✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे

म
माहितगार यांनी
गुरुवार, 02/19/2015 - 16:51  ·  लेख
लेख
* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे गावांच्या नावांच्या अभ्यासाला टोपोनिमी मराठीत स्थलनाम अभ्यास असे म्हणतात. गावांच्या नावांच्या भेंड्या खेळण्या पलिकडे जाऊन विशीष्ट भौगोलीक परिसरातील भाषेचा आणि मानवी स्थलांतराचा ढोबळ अंदाज येण्यास स्थलनाम अभ्यास उपयूक्त ठरू शकतो. अर्थात असे अंदाज ढोबळच असू शकतात त्यावरून अंतीम स्वरूपाचे निष्कर्ष काढणे सयुक्तीक असेलच असे नाही. * आता पर्यंत या धाग्यावर झालेल्या चर्चा ** अणसूर, पनस, फणस , कणस , सणस, अनासपुरे ** कुडाळ / कुडाल / कुटाल आणि चेन्नई / मद्रास ** थिर': थिरूपती, थिरूअनंतपूरम आणि कोविल : नागरकोविल - (मिपा सदस्य मार्गी) ** होसा, आणि उर - पेट्टे, हळे (मिपा सदस्य कंजूस, शेखरमोघे) उर ** मालेगाव - (मिपा सदस्य टोपी) ** मुंगी-पैठण ** आबाद, ग्राद, ग्राम, गाव - (मिपा सदस्य हुप्प्या) ** हिंग्लजा माता आणि स्थळनामे ** वट/वड / वाडी / वादी / वडूज ** बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख - (मिपा सदस्य आदूबाळ) ** रावळपींडी ** प्रत्यत : मळा , मळी किंवा मळा; उदा मालवण, मलावन, करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, *** सर्वांच्याच चर्चा सहभागाचे आभार. जिथे कमी जागेत सहज शक्य आहे तेथे उपचर्चा चालू करणारे किंवा महत्वपूर्ण माहिती विश्लेषणात योगदान करणार्‍या सदस्यांचा संदर्भाच्या दृष्टीने युक्त जावे म्हणून सदस्य नामोल्लेख कंसात करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येक चर्चा सहभागीचे नाम नमुद करणे पूर्ण जागा त्यातच व्यापली जाऊ नये म्हणून टाळले आहे. सर्वांच्याच चर्चा सहभागाचे पुनश्च्च आभार. अलिकडेच आंतरजालावर वाचन करताना श्री लंके मध्ये महारागाम नावाचे तर आझरबैजान देशात लंकारन अशी नावे योगा योगाने वाचण्यात आली. भारतात ur, ner, palli, , veli, cheri, pat, kuppam, padi, , vayal, vani (wani), vali, wadi इत्यादी प्रत्यय असणार्‍या ग्रामनामांची मोठीच संख्या आहे. यातील 'उर', 'नेर', 'पत/पात/पाट', 'वट' हे प्रत्यय असलेली ग्राम नामे इराण मध्येही आढळत असावीत नगर हे प्रत्यय असलेली ग्राम नामे अफगाणीस्तानातही असावीत. यातील बरेच प्रत्यय आपल्या वापरात वाचनात एवढे सरावलेले असतात की सहज जाणवतही नाहीत पण आजकाल आंतरजाल आणि सोप्या संगणकीय सुविधांनी ग्रामनामातील एकसारख्या प्रत्ययांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. *भारतातील ग्राम नामे ऑनलाईन शोधण्यायोग्य सुविधा **सेंसस इंडीया **पोस्टल पिनकोड **लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी * अफगाणीस्तानातील गावांची यादी या दुव्यावर उपलब्ध असलेली आढळली * United Nations Group of Experts on Geographical Names यांच्या वेब पेजवर इतर काही देशांसोबतच इराणमधील गावांची नावांची यादीचा दुवा आहे. * युके मधील गावांच्या नावांच्या प्रत्ययांची यादी इंग्रजी विकिपीडियावरील लेखात उपलब्ध आहे. (हा धागा लेख मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावांशी संबधीत असला तरी संदर्भा साठी म्हणून हा दुवा नमूद केला आहे. मला स्वतःला मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांच्या नावातील साधर्म्याची माहिती शोधण्यास आवडते. खासकरून अझरबैजान आणि अर्मेनिया या देशातील ग्रामनामांमध्ये मला सध्या बर्‍या पैकी रस आहे पण अफगाणिस्तान इराणच्या ग्रामनामांच्या सविस्तर याद्या जेवढ्या सहजतेने आंतरजालावर शोधता आल्या तेवढ्या सहजतेने मध्य आशियातील इतर देशांच्या माझ्या शोधात मला मिळाल्या नाहीत. कुणाला त्या उपलब्ध होऊ शकल्यास अथवा मध्य आशियातील नोंद घेण्याजोगी ग्रामनामाची साधर्म्ये आढळल्यास या धागा प्रतिसादातून नोंदवावीत अशी विनंती आहे. * शोधगंगावरील शोध प्रबंध दुवे ** Cultural history of the konkan based on silahara inscriptions Researcher: Paranjape, Binda चॅप्टर ९ पिडीएफ दुवा * माझे स्थलनाम विषयक उप धागे * अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश * कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव * आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी * माझे शब्द व्युत्पत्ती विषयक ईतर धागे * शोध स्तूप आणि स्तव शब्दांचा * मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? * पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः * गुढी उभारनी * आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ... * स्थलनाम आणि शब्द व्युत्पत्तीशी संबधीत ईतर धागे * येल्ला आणि तीच्या दासी * राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी * टवळी आणि सटवी * मिसळपाव बाह्य शब्द व्युत्पत्ती धागे (माझे) * झक मारणे: झक, झक्कू आणि झकास
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35987 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

