✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फुटबॉल विश्वचषक :२०१४

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
गुरुवार, 06/12/2014 - 22:02  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.
ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात सलामीचा सामना आज भाप्रवे रात्री १:३० ला रंगणार आहे. एकुण आठ गृप मधे बत्तीस संघ एकमेकांशी भिडणार आहेत. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्यांचे वेळापत्रक आणि फुटबॉल संघ, खेळाडुंची माहिती, आणि असे बरेच उपलब्ध आहे. आपण मिपा रसिक फुटबॉलच्या विविध घटना, खेळाडु, संभाव्य विजेते, रंगतदार होणारे सामने. आत बाहेरच्या संघाच्या गोष्टी, संघांचे डावपेच आणि आपल्या आवडतील त्या गोष्टींचे आदानप्रदान या धाग्यावर करु. आजच्या सामन्यात सरळ सरळ ब्राझील जिंकेल असे वाटते. ज्युलियो सेसर हा ब्राझीलचा गोलकिपर ज्याच्यामुळे ब्राझील उपांत्यफेरीत पराभूत झाले तो याहीवेळीही गोलकिपर आहेच. ब्राझीलचा स्ट्रायकर नेयमार, हुल्क, फ्रेड यांच्यावर ब्राझीलची खरी भिस्त आहे. सामना किती रंगतदार होतो ते आज पहिल्या सामन्यात पाहुच. मिपाकरांनी फुटबॉलच्या संदर्भात जालावर असलेले किंवा कोणी मिपाकर थेट सामने पाहणारे असतील तर सामन्यांचे, रसिकांचे लक्षणीय फोटो इथे टाकावेत. आणि आपण जमेल तसे सामन्यांचा आनंद घेऊ या. तेव्हा आजचा पहिला सामना आपण बघायला विसरायचं नाही. मी तरी पहिला सामन्याचा आज आनंद घेणार आहे. आपणही आपापल्या संघाचे झेंडे घेऊन तयार व्हावे, आम्ही ब्राझीलचा झेंडा हाती घेतलाय, आपण कोणत्या संघाचा झेंडा हाती घेतलाय, घेणार आहात तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या....!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42914 वाचन

💬 प्रतिसाद (138)

प्रतिक्रिया

पहिला गोल कोलंबियाचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/14/2014 - 21:38 नवीन
सुंदर चाल रचुन झालेला पहिला कोलंबियाचा गोल आठव्या मिनिटाला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला आठवते ते ग्रीस ९८ का २०००

प्रचेतस
Sat, 06/14/2014 - 23:16 नवीन
मला आठवते ते ग्रीस ९८ का २००० सालचे युरो कप विजेते होते. पण सध्या बरीच अधोगती झालेली दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

3-0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/14/2014 - 23:25 नवीन
कोलंबियाचा खेळ ग्रीस पेक्षा कितीतरी पटीने उत्तम होता. कोलंबियाने 3-0 ने ग्रीसला धूळ चारली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

२००४ चं युरो.. पण तोही

अनुप ढेरे
Mon, 06/16/2014 - 09:43 नवीन
२००४ चं युरो.. पण तोही तुक्काच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शेवटच्या ३ र्‍या मी.

शिद
Sun, 06/15/2014 - 23:48 नवीन
शेवटच्या ३ र्‍या मी. (एक्स्ट्रा टाईम) स्विट्झर्लंड्च्या Haris Seferović जबरा गोलमुळे स्विट्झर्लंड्चा इक्वॅडोर वर २-१ ने विजय.
  • Log in or register to post comments

चांगला म्याच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/16/2014 - 06:48 नवीन
स्वीतझर्लन्डचे उत्तम पासेस आणि आणि सतत गोल्पोष्टवर धड़कणे यामुळे विजयी ते विजयी ठरले असे वाटते. पण चांगला सामना बघायला मिळाला ! दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

दोनवेळा गोल झालेला पंचाने

कंजूस
Mon, 06/16/2014 - 11:06 नवीन
दोनवेळा गोल झालेला पंचाने दिला नाही मेक्सिको वि० कमेरून खेळात.आउटसाईडचे नाटक काही कळले नाही .रेकॉड केलेले दोन तीन वेळा पाहूनसुध्दा .तो हिरवा पट्टा दाखवायचे .
  • Log in or register to post comments

*ऑफसाईड

रंगोजी
Mon, 06/16/2014 - 20:03 नवीन
*ऑफसाईड पंचाच्या मदतनीसाने चूक केली. पास होताना पास घेणारा आणि जाळे यामध्ये किमान एक बचावपटू असावा लागतो (कीपर सोडून). तसे नसेल तर ऑफसाईड दिला जातो. याला अपवाद असतो जेव्हा पास घेणारा देणार्याच्या मागे असतो (pullback). त्यामुळे कॉर्नरला डायरेक्ट कधी ऑफसाईड होउ शकत नाही. येथे मदतनीसाने वाटेत चेंडूला दुसर्या॑ खेळाडूचा स्पर्श झाल्याने नवीन पास सुरु झाला वाटून ऑफसाईड ट्रिगर केला. पण प्रत्यक्षात स्पर्श कॅमेरूनियन खेळाडूचा होता. चुकीचा निर्णय. जरी मेक्सिकोला ३ गुण मिळाले असले तरी गोल फरक किती महत्त्वाचा ठरणार हे शेवटीच कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/16/2014 - 20:50 नवीन
मलाही ऑफसाईडची भानगड कळत नाही. कशाला हवा एक मधे बचावपटू. गोलपोष्टमधे चेंडु किती सराईतपणे 'गोल' म्हणुन डकवला हे महत्वाचे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगोजी

असं नसेल तर आक्रमण करणारा एक

खटपट्या
Wed, 06/18/2014 - 05:58 नवीन
असं नसेल तर आक्रमण करणारा एक खेळाडू (रोनाल्डो सारखा) नेहमीच गोल पोस्ट जवळ घुटमळत राहील. आणि योग्य पास मिळाल्यावर गोल करेल. गोलची संख्या दुप्पट तिप्पट होईल. आणि खेळातील चुरस कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्मनी आणि पोर्तुगल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/16/2014 - 20:46 नवीन
जर्मनी आणि पोर्तुगल आता थोड्याच वेळात भिडणार आहेत. एक चांगला सामना बघायला मिळावं असं वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी

प्रचेतस
Mon, 06/16/2014 - 20:58 नवीन
ही म्याच भलतीच रंगतदार व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवाय ९:३० पासून असल्याने झोपेचे खोबरे पण होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्मनीच्या खेळाडूला

प्रचेतस
Mon, 06/16/2014 - 21:43 नवीन
जर्मनीच्या खेळाडूला पुर्तुगेजांनी गोलक्षेत्रात अवैधारित्या पाडल्याने मिळालेल्या फ्री किकवर मुल्लरने जर्मनीला पहिला गोल करून दिला.
  • Log in or register to post comments

जर्मनीचा सलग तिसरा गोल

मधुरा देशपांडे
Mon, 06/16/2014 - 22:18 नवीन
जर्मनीचा सलग तिसरा गोल *drinks*
  • Log in or register to post comments

जर्मनी आक्रमक 3-0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/16/2014 - 22:34 नवीन
जर्मनीचा खेळ छान. जबरदस्त आक्रमण त्याच मुळे तीन गोल झालेत सुरुवातीला जे हल्ले पोर्तुगिल चढ़वले नंतर मात्र त्यांना जमत नैये. पाहू या सेकंड हाफ
  • Log in or register to post comments

अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी.

वेल्लाभट
Tue, 06/17/2014 - 11:18 नवीन
अपेक्षेपेक्षा खूपच एकतर्फी. पोर्तुगाल ची हाराकीरी चालू होती. पेपे पिवळ्या तिकिटावर वाचू शकला असता जर पुन्हा त्याच्याजवळ जाऊन डोकं नसतं `चालवलं'. रोनाल्डोही निष्प्रभ वाटला. मजेची बाबः आज ऑफिसात दोन मुलींचं संभाषण कानावर पडलं. `अरे वो गोल कर ही नही रहा था यार... पता नही क्या हुवा उसे? (चिंतेचा सूर)' एक क्षण मला वाटलं कुठल्याश्या सिरियल मधल्या पात्राविषयी चर्चा चालली आहे की काय... म्हणजे... तिने ऐकूनच घेतलं नाही ग त्याचं... इत्यादी. लोल! असो. ब्राझील मेक्सिको मजा येईल वाटते. उद्या पुन्हा डचांची खेळी बघायचीय... वाह! मझा आहे.
  • Log in or register to post comments

पेपे वाचला असता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/17/2014 - 15:12 नवीन
डोकं नसतं लावलं तर पेपे पिवल्या कार्डावर वाचला असता आणि रोनाल्डोची जी हवा होती ती तर कुठेच दिसली नाही. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

कदाचित पिवळेही मिळाले नसते.

रंगोजी
Wed, 06/18/2014 - 15:29 नवीन
कदाचित पिवळेही मिळाले नसते. मूळ फाऊल पंचाने दिलाच नव्हता. निव्वळ मूर्खपणा पेपेचा. रोनाल्डोबाबत सहमत. अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही असेच वाटते. पुढचे सामने सोपे आहेत. फॉर्मात येईल आशा आहे. तसेही पोर्तुगाल नेहमी अडखळत सुरुवात करतात. विश्वचषक पात्रतेच्या सामन्यातही करो या मरो परिस्थिती आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिरोस्लाव क्लोजा काल खेळला

असंका
Tue, 06/17/2014 - 13:49 नवीन
मिरोस्लाव क्लोजा काल खेळला नाही का?
  • Log in or register to post comments

टॅक्टिकल निर्णय. १ स्ट्रायकर

रंगोजी
Wed, 06/18/2014 - 15:20 नवीन
टॅक्टिकल निर्णय. १ स्ट्रायकर खेळवण्याऐवजी त्याना ३ रोटेटिंग आक्रमक हवे होते. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

जर्मनी

मित्रहो
Tue, 06/17/2014 - 13:50 नवीन
कालचा खेळ बघता जर्मनीच जिंकायला हवी यावर्षी.
  • Log in or register to post comments

काय राव .. सगळे फक्त

हाडक्या
Tue, 06/17/2014 - 15:29 नवीन
काय राव .. सगळे फक्त सेलेब्रिटी संघांबद्दल बोलतेत तुमी लोकं. कालची ईराणची मॅचपण भारी झाली बरं का. काय फाईट दिली ईराणने त्या नायजेरियाला, डिफेन्स तर मस्तच. आता अर्जेंटिना बरोबर आहे त्यांची पुढची मॅच.. :)
  • Log in or register to post comments

नेमा कंपनी मेक्सिकोच्या

कंजूस
Wed, 06/18/2014 - 04:11 नवीन
नेमा कंपनी मेक्सिकोच्या गोलाडव्यापुढे बापुडवाणी ठरली .टाळ्या वाजवून ब्राझिलकर थकले नी हात चोळत गेले शेवटी .०-० बरोबरी .
  • Log in or register to post comments

+१

शिद
Wed, 06/18/2014 - 15:37 नवीन
कालची ब्राझिल वि. मेक्सिको ची मॅच थरारक झाली. मेक्सिकोचा गोलकिपर ओचोआ हा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहून गोल अडवत होता. दुसरीकडे ब्राझीलचा गोलकीपर ज्युलियो सीझरनेही भक्कम कामगिरी करत संघावर गोल होऊ दिला नाही. कालच्या सामन्यातील खरे स्टार होते दोन्ही संघांचे गोलकीपर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच:

असंका
Wed, 06/18/2014 - 17:37 नवीन
रशिया आणि कोरीया...रटाळ मॅच: १:१ गोल्कीपरच्या हातात मारलेल्या बॉलवर गोल? आणि उत्तरादाखल रशियन आक्रमकांपैकी एकाच्या हाताला लागून अडलेल्या चेंडूवर दुसर्‍याने केलेला बरोबरीचा गोल्... नगण्य आव्हाने. एक सेकंदात बॉल या बाजूच्या गोल्जवळ तर दुसर्‍या सेकंदाला दुसर्‍या बाजूच्या! मध्ये कुणी कुणाला आव्हान देऊन अडवायचा प्रयत्नही नाही!
  • Log in or register to post comments

यापेक्षाही वाइट मोहन बागान

कंजूस
Wed, 06/18/2014 - 17:46 नवीन
यापेक्षाही वाइट मोहन बागान आणि डेंपो इत्यादी भारतीय टीमांच्या खेळाडूंचा खेळ होतो का ?
  • Log in or register to post comments

1-1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/18/2014 - 21:54 नवीन
ऑष्ट्रोलिया आणि नेदरल्यांडचा रंगतदार सामना सुरु आहे
  • Log in or register to post comments

रोबेननं आपल्या वेगाचं

प्रचेतस
Wed, 06/18/2014 - 21:59 नवीन
रोबेननं आपल्या वेगाचं प्रदर्शन करत डचांना आघाडीवर नेलं पण दोनच मिनिटात कांगारूंनी गोल डागून बरोबरी साधली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धडाकेबाज कांगारूपेक्षा डच

कंजूस
गुरुवार, 06/19/2014 - 03:22 नवीन
धडाकेबाज कांगारूपेक्षा डच नाविक सरस .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्पेनला मिळाले रिटन तिकीट .

कंजूस
गुरुवार, 06/19/2014 - 03:17 नवीन
स्पेनला मिळाले रिटन तिकीट . आता फक्त बीचवर लोळायचे आणि परत जायचे . ब्राझीलच्या मैनेजरने अगोदरच सांगितले होते युअरोपिअन टीम परवडली ,चिलीशी खेळ नको रे बाबा ,फारच तिखट .
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
गुरुवार, 06/19/2014 - 09:32 नवीन
चिली म्हणजे 'तिखट मिरची' जणू काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/19/2014 - 12:47 नवीन
चिलीने स्पेनचे विजेतापदाचे स्वप्न धुळीस मिळवले. स्पेन आक्रमक होते पण त्यांना जमलेच नाही. फुटबोल तज्ञ स्पेनच जिंकेल म्हणायचे आणि असंख्य क्रीडा रसिक स्पेनचे नाव घेत असायचे आता जर्मनी आणि ब्राझिल कडून अपेक्षा धरावी असे वाटते. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नारिंगी सेना पण जोरात आहे.

प्रचेतस
गुरुवार, 06/19/2014 - 12:51 नवीन
नारिंगी सेना पण जोरात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इठ्ठ्ला...................

इरसाल
गुरुवार, 06/19/2014 - 14:27 नवीन
कोनता झेंडा घेवु हाती ?
  • Log in or register to post comments

australia आणि holland

विअर्ड विक्स
गुरुवार, 06/19/2014 - 14:58 नवीन
australia आणि holland अत्यंत चुरशीचा झाला… दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ केला… tim cahil ची volley अप्रतिम…. Long pass सुद्धा सुरेख होता.
  • Log in or register to post comments

मला रॉबेनचा खेळ आवडला .

कंजूस
गुरुवार, 06/19/2014 - 15:38 नवीन
मला रॉबेनचा खेळ आवडला . संपूर्ण दोन तासभर रात्रीचा खेळ आणि तीन मैच पाहणे कठीणच त्यामुळे BBC SPORTS news हळूच मोबाईलच्या दोन इंची चौकोनात वाचतो .वाचनीय आहे .अपडेटस टाकतात मैदानातून .दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा एक तासात तीनही मैचेज जे ठळक सोनी सिक्सवर टिव्हीवर पाहतो .ताकाची तहान ताकावर .असा पूर्ण खेळ नाही तरी कुठे समजतोय ?कुणाचा तरी झेंडा आपला म्हणायचा .पांढरा टी शट बरा ,नंतरही घालता येतो . क्रिकेटपेक्षा मजा लय भारी .नाचणाऱ्या पोरींची गरजच नाही ,प्रेक्षकांतही सांपल असतात .आख्खा देश नाचतो अथवा टिपे गाळतो एकेका जबरदस्त लाथेवर .नव्वद मिनिटांत पंधरा किमी तरी पळत असतील बिचारे खेळाडू आपल्या देशासाठी .
  • Log in or register to post comments

स्पेन पाठोपाठ इंग्लंडने पण

प्रचेतस
Fri, 06/20/2014 - 09:55 नवीन
स्पेन पाठोपाठ इंग्लंडने पण गाशा गुंडाळला. उरुग्वेकडून २-१ ने हार. इंग्लंडचे खेळाडू म्हणजे नाव मोठं अन् लक्षण खोटं अशातली गत.
  • Log in or register to post comments

चला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/20/2014 - 21:50 नवीन
इटली चा म्याच सुरु आहे पाहताय ना ?
  • Log in or register to post comments

पाहतोय.

प्रचेतस
Fri, 06/20/2014 - 22:10 नवीन
पाहतोय. खूप संथ आणि रटाळ खेळ चालला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रटाळ सामना चालू असतानाच

प्रचेतस
Fri, 06/20/2014 - 22:22 नवीन
रटाळ सामना चालू असतानाच कोस्टारिकन खेळाडूने दिलेल्या सुरेख पासवर स्ट्रायकर रुईझने हेडरद्वारे अफलातून गोल करून इटलीला १-० ने पिछाडीवर ढकललं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोश्तारिका 1-0

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/20/2014 - 22:21 नवीन
कोश्तारिका च्या खेळाडू चा मस्त हेडर इटली विरुद्ध एका गोलची आघाडी. वल्ली शेठ सेकंड हाप तुम्ही पाहा मी झोपतो ...GN :)
  • Log in or register to post comments

कोश्तारिका च्या खेळाडू चा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/20/2014 - 22:22 नवीन
कोश्तारिका च्या खेळाडू चा मस्त हेडर इटली विरुद्ध एका गोलची आघाडी. वल्ली शेठ सेकंड हाप तुम्ही पाहा मी झोपतो ...GN :)
  • Log in or register to post comments

बघतो आहेच.

प्रचेतस
Fri, 06/20/2014 - 22:23 नवीन
बघतो आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीरस सामन्यात कोस्टारिका १-०

प्रचेतस
Fri, 06/20/2014 - 23:26 नवीन
नीरस सामन्यात कोस्टारिका १-० ने विजयी. बाद फेरीत प्रवेश. आता उरुग्वे - इटली सामन्याला करो वा मरो महत्त्व येणार.
  • Log in or register to post comments

फ्रान्स वि स्विटज दोन तीन

कंजूस
Sat, 06/21/2014 - 06:33 नवीन
फ्रान्स वि स्विटज दोन तीन वेळा हाइलाइटस पाहावे लागणार .बन्जिमाचा गोल शिटीने खाल्ला .फारच मजेदार मैच झाली . सेट टॉप बॉक्स रेकॉर्डिँगवाला असल्याने बरं पडतं .नंतर फारवर्ड करून बघता येतं .
  • Log in or register to post comments

मेस्सी जोरदार आक्रमणं करतोय

प्रचेतस
Sat, 06/21/2014 - 22:05 नवीन
मेस्सी जोरदार आक्रमणं करतोय पण इराणचा बचाव भेदण्यात अजून यश नाहिये. एका मेस्सीला ३/४ इराणी बचावपटू घेरून उभे आहेत.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/21/2014 - 22:32 नवीन
अर्जेंटीना इतके दमेल असं वाटलं नव्हतं :) सेकंड हाफ मधे पाहू मेस्सी काही चमत्कार करतो का ! बाकी इराणच्या बचावाला मार्क दिले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इराणचं आक्रमण मात्र लैच

प्रचेतस
Sat, 06/21/2014 - 22:39 नवीन
इराणचं आक्रमण मात्र लैच फ़िक्कं पडतंय. अर्जेंटीनाचा चेंडूवरील ताबा ७५% पेक्षाही जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे वाटतंय इरान फक्त मेसिला

खटपट्या
Sat, 06/21/2014 - 22:54 नवीन
असे वाटतंय इरान फक्त मेसिला थोपवण्यात धन्यता मानतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मेस्सीचा सुरेख गोल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/21/2014 - 23:21 नवीन
सालं काय अफलातून किक मारली मेस्स्सिने केवळ ग्रेट.1-0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा