ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.
दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.
२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.
आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्हाइकच वाईट.
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.
मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
सकारात्मक प्रतिसाद आवडला.
सहमत
मेतकूट साहेब
बरोबर आहे!! 'आमच्याकडे असेच
सकारात्मक प्रतिसाद, आवडला.
किती प्रतिसादांचं स्वसंपादन
पुढच्या वेळेला चुकार शब्द
हे आणि वर खिजवणं दुसर्याला!
तुमचा मेनू
धागाकर्त्यांना
सेवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा
सहमत. या धाग्याच्या
आताच एका दुसर्या धाग्यावर
ओक्के. धागा वाचला नाही . आता
सुखद आश्चर्य....
मेतकूट या शब्दाचे मराठीत
maraathit type karane
मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे
आमच्या चुलत बहिणीचे नाव पण
खरे-खोटे करुन पाहिले पाहिजे
"खरे" नावाचे सर्वच आयडी,
मिपा म्हणजे अनावृत्त ग्राहक व्यासपीठ?
+१
’मेतकूट’विषयीची खमंग चर्चा
लेख परत एकदा नीट वाचा एवढचं
मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१
अरेरे
(अवांतर : तुमच्या
खर्याची दुनिया नाही : )
ठिक .. आम्ही पण असे नाय
हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन
म्हणजे असा एक धागा होता माबोवर.
म्हणजे असा एक धागा होता माबोवर.
यावरून आठवले
माझा गणेशा झाला आहे....
पर्यायी दुवा
त्या रेस्टॉरंट मालकाचा
केवळ अप्रतिम !
कहर...
मूळचा पुण्याचा मंगुश हॉटेलचा
सोनल?
भारतीय वंशाची नक्कीच
भारी प्रतिसाद ! सज्जड
नवी बातमी काय आहे मग?
मेतकूट सध्या जोरात सुरूये.
आम्ही आपलं घरीच मेतकूट भात,
बरं मग????
मग काय!
अहो पण स्टॅटिस्टिक्स वेगळं
हीहीही!