Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

भावजी, दाजी हे शब्द आहेत. भावजी हा शब्द अलीकडे डौनमार्केट झालाय. दाजी हा शब्द तुलनेने जास्त ऐकला आहे- ब्राह्मणेतर समाजात याचा वापर बराच आहे असे वाटते. दक्षिण महाराष्ट्रात हा शब्द वापरला जातो. पुणे मुंबै इ. मोठ्या शहरांत मात्र अशा शब्दांचा विटाळ पाळला जातो.

In reply to by बॅटमॅन

सर्वांगीण प्रतिसाद....!! :-)) जिजू म्हणलं की भारी विचित्र वाटतं हे तर खरंच. नागपूरला हिंदी प्रभाव आहे जरा जरा. तिथे लोक हा शब्द वापरताना ऐक्लंय जास्ती करून...

In reply to by असंका

नागपुरी/वैदर्भीय लोकांनी असे बोलावे हे समजण्यासारखे आहे. शेवटी भौगोलिक सान्निध्याचा प्रभाव हा पडायचाच. पण न्यूनगंडात्मक अनुकरण करणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातल्यांना मात्र क्षमा नाही.

In reply to by बॅटमॅन

मी दाजीच म्हणतो. आमच्या जातीत पाव्हण्यांना असलं ऐकायची सवय नाही, त्यामुळे पहिल्यांदा शॉकच बसतो त्यांना.

In reply to by बॅटमॅन

भावजी आणि दाजी हे शब्द उच्चारले की जाम अनैतिक माणसं डोळ्यासमोर उभी राहतात... 'या रावजी बसा भावजी' टाईप किंवा '...दाजिबा तुमच वागणच खोटं...' टाईप..

In reply to by स्वप्नांची राणी

मग हा दोष त्या शब्दांचा की तसा ग्रह करून घेणार्‍या माणसांचा? ब्राह्मणेतर समाजात कैक वेळेस हा शब्द वापरलेला ऐकला आहे. तेही सगळे अनैतिकच असतील? कमाल आहे राव. चार पिच्चर पाहून लोक कसले कसले पूर्वग्रह करून घेतात. धन्य आहे _/\_

In reply to by बॅटमॅन

जीजू, चाचू... असं कोणी (मला किंवा इतरांनाही) म्हणाले की माझ्या तोंडी सहजपणे "बिहारमध्ये असता काय?" असा प्रश्न येतो :)

In reply to by असंका

मराठी घरांत जर भय्या, दीदी असे शब्द वापरत असतील तर मराठीच्या अधोगतीला कारं असणारी मराठी माणसे ती हीच

In reply to by टवाळ कार्टा

टका.. काही कामे नाईत होय रे.. ;) अखिल पृथ्वीवरल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी प्रतिसाद दिसतोय म्हणून विचारतोय. (प्रतिसाद खूप काल व्यापक आहे हो. आधी नीट समजून घेव )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो बरोबर काम करणार्‍या सौथ ईंडीयन माणसाचे नावच जीजू आहे. आता काय करणार बोला.

In reply to by मुक्त विहारि

मी अगोदरच सांगितलं होतं की मुवि खुर्ची टाकून चाय सुलेमानीचे घुटके घेत प्रतिसादांचा गल्ला मोजत बसले आहेत ! :) ;)

सहाशे एकाव्या प्रतिसादात या धाग्यावरचा बेस्ट प्रतिसाद दिल्याबद्दल स्रुजाचा सत्कार करण्यात येत आहे. मुविंचे परत अभिनंदन आणि पुस्प्गुच!

चलतकू चुलत असल्याने फार हिरीरीने सहभागी नाही. पण अपेक्षा पाहून मला गंमत वाटली. मुलगी पश्चिम महाराष्ट्र मधली नको. कारण माहीतीनाही.फार भाऊ बहीण नको.अजून काही असतील तर माहीत नाही. मला हा प्रकार अजिबात आवडत नाही. पश्चिम महाराष्ट्र पर्मीprmi मनिमौ

In reply to by मृत्युन्जय

पुण्याचं नावं काढलतं? आता १७,५०० परंत प्रतिसाद नक्की जाणार. संपादक बेरोजगारीच्या कुर्‍हाडीपासुन वाचणार. =))

In reply to by टवाळ कार्टा

पुणे नावाचे राष्ट्र करण्याची मागणी होणारै म्हणे
जी गोष्ट ऑलरेडी स्वतंत्र आहे तिच्यासाठी मागणी वैगरे काय करायची?

In reply to by सूड

या निमित्ताने " पुणे नावाचे एक स्वतंत्र राष्ट्र " या माझ्या धाग्याची झैरात करतो http://www.misalpav.com/node/29145

१५६१९ वाचने आणि ६११ (ही ६१२ वी) प्रतिक्रिया !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मुवि, हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१५६१९ वाचने >> यावर जाउ नका...आपणच पान रिफ्रेश करत राहीलो तरी तो काउंट वाढतो ;)

In reply to by टवाळ कार्टा

वाचायला असो की प्रतिसाद लिहायला असो, पण इतक्या वेळा पानाला भेट दिली गेली हे ही नसे थोडके ! (नुसते रिफ्रेश दुर्लक्ष करण्याइतके कमी असणार).

मुलगी दिसायला जर्रा ठिकठाक असेल तर ती माज करणारच...आणि बाकीचे सुध्धा ती अशी वागणार यात काहीच चुकीचे नाही असेच वागतात

In reply to by स्नेहल महेश

बाकिचे प्रतिसाद पण वाच्लेत की उगी स्क्रोल बार पळवत पळव्त आणलाय.. नाही डॉक्टर काका, टका, पिडां काकांचे इ. इ. इ. प्रतिसाद पण वाचनीय आहेत म्हणून म्हटलं.. ह.घ्या.

In reply to by स्नेहल महेश

हो ते अनाहितांचेच फक्त पर्तिसाद वाचित असतील.. किंवा त्यांनाच फक्त पोच देत असतील. नै का ? (ह.घ्या नै तर घेऊच नका.. ;) )

In reply to by स्नेहल महेश

चांगल्याला चांगलं म्हटल कि कित्ती लागत
कायपन .. इथे प्रतिसादाला वैट कोण म्हणालंय. मागच्या पानावर जावून पहा की बै आमी छान म्हणून आलोय. फक्त काही लोक ठराविक प्रतिसादांना प्रतिसाद देण्यापुरते मेन बोर्डावर (म्हणजे मुख्य व्यासपीठ म्हणायचय इथे..) येतात ते काही पटत नाही इतकेच.

लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे. तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील. ऑब्जेक्शन मि लोर्ड ! लग्न ही वैयक्तिक बाब नाही. मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे आणि विवाह संस्थेमुळे समाजाची धारणा होते. धन्यो ग्रूहस्थाश्रमः| असे म्ह्ट्ले आहे ते उगीच नव्हे. ती वैयक्तिक बाब असती तर इतकी झड़झडून चर्चा इथे झाली असती का ? ती महत्वाचीच घटना आहे आणि राहीलच कारण समाजाचा पायाच तो आहे. आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल. समाजाच्या रक्षणासाठी काही एक नियम ( त्यालाच धर्म म्हणतात) घालून दिलेले आहेत ते बहुतांश लोकांनी पाललेच पाहीजेत. धर्मो रक्षिती रक्षित: | हे समाजाला देखील लागू आहे. तुम्ही समाजाचे नियम पाळ्ता म्ह्णून समाज तुमचे रक्षण करतो हे धडधडित सत्य न स्वीकारून कसे चालेल? अनिर्बन्ध व्यक्तिस्वातंत्र्य विकृतीला जन्म देते हा आजपर्यन्तचा इतिहास आहे.

In reply to by विटेकर

लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील.
असे नेहमीच होते असे नाही...पण मुळात असे होउ नये यासाठीच तर जोडिदार निवडणे व्यवस्थित हवे ना

In reply to by विटेकर

आपला जोडीदार सातत्याने बदलणे हे प्रगत मनाचे/ प्रगत समाजाचे लक्षण नव्हे ! त्यामुळे अराजक होईल आणि जंगल राज निर्माण होईल.
आदिवासी समाजात असे चालते. त्यामुळे कुठे अराजक माजल्याचे दिसले नाही. झालंच तर स्त्रियांना तिथे नियमबद्ध समाजापेक्षा जास्ती मान असतो. नुस्ता थेरीत नाही, तर प्रॅक्टिकलमध्येही.

In reply to by बॅटमॅन

मग त्यांनाच प्र्गत म्हणायचे ना ? आदिवासी कशासाठी? असे एकाच पार्तनर बरोबर आयुष्य काढणारे अप्रगत अणि मागास मानयला हवेत ! एकपत्नी वाला राम ही मग मागासच म्हणायला हवा ! आणि किती पार्ट्नर बदलले यावर जर स्त्रीयांना मान द्यायचे ठरत असेल तर धन्यच म्हणायला हवे. स्त्रियांचा मान ही बाब मूळातच माणसाच्या रक्तात असायला हवी. आमच्या शशी थारूर नी बदलले पार्टनर .. आणि दिला का मान नव्या पार्तनरला?

In reply to by विटेकर

उगीच रागवू नका. पार्टनर सारखे बदलणे आणि अराजक यांचा परस्परसंबंध नाही इतकेच सांगायचे आहे. त्यामुळे राम, शशी थरूर, इ.इ. वाईड बॉल सोडून दिल्या गेले आहेत.

In reply to by बॅटमॅन

दुसर्याच्या बाईलीवर डोळा ठेवला / अभिलाषा धरली तर महायुद्धे होतात , नुसते अराजक नव्हे ! उदा. रामायण अथवा महाभारत ! म्हणून धर्मसंमत बाईलीबरोबर संग केला पाहिजे... पार्टनर बदलणे हे धर्मसंमत नव्हे इतकेच ! आता तुम्ही परस्पर संम्मतीने .. काय हरकत आहे ? तसे होत नाही, कामातुराणाम न भयम न लज्जा !

In reply to by विटेकर

पहिलं आणि दुसरं महायुद्ध काय बाईवरनं झालं? पुराणातल्या गोष्टी सोडून द्या. बाकी याच धर्माने मस्तानीचा छळ केला तेही धर्मसंमतच असावे. तदुपरि 'कामातुराणां न भयं न लज्जा' म्हणजे नक्कीच कोल्ह्याला द्राक्षे आंबट असलेल्यांनी रचलेला श्लोक असावा. दोन लोक परस्परसंमतीने काही का करेनात. जोवर कुणाला त्रास देत नाहीत तोवर संभोगाला असे हीन लेखायचे कारणच काय?

In reply to by बॅटमॅन

दोन लोक परस्परसंमतीने काही का करेनात. जोवर कुणाला त्रास देत नाहीत तोवर संभोगाला असे हीन लेखायचे कारणच काय?
ब्याट्या ह्या वाक्यासाठी एक मँगो केसर मस्तानी लागू माझ्याकडून!! काय का करेनात, मला त्रास होत नाही तोवर त्या गोष्टीशी शष्प देणं घेणं नाही.

In reply to by विटेकर

>>दुसर्याच्या बाईलीवर डोळा ठेवला
दुसर्‍याच्या बायलेवर डोळा ठेवा कोण म्हणतंय, हौसच असेल तर आपल्या वेगवेगळ्या कराव्या!! आणि शिंची महाभारतातली उदाहरणे देता; त्या अर्जुनान् चार (का पाच?) लग्ने केलांन् ती बरी चाल्ली!!

In reply to by सूड

अगदी अगदी....कृष्ण गोकुळात गोपींशी काय काय करतो याची गीतगोविंदातली वर्णने चालतात. त्याची राधेबरोबरची वर्णने मिटक्या मारत वाचतात. पण तेच प्रत्यक्षात कुणी करू म्हटलं की पित्त खवळते. इतकेच असेल तर आपल्या ग्रंथांवर बंदी घालून दाखवा.

In reply to by विटेकर

रक्षिती
र्‍हस्व असायला हवाय का? बाकी ही ओळ कशासाठीही खपवून नेतात राव. मागे एकदा संभाजी बागेत 'वृक्षो रक्षति...' असा पाठभेद वाचला होता.

In reply to by सूड

बर .. दुसरी तर दुसरी वेलांटी .. हाय काय अन नाय काय .. वृक्ष ? असेल बाबा , पुणे तिथे काय उणे ? आणि अर्थ तसाच घेतला तरी काही फार फरक पडत नाही. परस्परांचे रक्षण हा आपला धर्मच आहे. न राज्यं न राजाsssसीत न दण्ड्यो न च दण्डिक: | धर्मेणैव प्रजास्सर्वा रक्षन्ति स्म परस्परम || There is no kingdom nor any king; no criminal nor any judge to administer penalty to the criminal. People protect each other by virtue of dharma.

In reply to by विटेकर

विवाहसंस्था हा समाजाचा पाया नव्हे. समाजाचा पाया हा समाजाने राहण्याची, एकत्र राहण्याची प्रवृत्ती आहे. सृष्टीतील सर्वच प्राणी 'सामाजिक' नसतात. बिबट्या, वाघ ह्यांच्यात नर-मादी केवळ मीलनापुरते एकत्र येतात तर सिंहांमध्ये, रानकुत्र्यांमध्ये कळप अथवा टोळी करून राहण्याची प्रवृत्ती दिसते. मानव हा समाजशील प्राणी आहे हे खरंच आहे आणि मानवसमाजाचा पाया लग्नसंस्था नाही हेही तसेच आहे. लग्न हे शारीरिक गरजेच्या पूर्तीसाठी निर्माण झालेला एक समाजव्यवहार आहे. लग्नाचा पाया हा शरीरसंबंध आहे. लग्न हे 'ऑप्शनल' आहे, कारण निव्वळ शारीरिक सुखासाठी किंवा दोन व्यक्तींनी एकत्र राहण्यासाठी ते केलेच पाहिजे असे काही नाही. समाजबांधणीची प्रक्रिया ही आदिम इतिहासात डोकावून पाहिले असते विवाहसंस्था अस्तित्त्वात येण्याच्या फार आधी सुरू झाली होती. तुम्ही भारतीय संस्कृतीचं उदाहरण देताय म्हणून सांगतो. वसंतोत्सव हा टोळीतील किंवा गणातील सर्व प्रजननक्षम स्त्रीपुरुषांनी एकत्र जमून मुक्त शृंगारात रात्र घालवावी आणि त्यामुळे प्रजोत्पादन व्हावे अशा स्वरूपाचा उत्सव होता. त्यात हळूहळू बदल होत पुढे अशा व्यवहारास औपचारिक स्वरूप येऊ लागले. त्यातही दोन व्यक्तींनी एकत्र रहायचे आणि त्यातील कुणी त्या नात्याबाहेर संबंध ठेवायचे नाहीत अशा प्रकारचे बंधन अस्तित्त्वात यायला अजूनही बराच काळ जावा लागला. नंतर हे नाते जन्मभराचे होणे ही पुढची पायरी, विधवापुनर्विवाहबंदी ही त्यापुढची पायरी, विवाहीत स्त्रियांची आणि काही प्रमाणात पुरुषांची घुसमट ही पायरी अशा टप्प्याटप्प्याने विवाहसंस्थेचे स्वरूप, फायदे आणि तोटेही विकसित होत गेले. आर्थिकदृष्ट्या विवाहसंस्थेची आवश्यकता भासली ती मानवसमूहांनी भटके, शिकारी जीवन सोडून शेती करायला सुरूवात केली तेव्हा. विवाहसंस्थेची लवचिकता हाही मुद्दा काही अगदी अतिप्रगत, अर्वाचिन नसून पूर्वीपासूनच ती आहे. बॅटमन यांनी दिलेल्या आदिवासींमधील, पशुपालक समूहांमधील अशी लवचिकता प्रातिनिधिक ठरावी. आदिवासींमध्ये, विशेषतः गोंड आदिवासींमध्ये एक 'घोटुल' नावाचा प्रकार अगदी वीस-तीस वर्षांपर्यंत अस्तित्त्वात होता. थोडा शोध घेऊन पहा घोटुल म्हणजे काय ते. पुढारलेपणाबरोबर, आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्याबरोबर लग्न या संस्थेची अपरिहार्यता, कर्मकठोरपणा अगदी संपणार नसली तरी विवाहसंस्थेची वाटचाल तिच्या शिखरापासून उतरणीच्या दिशेने नक्कीच सुरू झाली आहे आणि ती अटळ आहे. लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका. :-)

In reply to by एस

अरे हे इतके सोप्पे आहे तर मग " वधू- वराच्या अपेक्षा" या गोष्टीवर का काथ्या कुटण्यात येतोय ? वसंतोत्सवाची वाट बघायची .. कशाला हवे ते जाचक विवाहबंधन ?

In reply to by विटेकर

मुद्द्यांना विचारपूर्वक आणि खुल्या दिलाने उत्तरे द्या. आपण 'सर्वज्ञ' किंवा 'मसीहा' यांच्यासारखे वागणार नाहीत अशी निदान आपल्याकडून अपेक्षा आहे. नपेक्षा सोडून द्या.

In reply to by एस

मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच नाही आणि तसा मी नाहीही. "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" ( वि का राजवाडे, गुग्लले तर पीदीएफ मिळेल ) वाचला तर तुम्ही सांगताय त्यापेक्षा भयानक गोष्टी समोर येतील. इतिहासातील/ पुराणातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आदर्श मानायचा यालाही काहीतरी ताळ तंत्र हवे की नको ? की मला सोयीस्कर आहे तेवढेच घेईन? सेक्स हा बेसिक इन्स्टि़क्ट आहे .. पण तो पशुन्चा ! जो पशुपासून मानव म्हणून उन्नत होऊ पाहतो त्याला धर्माधिश्ठित काम आणि अर्थ स्वीकारलाच पाहीजे. समाजाला फाट्यावर मारून मी जर कुत्र्या- मांजरां सारखा रस्त्यावर रत होणार असेन आणि पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार? नपेक्शा मी गप्प बसणे पसंत करीन.

In reply to by विटेकर

कुत्र्या-मांजरांसारखे रत होणे आणि पार्टनर बदलणे यात फरक नाही का? तुम्हांला तिटकारा असलेल्या गोष्टीबद्दल कसेही अंदाधुंद बोलावे का?

In reply to by विटेकर

तुम्ही सर्वज्ञ नाहीत हो, 'सर्वज्ञ' आणि 'मसीहा' या पदव्या आहेत काही आयडींच्या. :-) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे खरंच आपल्या संस्कृतीश्रेष्ठत्त्वाच्या, उदात्तीकरणाच्या ढोंगाचा पडदा फाडणारं पुस्तक आहे. प्रत्येकाने जरूर वाचावे असे. इतिहास, पुराणे इत्यादी माध्यमांतून आपण जे पाहतो, ऐकतो, शिकतो ते सर्वच जसेच्या तसे आंधळेपणाने स्वीकारणे हा तद्दन मूर्खपणा आहेच; तोच न्याय लावला तर अशीच बंधने तथाकथितरित्या पूर्वीपासूनच चालत आलेली आहेत म्हणून पुढेही टिकली पाहिजेत असे मानणे हेही चुकीचेच ठरेल. त्यातही ती टिकवण्याचे कर्तव्य स्वतःच्या शिरावर घेणे आणि समाजाच्या, संस्कृतीच्या प्रवाही स्वरूपाला विरोध करत बसणे हा तर नतद्रष्टपणाच म्हटला पाहिजे. लैंगिक गरजा ह्या मूलभूत गरजा पशूंच्या आणि मानवाच्याही आहेत. त्या नाकारण्याचे काही कारण नाही. इथेही तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ताळतंत्र ठेवलेच पाहिजे, फक्त ते ताळतंत्र हे पूर्वसूरींनी सांगितलेल्या धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या चालीरीतींप्रमाणे असण्यापेक्षा 'नैतिक' अधिष्ठानावर आधारित असायला हवे. नैतिकता आणि धार्मिकता ह्या दोन्ही संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही बाब इथे विशेष उल्लेखनीय. रस्त्यावर कामक्रीडेबाबत - ज्या समाजात ही फारशी विशेष बाब मानली जात नाही तिथे त्याचे कुणाला आश्चर्य वाटणार नाही. जिथे संपूर्ण बुरख्याआड स्त्रीचे आख्खे आयुष्य जाते तिथे पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्यासाठी चार बोटे जरी तिने झगा वर घेतला तर तिच्या टाचाही कापल्या जातात (संदर्भ - तालिबान) त्या समाजात इतकीही गोष्ट धक्कादायकच मानली जाईल. प्रश्न पुनरेकवार समाजाच्या मूल्यांच्या प्रवाहीपणाचा आहे. ह्या प्रवाहीपणाला, बदलाला कुणालाही बांध घालता येणार नाही.

In reply to by विटेकर

पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार?
किती मजेशीर आहे बघा हे विटुकाका!! आदर्शवाद जेव्हा पटवून सांगायचा असतो तेव्हा पुराणातली उदाहरणे चालतात, तेच जेव्हा जी गोष्ट तुम्ही आता निषिद्ध मानताय ती तुम्ही म्हणताय त्याच ग्रंथांमध्ये निषिद्ध नव्हती हे समोरचा जेव्हा सांगतो तेव्हा ते पटायला फारफार जड जातं. वर स्वॅप्स ने जे लिहीलंय त्यात समाजाला फाट्यावर मारायचा उल्लेख कुठेही दिसला नाही. उलट लोक काय म्हणतील याचा विचार करुन तुमच्या आयुष्यातले निर्णय नका घेऊ, इतका सरळसोट निष्कर्ष काढला मी!!