मालवण

सतीश कुडतरकर
Fri, 02/20/2015 - 14:16 नवीन
सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण - Malvan इराण मधील मलावन - Malavan
  • Log in or register to post comments

वर नोंदवलेल्या अफगाणि यादीत

माहितगार
Fri, 02/20/2015 - 18:11 नवीन
वर नोंदवलेल्या अफगाणि यादीत van असलेल एकच Karvan Kasi या नावाने अपवाद मिळाल. अर्थात सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये माळ + वन हे सहज लक्षात येतात इराणच्या यादीत शोध दिल्या नंतर van असलेला Ābgāvān सारख्या नावांचा दहा पानांचा तरी शोध येतो आहे. वर UNGEGN वरून मिळणारा इराणी स्थल नामांचा डाटाबेस सॅटेलाईट व्ह्यूला जोडला आहे. van, ur, ner, हे शब्द शोधताना त्याचे लोकेशन दोन मोठ्या जलाशयांच्या मध्ये दिसते आहे. जलाशयांची नावे त्या सॅटेलाईट व्ह्यूला डायरेक्टली नमुद केलेली नाहीत ते कास्पीअन सी आणि लेक उर्मीया असतील का ते पाहून कुणी सांगू शकेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

अफगाणी यादीत Mal बहुधा दोन

माहितगार
Fri, 02/20/2015 - 18:24 नवीन
अफगाणी यादीत Mal बहुधा दोन प्रकारात येत असावे एक तर मलंग,मलीक,मलाल,जमाल अशा नावात येते आहे पण अर्थातच त्यांचा इथे संबंध नाही. शमाली शोमाली अशी नावे दिसतात त्यांचा अर्थ सुभा असा होत असेल का ? Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, अशा प्रकारशी malestan या नावाचा प्रांताचे नावही दिसते आहे यातील mala भारतातील माला उच्चाराशी संबधीत असेल का हे त्यांच्या भाषांची पार्श्वभूमी असल्या शिवाय सांगता येणार नाही पण साधर्म्य रोचक वाटत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

शमाली शोमाली अशी नावे दिसतात

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 18:42 नवीन
शमाली शोमाली अशी नावे दिसतात त्यांचा अर्थ सुभा असा होत असेल का ? शमाली / शोमाली हे दिशादर्शक विशेषण आहे... अश् शर्क (الشَّرق) = पूर्व अल् घर्ब (الغَرب) = पश्चिम अश् शम्माल (الشَّمال) = उत्तर अल् जनूब (الجَنوب) = दक्षिण शमाली = उत्तरेकडे असलेले ठिकाण / उत्तरेकडून येणारा/री (व्यक्ती, वारा, पाऊस, इ) शोमाली हे शमालीचे एक बोलीरूप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ग्रेट शोमाली शब्द ऐकण्यात

