✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/01/2015 - 13:34  ·  लेख
लेख
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच. नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको. आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला. तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा. अरे हां..महत्वाची गोष्ट...... प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
30080 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 11:45 नवीन
मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे
घोड्यावरील उच्च 'विनोद' *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टक्या शी सहमत. तो शांतीवादी

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:10 नवीन
टक्या शी सहमत. तो शांतीवादी आहे. इन्फॅक्ट पुढच्या वर्षी त्याला नो-बेल मिळणारे शांतीसाठी. (वाजवा रे वाजवा) देवा ह्याला लौकर शांती देरे बाबा!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:22 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

शांती

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 16:55 नवीन
ही चालेल का ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ही मंदिरातली शांती मी लहान

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 22:28 नवीन
ही मंदिरातली शांती मी लहान असल्यापासुन बुक करुन ठेवलीये. तस्मात वो मेरी है!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बाबौ !!

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 11:57 नवीन
बाबौ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एका सीरियलीचे नाव आठवले.

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 19:16 नवीन
एका सीरियलीचे नाव आठवले. *** लगते हैं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ते ** ** असे हवे होते ना?

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 19:34 नवीन
ते ** ** असे हवे होते ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी...

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 19:39 नवीन
ये हृदयींचे ते हृदयीं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@तो शांतीवादी आहे. इन्फॅक्ट

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/22/2015 - 22:19 नवीन
@तो शांतीवादी आहे. इन्फॅक्ट पुढच्या वर्षी त्याला नो-बेल =)))))) मिळणारे शांतीसाठी.> =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

घोड्यावरील उच्च 'विनोद'

वैभव जाधव
Fri, 01/23/2015 - 19:42 नवीन
घोड्यावरील उच्च 'विनोद'
जणू ऊच्चै:श्रवा (स्पेलिंग मिष्टेक मापी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ऑ ? तुम्ही घोड्यावरून जाणार ?

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 14:46 नवीन
ऑ ? तुम्ही घोड्यावरून जाणार ? चौरकाका काय म्हणाले नव्ह्ते तसं !... आता उघड्या जीपवर बसवलेला क्यामेरा शोधणे आले +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पयशे

चौकटराजा
Fri, 01/16/2015 - 14:29 नवीन
पयशे युरो मधे घेऊन येणे. डोलर कालच ४२ पैशानी ( अरेरे अमेरिकनानो काय हे ?) घसरलेला आहे रू च्या तुलनेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ब्याक्कार हसतोय

आदूबाळ
Fri, 01/16/2015 - 22:27 नवीन
ब्याक्कार हसतोय :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मी मुंबईहून नक्की आहे....

सुहास झेले
Fri, 01/02/2015 - 13:17 नवीन
मी मुंबईहून नक्की आहे.... :)
  • Log in or register to post comments

मी १०० % येणार

विजुभाऊ
Fri, 01/02/2015 - 14:11 नवीन
मी १०० % येणार
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

सूड
Fri, 01/02/2015 - 15:10 नवीन
शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments

का रे?

पैसा
Fri, 01/02/2015 - 15:14 नवीन
हिरव्या देशात जाणारेस का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छे!! तसं झालंच तर बरंय म्हणा.

सूड
Fri, 01/02/2015 - 15:27 नवीन
छे!! तसं झालंच तर बरंय म्हणा. ;) पण सध्यातरी एका शाळामित्राच्या लग्नाला हजेरी लावायचीये, ते नाही केलं तर आयुष्यभर शिव्या खाव्या लागतील. त्यापेक्षा एका कट्ट्याला गैरहजर राहणं परवडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी येणार.

अन्या दातार
Fri, 01/02/2015 - 15:34 नवीन
मी येणार.
  • Log in or register to post comments

वाहन करणे

कंजूस
Fri, 01/02/2015 - 16:05 नवीन
सकाळच्या डेक्कन expचे दादर ते नेरळ रेज सह तिकिट फक्त साठ रूपये आहे आणि ८.२५ला नेरळला 'वनपीस' नेते.
  • Log in or register to post comments

आधी कशेळी वाचल्यावर वाटले...

अनन्न्या
Fri, 01/02/2015 - 16:22 नवीन
रत्नागिरीत कट्टा! पण हे फारच दूरचे कशेळी निघाले. कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आणखी एक कशेळी

सुनील
Sat, 01/03/2015 - 06:37 नवीन
तसे दुसरेही एक 'कशेळी' ठाण्याला लागूनच, भिवंडी रस्त्यावर आहे! कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

ओ ते

इरसाल
Fri, 01/16/2015 - 11:01 नवीन
कशेळी नाही कशेळे आहे क शे ळे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

खरंच कशेळे आहे का ? कारण

खटपट्या
Fri, 01/16/2015 - 12:22 नवीन
खरंच कशेळे आहे का ? कारण बाजुच्या खारेगावातील लोक कशेळीच बोलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

चॅक

इरसाल
Fri, 01/16/2015 - 13:08 नवीन
ते कर्जतवालं जे आहे ते कशेळे आहे अस म्हणायचं होतं मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

बराकभायच्या मुंबै एम्बस्सीची

स्पार्टाकस
Sat, 01/03/2015 - 07:44 नवीन
बराकभायच्या मुंबै एम्बस्सीची कंची डेट मिळते त्यावर अवलंबून हाय! जमल्यास रात्रीपासून हजेरी असंल!
  • Log in or register to post comments

जमल्यास रात्रीपासून हजेरी असंल!....

मुक्त विहारि
Sun, 01/04/2015 - 13:43 नवीन
हे तर एकदमच मस्त.... बराकभायशी बोलू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

बराकभाईंबरोबरच या ना मग.

अजया
Sun, 01/04/2015 - 14:42 नवीन
बराकभाईंबरोबरच या ना मग.
  • Log in or register to post comments

बराकभाईंना घेऊन यायचे असेल तर

अन्या दातार
Mon, 01/05/2015 - 11:17 नवीन
बराकभाईंना घेऊन यायचे असेल तर आजूबाजूला बरॅक बांधाव्या लागतात. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ज्यांना शक्य असेल त्यांनी...

मुक्त विहारि
Mon, 01/05/2015 - 13:02 नवीन
आपापल्या जोडीदारा समवेत आल्यास उत्तम....
  • Log in or register to post comments

मिपाकर सहकुटुंब येण्यास काही

अजया
Mon, 01/05/2015 - 13:53 नवीन
मिपाकर सहकुटुंब येण्यास काही हरकत नाही.फक्त किती जण हे स्पष्ट सांगुन ठेवावे,बुकिंगच्या सोयीसाठी.
  • Log in or register to post comments

येण्याचा नक्की प्रयत्न करेन!

भाते
Mon, 01/05/2015 - 19:57 नवीन
(बुकिंगच्या दृष्टीने)नक्की होकार/नकार कळवण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • Log in or register to post comments

भाते...

मुक्त विहारि
Mon, 01/05/2015 - 23:33 नवीन
तुमचे नांव आधीच नक्की केले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

सांगा महिना अखेरपर्यंत.आपण

अजया
Mon, 01/05/2015 - 20:11 नवीन
सांगा महिना अखेरपर्यंत.आपण तात्पुरतं तारीख बुकिंग १५ जानेवारीला करुन ठेवणार आहोत.माणसांचा आकडा सावकाश चालेल.
  • Log in or register to post comments

अर्ज किया है...

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 01/08/2015 - 09:27 नवीन
अर्ज किया है...

"मुवि तो कट्टे का दिवाना है", "कट्टा तो मिलने का इक बहाना है", "निकलता है तो निकलने दे जनाजा मेरा ए खुदा" "लेकिन मिपाकरोंसे मिलनेके बाद ही तेरे पास आना है"!

  • Log in or register to post comments

व्वा...

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/08/2015 - 09:39 नवीन
व्वा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

वाहवा वाहवा !!

खटपट्या
गुरुवार, 01/08/2015 - 09:57 नवीन
वाहवा वाहवा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

हाम आपके हय कोण ?

चौकटराजा
गुरुवार, 01/08/2015 - 10:09 नवीन
मुवि है ये कट्टेका दिवाना क्युं के इसको है प्यारा बहोत खाना शौक है ये इसका पुराना कट्टे का कोई भी निकालता बहाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

मी पण पुण्यावरुन येणार आहे.

गणेशा
Fri, 01/09/2015 - 13:16 नवीन
मी पण पुण्यावरुन येणार आहे. बुकिंग करावे.
  • Log in or register to post comments

है शाब्बास...

मुक्त विहारि
Fri, 01/09/2015 - 13:26 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

रविवारी सकाळी शक्यतो बाईक ने

गणेशा
Fri, 01/09/2015 - 13:48 नवीन
रविवारी सकाळी शक्यतो बाईक ने येण्याचा विचार आहे, जर बरेच जन असतील आणि ते ट्रेन ने जाणार असतील सकाळी तर त्यांच्याबरोबर पण येईन. आमचे परम मित्र .. अआ आणि वल्लीशेट आदल्यादिवशी जात असल्याने आम्ही एकटे पडलो आहे.. कोण आहे काय सकाळच्याला जाणारे. हर्षद दिसत नाही रे आजकाल येथे
  • Log in or register to post comments

कोण आहे काय सकाळच्याला जाणारे

टवाळ कार्टा
Fri, 01/09/2015 - 14:37 नवीन
कोण आहे काय सकाळच्याला जाणारे. >> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अात्तापर्यंत आलेली नावे

अजया
Sat, 01/10/2015 - 09:43 नवीन
अात्तापर्यंत आलेली नावे मुवि सहकुटुंब विनोद १८सहकुटुंब भाते समिर२० डाॅ खरे सहकुटुंब मापं कंजूस नुलकर कुटुंब वल्ली सगा बुवा गणेशा अभ्या दोघे बोका ए आझम बाहरीनचा खलिफा अन्या दातार कॅप्टन जॅक स्पॅरो उर्फ वर लिहिलेले नाव! चौरा काका विजूभाऊ सुहास झेले टका पिंगु इस्पिकचा एक्का द रामदास काका स्वच्छंदी मनोज पैसा ताई अजया इनिगोय मनिमौ सुचेता
  • Log in or register to post comments

रात्रकट्ट्याला असणारे आणि

टवाळ कार्टा
Sat, 01/10/2015 - 11:22 नवीन
रात्रकट्ट्याला असणारे आणि नसणारे अश्या २ याद्या बनवल्या तर बरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

..रात्रकट्ट्याला बसणारे आणि न

गवि
Sun, 01/18/2015 - 14:33 नवीन
..रात्रकट्ट्याला बसणारे आणि न बसणारे असं म्हणायचंय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे रात्रकट्ट्याला

टवाळ कार्टा
Sun, 01/18/2015 - 14:57 नवीन
हे रात्रकट्ट्याला असणार्यांच्या मधले २ प्रकार असू शकतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

रात्र कट्ट्याला

मुक्त विहारि
Sun, 01/18/2015 - 22:52 नवीन
५ ओप्शन्स आहेत. १. पक्षी-तीर्थ वाले, २. पक्षी वाले ३. तीर्थ वाले. ४. फक्त शाकाहारी. ५. शनिवार असल्याने उपास करणारे. थोडक्यात सगळ्यांचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 09:41 नवीन
खिक्क...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

"शनिवार असल्याने उपास करणारे"

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 09:42 नवीन
"शनिवार असल्याने उपास करणारे" म्हणजे "बुवाबाजी" कर्णारे काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा