आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
14 Sep 2014 - 9:47 am

America was not discovered; it was built!

अमेरिका सापडली नाही, ती उभारली गेली! हे एक प्रसिद्ध वाक्य मी बऱ्याच वेळेला ऐकले होते.
नुकतीच 'The Men Who Built America' ही मालिका History channel वर बघितली. त्यामधील उद्योजकांच्या गोष्टी पाहून आश्चर्य तर वाटलेच परंतु अमेरिकेचा इतिहाससुद्धा समजला आणि वरील वाक्य तर शतशः पटले.

या मालिकेमध्ये इतक्या छान तऱ्हेने सर्व उद्योजकांचा इतिहास समजावून दिला होता कि मला तो इतिहास तुमच्या बरोबर वाटून घ्यावा असे न वाटेल तरच नवल. खूप काही शिकण्यासारखे होते. न्यूयॉर्कमध्ये रहात असल्याने कितीतरी वेळा ग्रँड सेन्ट्रलला जाउन आलोय. कितीतरीवेळा रॉकफेलरच्या बिल्डिंग समोर उभे राहून ख्रिसमसचे झाड बघितलय परंतु त्यांचा इतिहास आज पहिल्यांदा कळला.

वादातीतही सही पण ज्यांनी अपार कष्ट घेऊन एक संपूर्ण देश उभा करण्यात हातभार लावला त्यांना सलाम!

-----------------------------------------------------------------------------------------------------

१४ एप्रिल १८६५, अमेरिकेतील यादवी युद्ध (civil war) संपल्यानंतर फक्त ५च दिवसांनी अब्राहम लिंकन यांची हत्या झाली. आत्तापर्यंत झालेल्या अमेरिकेतील रक्तरंजीत क्रांतीतील ६००,००० बळीमधील हा शेवटचा बळी! देश विभागला गेला.

Abraham Lincoln Murder

सारे जग अमेरिकेकडे 'एक फसलेला लोकशाही प्रयोग' म्हणून बघू लागले. पण त्यांना हे माहित नव्हते कि अमेरिकेने एका नव्या विश्वात प्रवेश केला होता. एक छोटासा उद्योजकांचा समूह देशाला प्रगतीकडे घेऊन जाणार होता. रॉकफेलर, व्हँडरबिल्ट, कार्नेगी, फोर्ड, मॉर्गन सारख्या उद्योजकांनी अमेरिकेला एका नव्या वाटेवर नेउन एका नवीन अमेरिकन संस्कृतीच्या पायघड्या घालण्यास सुरुवात केली होती. पुढची पाच दशकं हि मंडळी अमेरिकेवर राज्य गाजवणार होती. या मंडळींकडे असलेली दूरदृष्टी इतिहास घडवणार होती. आणि यांच्यामुळेच २०व्या शतकाच्या त्या ५० वर्षात जग घडले असे म्हणायला इतिहासकार कमी करत नाहीत आणि ती अतिशयोक्तीही नाही.

न्यूयॉर्क १८६५ - नवीनच तयार झालेल्या नव अमेरिकेचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला पहिल्यांदा कोणीतरी राजकीय व्यक्ती नव्हता. हा होता स्वकष्टाने आणि दृढ इच्छाशक्तीने गरिबीतून वर आलेला आणि स्वतःचे साम्राज्य निर्माण करणारा ..

कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट (२७ मे १७९४-४ जानेवारी १८७७)

Vanderbuilt

वयाच्या १६व्या वर्षी कोर्नेलिअस व्हँडरबिल्टने $१०० कर्ज घेऊन एक फेरी बोट विकत घेतली. लवकरच त्याने एक अतिशय गळेकापू स्पर्धक म्हणून नाव कमावले. जिंकण्यासाठी काहीही करणारा व कोणत्याही थराला जाणारा असा हा तरुण होता. लवकरच त्याच्या एका बोटीच्या अनेक बोटी होऊन त्या न्यूयॉर्क वरून देशाच्या सर्व कानाकोपर्यात मालाची आणि उतारूंची वाहतूक करू लागल्या. कमी भाडे आकारून स्पर्धकांवर मात करणे आणि नंतर त्यांच्या कंपनी विकत घेणे अशी त्याची पद्धत होती. या पद्धतीला घाबरून 'हडसन रिव्हर असोसिएशन’ या स्पर्धक कंपनीने कॉर्नेलिअसला भरमसाट मोबदला देऊन हडसन नदीवरील जहाज-वाहतूक सोडून देण्यास राजी केले.

नवीन तयार झालेल्या देशाला मालवाहतूक करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांची गरज होती आणि नवनिर्मित सरकार काही लगेच हि मागणी पूर्ण करू शकणार नव्हते. व्हँडरबिल्टने हे ओळखले आणि त्याने यामध्ये पुढाकार घेण्याचे ठरवले. 'व्हँडरबिल्ट' हे नाव नाविक उद्योगाशी एवढे जोडले गेले कि त्याला 'कॉमाडोर' (English: commodore मराठी: अॅडमिरल व कॅप्टन यांच्या दरम्यानचा एक नाविक अधिकारी) असे संबोधण्यात येऊ लागले. पुढच्या ४० वर्षात व्हँडरबिल्टने जगातले सर्वात मोठे खाजगी नाविक साम्राज्य तयार केले.

आणि मग त्याच्या कारकीर्दीच्या सर्वोच्चक्षणी यादवी युद्धाच्या सुरुवातीला त्याने कोणालाही सुचणार नाही असा निर्णय घेतला.

आंतरखंडीय रेल्वेचे बांधकाम सुरु असलेले त्याने पहिले. यामुळे पूर्व आणि पश्चिम अमेरिका प्रवास काही महिन्यात शक्य होणार होता. शिवाय रेलरोड वाहतूक हि अधिक कार्यक्षम आणि स्वस्तसुद्धा होती. व्हँडरबिल्टला रेलरोडमध्ये त्याचे भविष्य दिसले. त्याने आपल्या सर्व बोटी विकून टाकल्या आणि आयुष्याची जमापुंजी रेलरोड कंपनी विकत घेण्यामध्ये घालवली. चांगले उद्योजक हे नेहमी अशा संधींना ओळखतात आणि कोणालाही सुचणार नाहीत अशी पाऊले उचलून, धोका पत्करून, त्यांचे निर्णयाशी ठाम राहून त्यांचे भविष्य स्वतः लिहितात. आणि त्याचा हा निर्णय काही चुकीचा ठरला नाही. यादवी युद्धानंतर तो अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस ठरला. त्याकाळी त्याची संपत्तीची मोजदाद $६ कोटी ८० लाख ठरली जी आत्ताच्या रकमेमध्ये $७५० कोटी होईल.

परंतु हे सर्व पैसे त्याला त्याच्या युद्धात मरण पावलेला मुलगा परत आणून देणार नव्हते. यादवी युद्धामध्ये त्याचा एक मुलगा जॉर्ज धारातीर्थी पडला होता. त्याचे आपल्या या मुलावर जीवापाड प्रेम होते आणि त्याला त्याने तसे मोठेही केले होते. जॉर्जकडे कोमोडोर आपल्या साम्राज्याचा वारस म्हणून बघत होता. परंतु त्याच्या अचानक जाण्याने कमोडोर निराशेच्या गर्तेत सापडला होता. आता त्याच्यासमोर त्याचा दुसरा पण दुसर्यांच्या दृष्टीने फारसा महत्वाकांक्षी नसलेला मुलगा विल्यम याला वारस करण्याशिवाय पर्याय नव्हता.

विल्यम व्हँडरबिल्ट (८ मे १८२१ - ८ डिसेम्बर १८८५)

William Vanderbuilt

विल्यमला त्याने 'हडसन रेलरोड' चे उपाध्यक्ष केले. परंतु नंतरच्या केलेल्या व्यावसायिक भेटींमध्ये हे स्पष्ट झाले कि व्हँडरबिल्टचे स्पर्धक त्याला आता ताकदीचा स्पर्धक मानायला तयार नव्हते. व्हँडरबिल्ट आता वयाच्या सत्तरी मध्ये पोहोचला होता आणि त्याला स्पर्धक फारसे महत्त्व देईनासे झाले. व्हँडरबिल्टबरोबर झालेले अनेक करार त्यांनी मोडीत काढले. नव्या करारांवर सही करण्यास त्यांनी नकार दिला. कामोडॉर व्हँडरबिल्टने त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले.

