✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

श
शशिकांत ओक यांनी
Mon, 09/22/2014 - 17:52  ·  लेख
लेख

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी? यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो... संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय? असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
भाषा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
37669 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

काय आठवण करून दिलीत

बॅटमॅन
Mon, 09/29/2014 - 15:07 नवीन
काय आठवण करून दिलीत चित्रगुप्तजी....फीलिंग लैच नॉस्टॅल्जिक. 'बाराबोड्याचा' मागे काहीतरी व्युत्पत्ती आहे असे वाचल्याचे स्मरते. नक्की काय ते तूर्त माहिती नाही, पाहून सांगतो. इन जण्रल, -बोड्याचा हा प्रत्यय म्ह. त्या अगोदरचा गुणधर्म अधोरेखित करण्यासाठी असतो. उदा. तो लै हरामखोर**ड्याचा आहे. इथे -**ड्याचा हा प्रत्यय, हरामखोरपणा हा गुणधर्म त्या व्यक्तीत आहे हे सूचित करण्यासाठी वापरला जातो. एखादा गुणधर्म माणसात आहे याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवातही आहे अशी काहीशी ती धारणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इचिभन

इरसाल
Tue, 09/23/2014 - 15:56 नवीन
इचि- त्याच्या/त्याच/, भन म्हणजे बहिण.
  • Log in or register to post comments

तसं असेल तर शाळेच्या

सूड
Tue, 09/23/2014 - 16:35 नवीन
तसं असेल तर शाळेच्या ग्रूपमध्ये जायलाच नको!! ;)
  • Log in or register to post comments

गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची

प्रचेतस
Tue, 09/23/2014 - 16:40 नवीन
गधेगाळींमधली नेहमीचे तेहाची माय..सोडून इतर वेगळी शापवाचाने टंकू काय? ;)
  • Log in or register to post comments

टंका टंका !!

सूड
Tue, 09/23/2014 - 16:43 नवीन
टंका टंका !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कंटा कंटा !

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/23/2014 - 17:02 नवीन
कंटा कंटा ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आत्मूबुवांचा हा प्रतिसाद

बॅटमॅन
Tue, 09/23/2014 - 17:57 नवीन
आत्मूबुवांचा हा प्रतिसाद म्हणजे अंमळ सौदिंड्यन उच्चार वाट्टोय. आय होप अर्थ समजण्यातले कंटक दूर झाले असतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

टंका टंका !!

सूड
Tue, 09/23/2014 - 16:43 नवीन
टंका टंका !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

टंका की

बॅटमॅन
Tue, 09/23/2014 - 17:56 नवीन
टंका की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुठल्या, कुठे, आणि कधी

वेल्लाभट
Tue, 09/23/2014 - 17:47 नवीन
कुठल्या, कुठे, आणि कधी द्यायच्या एवढं कळलं; तर शिव्या दिल्या म्हणून बिघडत नाही. एक मत आपलं. बाकी चालूदे.
  • Log in or register to post comments

काकांशी बाडिस!!

सूड
Tue, 09/23/2014 - 17:47 नवीन
काकांशी बाडिस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

देशभरात सफाई अभियान

शशिकांत ओक
Tue, 09/23/2014 - 20:50 नवीन
मित्रांनो, बडा प्रधान सेवक, न. मो. यांनी आज अशी हाक दिली की हे सर्व भारतीय नागरिकांनो, आपण आपल्या कामातून आठवड्यातील 2 तास सफाई अभियाना देऊ शकणार नाही काय... त्याच प्रकारे मी सुचवतो हे मिपा मित्रांनो आठवड्यातील 2 तास आपण जिव्हाशुद्धी करता देऊ शकत नाही काय ... ज्यांना नाही द्यायचे त्यांना हे आवाहन नाही. पण जे राष्ट्र निर्मितीच्या विधायक कामात आपला सहभाग असावा असे कळकळीने मानतात व सक्रीय भाग घेतात त्यांनी काही तास आपल्या जिव्हेवर ताबा ठेवायला काय हरकत आहे... विचार व्हावा....
  • Log in or register to post comments

राष्ट्रनिर्मिती....

प्रभाकर पेठकर
Tue, 09/23/2014 - 21:12 नवीन
अपशब्दांचा अनावश्यक वापर करू नये असे मलाही वाटते. शिव्यांना सर्वस्वी बासनात बांधुन ठेवावं अस काही वाटत नाही. >>>>जे राष्ट्र निर्मितीच्या विधायक कामात आपला सहभाग असावा असे कळकळीने मानतात व सक्रीय भाग घेतात त्यांनी काही तास आपल्या जिव्हेवर ताबा ठेवायला काय हरकत आहे... राष्ट्रनिर्मितीच्या कामात शिव्यांमुळे अडथळा येतो? असे वाटत नाही. पश्चिमेकडची जी राष्ट्रे आपण प्रगत मानतो तिथली जनता येता जाता अपशब्द वापरत असतात. इतरांसाठी तसेच स्वतःच्या चुकासाठी स्वतःलाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

राष्ट्रनिर्मिती आणि

सूड
Tue, 09/23/2014 - 21:49 नवीन
राष्ट्रनिर्मिती आणि जिव्हाशुद्धीचा परस्परसंबंध लक्षात आला तर बरं होईल. आणि जिव्हाशुद्धीपेक्षाही आपण राहतो, कामासाठी जातो, वावरतो त्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काही करता आलं तर पाहावं (अर्थात ज्याचं त्यानं)!! बाकी पेठकर काकांशी सहमत, शिव्यांचा अतिरिक्त वापरही नको आणि बासनात गुंडाळून ठेवणेही नको. बाकी अष्टमी जवळ आलीच आहे, घागरी फुंकणं चालू देत!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

काका ...शिरियस मोड ऑन >>>>

सुहास..
Tue, 09/23/2014 - 21:18 नवीन
काका ...शिरियस मोड ऑन >>>> माझ्या मते शिव्या देण्याचे दोन प्रकार आहेत , एक म्हणजे लेव्हलच्या माणसाबरोबर लाडिक संवादात , उदा. काय रे भाड्या कुठे आहेस दोन दिवस ? या करिता लेव्हल लागतेच . उद्या मी जर हे पेठकर काकांशी बोलताना वापरल तर काका माझी छानशी रेसीपी तयार करुन घुबडांना खायला घालतील...शिवाय माझ्यासाठी जे आदरार्थी आहेत त्यांना अशी भाशा वापरायची माझी मजल देखील जात नाही.. .हे वरील वाक्यातील भकाराने सुरु होणारा शब्द मी तुमच्याशी, पका काकाशी पिंडा काकांशी बोलताना वापरु शकत नाही, मजल जात नाही ..पण समवयस्क , आणि गहरा दोस्ताना असलेल्याशी मात्र बोलु शकतो ..उदाहरणे खुप आहेत , आणि त्यांना मनसोक्त शिव्या ही द्यायच्या आहेत , त्यातही फरक आहे ...खानदेशी, कोल्हापुरचे ( जे एकमेकांशी जवळ आहेत ) त्यांच्या ऐकाल तर घाम फुटेल .. पण उद्या एखादा पुणेकर मला 'बैल रान्डीच्या' म्हटल्यावर मला आश्चर्य वाटेल ( अर्थात माझ्या सारख्याला बैल म्हणने म्हणजे तो बैल नक्की दुष्काळग्रस्त भागातला असावा ;) पहिल्यांदा जेव्हा ही शिवी ऐकली तेव्हा ....असो ) ...या झाल्या कॅज्युल गोष्टी .. आता दुसरा प्रकार म्हणजे रागा-रागात शिव्या देणे ( मान्य आहे की या प्रकारात शिव्या देण्याने भो* पडत नाहीत ) पण मानसिक व्हेन्टिलेशन होते ..म्हणजे जिव्हा अशुध्द होत असली तरी मन शुध्द होते की !! मग कशाल अडचण ...बर्‍याच जेव्हा असे होते त्याला आपल्याला शारिरिक दुखापत करु शकत नाही, त्याच्यांकरिता हा शेवटचा पर्याय आहे ... असो प्रेमचंद मुन्शी ची एक कथा आठवली ... एक माणुस आपल्या बॉस च्या वागण्याने खुप परेशान असतो ..बॉसचा राग दिवस-रात्र बायका-पोरांवर , कधी मित्रांवर काढत असतो ...त्याच्या एक मित्र त्याला शेवटी विचारतो काय रे बाबा का चिड चिडा झाला आहेस हल्ली ? कारण सांगीतल्यावर मित्र आयडिया देतो ...याच वागणं बदलत ...शांत होतो ..बायकोशी आनि -पोराबाळांशी व्यवस्थित वागायला लागतो ...बायको ला कळत नाही ..ती जरा लक्ष देते ..तर समजते की हा दररोज अर्धा तास उशीरा येतो आहे ...एक दिवस ती त्याचा पिच्छा करते ...हा ऑफिसमधुन सरळ एक एकांताच्या ठिकाणी जातो अजिबात कुणी नसत ...एका झाडाला त्याच्या बॉस चा फोटो लावलेला असतो ...त्याच्या बॉस ला तो जे दणकुन शिव्या देत असतो फोटोवर दगड फेकत असतो ...सरते शेवटी पायातला जोडादेखील मारतो ..अर्धा तास खंड शिव्या दिल्यावर चेहर्‍यावर शातंता आणि हास्य दिसते ....बायकोला कारण कळत त्याच्या घरी शांत वागण्याच !! असो ..बाकी आपकी मर्जी <<<< शिरीयस मोड ऑफ
  • Log in or register to post comments

+१

योगी९००
Wed, 09/24/2014 - 12:14 नवीन
माझ्या मते शिव्या देण्याचे दोन प्रकार आहेत +१ फॉर दोन्ही प्रकार.. आता उदाहरणार्थ मा.चो. ही शिवी घ्या. (म्हणजे माखनचोर म्हणायचे आहे मला...) ... तुमच्या मित्राला प्रेमाने (किंवा लाडीकपणे) "काय रे मा.चो. ? काय म्हणतोस" असे म्हणा. त्याला काही शिवी दिली असे वाटणार नाही. पण हेच जर रागाने आणि दात ओठ खात "माखनचोर" असे म्हणा आणि बघा काय होते ते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सलगी व सवय

शशिकांत ओक
Tue, 09/23/2014 - 21:51 नवीन
मित्रांनो, सलगी युक्त संभाषणातून असे अर्वाच्य शब्द वापरायची आपल्याला सवय झाली आहे, ठीक आहे, पण ती अन्य लोकांना संबोधित करण्यासाठी योग्य नाही याचे भान आपल्या कडून राखले जाते... मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत नाही. अयोग्य सवय सोडणे केंव्हा ही हितकर...
  • Log in or register to post comments

@मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/23/2014 - 22:55 नवीन
@मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत नाही. @अयोग्य सवय सोडणे केंव्हा ही हितकर... >>> या परस्पर विसंगत वाक्यांचा अन्वय कसा साधायचा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

भारत सफाई अभियानात...

शशिकांत ओक
Mon, 09/29/2014 - 00:04 नवीन
  • Log in or register to post comments

न उमटलेला प्रतिसाद...

शशिकांत ओक
Mon, 09/29/2014 - 00:07 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

भारत सफाई अभियानात...

शशिकांत ओक
Mon, 09/29/2014 - 00:04 नवीन
  • Log in or register to post comments

भारत सफाई अभियानात...

शशिकांत ओक
Mon, 09/29/2014 - 00:04 नवीन
  • Log in or register to post comments

आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची

मृत्युन्जय
Mon, 09/29/2014 - 16:19 नवीन
आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची लिंक इथेच डकवतो आहे. विषयाला अनुसरौन असल्याने तेवढीच स्वतःच्या धाग्याची प्रसिद्धी करुन घेतो ;)
  • Log in or register to post comments

आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची

मृत्युन्जय
Mon, 09/29/2014 - 16:21 नवीन
आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची लिंक इथेच डकवतो आहे. विषयाला अनुसरौन असल्याने तेवढीच स्वतःच्या धाग्याची प्रसिद्धी करुन घेतो ;) भाषिक संपत्ती http://misalpav.com/node/15135
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा