✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 01/11/2015 - 17:59  ·  लेख
लेख
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
72400 वाचन

💬 प्रतिसाद (233)

प्रतिक्रिया

मेतकूट नीट जमलं तर तुमची

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 11:56 नवीन
मेतकूट नीट जमलं तर तुमची खरपूड़ पण खपेल ओ. नाहीतर फुक्कट द्यावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

झैरात मंगताय

पैसा
गुरुवार, 09/24/2015 - 11:59 नवीन
ओरडून विकलंत तर माती पण विकेल. गप बसलात तर सोनं पण पडून राहील. प्याकिंग आणि प्रेझेंटेशन मस्ट. आत खरपूड का असेना! नवीन नाव देऊ कॅरॅमलाईज्ड राईस. हाकानाका! झैरात मंगताय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 12:06 नवीन
ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं. एकदा 200 रुपयांचा तुमचा तो भात नेतील ओ लोक. नंतर पायरी तरी चढ़तील काय? असो. हॉटेल व्यवस्थित सुरु आहे. बाकी मेतकूट धागा 200 पार करणार तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

या निमित्ताने एक विचार

वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 12:18 नवीन
या निमित्ताने एक विचार सांगावासा वाटतो. आपण मराठी मंडळी नेहमीच असा सूर लावतो की... छ्या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये? पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये??? त्यामुळे आपण असा सूर लावायला नको असं मला वाटतं. ठासून सांगावं.. फिर! थालीपीठ डेलिकसी है हमारा... ६० रुपये इज स्टिल डिसेंट. दुसरं म्हणजे हे जे पैसे आहेत ते "वांग्याच्या भाजीत काय आहे एवढं? १२५ रुपये मोजायला?" असं म्हणून द्यायचे नाहीयेत तर ते तुम्हाला "आयतं" मिळतं त्याचे आहेत. एसीत बसून, कुणीतरी वाढणारं असताना आपण हे पदार्थ खातो त्याचेही पैसे त्यात असतात. त्यामुळे...अशी आपणच आपल्या पदार्थांची, हॉटेलांची कुप्रसिद्धी करणं टाळावं. असं माझं मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

२०० वा प्रतिसाद!

किसन शिंदे
गुरुवार, 09/24/2015 - 12:22 नवीन
वेल्लाभटाच्या प्रतिसादाशी शंभर टक्के सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सहमत.

मराठी_माणूस
गुरुवार, 09/24/2015 - 12:23 नवीन
सहमत. झुणका भाकर केंद्रे काढुन आपण मराठी पदार्थांची अशीच व्हॅल्यु कमी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

नाही तर काय!

वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 12:28 नवीन
नाही तर काय! त्यावरून एक एक जनरलायझेशन्स आठवतायत आणि राग येतोय. असो. वेगळा धागा काढायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

अरेच्चा!

पैसा
गुरुवार, 09/24/2015 - 12:45 नवीन
मसालेभात अन वांग्याच्या भाजीला व्हॅल्यु नाही कोण म्हणतो? खूप मेहनत आहे. माझा आक्षेप आहे तो फोडणीचा भात ग्लोरिफाय करून विकायला. मसालेभात पुलाव आणि फ्राईड राईसच्या बरोबरीने विकला गेलाच पाहिजे. खरे तर फ्राईड राईसमधे ते अजि नो मोटो वगैरे काहीही घालतात पुलावात तूप ओततात काही ठिकाणी, त्यापेक्षा मसालेभात हजार पटीने चांगला आणि हेल्दी म्हटला पाहिजे. थालिपिठासारखा पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ नाही. मराठी जेवण हे सगळ्या प्रकारात समतोल आणि हेल्दी असतं. त्यातले खास पदार्थ आहेत त्याचे मार्केटिंग करावेच. पण आपले लोक दळभद्री जिलेटिन घालून खरवस विकतात आणि आपलंच नाक कापून घेतात. त्या शिळ्या फोडणीच्या भातासाठी पैसे मोजायला तयार असलेल्या लोकांना तर साष्टांग दंडवत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

शिळा फोडणीचा भात हॉटेल

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 12:55 नवीन
शिळा फोडणीचा भात हॉटेल/रेस्तरों मध्ये मिळत असला तर फोडणीची भाकरी(तुकडे) आणि पोळीचा मलीदा मिळालाच पाहिजे. अन्यथा आम्ही मोर्चा काढू. -सदस्यकाहीकारणनस्तानामोर्चाकाढूयेताजातानिषेधकरुचेजनकजेपीयांचीसंघटना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

या! मसालेभाताला ९५ रुपये

चेतन सुभाष गुगळे
Tue, 04/19/2022 - 21:05 नवीन
या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये? पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये???
दिल्ली (फेब्रुवारी २००२) बाथरुम फिटिंग्ज व्यावसायिकासोबत बिझिनेस लंच घेत असताना त्यांनी मला सांगितले की आता आपण व्यवसायाच्या जागी आहोत आणि वेळ कमी आहे अन्यथा यापेक्षा चविष्ट जेवण मी तुम्हाला घरी खाऊ घातले असते. आम्ही वेळ वाचविण्याकरिताच फक्त आणि तेही नाईलाजास्तव हॉटेलात जेवतो. अन्यथा स्वाद आणि असली घीचा चांगला माल घरी बनत असताना या सुमार जेवणाकरिता इतके पैसे खर्चणे जीवावर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

प्यारे बुवा

सुबोध खरे
गुरुवार, 09/24/2015 - 12:20 नवीन
प्यारे बुवा आपण मराठी लोक म्हणजे झैरातीतच मागे पडतो बघा. ते कोथिम्बिरवडी म्हणायचं आणि पस्तीस रुपयाला मोठ्या दोन वड्या द्यायच्या. त्यापेक्षा धनिया कबाब अलोंग विथ मिंट चटनी chutney म्हणायचं, (पुदिना चटणी नव्हे) आणि सहासात लहान पण गोल वळलेल्या कोथिम्बिरवड्याच द्यायच्या पण १२५ रुपये( अधिक कर) म्हणून लावायचे हे आपल्याला केव्हा जमायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कसं बोललात !!!!

वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 12:25 नवीन
कसं बोललात !!!! हेच्च्च्च्च इथेच्च्च्च्च मार खातंय राव ते तुमचं मराठी माणूस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 12:30 नवीन
अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत होतो महाराज. एकदा नेल्यानंतर कोणी पाय ठेवील काय हाटीलात? बाकी दणक्या जेवतो बरे आम्ही. मराठी पदार्थास नावे ठेवीत नाही हो. फ़क्त घरी सुग्रास भोजन मिळत असता बाहेर काय म्हणून खावे? असा यांचा प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमचे एक नातेवाईक दादरला

सुबोध खरे
गुरुवार, 09/24/2015 - 12:41 नवीन
आमचे एक नातेवाईक दादरला प्लाझा समोर मराठी हॉटेल चालवतात. तेथे १४-१५ वर्षपूर्वी गेलो असताना त्याच्या यादीत( मेनू कार्ड) पदार्थ पाहत असताना एक जाणवले कि बटाटा वडा एक प्लेट १० रुपये आणि ब्रेड बटर २० रुपये. मी त्याला विचारले हे काय रे बाबा? त्यावर तो म्हणाला दादरला मराठी माणूस डोंबिवली कल्याण पासून येतो घरी जेवायला जाण्यासाठी एक ते दीड तास लागणार तोवर पोटाची सोय म्हणून एक प्लेट वडा फक्त १० रुपये. मी विचारले मग ब्रेड बटर २० रुपये कसे? त्यावर तो हसत म्हणाला आमच्या मुलाला ब्रेड बटरच लागते म्हणणाऱ्या हुच्चभ्रू लोकांना पैसे देऊ दे कि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

:-)

एस
गुरुवार, 09/24/2015 - 13:14 नवीन
हेहेहेहे! मस्त विचारसरणी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोळा आणे!

पैसा
गुरुवार, 09/24/2015 - 12:50 नवीन
ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं.
सोळा आणे सही! प्याकिंग उघडलं की आत खरपूड आहे ते कळतंच! आमच्या फो.भा. ची कल्जी क्रू नये बर्का! तो फो.भा. च असेल. आणि लोक जरूर घेतील २०० रुपये मोजून. आजकालच्या लोकांना फो. भा. आवडत असेल तर खाऊ देत बापडे. नसीब अपना अपना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ह्या ह्या ह्या. हिटलरकडे

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 12:58 नवीन
ह्या ह्या ह्या. हिटलरकडे गोबेल होताच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुम्हाला कोण पायजे?

पैसा
गुरुवार, 09/24/2015 - 13:01 नवीन
हिटलर की गोबेल? आपल्याकडे सगळे आहेत. शिळ्या भाकरीचा कट्टा कधी करताय ते सांगा. फो.भा. आणि पेश्शल खरपुड्या मी स्पॉन्सर करते! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हिटलरकड़े गोबेल असतोच.

प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 13:04 नवीन
हिटलरकड़े गोबेल असतोच. हेल हिटलर. बाकी फुकट इतरांना द्या. हमें बख्श दो! मेतकूटाचा गोपाळकाला झाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गणपतीची पावती २५,००० ची फाडा

नितिन५८८
गुरुवार, 09/24/2015 - 10:55 नवीन
एवढे चालत असेल हे हॉटेल तर ह्यावेळेस मेतकुट वाल्याची, गणपतीची पावती २५,००० ची फाडायला काही हरकत नाही!
  • Log in or register to post comments

येस. हॉटेल व्यवस्थित गर्दी

वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 11:18 नवीन
येस. हॉटेल व्यवस्थित गर्दी खेचत आहे.
  • Log in or register to post comments

मेत्कुटला गेलो नाही पण २००

सुबोध खरे
गुरुवार, 09/24/2015 - 12:21 नवीन
मेत्कुटला गेलो नाही पण २०० पार केले
  • Log in or register to post comments

डॉक्टर या की सांच्याला एकदा

किसन शिंदे
गुरुवार, 09/24/2015 - 12:48 नवीन
डॉक्टर या की सांच्याला एकदा क्लिनिक बंद झाल्यावर.. एक कट्टा करून टाकू..हाकानाका! :) उकडीचे मोदक फार भारी मिळतात इथे..हां पारी थोडी जाड असते, पण तेवढं चालून जातेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केंव्हा जायचं बोला.

सुबोध खरे
गुरुवार, 09/24/2015 - 12:59 नवीन
केंव्हा जायचं बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

एक ऑक्टोबरला जमेल का?

किसन शिंदे
गुरुवार, 09/24/2015 - 13:12 नवीन
एक ऑक्टोबरला जमेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कट्टा

सुनील
Fri, 09/25/2015 - 14:40 नवीन
नक्की कधी ते ठरवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

जमेल की. रात्रि २०.३० नन्तर

सुबोध खरे
Fri, 09/25/2015 - 20:32 नवीन
जमेल की. रात्रि २०.३० नन्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

फक्त मला हॉटेलच्या बाहेर

सुबोध खरे
Fri, 09/25/2015 - 20:34 नवीन
फक्त मला हॉटेलच्या बाहेर आशाळभूतासारखे वाट पाहायला आवडत नाही. लोक उठतात कधी आणि आम्ही बसतो कधी हे मला पटत नाही. ( वैयक्तिक दुर्गुण समजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दुसरा अनुभव

सर्वसाक्षी
Fri, 09/25/2015 - 11:11 नवीन
मेतकूट नव्या जागी स्थलांतरीत झाल्यावरही एकदा गेलो होतो. बाहेर लोक इभे पाहिले आणि पदार्थ बांधुन नेले. चविच्या बाबतीत अपेक्षाभंग झाला. वांग्याचे भरीत म्हणजे मिरच्यांचे बारीक तुकडे मुक्तहस्ते पेरलेले शिजवलेले वांगे निघाले. ना दही ना चिंंचगूळ ना चमचमईत उत्तरे कडील मसालेदार बैंगन भरता. कदाचित ही त्यांची स्वतंत्र नवी पाककृती असेल. झुणका सुद्धा अगदीच सुमार होता. अर्थात हा माझा अनुभव. कदाचित लोकांना तेथील पदार्थ आवडत असतील. मेतकूट समोरच्या गल्लीत 'कोल्हापूर' शेजारी मी मराठी' सुरू झाले आहे, मी अजुन गलो नाही. कुणी अनुभवले आहे का?
  • Log in or register to post comments

आमचा पण थोडा प्रतिसाद भार....

मुक्त विहारि
Fri, 09/25/2015 - 15:46 नवीन
"मेतकूट"ला जाण्यापेक्षा. आमचे ३८, बँकॉक स्ट्रीट, बरे आहे. आणि साग्रसंगीत हवे असेल तर, "नंदी पॅलेस."
  • Log in or register to post comments

भयानक

प्रणवजोशी
Wed, 11/18/2015 - 12:37 नवीन
मला सुद्धा असाच वाईट अनुभव आला.
  • Log in or register to post comments

कधी?

प्रभाकर पेठकर
Wed, 11/18/2015 - 13:20 नवीन
कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रणवजोशी

कोण ते धागा वर काढतय?

जातवेद
Wed, 11/18/2015 - 15:26 नवीन
कोण ते धागा वर काढतय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा