होते असे लिहिले आहेत. म्हणजे जपानी जे काही करत होते तो बुध्दाचा मार्ग होता का? आणि अनेकांना हिटलर आर्य वंशाचा उदोउदो करायचा आणि भारतही मुळातला आर्य लोकांचा देश म्हणून हिटलरलाही भारताविषयी प्रेम होते असा उफराटा सिध्दांत मांडतात. कालच मिपा सदस्य राजघराणे यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयीच लिहिले आहे आणि असे वाटणार्‍यांचे मत कसे चुकीचे आहे हे दाखविओन दिले आहे. आता सगळी दुनिया भारताभोवती फिरत होती आणि सगळ्यांना आपल्याला मदत करायची होती असे वाटायला लागले तर खरोखरच अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा