✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प
प्यारे१ यांनी
Wed, 03/26/2014 - 14:42  ·  लेख
लेख
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का? गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;) आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालगीत
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35028 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

@हभपप्यारेबुवांचं आध्यात्मिक

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 18:15 नवीन
@हभपप्यारेबुवांचं आध्यात्मिक गुरुपद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं?>>> आय..आय..आय... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खिक्क्क्क!

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 18:43 नवीन
खिक्क्क्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

टैम्प्लीज!

पैसा
Wed, 03/26/2014 - 18:44 नवीन
अवांतरः या धाग्यावर एनएफएस्/एज ऑफ द एम्पायर/डेव्ह/मारिओ ब्रदर्स/मोदी/अरविंद/आऊलबाबा यांच्याबद्दल चर्चा केली तर चालेल काय?! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुनाला विचारते बेन?

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 19:52 नवीन
कुनाला विचारते बेन? मला विचारशील तर इकडे काय बी चालेल. ;) ते विकासशेट बोल्तो तसा धाग्याचा मोदी ;) तं कवाच झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तीळं झालं! खिचडी निश्चित!!

अजया
Wed, 03/26/2014 - 17:17 नवीन
तीळं झालं! खिचडी निश्चित!!
  • Log in or register to post comments

फुटलो काय प्रतिसाद आहेत

जेपी
Wed, 03/26/2014 - 17:21 नवीन
गणपाशेठ मिपा शेफ होतील का ?>>>> काय माहित नाय बॉ . (pentant pending)
  • Log in or register to post comments

होतील किंवा नाही होणार ......

अजया
Wed, 03/26/2014 - 17:35 नवीन
होतील किंवा नाही होणार .......कसेही. मी पयली !! ;)
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Wed, 03/26/2014 - 17:37 नवीन
अण्मोदन देणारी मी फश्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सानिका आणि पेठकर साहेबांच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/26/2014 - 18:18 नवीन
सानिका आणि पेठकर साहेबांच्या उदयामुळे गणपा मिपाशेफ़ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही पाककृतीकारास निर्णायक बहुमत मिळण्याचे दिवस गेले आहेत. -दिलीप लाटपांडे ;)
  • Log in or register to post comments

गणपा हा तर संजीव कपूरचा ड्यू

रेवती
Wed, 03/26/2014 - 18:32 नवीन
गणपा हा तर संजीव कपूरचा ड्यू आयडी आहे.
  • Log in or register to post comments

म्हंजे? गणपा मिपाशेफ नाही?

यशोधरा
Wed, 03/26/2014 - 18:35 नवीन
म्हंजे? गणपा मिपाशेफ नाही?
  • Log in or register to post comments

गन्पाच मिशे आहे

आत्मशून्य
Wed, 03/26/2014 - 19:31 नवीन
अगदीकाल परवा स्थापन झालेला कोणताही विभाग ग्न्पाला आव्हानहि देउ शकणार नाही.
  • Log in or register to post comments

मग त्या विभागाने चुलिचे

आत्मशून्य
Wed, 03/26/2014 - 19:34 नवीन
प्रतिनिधित्व करत त्यांच्या भल्याचा कितीही आव आणो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हॅ:

रमताराम
Wed, 03/26/2014 - 19:35 नवीन
मुळीच नाही. गणपा हा चीनमधल्या एका शेफच्या पाकृ नि फोटो चोरून इथे टाकतो नि म्हणतो हा पदार्श मी केला म्हणून. बॅट्या लगेच त्यावर अकरा प्रश्न विचारतो आणि प्यारे त्यातल्या अंड्यांच्या एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो. आता पदार्थ नक्की कुठला झाला ते कधीच कळत नाही. -आयाराम रमताराम
  • Log in or register to post comments

हा आमच्या शेफवर गंभीर आरोप

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 19:45 नवीन
हा आमच्या शेफवर गंभीर आरोप आहे. पुरावा द्या. -प्यारेगुरुजी (छोटी दाढीवाले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पुरावा कशाला?

पैसा
Wed, 03/26/2014 - 19:51 नवीन
पुरावा कशाला, त्यापेक्षा जाळावा. म्हणजे आम्ही कितीही जीव तोडून आमचा स्टँड सांगितला तर तुम्ही पुरावे मागणार. याला काय अर्थ आहे? आमचे ररागुर्जी म्हणतात ते कबूल करा, पुढे सगळं संतुलित आहेच्च. आम्ही "आप" असल्याने पुराव्यांशिवाय बोलायचा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तो तुम्ही कसा काय नाकारता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कानात कुजबूज

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 19:54 नवीन
कानात कुजबूज (विषय गणपा मिपा शेफ होणार का नाही त्याचा सुरु आहे. 'आप' कहा से आये बीच में?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्याला काय झालं?

पैसा
Wed, 03/26/2014 - 20:00 नवीन
कोणत्याही धाग्यावर घुसून त्याचा खरडफळा करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. गणपाबद्दलच्या धाग्यावर "आप"च काय, आम्ही ओबामाला सुद्धा आणू शकतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>आम्ही ओबामाला सुद्धा आणू

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 20:03 नवीन
>>>आम्ही ओबामाला सुद्धा आणू शकतो! कुणीतरी रंगीबेरंगी आठवले! तुम्ही रिपब्लिकन डेमोक्रॅटीक काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅहॅ

पैसा
Wed, 03/26/2014 - 21:14 नवीन
का श्या देऊन र्‍यायले भौ? आमी अस्सल अति डावे देशी समाजवादी (पक्षी गोंधळी) हाव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बर्रोब्बर बोल्लात पैसातै.

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2014 - 11:28 नवीन
बर्रोब्बर बोल्लात पैसातै. "डाव" असल्याशिवाय सैपाक होतोय का कधी.. एक सूचना : पण डाव चं अनेकवचन डावे असं होत नस्तय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आणाच तुम्ही ओबामाला... 'आप'ला

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/26/2014 - 20:11 नवीन
आणाच तुम्ही ओबामाला... 'आप'ला त्याच्यासमोर निदर्शने करायचा बेत आहे. पण येवढ्या लांब जायला आम्हाला कोणीच चार्टर्ड फ्लईट द्यायला तयार नाही. मग आम्ही त्याला इमेलनं डिबेटचे आव्हान दिलं होतं. पण घाबरट कुठला, साधी पोचही नाही दिली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नवा फोन

रमताराम
Wed, 03/26/2014 - 21:03 नवीन
अहो त्याने म्हणे ब्लॅकबेरी बदलून अँड्रॉईड फोन घेतलाय नवा, त्यात काही मेसेज नि काही कॉन्टॅक्ट्स गायब झाले. त्यात तुमचा नि पुतीनचा नंबर लागलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आप बीच मे ही तो आया है|

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 20:02 नवीन
आप बीच मे ही तो आया है| :p =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शमत

रमताराम
Wed, 03/26/2014 - 20:52 नवीन
आत्मूदादांशी शमत हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अध्यात्म छोट्या किंवा मोठ्या

स्वप्नांची राणी
Wed, 03/26/2014 - 20:08 नवीन
अध्यात्म छोट्या किंवा मोठ्या दाढीने सिद्ध होते या विचारसरणीस सर्व विनादाढी अध्यात्मवाद्यांचा जोरदार आक्षेप..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो 'तुमचा' मुद्दा लक्षात

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 20:10 नवीन
हो 'तुमचा' मुद्दा लक्षात आल्यानं माझा मुद्दा अगदीच वेगळा असला तरी माघार घेतो. -अर्धवृत क्षिप्रचल केलेला प्यारेगुरुजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

छोटी असो

रमताराम
Wed, 03/26/2014 - 20:54 नवीन
छोटी असो वा मोठी, दाढी असो वा शेंडी. तिचा उल्लेख करणे हे आचारसंहितेचा भंग करणारे आहे हे नमूद करतो. संपादकांकडे तक्रार करून आपला आयडी रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ब्वार्र!

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 20:57 नवीन
ब्वार्र! तुमाला मारुतीची शिपटी चाल्त्या, गन्पतीची सोंड चालत्या आनि आमची दाडी डाचतीया व्हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पुरावा?

रमताराम
Wed, 03/26/2014 - 20:57 नवीन
हा आमच्या शेफवर गंभीर आरोप आहे. पुरावा द्या.>> पुरावा? आता हेच बघा. इतके फोटो टाकतो, इतक्या पाकृ टाकतो गणपा पण एकदा तरी हे पदार्थ प्रत्यक्ष भाऊ घातलेत कुणाला? सांगा बरं मंडली, मी म्हंतो ती गोस्ट सच्ची का नाय? निस्ता मिडीयावरून मी शेफ मी पाककलेचा एवढा विकास केला म्हणून बोंबलून र्‍हायला तो. -ररा शहा (जंगल दाढीवाले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आयला

रमताराम
Wed, 03/26/2014 - 20:58 नवीन
भलताच टायपो झाला ना भो. भाऊ नव्हे, खाऊ घातलाय का असा प्रश्न हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पण तो सच्चा हाय आणि काय हाय

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 20:59 नवीन
पण तो सच्चा हाय आणि काय हाय ते तिकडं बघून सांगतो. जरा दम काडा. न्हायतं तिकडंच वाचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

य: भयभीत: स मृतः

लॉरी टांगटूंगकर
Wed, 03/26/2014 - 21:57 नवीन
य: भयभीत: स मृतः हे वाचून गब्बर सिंग संस्कृतमध्ये ईमॅजीन झालेला आहे. आज रात्री भयाण स्वप्न पडणार, काही खरं दिसत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

गब्बर

रमताराम
Wed, 03/26/2014 - 22:49 नवीन
वैदिक काळातल्या गब्बरचेच उद्गार आहेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

गणपाच्या मिपाशेफ असण्याबद्दल

यशोधरा
Wed, 03/26/2014 - 20:29 नवीन
गणपाच्या मिपाशेफ असण्याबद्दल शंका घेतली जावी ह्याबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments

ह्या ठिकाणी शंका घेतली

प्यारे१
Wed, 03/26/2014 - 20:51 नवीन
ह्या ठिकाणी शंका घेतली जाण्याचं कारणच मुळात सगळ्या आरोपांच्या धगीतून गणपा सगळीकडून 'झाळला' जाऊन त्याच्या शेफत्वाचं अस्सल सोनं बाहेर यावं हे आहे. ;) (कोण म्हटलं ते फॅट बर्निंग असं नस्तं करायचं म्हणून ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असा काय?

पैसा
Wed, 03/26/2014 - 21:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कॉलिंग पेठकर काका

भाते
Wed, 03/26/2014 - 20:38 नवीन
या धाग्यावर पेठकर काकांचा एकही प्रतिक्रिया नाही! कॉकटेल/मॉकटेल सम्राट सोत्रि कुठे आहेत? त्यांना कोणी स्पर्धक आहे का? बाकी तुमचे चालु द्या! :)
  • Log in or register to post comments

बोंबला!

भाते
Wed, 03/26/2014 - 20:41 नवीन
काकांचा! 'काकांची' प्रतिक्रिया पाहिजे होते ना? स्वसंपादनाची सोय द्या रे मला!
  • Log in or register to post comments

१००

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 21:47 नवीन
१०० :D
  • Log in or register to post comments

आता १०१ करायचे म्हणून हो!!

सूड
Wed, 03/26/2014 - 22:07 नवीन
आता १०१ करायचे म्हणून हो!!
  • Log in or register to post comments

तस्स नाही ओ (हे लक्ष्यच्या

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 22:12 नवीन
तस्स नाही ओ (हे लक्ष्यच्या ष्ट्यालीत) *beee* ...मीच पहिला पर्तिसाद दिला :P आण मी शेंचुरीचा बी मीच दिला म्हणून त्येला महत्व हाय . :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मिपापण सिद्ध झालं हो!

स्पंदना
गुरुवार, 03/27/2014 - 04:58 नवीन
मिपापण सिद्ध झालं हो! मुळ धाग्याच्या दुप्पट प्रतिक्रिया विडंबनाला.
  • Log in or register to post comments

+१

सखी
गुरुवार, 03/27/2014 - 18:25 नवीन
मिपापण सिद्ध झालं हो! मुळ धाग्याच्या दुप्पट प्रतिक्रिया विडंबनाला. अपर्णाताईच आणि माज मत एकच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हुम्म्म्म

इरसाल
गुरुवार, 03/27/2014 - 10:28 नवीन
कोण गणपा ? धन्यवाद. (हे राहिलेच होते इतक्या धुमाकुळात मी टाक्ले !)
  • Log in or register to post comments

मला हा संघाचा (छुपा) डाव दिसतो

नाखु
गुरुवार, 03/27/2014 - 11:06 नवीन
प्रत्यक्ष मिपास्थान मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच मिपाकरांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे अप्वादात्मक उदाहरण सोडल्यास, इन जनरल गणपाशेठ अनेक कसोट्यांवर इतर अनेक सुगरणी/सुगरणे यांच्या बराच मागे आहेत. सध्या हुजरेवालांनी ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच "गणपा भक्तां कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा "ओसाडवाडि" तल्या "ठोकमत" मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गणपा शेठ च्या पाक-कला कार्याचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. हुजरेवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे. "आप्"लाच थंडा(पडलेला) गामा गंपाशेठ (अगदी) हलके घेणे
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sat, 03/29/2014 - 20:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

फ़ाश्टेष्ट शेंचुरी झाली

दिव्यश्री
गुरुवार, 03/27/2014 - 13:51 नवीन
फ़ाश्टेष्ट शेंचुरी झाली हॊऒऒऒऒऒ ... :) *OK* आणि आता शेंचुरी + हाप शेंचुरी कडे यशस्वी वाटचाल सुरु आहे हॊऒऒऒऒऒ :D धागाकर्त्याचे आणि ज्यांच्या नावाणे धागा चालू केला त्यांचे समस्त मिपा कुटुंबा तर्फे आभिनंदन . *good* *BRAVO*
  • Log in or register to post comments

हल्ली काऽऽऽऽऽय म्यागी बनवणारे

सूड
गुरुवार, 03/27/2014 - 14:48 नवीन
हल्ली काऽऽऽऽऽय म्यागी बनवणारे पण मिपाशेफ बनतात हों !! -मधली आळी,रत्नांग्री ;)
  • Log in or register to post comments

या असल्या कॉमेंटींमुळेच

आदूबाळ
गुरुवार, 03/27/2014 - 16:50 नवीन
या असल्या कॉमेंटींमुळेच मिपावर येण्याचं (क्रं)चीज होतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा