यष्टी
परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत.
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.
राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात.
आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ”
“अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली.
चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता.
मान्सं तमाकू थुकत व्हती.
बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली.
ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते.
जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं.
“यष्टी” समदे वराडले.
आण्णा हसत व्हते.
तेनी मला खांद्यावर बशिवलं.
लई लई दिसांनी.
मला यष्टी आवडली.
*शतशब्दकथा
Book traversal links for यष्टी
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाहा!
यष्टि आवाडली!
वेल्कम ब्याक आन्जाक्का !
लिहताना कोठुन गोळा करता ही प्रांजळ निरागसता ?
भारवाहक
काय सांगु अन्जाक्का आमच्या
मस्त...
मस्तच
स्वदेस सिनेमामध्ये ती
ती आमच्या पसरणीच्या
..
:-)
"तेनी मला खांद्यावर बशिवलं."
सुंदर.
गावात प्रथमच सुरु होणारी
मुक्काम गाडी
मुक्काम गाडीझकास.
सुंदर
आवडली..
आवडली यष्टी
किती सुंदर अन प्रभावशाली आहे
मस्तच!
आन्जाक्क्का लैच ब्येस !!!!
वा..
आभार
शतशत
तुम्ही आणि अन्य काही
मस्त ! भट्टी जमली आहे !
शतशब्दकथा
मस्त
मस्त
जगा / जग्या लय भारी
सुंदर!
मस्तच … मला हि भावतात तुमच्या
आवडली यष्टी.
मस्त !