मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनाचे कोडे

राजा सोव्नी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी , घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट, अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा , आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि, आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे, लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा, करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा, उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे

वाचने 2822 वाचनखूण प्रतिक्रिया 7

शशिकांत ओक 02/05/2013 - 00:13
आणि रविवारच्या रात्री, लावला बाम कपाळी । अन चोळली पाठ मोकळी।। म्हणे राजा, या बसा । करा कामाच्या लीला।। दमला फार करुनी कामे । माझ्या तोंड माऱ्याला दावा आता तोऱ्याला। हळुच सोडवुन नाडीला ।। पाहतो रोज वाट आता रविवारची। करीत कामे हाताने पटापट । स्वप्नात रंगतो रातिच्या झटापटीची।।

संजय क्षीरसागर 02/05/2013 - 14:12
नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये
ही सुविधा वापरावी

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 02/05/2013 - 19:51
बघा ना राव, बर्‍याच जणांना कळतच नाही. @मोदक, ह्या ह्या ह्या. (तुझ्या प्रश्नानंतरचे हे माझे उत्तर आहे.) ;)