माहितगार
Fri, 02/20/2015 - 18:46 नवीन
ग्रेट शोमाली शब्द ऐकण्यात होता नेमका अर्थ माहित नव्हता. रोचक माहितीसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

माला नाही

पैसा
Fri, 02/20/2015 - 19:55 नवीन
मळा आहे ते. मळी किंवा मळा शेवट येणारी गावे असतात. उदा. करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ (ही सगळी गोव्यातली गावे आहेत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

माला नाही..मळा आहे ते

माहितगार
Sat, 02/21/2015 - 17:22 नवीन
माला नाही..मळा आहे ते
उसगाळीमाळ आणि पनसामाळ मध्ये माळ हा प्रत्यय सुस्पष्ट दिसते आहे. मळा प्रत्यय घेणारी गावे महाराष्ट्रात आहेत गोव्यात अथवा कोकणीत माळ हा शब्द मळा या अर्थाने येतो असे आपणास म्हणावयाचे आहे का ? (मळा हा शब्द दक्षिण भारतीय भांषांमध्ये सुद्धा वापरला जातो का याची माहिती जाणकारांनी द्यावी). परंतु मळा हा शब्द उत्तर भारतीय भाषात अथवा संस्कृतात माझ्या ऐकण्यात नाही असल्यास जाणकारांनी अधीक माहिती द्यावी. माळ हा शब्द मराठीत मुख्यत्वे गळ्यात घालण्याचा दागिना. आणि माळ - वैराण, सपाट प्रदेश या दोन अर्थांनी वापरला जातो. पुस्तक डॉट ऑर्ग या ऑनलाईन हिंदी डिक्शनरी नुसार माल या शब्दाचे माल पुं० [सं० मा+ रन्, र—ल, पृषो०] १. क्षेत्र। ३. वन। जंगल। ६. एक प्राचीन अनार्य या म्लेच्छ जाति। ६. एक प्राचीन देश। हे अर्थ भौगोलीक प्रदेशांच्या संदर्भाने दखल घेण्या जोगे वाटतात. महाराष्ट्रात माळ हा प्रत्यय माळ - वैराण, सपाट प्रदेश या अथवा उपरोक्त भौगोलीक अर्थाने बर्‍याच गावांच्या नावात येत असावा. मालेगाव, माळेगाव, माळशिरज, माळशेज, यवतमाळ इत्यादी त्या शिवाय माळवा, ह्या भौगोलीक प्रदेशाचे नावही मराठी लोकांना सुपरिचीत आहे. पुस्तक डॉट ऑर्ग नुसार मालद नावाच्या प्रदेशाचा उल्लेख रामायणात त्राटीकेने उजाड केलेल्या प्रदेश म्हणून येतो. मालदा/मालदह हे बिहार मधील शहर आहे. आपण मराठी लोक माळा शब्दाचा हिंदी उच्चारण माला असे करण्याचा प्रयत्न करतो तसे अफगाणी उच्चारणांबाबत झाले असू शकेल का हा विचार करून मी वरच्या प्रतिसादात mala शब्दाचा वर उल्लेख भौगोलीक क्षेत्र या अर्थानेच केला. अर्थात प्रत्यक्षात तुम्ही म्हणता तसेही असू शकेल का ते अधीक भाषाशास्त्रीय शोध घेतल्या शिवाय नक्की सांगता येणार नाही असे वाटते. आपण अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, या शब्दांबद्दल चर्चा करत आहोत आणि तेथेही फळबागा भरपूर असणार पण त्यांना मळा म्हणत असावेत यासाठी इतर भाषिक संदर्भांची गरज पडेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माळ आणि मळा वेगळे

पैसा
Sat, 02/21/2015 - 18:03 नवीन
माळ म्हणजे ओसाड गवताळ पठार, मळा म्हणजे भाजीचा/फळांचा/शेतीचा पट्टा. लहान मळा म्हणजे मळी. अफगाणिस्तानात तोच अर्थ असलेले वेगळ्या उच्चाराचे शब्द असू शकतील कारण या दोन्ही प्रदेशातल्या भाषांचे कूळ एक असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हा हा हा …

पगला गजोधर
Sat, 02/21/2015 - 13:54 नवीन
यु एस ए पेनसिल्वेनियातील मालव्हर्न….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख हे

आदूबाळ
Fri, 02/20/2015 - 15:45 नवीन
बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख हे भारतापासून ते हॉलंडपर्यंत स्थळनामांत वारंवार येतं. गॅरिसन/फोर्टिफिकेशन असा काहीसा अर्थ असावा.
  • Log in or register to post comments

बुर्ज-बर्ग हा संबंध माहित

माहितगार
Fri, 02/20/2015 - 18:35 नवीन
बुर्ज-बर्ग हा संबंध माहित नव्हता. आशियाई नावांशी साधर्म्य असणारी अजून काही युरोपीय उदाहरणे आहेत का ? कारण माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनात तशी कमी आलीत. बुर्ज-बर्ग अशा प्रकारचा बदल लक्षवेधल्या शिवाय लक्षात येईलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

स्पेनमध्ये इस्लामी राज्य होते

विशाखा पाटील
Fri, 02/20/2015 - 20:19 नवीन
स्पेनमध्ये इस्लामी राज्य होते, त्यामुळे तिथे अरब नावांचा प्रभाव सापडतो. उदा. 'बेने' म्हणजे '..ची मुलं'. (भारतात आलेल्या ज्यूंची ओळख 'बेने इस्राईल' अशी आहे.) बेने नावाने सुरू होणारी स्पेनमध्ये गावे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

+१

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 20:31 नवीन
+१ बिन् = इब्न (= चा मुलगा) वापरून नावे लिहीण्याची प्रथा सर्व मध्यपूर्वेत आहे. बेने हा शब्द त्याच अर्थाने जास्त करून इझ्राईली / ज्यूंमध्ये वापरला जातो. (मुलाचे नाव) बिन् (वडीलांचे नाव) बिन् (आजोबांचे नाव) (टोळी/ट्राईबचे नाव) असे पूर्ण नाव होते. उदा: फहाद बिन्/इब्न अब्दुलाझिझ बिन्/इब्न तारिक अल् सौद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

+१

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/21/2015 - 18:56 नवीन
+१ त्यात "बुर्ग" पण सामील करा. उदा. हांबुर्ग (जर्मनीतले एक शहर) इतर काही उदाहरणे: संस्कृत ---> जर्मन (उच्चार) रथ ---> rad (राड) अक्ष ---> achse (आख्शं) नाभी ---> naba / nabe (नाबा / नाबं) गर्भ ---> grifan / griff (ग्रिफान / ग्रिफ्) याशिवाय मातृ, पितृ, भ्रातृ, हस्त, इ कित्येक संस्कृत शब्दांची (जे आजच्या अनेक भारतीय भाषामध्ये तसेच्या तसेच अथवा थोड्याफार फरकाने रूढ आहेत) अनेक युरोपियन भाषांची जवळीक सर्वमान्य आहेच. आशियातील भारतापासून ते मुख्य युरोप खंड, ब्रिटनसारखी बेटे आणि वसाहतवादामुळे अमेरिका यांचा मानवी प्रसरणात संबंध आहे. अर्थातच, या प्रचंड आकाराच्या भूभागावर प्रचलीत असलेल्या भाषांत बरेच दुवे आढळून येतात. म्हणून या सर्व भाषांना "इंडो-युरोपिअन भाषाकुटुंब (लँग्वेज फॅमिली)" म्ह्टले जाते. मात्र, शतकानुशतके एकमेकापासून हजारो किलोमीटर अंतराने विभागलेल्या या भाषांतील शब्दांचे उत्पत्ती-संबध लावताना केवळ उच्चारसाधर्म्यावर अवलंबून न राहता त्यांत (अ) अर्थसाधर्म्य व (आ) व्याकरणसाधर्म्य आहे की नाही हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.

इंडो-युरोपिअन भाषाक्षेत्र : अशिया आणि युरोप

Image removed. Image removed.

.

इंडो-युरोपिअन भाषाक्षेत्र : अमेरिका

Image removed. Image removed.

.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

इंडो युरोपीयन भाषागटात परस्पर

माहितगार
Sat, 02/21/2015 - 19:34 नवीन
इंडो युरोपीयन भाषागटात परस्पर साधर्म्य आहे पण ते टोपोनिमीतही खासकरून गावांच्या नावांच्या बाबतीत त्याच प्रमाणात आहे असे म्हणता येईल की गावांच्या नावांच्या बाबतीत साधर्म्य कमी आहे. गावांच्या नावांच्या बाबतीत साधर्म्य कमी असेल तर स्थलांतर विषयक निष्कर्षात फरक पडावयास हवे असतील या बाबत अधिक माहिती मिळाल्यास वाचावयास आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बंगळूरुमधे येलहंका नावाचा भाग

आशु जोग
Fri, 02/20/2015 - 15:53 नवीन
बंगळूरुमधे येलहंका नावाचा भाग आहे. महाराष्ट्रापेक्षा बंगळूरु ये लंका के पास है म्हणून येलहंका नाव असावे असे आमचा गग्गी म्हणतो.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रापेक्षा बंगळूरु ये

माहितगार
Fri, 02/20/2015 - 18:37 नवीन
महाराष्ट्रापेक्षा बंगळूरु ये लंका के पास है म्हणून येलहंका नाव असावे असे आमचा गग्गी म्हणतो.
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

काका, तुमचे धागे पाहून मला

हाडक्या
Fri, 02/20/2015 - 19:31 नवीन
काका, तुमचे धागे पाहून मला उपक्रमाची खूप खूप आठवण येते हो.. तुम्हाला उपक्रमासारख्या संस्थळाची खूप गरज आहे. (कुठे नेऊन ठेवलाय उपक्रम माझा?)
  • Log in or register to post comments

हम्म.. असूद्यात मिसळपाव खात

माहितगार
Sat, 02/21/2015 - 17:28 नवीन
हम्म.. असूद्यात मिसळपाव खात खात उपक्रम करुयात की, गावांच्या नावांचा आंतरजालीय शोध एक चांगला छंद/उपक्रम आहे सवडीनुसार जरुर जॉईन व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

श्रीलंकातील गावांच्या मोठ्या

कंजूस
Fri, 02/20/2015 - 19:42 नवीन
श्रीलंकातील गावांच्या मोठ्या नावाची फोड करून कसे लक्षात ठेवायचे याबद्दल लोनली प्लानेट च्या पुस्तकात फार छान माहिती दिली आहे त्याची आठवण झाली अर्थात प्रताधिकारात असल्याने चूप.
  • Log in or register to post comments

ओके. एखाद्या गावाच्या

माहितगार
Sat, 02/21/2015 - 17:34 नवीन
ओके. एखाद्या गावाच्या नावाबद्दल इतर लोक काय म्हणतात याची चर्चा करताना लोनली प्लानेट काय म्हणत याची चर्चा समीक्षण या कॅटेगरीत बसून कॉपीराईट अपवादात मोडेल असा अंदाज आहे. बाकी माहितीसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पाकीस्तानातील रावळपींडी हे

खटपट्या
Sat, 02/21/2015 - 03:09 नवीन
पाकीस्तानातील रावळपींडी हे गाव मला नेहमी भारतात असल्यासारखे वाटते. कोकणातल्या माझ्या गावाच्या बाजुच्या गावाचे नाव "भू" असे आहे. :) आता जीथे काम करतोय तीथे एका नदीचे नाव कर्न रीव्हर असे आहे. आम्ही आपले उगाच म्हणतो "प्राचीन काळी इथे कर्ण येउन गेला असावा" :) तसेच योशमाईट जंगलाला बरेच भारतीय "यशोमती पार्क" असे म्हणतात. :)
  • Log in or register to post comments

योशमाईट नाय मालक, त्याचा

पिवळा डांबिस
Sat, 02/21/2015 - 04:23 नवीन
योशमाईट नाय मालक, त्याचा उच्चार योसेमिटे असा आहे. मला वाटतं तो रेड (अमेरिकन) इंडियन भाषेतला शब्द आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पाकीस्तानातील रावळपींडी हे

आशु जोग
Sat, 02/21/2015 - 11:59 नवीन
पाकीस्तानातील रावळपींडी हे गाव मला नेहमी भारतात असल्यासारखे वाटते. यावर माहितगार यांच्याकडून उत्तर मिळणार नाही. त्यांची फ्रीक्वेन्सी भलतीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आमच्या अनुपस्थितीचे परस्पर

माहितगार
Sat, 02/21/2015 - 17:40 नवीन
आमच्या अनुपस्थितीचे परस्पर नाहीते अर्थ लावून 'आमच्या अखंड भारत पक्षातील लोकांना' नाहक फितुर करण्याच्या प्रयत्नांचा आम्ही तीssव्र णिषेध करटो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

पाकीस्तानातील रावळपींडी हे

माहितगार
Sat, 02/21/2015 - 17:44 नवीन
पाकीस्तानातील रावळपींडी हे गाव मला नेहमी भारतात असल्यासारखे वाटते.
हे बरय जो भागच भारताचा होता (आणि भविष्यात पुन्हा असेल) त्यातील एका गावाच्या नावा बद्दल असल्या सारखे वाटतेय म्हणताय :) आमच्या अखंड भारत पक्षात पूर्णपणे सामील व्हा की ! अए तळ्यात मळ्यात कशामुळे ? आमच्या अखंड भारत पक्षाला बाकी कर्न रीव्हर आणि योशमाईटचे जंगल नको आहे आम्हाला आमच्या सीमा सांभाळता आल्यातरी पुरे आहेत ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अखंड भारत पक्ष ? येतो की.

खटपट्या
Mon, 02/23/2015 - 00:27 नवीन
अखंड भारत पक्ष ? येतो की. फोर्म भरावा लागतो की प्रवेश फी द्यावी लागते ? मुख्यालय कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मिपावरूनच कंपू स्वरूपात चालू

माहितगार
Wed, 02/25/2015 - 14:52 नवीन
:) मिपावरूनच कंपू स्वरूपात चालू करून पुढे पक्ष म्हणून वाढवण्याचा इरादा आहे ! तुर्तास आमच्या समवेत कंपूगिरीत सहभाग नोंदवण्या शिवाय इतर काही फॉर्मॅलिटी नाहीत. मिपा हेच मुख्यालय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

दिल्ली

पिवळा डांबिस
Sat, 02/21/2015 - 04:21 नवीन
लुईझियानामध्ये एका गावाचे नांव Delhi आहे. पण शिंचे त्याचा उच्चार मात्र डेल्हाय असा करतात!!!
  • Log in or register to post comments

ग्रेट इंग्रजी विकि तपासला

माहितगार
Sat, 02/21/2015 - 17:51 नवीन
ग्रेट इंग्रजी विकि तपासला तेव्हा युएस मध्ये अर्धाडझन तरी Delhi दिसताहेत खरच तिकडेच अजून एक भारत उघडायला हरकत नै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

Vaduz Capital of Liechtenstein

कापूसकोन्ड्या
Sat, 02/21/2015 - 07:10 नवीन
Vaduz Vaduj, Maharashtra 415506
  • Log in or register to post comments

रोचक माहिती महाराष्ट्र आणि

माहितगार
Sat, 02/21/2015 - 18:27 नवीन
रोचक माहिती महाराष्ट्र आणि भारतात वट/वड पासून वाडी वगैरे काही प्रत्यय आहेत त्याच प्रकारे महाराष्ट्रातले वडूज संभवेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

अरबीमध्ये सुकलेल्या

विशाखा पाटील
Sat, 02/21/2015 - 22:32 नवीन
अरबीमध्ये सुकलेल्या नदीपात्राला आणि दरीला 'वाडी' असे म्हणतात आणि अरबी स्थलनामांमध्ये वाडी हा प्रत्यय सापडतो. महाराष्ट्रात अरबी आणि फार्सीच्या प्रभावातून हा शब्द आला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

बरोबर आपल्याकडे हिंदी उर्दुत

माहितगार
Sat, 02/21/2015 - 23:05 नवीन
बरोबर आपल्याकडे हिंदी उर्दुत 'वादी' असा होऊन येतो. पण वट/वड पासून आपल्याकडे अनेक शब्द आहेत जसे की वाटीका, वाडा. आपल्याक्डील ग्राम नाम वाडी हे 'वाडा' पासून झाले असण्याची शक्यता मला अधीक वाटते आहे. वट हे झाडाचे नाव प्रोटो इंडोयुरोपीय्न भाषाकुळात राहीले असेल तर दरी या अर्थाचा अरेबीक वाडी/वादी सुद्धा त्यापासून आलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वाटते अर्थात मी चूकही असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

तो अरबी शब्द वाडी नसून "वादी"

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/22/2015 - 14:47 नवीन
तो अरबी शब्द वाडी नसून "वादी" असा आहे. वादी म्हणजे दरी. फार पूर्वी अरबस्थानात पाण्याने भरलेल्या नद्या होत्या तेव्हा त्यांच्या पाण्याच्या ओघाने या वाद्या (दर्‍या) बनलेल्या आहेत. आता त्यातील फारच कमी वाद्यांमध्ये पाणी असते, बहुतेक सर्व कोरडी ठणठणीत झालेली पात्रे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

थोडस अवांतर

सतीश कुडतरकर
Sat, 02/21/2015 - 11:36 नवीन
थोडस अवांतर आमच्या चायवाल्याकडे 'प्रातःकाल' नावाचा हिंदी पेपर येतो. त्यात राजस्थान मधील बातम्या असतात. कधी नजरेखालून घातल्यास महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील गावांच्या नावाचेच एखादे गाव असतेच असते. जसे रत्नागिरीतील चिखली, खेड. ठाणे जिल्ह्यातील केळवा (Beach). कारण कोकणातील सध्याचे निवासी काही निवडक जाती सोडल्यास स्थलांतरित आहेत.
  • Log in or register to post comments

रोचक, भारतातल्या भारतात तर

माहितगार
Sat, 02/21/2015 - 18:30 नवीन
रोचक, भारतातल्या भारतात तर खूप एकसारखी गाव नावे आहेत बरीच नावे भारतच्या चारही टोकास आढळतात, डाटाबेस सर्च केलेतर थक्क व्हावयास होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

Prague - प्रागज्योतिषपूर

आदूबाळ
Sat, 02/21/2015 - 12:20 नवीन
Prague - प्रागज्योतिषपूर Gowda असं हॉलंडमधल्या एका गावाचं नाव आहे. पण त्याचा उच्चार "खावडा" असा आहे.
  • Log in or register to post comments

रोचक माहिती Gowda युरोपात

माहितगार
Sat, 02/21/2015 - 18:33 नवीन
रोचक माहिती Gowda युरोपात एकच असेल का अजून असतील आपली दक्षीण भारतीय मंडळी खुष होतील. :)
  • Log in or register to post comments

फ्रांसमध्ये एक सचिन नावाचे

हाडक्या
Tue, 02/24/2015 - 23:35 नवीन
फ्रांसमध्ये एक सचिन नावाचे गाव आहे.. :)
  • Log in or register to post comments

स्कॉटलंडी ठाणं

गामा पैलवान
Fri, 06/01/2018 - 23:42 नवीन
स्कॉटलंड मध्ये ठाणे नावाचं गाव आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

चुकलो, ते बिरूद आहे.

गामा पैलवान
Fri, 06/01/2018 - 23:43 नवीन
चुकलो, ते बिरूद आहे. क्षमस्व! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हिंग्लजा माता आणि स्थळनामे

माहितगार
Wed, 02/25/2015 - 15:07 नवीन
देवीच्या शक्तिपीठांपैकी एक हिंग्लजा मातेचे मंदीर बलुचीस्तानात स्थीत आहे (त्या देवीची स्थानिक मुस्लिम आणि राजस्थानादी प्रांतात चांगलीच फोलोअरशीप (भक्तगण) आहेत). कदाचीत अफगाणिस्तानातही मंदिर राहीले असावे असा गूगल बुक्सचा (हिंदी) संदर्भ दिसतो आहे पण दुजोर्‍यासाठी अफगाणिस्तानच्या डाटाबेस मध्ये पडताळता आला नाही. या देवीची नावे भारतात स्थळनामात आली असावीत असे दिसते. बलुचीस्तानमधील देवी गावाचे स्थलनाम हिंग्लज असेच आहे आणि तेथील नदीचे नाव हिंगोल आहे. हिंग्लजगड नावाने एक शक्तीपिठ माळव्यात मध्यप्रदेशात असावे. उत्तरप्रदेशात हिंगौरी नावाचे गाव हिंगलजा देवी शी संबंधीत आहे. त्या गावाच्या नावावरून हि देवी गौरींपैकी असण्याची शक्यता असावी का ? मला महाराष्ट्रातील गडहिंगलज आणि हिंगोली ह्या दोन गावांची नावे लागलीच आठवली (पण महाराष्ट्रातील या गावांच्या नावाच्या आंतरजालावरील माहितीत हिंगलजा देवी बद्दल नमुद केलेली माहिती काही आढळली नाही)
  • Log in or register to post comments

उस्मानाबाद जिल्ह्यात

माहितगार
Wed, 02/25/2015 - 15:16 नवीन
उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव दिसते आहे. शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसताहेत पण हिंगलजा देवीशी संबंधीत असतील का नाही हे सांगणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हिंगलाज देवीचे मूळ

माहितगार
Wed, 02/25/2015 - 19:50 नवीन
हिंगलाज देवीचे मूळ या नावाने लोकसत्तावर सुकन्या आगाशे यांचा सविस्तर माहितीपूर्ण आणि रोचक लेखच मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

कैकेशस हिंग

गामा पैलवान
Fri, 06/01/2018 - 23:12 नवीन
कैकेशस पर्वतराजीत हिंगुश / इंगुश नावाची जमात आढळते. हे नाव सुद्धा हिंग वरून पडलेले दिसते. त्यांचा इंगुष्ठीया नावाचा प्रजासत्ताक देखील आहे. हिंगीस (मार्टिना वालं) उपाख्य हिंगीसोव्ह हे नाव चेक प्रजासत्ताकात आढळून येतं. याचं मूळही इंगुश जमातीत असावं असा अंदाज आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

--- + आबाद

हुप्प्या
Wed, 02/25/2015 - 20:57 नवीन
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधली अनेक गावे/शहरे ही आबाद प्रत्यय बाळगून आहेत. अहमदाबाद, औरंगाबाद, हैद्राबाद, इस्लामाबाद, होशंगाबाद, दौलताबाद, अबोटाबाद (ओसामाजींचे समाधीस्थळ!), जलालाबाद. आग्रा शहराचे नाव काही काळ अकबराबाद होते. अकबराबाद नावाची अनेक गावे इराणमधे आहेत. हे बहुधा फारसी भाषेतून आले आहे. रशियात ग्राद ह्या नावाने शेवट होणारी अनेक गावे आहेत. ह्या दोन्ही प्रत्ययांचे भाषाशास्त्रीय नाते आहे. ग्राद, ग्राम, गाव हेही जवळचे वाटते. तेही इंडो युरोपियन भाषेतले एक समान मूळ असणारे शब्द असावेत.
  • Log in or register to post comments

ग्राद, ग्राम, गाव हेही जवळचे

माहितगार
Fri, 02/27/2015 - 11:14 नवीन
ग्राद, ग्राम, गाव हेही जवळचे वाटते.
घर या अर्थाने गेर हा शब्द येऊन स्थलनामांमध्येही दिसतो. त्याच गेरची गेरेड किंवा गेरेज हि रुपे झाली असल्याची शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

युरोपातला आबादसारखा प्रत्यय

गामा पैलवान
Fri, 06/01/2018 - 23:31 नवीन
हुप्प्या, इथे इंग्लंड मध्ये अॅबोट (abbott) प्रत्यय असलेली अनेक गावे आहेत. उदा. : न्यूटन अॅबोट, स्टोक अॅबोट, इत्यादि. हा प्रत्यय आबाद सारखा वाटतो. ही पेठगावे म्हणजे सुबात्तापूर्ण मार्केट व्हिलेजेस असावीत. मराठीत आबादीआबाद म्हणजे वैपुल्य अशा अर्थाचा शब्द आहे. इंग्लंडसारखी जर्मनीत बाद रीशेनहॉल सारखी नावं आहेत. त्यातला बाद प्रत्यय बहुधा बाथ म्हणजे गरम पाण्याची कुंडे यावरून पडलेला दिसतो. तसेच बादेन प्रत्यय असलेली बरीच गावं आढळतात. यांचा आबाद या फयन्चा/ अरबी प्रत्यायाशी कितपत संबंध आहे हे शोधून काढणं रंजक ठरावं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

आब - पाणी

समर्पक
Tue, 06/05/2018 - 21:48 नवीन
फारसी व संस्कृत या फार जवळच्या भाषा आहेत. संस्कृत आप फारसीत आब होते, पाण्याजवळील जागा (व त्याकारणाने संपन्न जागा) अशा अर्थाने आबाद हा शब्द आला. पुढे गावांची नावे त्यावरून आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा