Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Sun, 01/11/2015 - 17:59
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
अनुभव
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
  • Log in or register to post comments
  • 72400 views

प्रतिक्रिया

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 11:56

In reply to हीहीही! by पैसा

Permalink

मेतकूट नीट जमलं तर तुमची

मेतकूट नीट जमलं तर तुमची खरपूड़ पण खपेल ओ. नाहीतर फुक्कट द्यावं लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/24/2015 - 11:59

In reply to मेतकूट नीट जमलं तर तुमची by प्यारे१

Permalink

झैरात मंगताय

ओरडून विकलंत तर माती पण विकेल. गप बसलात तर सोनं पण पडून राहील. प्याकिंग आणि प्रेझेंटेशन मस्ट. आत खरपूड का असेना! नवीन नाव देऊ कॅरॅमलाईज्ड राईस. हाकानाका! झैरात मंगताय!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 12:06

In reply to झैरात मंगताय by पैसा

Permalink

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं. एकदा 200 रुपयांचा तुमचा तो भात नेतील ओ लोक. नंतर पायरी तरी चढ़तील काय? असो. हॉटेल व्यवस्थित सुरु आहे. बाकी मेतकूट धागा 200 पार करणार तर
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/24/2015 - 12:18

In reply to ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना by प्यारे१

Permalink

या निमित्ताने एक विचार

या निमित्ताने एक विचार सांगावासा वाटतो. आपण मराठी मंडळी नेहमीच असा सूर लावतो की... छ्या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये? पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये??? त्यामुळे आपण असा सूर लावायला नको असं मला वाटतं. ठासून सांगावं.. फिर! थालीपीठ डेलिकसी है हमारा... ६० रुपये इज स्टिल डिसेंट. दुसरं म्हणजे हे जे पैसे आहेत ते "वांग्याच्या भाजीत काय आहे एवढं? १२५ रुपये मोजायला?" असं म्हणून द्यायचे नाहीयेत तर ते तुम्हाला "आयतं" मिळतं त्याचे आहेत. एसीत बसून, कुणीतरी वाढणारं असताना आपण हे पदार्थ खातो त्याचेही पैसे त्यात असतात. त्यामुळे...अशी आपणच आपल्या पदार्थांची, हॉटेलांची कुप्रसिद्धी करणं टाळावं. असं माझं मत.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/24/2015 - 12:22

In reply to या निमित्ताने एक विचार by वेल्लाभट

Permalink

२०० वा प्रतिसाद!

वेल्लाभटाच्या प्रतिसादाशी शंभर टक्के सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 09/24/2015 - 12:23

In reply to या निमित्ताने एक विचार by वेल्लाभट

Permalink

सहमत.

सहमत. झुणका भाकर केंद्रे काढुन आपण मराठी पदार्थांची अशीच व्हॅल्यु कमी केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/24/2015 - 12:28

In reply to सहमत. by मराठी_माणूस

Permalink

नाही तर काय!

नाही तर काय! त्यावरून एक एक जनरलायझेशन्स आठवतायत आणि राग येतोय. असो. वेगळा धागा काढायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/24/2015 - 12:45

In reply to या निमित्ताने एक विचार by वेल्लाभट

Permalink

अरेच्चा!

मसालेभात अन वांग्याच्या भाजीला व्हॅल्यु नाही कोण म्हणतो? खूप मेहनत आहे. माझा आक्षेप आहे तो फोडणीचा भात ग्लोरिफाय करून विकायला. मसालेभात पुलाव आणि फ्राईड राईसच्या बरोबरीने विकला गेलाच पाहिजे. खरे तर फ्राईड राईसमधे ते अजि नो मोटो वगैरे काहीही घालतात पुलावात तूप ओततात काही ठिकाणी, त्यापेक्षा मसालेभात हजार पटीने चांगला आणि हेल्दी म्हटला पाहिजे. थालिपिठासारखा पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ नाही. मराठी जेवण हे सगळ्या प्रकारात समतोल आणि हेल्दी असतं. त्यातले खास पदार्थ आहेत त्याचे मार्केटिंग करावेच. पण आपले लोक दळभद्री जिलेटिन घालून खरवस विकतात आणि आपलंच नाक कापून घेतात. त्या शिळ्या फोडणीच्या भातासाठी पैसे मोजायला तयार असलेल्या लोकांना तर साष्टांग दंडवत!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 12:55

In reply to अरेच्चा! by पैसा

Permalink

शिळा फोडणीचा भात हॉटेल

शिळा फोडणीचा भात हॉटेल/रेस्तरों मध्ये मिळत असला तर फोडणीची भाकरी(तुकडे) आणि पोळीचा मलीदा मिळालाच पाहिजे. अन्यथा आम्ही मोर्चा काढू. -सदस्यकाहीकारणनस्तानामोर्चाकाढूयेताजातानिषेधकरुचेजनकजेपीयांचीसंघटना
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Tue, 04/19/2022 - 21:05

In reply to या निमित्ताने एक विचार by वेल्लाभट

Permalink

या! मसालेभाताला ९५ रुपये

या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये? पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये???
दिल्ली (फेब्रुवारी २००२) बाथरुम फिटिंग्ज व्यावसायिकासोबत बिझिनेस लंच घेत असताना त्यांनी मला सांगितले की आता आपण व्यवसायाच्या जागी आहोत आणि वेळ कमी आहे अन्यथा यापेक्षा चविष्ट जेवण मी तुम्हाला घरी खाऊ घातले असते. आम्ही वेळ वाचविण्याकरिताच फक्त आणि तेही नाईलाजास्तव हॉटेलात जेवतो. अन्यथा स्वाद आणि असली घीचा चांगला माल घरी बनत असताना या सुमार जेवणाकरिता इतके पैसे खर्चणे जीवावर येते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 09/24/2015 - 12:20

In reply to ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना by प्यारे१

Permalink

प्यारे बुवा

प्यारे बुवा आपण मराठी लोक म्हणजे झैरातीतच मागे पडतो बघा. ते कोथिम्बिरवडी म्हणायचं आणि पस्तीस रुपयाला मोठ्या दोन वड्या द्यायच्या. त्यापेक्षा धनिया कबाब अलोंग विथ मिंट चटनी chutney म्हणायचं, (पुदिना चटणी नव्हे) आणि सहासात लहान पण गोल वळलेल्या कोथिम्बिरवड्याच द्यायच्या पण १२५ रुपये( अधिक कर) म्हणून लावायचे हे आपल्याला केव्हा जमायचं?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/24/2015 - 12:25

In reply to प्यारे बुवा by सुबोध खरे

Permalink

कसं बोललात !!!!

कसं बोललात !!!! हेच्च्च्च्च इथेच्च्च्च्च मार खातंय राव ते तुमचं मराठी माणूस...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 12:30

In reply to प्यारे बुवा by सुबोध खरे

Permalink

अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत

अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत होतो महाराज. एकदा नेल्यानंतर कोणी पाय ठेवील काय हाटीलात? बाकी दणक्या जेवतो बरे आम्ही. मराठी पदार्थास नावे ठेवीत नाही हो. फ़क्त घरी सुग्रास भोजन मिळत असता बाहेर काय म्हणून खावे? असा यांचा प्रश्न.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 09/24/2015 - 12:41

In reply to अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत by प्यारे१

Permalink

आमचे एक नातेवाईक दादरला

आमचे एक नातेवाईक दादरला प्लाझा समोर मराठी हॉटेल चालवतात. तेथे १४-१५ वर्षपूर्वी गेलो असताना त्याच्या यादीत( मेनू कार्ड) पदार्थ पाहत असताना एक जाणवले कि बटाटा वडा एक प्लेट १० रुपये आणि ब्रेड बटर २० रुपये. मी त्याला विचारले हे काय रे बाबा? त्यावर तो म्हणाला दादरला मराठी माणूस डोंबिवली कल्याण पासून येतो घरी जेवायला जाण्यासाठी एक ते दीड तास लागणार तोवर पोटाची सोय म्हणून एक प्लेट वडा फक्त १० रुपये. मी विचारले मग ब्रेड बटर २० रुपये कसे? त्यावर तो हसत म्हणाला आमच्या मुलाला ब्रेड बटरच लागते म्हणणाऱ्या हुच्चभ्रू लोकांना पैसे देऊ दे कि!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 09/24/2015 - 13:14

In reply to आमचे एक नातेवाईक दादरला by सुबोध खरे

Permalink

:-)

हेहेहेहे! मस्त विचारसरणी. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/24/2015 - 12:50

In reply to ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना by प्यारे१

Permalink

सोळा आणे!

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं.
सोळा आणे सही! प्याकिंग उघडलं की आत खरपूड आहे ते कळतंच! आमच्या फो.भा. ची कल्जी क्रू नये बर्का! तो फो.भा. च असेल. आणि लोक जरूर घेतील २०० रुपये मोजून. आजकालच्या लोकांना फो. भा. आवडत असेल तर खाऊ देत बापडे. नसीब अपना अपना!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 12:58

In reply to सोळा आणे! by पैसा

Permalink

ह्या ह्या ह्या. हिटलरकडे

ह्या ह्या ह्या. हिटलरकडे गोबेल होताच की!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/24/2015 - 13:01

In reply to ह्या ह्या ह्या. हिटलरकडे by प्यारे१

Permalink

तुम्हाला कोण पायजे?

हिटलर की गोबेल? आपल्याकडे सगळे आहेत. शिळ्या भाकरीचा कट्टा कधी करताय ते सांगा. फो.भा. आणि पेश्शल खरपुड्या मी स्पॉन्सर करते! =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 13:04

In reply to तुम्हाला कोण पायजे? by पैसा

Permalink

हिटलरकड़े गोबेल असतोच.

हिटलरकड़े गोबेल असतोच. हेल हिटलर. बाकी फुकट इतरांना द्या. हमें बख्श दो! मेतकूटाचा गोपाळकाला झाला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on गुरुवार, 09/24/2015 - 10:55

Permalink

गणपतीची पावती २५,००० ची फाडा

एवढे चालत असेल हे हॉटेल तर ह्यावेळेस मेतकुट वाल्याची, गणपतीची पावती २५,००० ची फाडायला काही हरकत नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 09/24/2015 - 11:18

Permalink

येस. हॉटेल व्यवस्थित गर्दी

येस. हॉटेल व्यवस्थित गर्दी खेचत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 09/24/2015 - 12:21

Permalink

मेत्कुटला गेलो नाही पण २००

मेत्कुटला गेलो नाही पण २०० पार केले
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/24/2015 - 12:48

In reply to मेत्कुटला गेलो नाही पण २०० by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर या की सांच्याला एकदा

डॉक्टर या की सांच्याला एकदा क्लिनिक बंद झाल्यावर.. एक कट्टा करून टाकू..हाकानाका! :) उकडीचे मोदक फार भारी मिळतात इथे..हां पारी थोडी जाड असते, पण तेवढं चालून जातेय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 09/24/2015 - 12:59

In reply to डॉक्टर या की सांच्याला एकदा by किसन शिंदे

Permalink

केंव्हा जायचं बोला.

केंव्हा जायचं बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/24/2015 - 13:12

In reply to केंव्हा जायचं बोला. by सुबोध खरे

Permalink

एक ऑक्टोबरला जमेल का?

एक ऑक्टोबरला जमेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 09/25/2015 - 14:40

In reply to एक ऑक्टोबरला जमेल का? by किसन शिंदे

Permalink

कट्टा

नक्की कधी ते ठरवा!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/25/2015 - 20:32

In reply to कट्टा by सुनील

Permalink

जमेल की. रात्रि २०.३० नन्तर

जमेल की. रात्रि २०.३० नन्तर
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/25/2015 - 20:34

In reply to जमेल की. रात्रि २०.३० नन्तर by सुबोध खरे

Permalink

फक्त मला हॉटेलच्या बाहेर

फक्त मला हॉटेलच्या बाहेर आशाळभूतासारखे वाट पाहायला आवडत नाही. लोक उठतात कधी आणि आम्ही बसतो कधी हे मला पटत नाही. ( वैयक्तिक दुर्गुण समजा)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Fri, 09/25/2015 - 11:11

Permalink

दुसरा अनुभव

मेतकूट नव्या जागी स्थलांतरीत झाल्यावरही एकदा गेलो होतो. बाहेर लोक इभे पाहिले आणि पदार्थ बांधुन नेले. चविच्या बाबतीत अपेक्षाभंग झाला. वांग्याचे भरीत म्हणजे मिरच्यांचे बारीक तुकडे मुक्तहस्ते पेरलेले शिजवलेले वांगे निघाले. ना दही ना चिंंचगूळ ना चमचमईत उत्तरे कडील मसालेदार बैंगन भरता. कदाचित ही त्यांची स्वतंत्र नवी पाककृती असेल. झुणका सुद्धा अगदीच सुमार होता. अर्थात हा माझा अनुभव. कदाचित लोकांना तेथील पदार्थ आवडत असतील. मेतकूट समोरच्या गल्लीत 'कोल्हापूर' शेजारी मी मराठी' सुरू झाले आहे, मी अजुन गलो नाही. कुणी अनुभवले आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 09/25/2015 - 15:46

Permalink

आमचा पण थोडा प्रतिसाद भार....

"मेतकूट"ला जाण्यापेक्षा. आमचे ३८, बँकॉक स्ट्रीट, बरे आहे. आणि साग्रसंगीत हवे असेल तर, "नंदी पॅलेस."
  • Log in or register to post comments

Submitted by प्रणवजोशी on Wed, 11/18/2015 - 12:37

Permalink

भयानक

मला सुद्धा असाच वाईट अनुभव आला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 11/18/2015 - 13:20

In reply to भयानक by प्रणवजोशी

Permalink

कधी?

कधी?
  • Log in or register to post comments

Submitted by जातवेद on Wed, 11/18/2015 - 15:26

Permalink

कोण ते धागा वर काढतय?

कोण ते धागा वर काढतय?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com