रक्तदाब!

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
3 Jan 2015 - 9:21 am

एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब!

उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर!
आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) )

उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो.
पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) )

उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही!
पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही!

उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत..
पण हुच्चवाली..??? हास्पिटलात्,आय-सी-यूत ताटकळत रहातात.

साध्यांना मरण सरळ येतं,सरळांना साधं येत नसलं..तर उच्चतम येत..डायरेक्ट क्रांतिकारकां सारखं!
हुच्चवाद्यांना त्यांचा रक्तदाब आयुष्यभर,अगदी होण्या आधीपासूनंही मारत असतो,प्रत्यक्ष मरणाचे तर बोलावयालाच नको!

मग मनात येतं.. हुच्चवाले,ही वांझोटी तडफड का बरं करत रहातात आयुष्यभर जगण्याची?
साध्यांसारखे साधे राहिले,तर त्याच साधेपणाने उच्चतमं पातळी गाठू,हे सहजमूल्य का बरं प्रवेशत नाही ,यांच्या आयुष्यात?

उच्चवाल्यांना झालाच तर हा चाळिशीत होतो,आणि साठीपर्यंत छळणार्‍या खौट मित्रासारखा सोबत करतो..(नंतर पोहोचवायलाही येतो..! ;-) )

पण हुच्चवाद्यांना..आपलं.. ते हे...वाल्यांना??? आधी...तो आहे,हे कळत नाही,आणि कळल्यावर "अता जाइल" . आपण किंवा तो..कोणिही!!!,याचं(च) वाइट वाटतं.. कारण पोहोचवायला याच्या सकट सगळे येतात,पण निरोप कोणिच देत नाही.

पण परत विचार केला..आपल्याही रक्तदाब आहे,आणि तो वाढेल असं वागायला परवानगी पण नाही आता आपल्याला!
मग,सोडून देऊ ज्याचा त्याचा रक्त-दाब्,ज्याचा त्याच्यापाशी!
किमान आजच्या दिवस तरी आपला रक्तदाब नियंत्रित राहिल..(आपल्याचपाशी... ;-) )
नाही का?
==============================
आपला:- रक्त दाबावर-चाल्लेला ~ अतृप्त

आरोग्यदायी पाककृतीगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यअद्भुतरसकवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

3 Jan 2015 - 11:28 am | स्पंदना

काव्यरस:
आरोग्यदायी पाककृती
गरम पाण्याचे कुंड
बालसाहित्य
अद्भुतरस

*new_russian* \m/ \M/

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 1:50 pm | अत्रुप्त आत्मा

गम्मत जम्मत केल्ये हो! :-D
वाचा आणि सोडुन द्या! :)

कंजूस's picture

3 Jan 2015 - 1:12 pm | कंजूस

गाडी आता मिरज पंढरपूर मार्गावरून कुर्डुवाडी सोलापूरकडे चाललीय का ?अगा पांडुरंगा !

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

@मिरज पंढरपूर मार्गावरून कुर्डुवाडी सोलापूरकडे चाललीय का?>> :D नाही कंजूस काका, ही वाट तर चोराच्या आळंदिची! :D

खटपट्या's picture

3 Jan 2015 - 1:36 pm | खटपट्या

मी हुच्च की उच्च ?

विशाल कुलकर्णी's picture

3 Jan 2015 - 3:56 pm | विशाल कुलकर्णी

:D

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2015 - 8:06 pm | टवाळ कार्टा

याच्यावर "फक्तदाब" असे विडंबन लिहिण्याचा कॉपिराईट घेऊन ठेवत आहे...तस्मात कोणीही "फक्तदाब" अथवा त्याच्या अनुशंगाने डोक्यात येणारे विचार ;) यावर विडंबन करू/पाडू :D नये अशी विषेश विनंती
तसेच आजकाल विडंबनामुळेसुध्धा काही मिपाकरांच्या "भावना दुखावल्या जात आहेत" त्यामुळे ज्यांना ज्यांना "फक्तदाब" वाचायची असेल त्यांनी मला व्यनी करुन कळवावे...विडंबन तयार होताच व्यनीतूनच पाठवले जाईल

अवांतर - वरील विनंतीस गुर्जी अथवा गुर्जींचा वशीला घेउन येणारे अथवा गुर्जींच्या कंपूतले अपवाद असतील (कंपूतल्यांनी "कंपूच्या सदस्यत्वाचा पुरावा स्वतः द्यावा" :) )

सस्नेह's picture

3 Jan 2015 - 10:14 pm | सस्नेह

ताम्रपात्रातील 'फक्तदाब' पुरेसा सक्षम होऊन पाकचक्रिका 'सुलभ' होण्यासाठी शुभेच्छा *biggrin*

टवाळ कार्टा's picture

4 Jan 2015 - 12:48 am | टवाळ कार्टा

नाही ....हे "तसले" विडंबन नस्णारै :P
हे खास "पुरुष" विभागासाठी लिहायचा विचार चालू आहे ;)

हाडक्या's picture

6 Jan 2015 - 4:05 pm | हाडक्या

ट.का.. आगदी हाच "फक्तदाब" विडंबन विचार आमच्या मनी आला तोच तुमचा पर्तिसाद पाह्यला ..
णिशेध..! णिशेध..!! ;)

बादवे "फक्तदाब" व्यनि करा हो.

सौंदाळा's picture

6 Jan 2015 - 4:17 pm | सौंदाळा

मला पण एक कॉपी पाठवा तयार झाली की

सूड's picture

6 Jan 2015 - 4:10 pm | सूड

वशाडी येवो.

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 9:37 am | टवाळ कार्टा

तुजी बायल पन तुका ह्याच म्हणतली :P

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2015 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा

=))))) आग्गाग्गाग्गाग्गाग्गा !!! =)))))

प्रचेतस's picture

6 Jan 2015 - 4:36 pm | प्रचेतस

अतिशय सुरेख कविता

पैसा's picture

6 Jan 2015 - 11:09 pm | पैसा

तुमचा रक्तदाब कशानी वाढला पण?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

छळ!!!! दू.....दू.... छळ!!!! :-\

प्रचेतस's picture

6 Jan 2015 - 11:35 pm | प्रचेतस

कोण आहेत हे छळवादी म्हणे?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

मिपा प्रसिद्ध म्हण:- आगोबाच्या उलट्या बोंबा! :P

बॅटमॅन's picture

7 Jan 2015 - 12:56 am | बॅटमॅन

च्यायला =))

तदुपरि, "फक्तदाब" या एका शब्दप्रयोगात अनेकानेक अर्थ व श्लेष लपलेले पाहून कसं सगळीकडं संक्लिद्य संक्लिद्य झालं. =))

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 9:37 am | टवाळ कार्टा

;)

सतिश गावडे's picture

7 Jan 2015 - 2:25 pm | सतिश गावडे

या निमित्ताने "दिस चार झाले मन संक्लिद्य होऊन" हे गाणे आठवले.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2015 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा

@अनेकानेक अर्थ व श्लेष लपलेले पाहून कसं सगळीकडं संक्लिद्य संक्लिद्य झालं> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy007.gif अरे..हल'कट खाटुका! http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy007.gif