फुटबॉल विश्वचषक :२०१४
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु.
आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच.
मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
![]() |
वर्गीकरण

प्रतिक्रिया
आमचा पाठींबा जर्मनीला. क्लोज,
(No subject)
शुभेच्छा!
ब्राझील मध्ये सामने असल्याने
मी ब्राझिलचा झेन्डा घेतलाय !
फूटबॉल साठी...
कॉलेज
सर नो बुट्टी
कोणाकडे ऑनलाइन बघण्यासाठी
चकटफू
चला मंडली
क्रोएशियान चांगलं आक्रमन
माताय, स्पर्धेतला पहिलाच गोल
हो ना राव...
अगदी अगदी.
ब्रझिल ने मारला !!!
येस्स
सेकंड हाफ
खेळाच्या ६८ व्या पेनल्टी किक
ब्राझील जिंकले पण मनं जिंकली
हुर्रे....ब्राझिल जिंकले तर..
अर्जेंटिना.... माझी पसंती
+१
अर्जेंटिना
तेवेझ नाहिये मित्रा
तेवेज नाहीये... पण हिग्वेन,
जर्मनी
ब्राझील व जर्मनी यांच्यात
:ड प्रतिसाद वाचून दोनदा डोळे
चला दोस्त हो !!!
पूर्वार्धाची ४० मिनिटं.अजूनही
मजाय पण.
मेक्सिकन कोच लैच वैतागला होता
अखेर
०-०
थांबा थोडे दिवस...
मेक्सिकोच्या पेराल्टाने पहिला
मेक्सिको 1-0
स्पेन विरुद्ध हॉलंड १-०
स्पेन विरुद्ध हॉलंड १-१
स्पेन विरुद्ध होलंड १-५
हॉलंड जिंकले
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
वॅन पर्सीच हेडर खतरनाक.
युरोपियन देशाची भिशी
हेडरचे गोल बंद करायला हवेत
गोलाडवा.
इंग्लंड वि. इटली
आजचे सामने:
मंडळी झालात का तयार. :)