✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

ज
जॅक डनियल्स यांनी
Mon, 08/05/2013 - 11:29  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! या लेखमालेपासून मी सापांची ओळख करून देतो आहे. विचार केला की, विषारी सापांपासून श्रीगणेशा करू. सापांची पुस्तकी ओळख-त्यांचे निवास स्थान, मादी किती अंडी घालते, रंगाची रेंज, भक्ष इ. तुम्हाला कुठल्यापण 'सरपटणाऱ्या' प्राण्यांच्या पुस्तकात मिळेल. संग्रही ठेवावीत अशी दोन पुस्तके म्हणजे " निलीमकुमार खैरेंचे-भारतीय साप " आणि थोडे अजून पैसे (~७०००रु.)टाकायचे असतील तर "अशोक कॅप्टन आणि रोम्युलस विटेकरांचे-Snakes of India, The Field Guide." अश्या प्रकारची मी पुस्तकी माहिती लिहिणार नाही, कारण तेवढा माझा अजून व्यासंग आणि अनुभव नाही. माझे सगळे लेख हे थोडी माहिती आणि जास्त स्वानुभवावर आधारित असतील. या सर्व भागातील फोटो माझा मित्र आमोद झांबरे आणि चिराग रॉय यांचे आहेत. आमोद झांबरे याने TIFR मध्ये wildlife conservation मध्ये मास्टर केले आहे आणि आत्ता उच्चशिक्षणाचे पर्याय शोधात आहे. त्याची पेशालीटी 'भारतीय विंचू' आहे, त्याने नवीन जाती पण शोधून काढल्या आहेत. चिराग हा प.बंगाल मध्ये राहून सापांवर संशोधन करतो. नाग ('बेक्कार' विषारी): आपल्याकडे महाराष्ट्र आणि गोवा मध्ये जो नाग मिळतो त्याला -चष्मा नाग (spectacled cobra)किंवा लोकांच्या भाषेत 'दहाचा आकडावाला नाग" म्हणतात. पुण्यामध्ये सदाशिव पेठ्तल्या वाड्याच्या जिन्याखाली,सहकारनगरमधील बंगल्यात-अडगळीच्या खोलीत, धनकवडीला चुली मध्ये, आंबेगाव पठारावर विहिरीमध्ये, लुल्लानगर मध्ये स्वीमींग तलावामध्ये,पार्वती जनता वसाहतीत मोरीच्या बोळात, (सिंहगड रस्ता) वडगाव बुद्रुक मधील इमारतीच्या पिण्याच्या प्यायच्या टाकीत आणि शेवटी कर्वेनगर मध्ये स्कूटर च्या डिक्कीत मला हा मिळाला आहे.( अजून अनेक जागा आहेत, पण हे अनुभव संस्मरणीय होते ;)). नागाचे अजून प्रकार भारतात सापडतात-मोनोसिलेट नाग (प.बंगाल) आणि काळा नाग(पंजाब,राजेस्थान इ.)पण आपल्या एकडे फक्त हा 'चष्मा' नाग सापडतो. नाग. खालचे फोटो बघा , म्हणजे समजेल की तो 'चष्मा' हा नागाच्या शिकाऱ्यांला घाबरवण्यासाठी असतो. म्हणजे आपण जसे अभियांत्रिकीच्या परीक्षेत १ पानाच्या जागी ५ पानी उत्तर लिहून परीक्षकाला गोंधळात टाकतो, तसला हा प्रकार ;). प्रत्येक नागाच्या फण्यावर वेगळी नक्षी (फेशन-फण्याची नक्षी )असते पण सगळ्यांचा उद्देश तोच असतो.ती फेशन मात्र फारच मोहक असते,नागपंचमीमुळे का होईना ती आपल्या सर्वांनी पाहिलेली असते.शास्त्रीयदृष्ट्या पण त्याचे महत्व म्हणजे त्यावरून नागाचा विझुअल जेनेटिक्स समजू शकते. फणा फणा १ नंतर चा हा फोटो बघा,आपण छत्री मिटतो तसा नाग फणा मिटतो आणि तो तसाच सरपटतो. त्यामुळे खूप वेळा कॉलवर नाग ओळखणे अवघड जाते, लोकं त्यामध्येच फसून अपघात करून घेतात. एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, त्यामधून त्याला फक्त समोरच्याला सांगायचे असते- "आपण लई डेंजर ए, पुढे आला तर बघ"...जर समोरच्याने वाट दिली तर तो लगेच कल्टी मारतो(दुनियादारी मधल्या साईनाथ सारखी ;)). शेवटचा पर्याय म्हणून चावतो, नागाला पण त्याच्या विषाची पूर्ण किंमत माहिती असते त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !). नाग १ जंगलात जे नाग राहतात ते वेगवेगळे बेडूक-सरडे , छोटे जंगली प्राणी, छोटे पक्षी इ.असे अनेक काही खातात पण पुण्यासारख्या शहरातील नागांना चविष्ट पर्याय कमी असतात. त्यांना जास्त करून काळे उंदीर, घुशी, बेडूक आणि कबुतरं,चिमण्या(माणसांनी मारून उरल्या असल्या तर ;)) इ. मिळतात. सगळे नाग १००% नॉनव्हेज खातात ,त्यामध्ये दुध, बत्तासे अश्या शाकाहारी गोष्टी येत नाहीत. फक्त विकसित बुद्धीच्या (??) माणूस प्राण्याला माहित आहे की गाईचे दुध त्यांच्या आचळातून कसे मिळवायचे आणि त्याचा खरवस कसा करायचा, ही गोष्ट नागांना (कुठल्या पण सापाला) येत नाही. उलट या विकसित माणसाने, अंधश्रध्येमुळे त्यांना दुध कोंबून अनेक वेळा गुदमरून मारलेले आहे. नागपंचमीच्या आधी १ महिना तहानलेले ठेवून, नंतर त्यांच्या समोर दुध काय 'जेडी' जरी ठेवली तरी ते अधाश्यासारखे पितील. दुध हे निसर्गात, (आंबे येतात तसे) नैसर्गिकरीत्या उबलब्ध नसते, त्यामुळे ते कुठल्या पण सरपटणाऱ्या प्राण्याचे खाद्य असूच शकत नाही. नागाचे विष हे मज्जासंस्थे वर हल्ला करते, म्हणजे मेंदुमधून जे आपले शरीर कार्यरत राहायला संदेशवहन चालते ते गंडवते. थोडक्यात म्हणजे जीमेल मध्ये असा व्हायरस टाकायचा की हळू हळू एक पण इमेल आपल्याला मिळणार नाही आणि शेवटी खाते बंद पडेल. नाग चावल्यावर, सुरवातीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, मग हळू हळू ऐक-ऐक क्रिया बंद पडत, कार्डियाक अरेस्ट होऊन माणूस दगावतो.(मिपाकर डॉ.खरे या वर जास्त प्रकाश टाकू शकतील.) आधी मिपावर एका प्रतिक्रियेत मी लिहिल्या प्रमाणे- हे विष poison नसून venom असते, ज्याचा फक्त रक्ताशी संबध आला तरच त्याचे दुष्परिणाम होतात. हे वेनोम नागाची थुंकी असते, त्यात प्रामुख्याने प्रोटीन,enzymes असतात की जे नागाला त्याचे भक्ष पचवायला मदत करतात. त्यामुळे जर आपण जर हे वेनोम प्यायले तर तो प्रोटीन शेक सारखे काम करेल, पण जर तोंडात किंवा पोटात जखम (ulcer) असेल तर वाट लागेल आणि कोणता माणूस ते पचवू शकेल की नाही ही पण एक शंकाच आहे. नागच्या (कोणत्याही विषारी सापाच्या) पिल्लामध्ये पण पूर्ण विकसित झालेल्या विष-ग्रंथी असतात, आणि विष पण मोठ्या नागापेक्षा जहाल असते. कारण विष-ग्रंथीचा आकार छोटा असल्यानेमुळे त्यांना कमी विषात जास्त मोठें भक्ष मारून पचवायचे असते.(त्यांना त्यांच्या आया ग्राईप वाटर पाजत नाहीत ;)). म्हणून लहान पिल्लू बघून त्याला हलगर्जी पणे हाताळायला जाऊ नका, ते पण मोठ्या नागासारखेच तुम्हाला पोचवू शकते. मोठा नाग जास्तीत जास्त साधारण पणे ~२११ mg विष टोचू शकतो,नाग कधीच एवढे विष टोचत नाही, एखादा पूर्ण वाढ झालेला माणूस ११ mg विषामध्ये राम म्हणू शकतो. नागाचे विषाचे गणित हे त्याच्या भक्षाच्या आकारानुसार बदलत असते( म्हणजे छोटा उंदीर असेल तर थोडे आणि घूस असेल तर जास्त विष)पण माणूस समोर आला तर त्याचे हे गणित चुकते आणि 'टू बी सेफर' तो जास्त विष टाकतो किंवा टाकत पण नाही.त्यामुळे नाग चावल्यावर, एकच उपाय -सरकारी रुग्णालय, पुढचे कार्य तिकडचे डॉ. बघून घेतील. भारतात सगळ्यात जास्त सर्पदंशाचे मृत्यू हे नाग चावल्याने होतात, भातशेतीत बेडूक खायला नाग येतात, आणि भात कापणीच्या वेळी विळा चालवताना किंवा चुकून पाय पडून नागदंश होतो. पुण्यामध्ये जिकडे शेत जमिनी घेऊन (सिंहगड रस्ता, आंबेगाव पठार इ.)घरे बांधली गेली आहेत तिकडे अजून खूप मोठें नाग निघतात आणि नाग दंश पण होतात. आधीच्या भाग २ मध्ये लिहिल्या प्रमाणे मी सिहगड कॉलेज मध्ये खूप मोठें (५-६ फुटी) नाग पकडले आहेत. नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणीखोडी काढली किंवा त्याला कोपच्यात घेतले तर त्याच्या सारखा दुसरा मोहक लढवय्या नाही. मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,सळसळणारी नागीण पहायचे भाग्य नशिबात असायला लागते. नागाबद्द्लच्या अंधश्रद्धा आणि माझे अनुभव पुढच्या भागात....

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
52543 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

इथला

मीनल
Sat, 08/10/2013 - 07:32 नवीन
http://myurmee.blogspot.com/2010/03/blog-post_03.html आमच्या घरी निघालेला हा साप कोणता?
  • Log in or register to post comments

मी आधी पण उत्तर दिले होते पण

जॅक डनियल्स
Sat, 08/10/2013 - 07:38 नवीन
मी आधी पण उत्तर दिले होते पण बहुतेक मधल्या काळात ते पुसले गेले. तो पूर्वेचा राजा साप (Eastern Kingsnake ) आहे. आमच्या कडे पण टेनसी मध्ये सापडतो. खूप शांत आणि बिनविषारी साप आहे. दुसरे साप हे त्याचे अन्न आहे. साप पाळणाऱ्या लोकांना अतिशय प्रिय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

थरारक लेख आहे

अमोल खरे
Sat, 08/10/2013 - 11:24 नवीन
जबरदस्त माहिती आहे. आमच्या बिल्डिंग खाली जाडजुड साप मिळाला होता. बहुदा अजगर होता. कुठुन कसा आला माहित नाही. बहुदा नॅशनल पार्क मधुन आला असावा. अजगर असल्याने काहीच मुव्हमेंट नव्हत्या. कोणाला तरी तो दिसल्यावर लगेच फोनाफोनी करुन पोलिस आणि एक सर्पमित्र आला. त्याने लगेच तो पकडला आणि त्यावर बहुदा फडकं टाकलं. मी घराच्या खिडकीतुन पाहत असल्याने नीट कळलं नाही, पण बहुदा फडक्यात गुंडाळुन त्याने तो पोत्यात टाकला. त्या फडक्यावर पाणी टाकायला तो बिचारा सर्वांकडे पाणी मागत होता, तर एकजण पाणी द्यायला तयार नाही. शेवटी अंगणात एकाने नळ दाखवला, त्या नळाचे पाणी त्याने घेतले आणि त्या अजगराला घेऊन तो गेला. मी सहज तीन मजले उतरुन त्याला पाणी नेऊन देऊ शकलो असतो, पण मी जाईपर्यंत कोणीतरी पाणी देईलच असं वाटुन मी नुसता बघत राहिलो ह्याची रुखरुख अजुन आहे. जॅक- अजगर अख्खा माणुस खातो असं म्हणतात ते खरं आहे का ? आणि त्या माणसाने खरोखर फडकं टाकलं होतं का ? म्हणजे असं फडकं टाकायची पद्धत आहे का ?
  • Log in or register to post comments

अजगराची अंधश्रद्धा लेखात मी

जॅक डनियल्स
Sat, 08/10/2013 - 23:34 नवीन
अजगराची अंधश्रद्धा लेखात मी माहिती देईन. समोर हालचाल दिसली की साप विचीलीत होतात आणि हल्ला करतात म्हणून अजगराला शांत करायला त्याने फडके टाकले होते. अशी पद्धत अजगरासाठी वापरली जाते कारण तो हल्ला करून चावतो. तो बिनविषारी असला तरी मोठा असल्यामुळे चावणे परवडत नाही. हे वाचून ती पद्धत कोणी वापरू नका, खूप धोक्याची पद्धत आहे ती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

छोटा गारूडी

चाफा
Sat, 08/10/2013 - 15:46 नवीन
Image removed. आठवला म्हणून इथे डकवला फोटो,
  • Log in or register to post comments

भारी लेख आणि लेखमाला..

चिगो
Sat, 08/10/2013 - 23:00 नवीन
भारी लिहितोयस, मित्रा.. पंचेस तर लैच जबराट हाणलेयत, भाऊ.. ;-) लगे रहो..
  • Log in or register to post comments

एका मित्राने अरुणाचल मधून धाडलेले काही फोटो...

भटक्य आणि उनाड
Sun, 08/11/2013 - 02:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

भटक्य आणि उनाड
Sun, 08/11/2013 - 02:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

भटक्य आणि उनाड
Sun, 08/11/2013 - 02:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

शिकार झालेला नाग !!!

भटक्य आणि उनाड
Sun, 08/11/2013 - 02:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फारच भारी फोटो आहेत.

जॅक डनियल्स
Sun, 08/11/2013 - 04:16 नवीन
फारच भारी फोटो आहेत. मोनोसिलेत नाग आहे. साधरण पणे एक दिवसात पचवून टाकले असेल किंग ने त्याला. साधरण पणे माणसाची ढवळाढवळ झाली तर साप त्याचे भक्ष ओकून टाकतो, पण इकडे नशिबाने तसे झालेले दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटक्य आणि उनाड

झकास लेखमाला !

पहाटवारा
Sun, 08/11/2013 - 03:33 नवीन
जेडि मित्रा , अनवट विषयावर लेखमाला लिहितोयस .. अन तुझि शैलीहि मस्त आहे... एक विनंती ..
आमोद झांबरे याने TIFR मध्ये wildlife conservation मध्ये मास्टर केले आहे आणि आत्ता उच्चशिक्षणाचे पर्याय शोधात आहे. त्याची पेशालीटी 'भारतीय विंचू' आहे, त्याने नवीन जाती पण शोधून काढल्या आहेत.
या तुझ्या "विंचूमित्रा" लाहि लिहिते कर .. नाहितर तूच त्याचा लेखविता धनी बन !
  • Log in or register to post comments

कल्पना चांगली आहे.

जॅक डनियल्स
Sun, 08/11/2013 - 04:09 नवीन
कल्पना चांगली आहे. मी त्याला विचारून बघीन. धन्यवाद्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

हा भाग एकदभ क ड क ! लै भारी!

जव्हेरगंज
Wed, 09/14/2016 - 20:14 नवीन
हा भाग एकदभ क ड क ! लै भारी!
  • Log in or register to post comments

हा घोणस आहे का? घराच्या

फुटूवाला
Sun, 03/06/2022 - 11:29 नवीन
Image removed. Image removed. हा घोणस आहे का? घराच्या खिडकीतून काढलेला फोटो आहे हा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा