१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत
मिपाकरांनो,
प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)
ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.
पुण्याहून येणार्या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.
मुंबईहून येणार्या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.
ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.
मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच.
नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको.
आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला.
तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा.
अरे हां..महत्वाची गोष्ट......
प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.
ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी मुंबईहून नक्कीच येईन.
नेरळ
१४ ला रात्रिच येण्याचा इचार
मी आहे रात्रकट्ट्याला
ज्याना या कट्टयाला यायचंय
कशेळे वनविहार कट्ट्याला
४)अलिबाग/पेणकडून
ऐला कशेळे इकडं आहे होय! या
काही स्पष्टीकरण हवेय ! मुवि !
सविस्तर पत्र कशाला? हेच जाहीर आमंत्रण आहे...
मी येणार
हो,चालेल की.
..आमचे नाव नोंदवा १४ रात्रीपासुन...!!!
बुकींग किती दिवस आधी करावे लागणार आहे.
आत्ताच शिवाजी यांच्याशी बोलणे
१५ च्या कट्ट्याला नक्की येणार
मी सकाळी येईन
होय...
मी पण येईन.
१४ ला रात्रिच येण्याचा इचार
स्वागत...
जबरा कट्टा होणार असे दीसतेय !
कट्ट्यास शुभेच्छा. सुट्टी
PUNE SAT)
MUMBAI /THANE/KALYAN)मुंबई
आई गं !
(कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?)
मी २ थेंब घेईन
मोह वाईट..
मोह वाईट..
म्हण्जे ...
मि पन ..... २ थेम्ब ....
पन नागपूर ला...
अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे
जर आधी नीट ठरत असेल की किमान
+ १
+१
अशीच अरेंजमेंट ..
काका,
त्यापेक्षा ..
_/\_
तुमचा मार्ग आणि वेळा कळवा.
एक्का साहेब फक्त फोटो नको या
हरकत नाय !
MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा
बास्स बास्स्स.
मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन
ट्क्या तू इचारतोस आण्भव काय??
अर्रे...मला त्या घोड्यावर (का
मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे