वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भावजी, दाजी हे शब्द आहेत.
सर्वांगीण प्रतिसाद....!!
नागपुरी/वैदर्भीय लोकांनी असे
मी दाजीच म्हणतो. आमच्या जातीत
भावजी आणि दाजी हे शब्द
मग हा दोष त्या शब्दांचा की
माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात
दाजीबा !
जीजू, चाचू... असं कोणी (मला
हाहा, अगदी अगदी!
त्या मानाने भय्या, दीदी हे
मराठी घरांत जर भय्या, दीदी
अगदी अगदी....
अच्छा .. म्हणजे अधोगतीवर
उग्गीच
टका.. काही कामे नाईत होय रे..
पुलं
भाई म्हणत.. भय्या नव्हे.
अहो बरोबर काम करणार्या सौथ
चक्क ६०० झाले..
मी अगोदरच सांगितलं होतं की
हा ५९९!
सहाशे एकाव्या प्रतिसादात या
मी सध्या दिराची शोध मोहीम राबविण्यात मदत करत आहे
एक प्रश्न
पश्चिम महाराष्ट्र पुण्यात
माहिती नै. पण पुणे हे पश्चिम
काय बोलता? म्हणजे पुणे हा
पुण्याचं नावं काढलतं? आता १७
पुणे नावाचे राष्ट्र करण्याची
पुणे नावाचे राष्ट्र करण्याची
या निमित्ताने " पुणे नावाचे
http://www.misalpav.com/node/29145१५६१९ वाचने आणि ६११ (ही ६१२
१५६१९ वाचने >> यावर जाउ नका..
वाचायला असो की प्रतिसाद
मुलगी दिसायला जर्रा ठिकठाक
सुरेख प्रतिसाद स्रुजा.
बाकिचे प्रतिसाद पण वाच्लेत की
बाकिचे प्रतिसाद पण वाचलेत
हो ते अनाहितांचेच फक्त
चांगल्याला चांगलं
self proclaimed???
चांगल्याला चांगलं म्हटल कि
लग्न ही दोन
लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे. तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील.ऑब्जेक्शन मि लोर्ड ! लग्न ही वैयक्तिक बाब नाही. मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे आणि विवाह संस्थेमुळे समाजाची धारणा होते. धन्यो ग्रूहस्थाश्रमः| असे म्ह्ट्ले आहे ते उगीच नव्हे. ती वैयक्तिक बाब असती तर इतकी झड़झडून चर्चा इथे झाली असती का ? ती महत्वाचीच घटना आहे आणि राहीलच कारण समाजाचा पायाच तो आहे. आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल. समाजाच्या रक्षणासाठी काही एक नियम ( त्यालाच धर्म म्हणतात) घालून दिलेले आहेत ते बहुतांश लोकांनी पाललेच पाहीजेत. धर्मो रक्षिती रक्षित: | हे समाजाला देखील लागू आहे. तुम्ही समाजाचे नियम पाळ्ता म्ह्णून समाज तुमचे रक्षण करतो हे धडधडित सत्य न स्वीकारून कसे चालेल? अनिर्बन्ध व्यक्तिस्वातंत्र्य विकृतीला जन्म देते हा आजपर्यन्तचा इतिहास आहे.लग्न केलं किंवा नाही केलं,
आपला जोडीदार सातत्याने बदलणे
मग त्यांनाच प्र्गत म्हणायचे
उगीच रागवू नका. पार्टनर सारखे
दुसर्याच्या बाईलीवर डोळा
पहिलं आणि दुसरं महायुद्ध काय