न्यूयॉर्क शहरात येणारा एकुलता एक अल्बानी रेलवे पूल हा व्हँडरबिल्टच्या मालकीचा होता. संपूर्ण न्यूयॉर्क बेटावरील दळणवळण या पुलावरूनच चालले होते म्हणाना. कामोडॉर व्हँडरबिल्टने हा पूल बंद करण्याचे आदेश दिले आणि एकहाती न्यूयॉर्क सेन्ट्रल कंपनीला आणि पर्यायाने न्यूयॉर्कला वेठीस धरले.

Albany Bridge

न्यूयॉर्क सेन्ट्रलच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या मालकीचे समभाग विकायला सुरुवात केली. लवकरच हि बातमी सगळीकडे पसरली आणि त्या समभागांच्या किमती घसरायला सुरुवात झाली. व्हँडरबिल्टने सारे समभाग विकत घेऊन टाकले आणि आपल्या कंपनीमध्ये विलीन करून टाकली. अशा रीतीने व्हँडरबिल्टने अमेरिकेतली सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीची स्थापना केली.

व्हँडरबिल्टची महत्त्वाकांक्षा जशी त्याचे साम्राज्य तयार करण्यास उपयुक्त ठरली तशीच एका वेळेस त्याच साम्राज्याच्या विनाशासही कारणीभूत ठरली होती. याच महात्वाकांक्षेमुळे व्हँडरबिल्टला मोठा तोटा सहन करावा लागला.

शिकागो हे न्यूयॉर्क सारखेच प्रगतीशील शहर होते. औद्योगिक वाढीचे महत्वाचे केंद्र बनत चालले होते. शिकागो आणि न्यूयॉर्क ला जोडणारी इअरि रेलरोड लाइन हि सर्वाधिक फायदेशीर रेलरोड लाइन होती आणि ती अजूनही व्हँडरबिल्टच्या मालकीची नव्हती.

Erie Railway

इअरि शिकागो ते न्यूयॉर्क मार्ग

Erie Rail Road

१८६७ मध्ये व्हँडरबिल्ट या कंपनीचे सर्व समभाग विकत घेण्याचा सपाटा लावला. एका आठवड्याच्या आत जास्तीत जास्त समभाग विकत घेऊन या कंपनीवर मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा त्याचा मानस होता. (Hostile Takeover) परंतु या कंपनीतील व्यवस्थापक जे गोल्ड आणि जीम फिस्क याला पुरून उरतात. त्यांनी व्हँडरबिल्टला लुटायचा बेत आखला. दोघेजण मिळून कंपनीच्या बेसमेंटमध्ये सर्रास कंपनीचे समभाग छापणारा छापखानाच काढला आणि सरळ सरळ छापायला सुरुवात केली. (Watering Down Stock) (हे आज अत्यंत बेकायदेशीर कृत्य समजले जाते.) त्यांनी १ लाखाच्या वर समभाग छापले. प्रत्येक समभागावर त्यांनी छोट्या अक्षरात अस्वीकृती (disclaimer) लिहिले कि समभाग छापण्याचे सर्व हक्क कंपनीकडे राहतील आणि भागधारकांना विचारात न घेता कंपनी समभाग छापेन. व्हँडरबिल्टने अधाशीपणे सर्व समभाग विकत घेत राहिला. परंतु प्रत्येक समभाग घेतल्यावर त्याच्या भागांची किंमत कमी होत गेली आणि कंपनीचे मालकी हक्क अजूनही कंपनीकडेच राहिले.
अशा रीतीने व्हँडरबिल्टने $७०,००,००० चे (आजचे $१००कोटी) समभाग विकत घेतल्यावर त्याला यातील फोलपणा लक्षात येतो पण हात चोळत राहण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नाही राहिला.

रेलरोडचे जाळे सर्व अमेरिकेत पसरू लागले होते. जे फक्त १५ वर्षांपूर्वी स्वप्न वाटायचे ते आता सत्यात उतरले होते. १८०,००० कामगारांना काम मिळाले होते. मालाची देवाणघेवाण वाढली होती. उद्योगांना चालना मिळू लागली होती. मिसिसिपी च्या पूर्व आणि पश्चिमेकडील जग एकत्र येऊ लागले होते. १८७१ मध्ये आपल्या या साम्राज्याची ओळख सर्वांना पटावी म्हणून व्हँडरबिल्टने एक मोठे रेलवे स्टेशन बांधायचा विचार केला. हार्लेम, सेन्ट्रल आणि हडसन रेल रोड जेथे एकत्र येतात तेथे त्याने एक मोठी इमारत बांधायचे ठरवले. हेच "ग्रँड सेन्ट्रल डेपो" न्यूयॉर्क मधली त्याकाळातील सर्वात मोठी इमारत होती. आणि त्याकाळच्या साम्राज्याचा एक पुरावा म्हणून आजही हि इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे.

Grand Central

आयुष्याच्या शेवटच्या पर्वात व्हँडरबिल्टने मोठमोठ्या देणग्या दिल्या. सेन्ट्रल विद्यापीठाला $१० लाख आणि न्यूयॉर्क मधील चर्च ला $५०,००० ची देणगी दिली. सेन्ट्रल विद्यापीठ आज व्हँडरबिल्ट विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.

Vanderbilt University

कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला.

जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)!

त्याविषयी पुढील भागात. . .

क्रमशः
-----------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भसूची:
१) The men who built America - History Channel
२) Wikipedia: Cornelius Vanderbilt
३) व्हँडरबिल्ट घराणे: मराठी विश्वकोश

संस्कृतीइतिहासकथालेखमाहिती

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Sep 2014 - 10:56 am | कैलासवासी सोन्याबापु

छान सिरिज आहे!!! उत्तम लिहिले आहे आपण!!! विलक्षण धाडसी लोकांचा देश आहे अमेरीका!! सतत नव्या कल्पनांना उघडे दरवाजे!!! अप्रतिम लेखमाला होईल, येऊ देत

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2014 - 12:04 pm | टवाळ कार्टा

मस्तच

उपास's picture

14 Sep 2014 - 12:06 pm | उपास

मालिका छान होईलच.. र्जमलचं तर प्रूफ रिडींग करुन घ्या, वाक्यांचा टोन मधेच सटकतोय असं वाटलं..
दरम्यान, गिरीश कुबेरांच 'हा तेल नावाचा इतिहास आहे..' वाचलं आणि रॉकफेलरच्या ताकदीचा अंदाज आला, जगप्रवर्तक म्हणता येईल असं काम केलय त्याने बर्‍या-बुर्‍या सगळ्याच मार्गांनी अर्थात पण अमेरिकन्स म्हण्ततात तसं, 'He showed results..'
पुलेशु..

अमित खोजे's picture

14 Sep 2014 - 10:58 pm | अमित खोजे

'एका तेलियाने' असे गिरीश कुबेरांचे पुस्तक मी वाचले आहे. तेही मराठीमध्येच आहे. गिरीश कुबेरांनी सुंदररीतीने संपूर्ण तेल उद्योग कसा सुरु झाला, त्यामध्ये कसे राजकारण खेळले गेले, यामानी यांनी ते कसे छान सांभाळले, अमेरिकेचे यातील वर्चस्व आणि अरेरावी, इराक इराण मधील युद्धांची कारणे याचे वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला वाटत होते की ही माहिती आपल्या मिपावर यावी. किंवा या पुस्तकाचे परीक्षण लिहून मिपाकरांना याची ओळख करून द्यावी. परंतु हे पुस्तक मराठीमध्येच आहे आणि सर्वांनी ते विकत घेऊन वाचले तरच ती संपूर्ण माहिती कळेल.

Eka_Teliyane

Eka_Teliyane_2

गिरीश कुबेरांच 'एका तेलीयाने' ,'हा तेल नावाचा इतिहास आहे..' वाचले आणी 'धर्म-अधर्म' ही वाचले. तिसरे पुस्तक वाचुन अमेरीका कोणी घडवली याचा जास्त बोध झाला.

प्रसाद१९७१'s picture

17 Sep 2014 - 2:14 pm | प्रसाद१९७१

गिरीश कुबेरांचे जास्त वाचायचे नसते, त्यांचा अमेरीकेला आणि इस्त्रायला ठोकणे हा एकच धंदा असतो. त्यांचा ह्या मध्यपूर्वेत भटकण्याचा खर्च कोणी केला होता विचारा त्यांना एकदा.

आदूबाळ's picture

14 Sep 2014 - 12:37 pm | आदूबाळ

छानच!

मला वाटत होतं की vanderbilt चा जीन्सचा व्यवसाय होता.

आतिवास's picture

14 Sep 2014 - 4:57 pm | आतिवास

माहितीपूर्ण आहे.
पण मधली संगती तुटल्यासारखं वाटलं मला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Sep 2014 - 5:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमाला ! लेखनात जरा विस्कळीतपणा आहे, तो आवरला तर निवडलेल्या विषयात एक उत्तम लेखमाला होण्याचे बीज नक्की आहे.

काउबॉय's picture

14 Sep 2014 - 6:25 pm | काउबॉय

विषय रोचक आहेच, आता लिखाण मात्र फर्मासच हवे.

अमित खोजे's picture

14 Sep 2014 - 10:12 pm | अमित खोजे

खरे आहे. लेख सुरुवातीला एका काळात लिहिला होता. जसे कि 'जीम फिस्क त्याला पुरून उरतात', 'त्याला यातील फोलपणा लक्षात येतो' पण लेख वाचल्यानंतर तो अगदीच निरस व विकिपीडिया सारखा एका टोन मध्ये वाटला. त्याला गोष्टीचे स्वरूप देण्याच्या नादात थोडा विस्कळीत झाला.
प्रुफ रीड (मुद्रितशोधन ? शब्द सुचवाल ?) नक्कीच करून घेईन. चित्रांचे संदर्भ सुद्धा द्यायचे राहिलेत. घाई केली असे वाटतंय. पुढचा लेख जरा शांतपणे लिहून, प्रुफ रीड करून मगच टाकेन.

अजया's picture

14 Sep 2014 - 5:20 pm | अजया

पुलेशु.

कौशी's picture

14 Sep 2014 - 8:25 pm | कौशी

माहितीपुर्ण लेखमाला..वाचतेय

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2014 - 9:43 pm | श्रीरंग_जोशी

सदर डॉक्युमेंटरी मी किमान तीन वेळा पाहिली आहे.

एक आव्हानात्मक विषय हाती घेतला आहे. सादरीकरण आवडले पण भाषाशैली यांत्रिक वाटली.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अमित खोजे's picture

14 Sep 2014 - 10:35 pm | अमित खोजे

मलासुद्धा हि डॉक्युमेंटरी एवढी आवडली कि वाचनालयातून तीची DVD आणली आणि दोन वेळा बघितली. त्या DVD चा आता लेख लिहायलासुद्धा उपयोग होत आहे. फक्त मला आता असा प्रश्न पडला आहे कि हि लेखमाला या डॉक्युमेंटरीचे भाषांतर म्हणून लिहू कि अजून जी माहिती संदर्भ शोधताना मिळेल ती -अधिक डॉक्युमेंटरी - अशी माहितीपूर्ण लिहू. मला दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतोय.

भाषाशैली सुधारावी लागणार हे तर समजलेच आहे. गोष्टीच्या स्वरुपात लिहिण्याचा प्रयत्न राहील.

श्रीरंग_जोशी's picture

15 Sep 2014 - 6:01 am | श्रीरंग_जोशी

नक्कीच दुसरा पर्याय सा स्वागतार्ह असेल. परंतु त्यात माहितीचा विस्तार नियंत्रीत करणे हे फारच आव्हानात्मक काम असते हे मी स्वानुभावावरून सांगू शकतो :smile: .

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Sep 2014 - 6:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

डॉक्युमेंटरीचे नाव मिळेल काय? तूनळीवर शोधुन बघतो.

श्रीरंग_जोशी's picture

16 Sep 2014 - 9:05 pm | श्रीरंग_जोशी
मन१'s picture

14 Sep 2014 - 11:17 pm | मन१

लेखनावर फिदा आहे. पुढच्या धाग्याची हावरटासारखी वाट पहात आहे.

मस्त माहितीपुर्ण लेख. पु.भा.प्र.

लेखन आवडले, पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

सारिका होगाडे's picture

16 Sep 2014 - 12:27 am | सारिका होगाडे

अतिशय सुन्दर माहिती.. खुपच छान लेख.. पुढिल लेखच्या प्रति़क्शेत...

ताल लय's picture

1 Oct 2014 - 11:36 pm | ताल लय

जबर्दस्त मालिका
१११११११११

पैसा's picture

15 Oct 2014 - 12:27 am | पैसा

खूपच माहितीपूर्ण! खाजगी मालकीची रेल्वे ही कल्पनासुद्धा करता येत नाहीये!