उंदरांची शर्यत
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती.
कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे.
तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो.
एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे.
शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार.
हे कुठवर चालणार आहे.
माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता.
माणूस कधी होणार?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पण प्रत्येक स्पर्धेत आपले मुल
सारखे पाठीमागून हॉर्न वाजवणे
मुळात शालेय शिक्षणात पहिला
वाईट आहे
माझे म्हणणे
संस्कार महत्त्वाचे.
मुलांना बालपणाचा आनंद लुटू द्या
मला वाटतं मुख्य अडचण स्पर्धा
फक्त तिन तास... हे आयुष्य असतं ?
शिक्षणाचा आनंद
आनंद.
? शेवटी विषाणुंची मुले व
विकी डोनर विषाणू डोनेट करत
.
जाउद्या हो.
:D :D :D
.
धन्य!!!! _/\_
.
छान.
स्पर्धा हवी पण लहान मुलांना त्यात ढकलु नये
आज इंजिनियरिंग मध्ये जे
साधारण बुद्धिमत्ता असणा~या
व्वा! प्रतिसाद ऑफ द ईयर!!!!
हे एक तुमचं काय आहे की..
दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!!
चीनने गेल्या ३०
अच्छा.. आता तुमचा प्रॉब्लेम
देअर लाईज अ ट्रूथ
ब्येस्ट
तुम्ही मास्तर दिसताय
भारतामध्ये software हीं विकत
.
ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले..सर हे जरा एक्सप्लेन करा ना आणिसरकारने कारखानदारी संपवलीहे नाही पटलेएन.पी.ए चा नियम त्यामुळे
ठीक आहे
दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!!
घासा अमेरिकेची भांडी..अन
ओ.बी.सी समाजातिल कुंभार.
जन्माधिष्ठित व्यवसायाची पद्धत उत्तम होती
जन्मधिष्टीत व्यवसाय पद्धती कधीच कालबाह्य झाली आहे....
आमच्याकडंही असंच, आजोबा
डॉक्टर साहेब, आपली मुले
साहेब ,
पटले नाही
बलुतेदारीमुळे गावे स्वयंपूर्ण
बलुतेदारीमुळे गावे स्वयंपूर्ण
मजबुरीने खाजगी प्रश्र्ण सार्वजनीक ठिकाणी विचारत आहे..
ज्वलंत प्रश्न
व्यायामाची आवड..
प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रं मित्रम समाचरेत