मनो याम्च्या बाजीराव अॅट बिठूर लेखातील; राही, मनो, अरविंद कोल्हटकरां सोबतची एक अनुषांगिक उपचर्चा राजेलोकांची बसण्याची पद्धती आसने सिंहासन इत्यादी मार्गाने गेली . त्या चर्चेत सिंहासनास संस्कृतातील मंचक आणि भद्रासन हे शब्द पर्यायांचा विचार झाला . उर्दूतील तख्त , गद्दी शब्दाची चर्चा झाली तर मराठीतील गादी शब्दाचीही आठवण निघाली .
पत > पट > पाट >आटपाटनगर, पाटनगर , पाटण, पाटील पटेल इत्यादी शब्द साधर्म्याचा शोध या निमित्ताने वेगळ्या धागा लेख चर्चेच्या माध्यमातून घ्यावा असा विचार केला. मराठी लोककथातील आटपाटनगर हा शब्द लहानपणी कानावर पडला होता पण त्याचा नेमका अर्थ अथवा व्युत्पत्ती माहीत नव्हती . कोणतेतरी एका गाव असा त्याचा अर्थ मी घेत असे . राजधानीच्या गावास गुजराथीत पाटनगर म्हणतात हे कळाल्या नंतर आटपाटनगर शब्दाच्या व्युत्पत्तीचा अंदाज आपसूकच आला . पाटलीपुत्र /पाटणा ते पैठण अशी ऐतिहासिक राजधानीच्या शहरांची नावे आपण ऐकून असतोच
या लेखाच्या निमित्ताने भारतातील ग्रामनामांचा शोध पोस्टल पिनकोड डाटाबेस च्या साहाय्याने घेतला . (सेन्सस साईट सर्वर बिझी दाखवत होते) सेन्सस च्या मानाने पिनकोड डाटाबेस लहान असतो त्यात पुन्हा त्यांच्या डाउनलोड एक्सेल मध्ये सिक्कीम नागालॅन्ड केरळ तामिळनाडू यांचा का कोण जाणे समावेश झाला नाही तरीही Pat अशी सुरवात असलेली ६ हजाराच्या आसपास गावे भारताच्या सर्व राज्यातून सापडली . यातील अर्धी गावे ढोबळ ठोकताळ्याने इतर अर्थाने आली असतील असा विचार करून सोडून दिली तरी अर्धी म्हणजे तीन एक हजार गावे किंवा मोठ्या प्रमाणावार गाव नावे राजधानीच्या गावामवरून आलेली दिसतील यातील बरीच एका गावाच्या नावावरून दुसर्या गावाचे नाव आले असेही असणार तरीही एका खूप मोठे प्रमाण राजधानीच्या गाव नावाचे दिसते. यात अगदीअनेक पट्टानुर सारख्या नावाची गावे अगदी अरुणाचल प्रदेश मेघालयात आढळतात आणि असे Pat नाम-उच्चार साधर्म्य असलेली अनेक गावे उत्तरपूर्व भारतात आहेतच . (चीन ऐतिहासिक दृष्ट्या अरुणाचल प्रदेश त्यांचा असल्याचे सर्वांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करते त्या शिवाय उत्तर पूर्व भारतास वेगळे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न त्यांच्या साहाय्याने फुटीरतावादी गट करत असतात त्यांच्या तोंडावर हा पुरावा सहज टाकता यावा असे वाटते)
पाटण, पाटणा पट्टन पाटगाव अशी नाम - उच्चार साधर्म्य असलेली गावे काश्मीर ते तामिळनाडू संबंध भारतभर पसरलेली दिसतात . (अफगाण डाटाबेसमध्ये डझनाभातरी गावानावे उच्चार साधर्म्याची असावीत त्यातील दोन गावांची नावे सुस्पष्टपणे पाटण असलेली दिसतात ) तामिळनाडूचा संबंध डाटाबेस शोधणे शक्य झाले नाही तरी तंजावूरच्या मराठा राज्याने एका किल्ला उभारला तो तेथील पट्टुकोट ई नावाच्या गावात पट्टू पासूनची आणखी बरीच ग्रामनामे तामिळनाडूत असावीत असे प्रथम दर्शनी दिसले .
भारतातील काही आडनावांचा आपण माग घेतला तर पाटील , पटेल , पटवारी , पटनाईक , पटवर्धन अशी काही आडनावे भारतात दिसून येतात या आडनावाची माणसे राजप्रमुख पदावर असल्याचे पुरावे आज जरी मिळण्याची शक्यता कमी असली तरी स्थानिक स्वरूपाची प्रमुख पदाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे राहिल्या असाव्यात असा सर्वसाधारण कयास करता यावा.
पती या प्रत्ययाचे इतर उपयोग पाहिल्यास प्रमुख या अर्थाने हा शब्द प्रयोग वापरला गेल्याचे दिसते. etymonline वरील पेट्रीआर्क शब्दाची खालील व्युत्पत्ती माहिती रोचक ठरावी
patriarch (n.)
late 12c., from Old French patriarche "one of the Old Testament fathers" (11c.) and directly from Late Latin patriarcha (Tertullian), from Greek patriarkhes "chief or head of a family," from patria "family, clan," from pater "father" (see father (n.)) + arkhein "to rule" (see archon).
https://www.etymonline.com/word/patriarch?ref=etymonline_crossreference
इंग्लिश विकिपीडियावरील एका संदर्भ नमूद ना केलेली आंध्र आडनावाबद्दलची माहिती खालील प्रमाणे आहे
Family names ending with "pati" or "pudi" evolved later during post Ashokan period of Buddhism as new towns were established. Example: Gottipati, Bhamidipati, Gudipati, Mokkapati,
Chigurupati, Gudipudi, Rimmalapudi etc. - en विकिपीडिया
मोल्सवर्थ मधील पाट शब्दाचा अर्थ पाट (p. 283) pāṭa m (पीठ S) A stool असा दिला आहे .
आपले मिपा मित्र शरद यांनी महाराष्ट्र शब्दकोश , खंड 5, प ते भ, पान 1978, ( प्रत 1936) मध्ये पाट शब्दाचा अर्थ श्रेष्ठपणा , मोठेपणा / श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार / सिंहासन, गादी, पीठ; असा दिला आहे आणि ज्ञानेश्वरीच्या पासून हा अर्थ मराठीत वापरला जात असल्याचे संदर्भ उपलब्ध होण्याकडे लक्ष वेधले.
पाट : * २ . सिंहासन, गादी, पीठ; 'ते वेळी विजयश्रियेचे पाटीं | एकुचि बैसे ' - ज्ञानेश्वरी ७.१२ ; 'योगसाम्राज्य शेष पाट | तुजचि साजे ' - विपू ७.१०५. * ३. श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार . 'वरी क्षत्रीयांमाजी श्रेष्ठु | जो जगजेठी जगी सुभटु | तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पै |' - ज्ञानेश्वरी १. ११५ ; ' एकाएकी इच्छी पाट| नेणे चाट काउळें | -तुकाराम गाथा २८७० * ४. श्रेष्ठपणा , मोठेपणा . 'कांबाळका एकी माये - | वाचोनी जिणे काय आहे | म्हणोनी सेविजे की तो होये पाटाचा धर्मु ' -ज्ञानेश्वरी १८.९०८ -महाराष्ट्र शब्दकोश , खंड 5, प ते भ, पान 1978, ( प्रत 1936) मध्येअर्थात शब्द वापर ज्ञानेश्वरी पेक्षाही नक्कीच प्राचीन असावा हे गावांच्या नावांच्या यादीवरुन लक्षात येते. पत ( झाडाचे बसण्यासाठी आठांथरलेले पान या अर्थाने मग असे आसन ग्रहण करणाऱ्या पत असलेल्याना प्रमुखांना संबंधित आडनावे > पट > पाट असा शब्द विकास होऊन राजधानी नावांची प्रगतीची शक्यता असू शकावी किंवा कसे .. माझे उपरोक्त निष्कर्ष अचूक असतील असा दावा नाही पण जिज्ञासूंनी या दिशेने अधिक शोध अभ्यास करुन पहावा असे वाटते. तर या निमित्ताने अशा उच्चार साधर्म्य असलेल्या गावांच्या नावांची आणि जमल्यास त्या गावांच्या इतिहासाची माहिती या लेख चर्चेच्या निमित्ताने वाचण्यास मिळाल्यास आनंद वाटेल. अनुषांगिक व्यतिरिक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8347
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आटपाट नगर याचा लाक्षणीक अर्थ
तसेही शक्य असावे.
In reply to आटपाट नगर याचा लाक्षणीक अर्थ by विजुभाऊ
...
आभार
In reply to ... by manguu@mail.com
पट्टण
ईंग्रजी विकिपीडियावर पती हा
In reply to पट्टण by पैसा
पाट/पट किंवा तदानुषंगिक
होय अगदी आपण सुचवल्या
In reply to पाट/पट किंवा तदानुषंगिक by पगला गजोधर
बंदर
पत्तन हा बंदर (पोर्ट)
In reply to बंदर by हुप्प्या
पत हा प्रत्यय
In reply to बंदर by हुप्प्या
महाराष्ट्र शब्दकोश
पाटील म्हणजे राजप्रमुख
In reply to महाराष्ट्र शब्दकोश by शरद
नेमकी नोंद
अत्यंत उपयूक्त माहिती
In reply to नेमकी नोंद by शरद
पद्र - पद्रक
नाशिक लेणी क्र. ३ (देवी लेणे)
In reply to पद्र - पद्रक by अरविंद कोल्हटकर
हा दक्षिणपथेश्वर नातू म्हणजे
In reply to नाशिक लेणी क्र. ३ (देवी लेणे) by प्रचेतस
@ प्रचेतस ,
In reply to नाशिक लेणी क्र. ३ (देवी लेणे) by प्रचेतस
पिसोरे वायव्येस आणि खूप
In reply to @ प्रचेतस , by माहितगार
सॉरी, 'ईशान्येस' असे वाचावे.
In reply to पिसोरे वायव्येस आणि खूप by प्रचेतस
धन्यवाद
In reply to पिसोरे वायव्येस आणि खूप by प्रचेतस
अवांतर पण त्तरीही
In reply to @ प्रचेतस , by माहितगार
पद्र - पद्रक हा संस्कृत शब्द
In reply to पद्र - पद्रक by अरविंद कोल्हटकर
Padrakha काही गाव नावे
In reply to पद्र - पद्रक by अरविंद कोल्हटकर
पद्रक हे भद्रक चे अपभ्रंश रुप ?
In reply to Padrakha काही गाव नावे by माहितगार
पट्टकिल - पाटील
पट्ट शब्दाचे अर्थ